Skip to content
Marathi Bana » Posts » Gudhi Padva is the most important festival in India | गुढीपाडवा

Gudhi Padva is the most important festival in India | गुढीपाडवा

Gudhi Padva is the most important festivals in India

Gudhi Padva is the most important festival in India | गुढीपाडवा हा भारतातील सर्वात महत्वाचा सण आहे; साडेतिन मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याचा दिवस, हा एक मुहूर्त मानला जातो.

गुढीपाडवा : साडेतिन मुहूर्त (दसरा, गुढीपाडवा व अक्षयतृतीया हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत तर, दिवाळी पाडवा म्हणजे कार्तिक शुध्द प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त) अशा साडेतिन मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याचा दिवस हा एक मुहूर्त मानला जातो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात या दिवशी करतात. या दिवशी इतर दिवसांप्रमाणे मुहूर्त पाहण्याची गरज नसते. (Gudhi Padva is the most important festival in India)

नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासुन सुरुवात होते. वसंत ऋतुचं आगमन गुढीपाडव्यापासून होतं. या शुभमुहूर्तावर  नवीन उदयोग किंवा व्यवसायाला सुरुवात करतात. नवीन वास्तुत गृहप्रवेश किंवा सोने खरेदी अशा अनेक महत्वाच्या कार्याची सुरुवात या दिवशी केली जाते. (Gudhi Padva is the most important festival in India)

Gudhi Padva is the most important festival in India
Gudhi Padva is the most important festival in India-marathibana.in

महाराष्ट्रात, गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो; गुढीपाडव्यापासून मराठी आणि कोंकणी लोकांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. हिंदू कॅलेंडरनुसार हा सण महाराष्ट्र आणि गोव्यात; शुक्ल पक्षाच्या चैत्र प्रतिपदेला साजरा केला जातो.

गुढीपाडवा हा सण देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो; कोंकणी लोक याला ‘संवत्सर’ म्हणतात. गौतमीपुत्राची सत्ता असलेली राज्य कर्नाटक व आंध्रप्रदेश मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद साजरा करण्याकरता; या दिवशी संवत्सर पाडवा ‘उगादी’ या नावाने हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे; तर, काश्मीरमध्ये ‘नवरेह’, मणिपूरमध्ये ‘सजिबू नोंगमा पानबा’ या नावानं ओळखला जातो. (Gudhi Padva is the most important festival in India)

गुढीपाडव्याचे महत्त्व (Gudhi Padva is the most important festival in India)

Gudhi Padva is the most important festival in India
Gudhi Padva is the most important festival in India-marathibana.in

हिंदु समाजात प्रत्येक कुटुंब आपापल्या घराच्या दारात गुढी उभारतात; गुढी हे विजयाचे, समृध्दीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतिक समजले जाते. प्रभू श्री राम हे रावणाचा पराभव करुन; चौदा वर्षाचा वनवास संपल्यानंतर, अयोध्येला गुढीपाडव्याच्या दिवशी परतले.

अयोध्या वासियांनी त्यांच्या आगमना प्रित्यर्थ आपापल्या दारात गुढया उभारुन; त्यांचे स्वागत केले होते. गुढीपाडव्यापासून रामजन्मोत्सवाला देखील सुरुवात हाेते आणि रामनवमीला रामजन्मोत्व साजरा केला जातो.

वाचा: Maharashtra Day History and all 2022 | महाराष्ट्र दिन

प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती; अशी पौरानिक कथा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान ब्रह्माची, विधीवत पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो अशी मान्यता आहे; आणि घरात सुख-समृध्दी, शांती व आनंद वाढतो. वाचा: Significance Of Red Colour In Weddings | लाल रंगाचे महत्व

गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व

चैत्र शुध्द प्रतिपदेचे, म्हणजे गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील फार महत्व आहे; या दिवशी सकाळी कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करतात. गुढी उभारल्यानंतर गुढीची पूजा करुन; कडुलिंबाचा बार म्हणजे बहर किंवा पाने, गुळ, ओवा, हिंग या सर्व वस्तू एकत्र करतात करतात; आणि प्रसाद म्हणून त्याचे सेवन केले जाते.

या प्रसादात वापरलेल्या विविध घटकांमुळे त्वचा विकार होत नाहीत; उलट त्वचेचे आरोग्य सुधारते. या मिश्रणामुळे पाचन सुधारते; त्याबरोबर पित्ताचा त्रास असल्यास थांबतो. त्यामुळे या प्रसादाचे आयुर्वेदात अतिशय महत्व सांगितले आहे. वाचा; Importance of Krishna Janmashtami | श्रीकृष्णजन्माष्टमी 2022

गुढीपाडवा कसा साजरा करतात?

Gudhi Padva is the most important festival in India
Gudhi Padva is the most important festival in India-marathibana.in

गुढीपाडवा खासकरुन महाराष्ट्रात, अतिशय उत्साहात; आणि अतिशय मोठया प्रमाणात साजरा केला जातो. लहान मुलांबरोबर मोठी माणसेही पाडव्याचया दिवशी नवीन कपडे घालतात; दारात रांगोळी काढतात.

गुढीपाडव्याचा सण कुटुंबातील सर्व सदस्यए मित्र मंडळी आणि नातेवाईक यांच्यासोबत; मोठ्या उत्साहात साजरा करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी खासकरुन; पुरणाची पोळी, आमटी, भात किंवा श्रीखंड पुरी व गोडभात बनवला जाते.

गुढीला या सर्व पदार्थांचं नैवेद्य दाखवतात; या दिवशी हिंदु बांधव एकमेकांना गुढीपाडव्याच्या; व नव वर्षाच्या शुभेच्छा देतात. वाचा: Importance of the Teachers’ Day | शिक्षक दिनाचे महत्व

Best Wish
Gudhi Padva is the most important festival in India-marathibana.in

गुढीपाडवा पूजा साहित्य

उंच बांबू किंवा लाकडी काठी, तांब्याचा कलश, नारळ, नवीन कपडा, पाच फळं, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार,  साखरेची गाठी, निरंजन किंवा समई, अगरबत्ती, पान-सुपारी, तांदुळ, हळद-कुंकू, इ. वाचा: Know All About Ganesh Chaturthi 2022 | गणेश चतुर्थी

गुढीची पूजा कशी करावी? (Gudhi Padva is the most important festival in India)

सकाळी लवकर उठून लिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करावे; आंब्याची पाने आणि फुलांची माळ तयार करुन घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावी. गुढी घराच्या समोर मुख्य प्रवेशद्वारावर; उभारावी. व नंतर गुढीची पूजा करावी. वाचा: What is the Importance of Ghatasthapana? | घटस्थापना

गुढी कशी उभारावी? (Gudhi Padva is the most important festival in India)

गुढी उभारण्यासाठी एक उंच बांबू किंवा काठी स्वच्छ धुऊन घ्या; त्या बांबू किंवा काठीच्या वरच्या भागावर नवीन कापड, साडी किंवा ब्लाउजपिस बांधा. त्यानंतर कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने; फुलांचा हार, साखरेची गाठी हे सर्व एकत्र बांधून त्यावर उपलब्ध असेल तो तांबे, पितळ, चांदीचा कलश; किंवा घरातील तांब्या उपडा ठेवा. वाचा: Know About the State of Maharashtra (I) | महाराष्ट्र राज्य

ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे; ती जागा स्वच्छ धुऊन-पुसून घ्यावी. त्या ठिकाणी रांगोळी काढावी; त्या जागेवर पाट ठेवून गुढीची काठी किंवा बांबू ठेवावा. गुढी घराचा दर्शनी भाग म्हणजे दरवाजा; उंच गच्ची किंवा गॅलरीत उभारावी.

गुढीची काठी नीट बांधून कलशाला गंध लावाव; फुले व अक्षता वाहून गुढीची पूजा करावी. त्यावेळी निरंजन किंवा दिवा लावून उदबत्ती ओवाळावी. प्रसादासाठी दूध, साखर, पेढे; किंवा आपल्याकडे असेल तो नैवेद्य दाखवावा. वाचा: What is Vaijayanti mala or Vana-mala? | वैजयंतीमाळ, वन-माळ

दुपारी गुढीला गोड नैवेद्य दाखवावा व संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन: गुढीला हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून मग गुढी उतरवावी. वाचा: Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकरसंक्रांती

गुढी पाडव्या बाबत पुराण कथा

गुढी पाडव्याबाबत एक कथा अशी आहे की, एका शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने, शकांचा पराभव करण्याकरता, 6,000 मातिचे पुतळे बनवले; आणि त्या पुतळयांमध्ये प्राण फुंकले. यांच्या सहाय्याने शकांचा पराभव करण्यात आला; तेव्हांपासुन शालिवाहन राजाच्या नावाने, नवीन कालगणना सुरु होण्याची प्रथा सुरु झाली; अशी पुराणातील कथा आहे.

वाचा: How to Celebrate Holi Festival in India | होळी उत्सव

Shiv Parvati
Gudhi Padva is the most important festival in India-marathibana.in

देवी पार्वती आणि महादेवाचा विवाह पाडव्याच्याच दिवशी ठरला असल्याची देखील कथा आहे; पाडव्यापासुन लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली; आणि तृतियेला त्यांचा विवाह संपन्न झाला. वाचा: How to Celebrate the Festival of Bail Pola? | बैल पोळा सण

पाडव्याच्या दिवशी देवी पार्वती म्हणजे आदिशक्तीची पुजा करण्याची प्रथा आहे; त्याला चैत्र नवरात्र असे देखील म्हणतात. देवी पार्वती विवाहानंतर महिनाभरासाठी आपल्या माहेरी येते; तिथे देवी वार्वतीचा कौतुक सोहळा साजरा करतात. त्या निमित्ताने हळदीकुंकवाचे आयोजन केले जाते. नंतर देवी पार्वती अक्षयतृतीयेला; आपल्या सासरी निघते. अशी ही पुराणातील एक कथा आहे.

|| आपणास गुढी पाडवा व नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ||

Related Posts

Related Post Categories

(टीप : या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील तज्ञ व्यक्तींशी संपर्क साधा.) 

Best healthy foods to eat in winter

Best healthy foods to eat in winter | हिवाळ्यातील आरोग्यदायी पदार्थ

Best healthy foods to eat in winter | हिवाळ्यात आपले शरीर निरोगी व उबदार ठेवण्यासाठी सर्वोत्तम आरोग्यदायी पदार्थ व त्यामधील ...
Know about the winter skincare tips

Know about the winter skincare tips | स्किनकेअर टिप्स

Know about the winter skincare tips | हिवाळ्यातील स्किनकेअर टिप्स, त्वचेसाठी मोकळा श्वास घेऊ देण्याचे मार्ग व तेजस्वी त्वचेसाठी सुपरफूड ...
Most effective ways to reduce obesity

Most effective ways to reduce obesity | लठ्ठपणा कमी करण्याचे मार्ग

Most effective ways to reduce obesity | लठ्ठपणा कमी करण्याचे सर्वात प्रभावी मार्ग जे रक्तातील साखर, उच्च रक्तदाब आणि असामान्य ...
pexels-photo-269077.jpeg

Know the Types of Real Estate | RE गुंतवणुकीचे प्रकार

Know the Types of Real Estate | रिअल इस्टेट गुंतवणुकीचे प्रकार, रिअल इस्टेट गुंतवणूक सुरू करणे, गुंतवणुकीच्या श्रेणी व रिअलइस्टेटमध्ये ...
Direct Equity Investment Plans

Direct Equity Investment Plans | थेट इक्विटी गुंतवणूक

Direct Equity Investment Plans | थेट इक्विटी गुंतवणूक, इक्विटी गुंतवणूक म्हणजे काय? इक्विटी गुंतवणुकीचे प्रकार, फायदे आणि तोटे घ्या जाणून ...
Know The Best PO Saving Schemes

Know The Best PO Saving Schemes | PO बचत योजना-2

Know The Best PO Saving Schemes | PO बचत योजना-2 विविध पोस्ट ऑफिस बचत योजना, त्यांची ठळक वैशिष्टये, देय व्याज, ...
How drinking water helps to lose weight?

How drinking water helps to lose weight? | पिण्याचे पाणी व वजन

How drinking water helps to lose weight? | अधिक पाणी पिण्याने वजन कमी करण्यात कशी मदत होते? यामुळे अधिक कॅलरीज ...
Importance of the skin health

Importance of the skin health | त्वचा आरोग्याचे महत्त्व

Importance of the skin health | त्वचा शरीरातील द्रवपदार्थ आत ठेवते, निर्जलीकरण प्रतिबंधित करते व हानिकारक सूक्ष्मजंतू बाहेर ठेवते. त्वचा ...
Know All About Low Blood Pressure

Know All About Low Blood Pressure | कमी रक्तदाब

Know All About Low Blood Pressure | कमी रक्तदाबाची कारणे, लक्षणे, निदान, चाचण्या, उपचार, जीवनशैली आणि घरगुती उपचार व रक्तदाब ...
Know The Benefits of Multani Mitti

Know The Benefits of Multani Mitti | मुलतानी माती

Know The Benefits of Multani Mitti | मुलतानी माती त्वचेचा तेलकटपणा कमी करते, मुरुमांशी लढण्यात मदत करते तसेच त्वचा टोन ...
Spread the love