Skip to content
Marathi Bana » Posts » Significance of Ram Navami in Indian Culture |रामनवमीचे महत्व

Significance of Ram Navami in Indian Culture |रामनवमीचे महत्व

Significance of Ram Navami in Indian Culture

Significance of Ram Navami in Indian Culture | भारतीय संस्कृतीमध्ये ‘श्री रामनवमी’ हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो. रामजन्मोत्सव व रामनवमीचे महत्व…

राम नवमी उत्सव संपूर्ण भारतभर दरवर्षी; अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करतात. भगवान श्री रामासाठी साजरा होणारा हा उत्सव लोक अत्यंत मनोभावे, आनंदाने, उत्साहाने व सामंजस्याने साजरा करतात. (Significance of Ram Navami in Indian Culture)

राम नवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे; चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. रामनवमी हा दिवस भगवान विष्णूचा सातवा अवतार; भगवान श्री राम यांचा जन्म म्हणून साजरा केला जातो.

हा उत्सव अयोध्येचा राजा दशरथ; आणि राणी कौशल्या यांच्या मुलाच्या रुपात भगवान विष्णूचा अवतार; म्हणून रामाचा जन्म साजरा केला जातो.

या दिवशी पुष्य नक्षत्रावर,; माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना; अयोध्येत श्री रामचंद्रांचा जन्म झाला. त्यामुळे चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. (Significance of Ram Navami in Indian Culture)

रामजन्मोत्सव सोहळा | Ramjanmotsav

रामनवमीच्या दिवशी; सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजे दुपारी ठिक 12.00 वाजता; रामजन्माचा सोहळा होतो. कारण प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर; म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला. 

श्री रामांच्या फोटोस किंवा मुर्तीस हार फुलांसोबतच गाठी घालतात; श्री रामांची पूजा करताना त्यानां करंगळीजवळच्या बोटाने; म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. तसेच श्री रामांना हळद-कुंकू वाहातांना आधी हळद व नंतर कुंकू; उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.

श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली आणि जाई-जूईची फुले वाहतात; त्यानंतर आरती करुन प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजर्‍या केल्या जाणाऱ्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. (Significance of Ram Navami in Indian Culture)

रामजन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत | Method of celebrating Ramjanmotsav.

भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो; रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. श्रीरामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन,पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करुन; हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.

काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत; रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे; कार्यक्रमही केले जातात. श्रीराम हे सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे; सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.

महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्वच राम मंदीरामध्ये रामनवमीचा उत्सव अतिशय आनंदात आणि थाटामाटात साजरा करतात. त्या प्रसंगी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (Significance of Ram Navami in Indian Culture )

Significance of Ram Navami in Indian Culture: रामनवमीचे महत्व
Significance of Ram Navami in Indian Culture-marathibana.in

कित्येक राममंदिरांमध्ये; चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. चैत्र नवरात्रामध्ये नऊ दिवस रामायनाचे पारायण, प्रवचन, भजन व किर्तनाचे कार्यक्रम आयाजित केले जातात.

रामायणाचे पारायण व राममूर्तीला विविध शृंगार परिधान करतात; नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हसमयी बाळाच्या डोक्याला कुची बांधून (एक वस्त्र) एक नारळ पाळण्यात ठेवून; तो पाळणा हालवतात व त्यावर गुलाल व फुले उधळतात.

काही ठिकाणी नारळाऐवजी; श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात. याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा म्हटला जातो; त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात व महाप्रसादाचे आयोजन करतात. फटाके फोडुन, रोषणाई करुन आनंद साजरा केला जातो; अशा प्रकारे हा उत्सव विविध प्रकारे साजरा होत असतो.

रामनवमीचे महत्व (Significance of Ram Navami in Indian Culture)

रामनवमीचे वेगवेगळया अर्थाने अतिशय महत्व आहे.

भगवान श्री राम यांचा जन्म; सूर्यवंशी इक्ष्वाकु वंशमध्ये; त्रेता युगात राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचा पुत्र म्हणून; अयोध्येत झाला होता. त्यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तारखेला झाला होता.

हिंदू शास्त्रानुसार; राम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे. म्हणून हा उत्सव देशभरातील हिंदूंमध्ये धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो.

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभु आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असुन; भारतीयांच्या हृदयात कायम विराजमान आहेत. भगवान श्रीरामाच्या येण्याने आणि त्यांच्या जगण्याने; संपुर्ण राष्ट्राला जगण्याचा मार्ग दाखविलेला आहे.

मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या आचरणातुन; प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे. संसारात राहुन सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकिय मर्यादा पाळत; पुरुष सदाचरणी राहु शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री प्रभु रामचंद्र होत.

वाचा: Know the early life of Lord Ram | श्रीरामाचे प्रारंभिक जीवन

Significance of Ram Navami in Indian Culture: रामनवमीचे महत्व
Significance of Ram Navami in Indian Culture-marathibana.in

प्रभु रामचंद्रांना तीन भाऊ होते; परंतु त्यांच्यात कधीही वाद झाले नाहीत. हे सर्व बंधु आपल्या सुखापेक्षा; इतर भावांच्या सुखाचा विचार अगोदर करत असत. माता कैकयी मुळे वनवास लाभला तरी देखील; त्या मातेचा प्रभु रामचंद्रांनी कधीही तिरस्कार किंवा व्देष केला नाही.

इतर मातांप्रमाणेच कैकयी देखील त्यांना कायम वंदनियच होती; प्रभु रामचंद्राची मातृपितृ भक्ती देखील आजच्या तरुणांकरता अनुकरणीय अशीच आहे. वाचा: श्रीकृष्ण जन्माष्टमी 2021

संस्कृतिरक्षक प्रभु श्रीराम (Significance of Ram Navami in Indian Culture)

प्रभु श्रीराम एकवचनी, एकबाणी, एकपत्नी, गुणवान पुत्र, राजधर्मचारी, होते; आणि हे सगळे गुण त्यांच्या अंगी असुन देखील या सर्व गोष्टींचा त्यांना अहंकार नव्हता. असे संस्कृतिरक्षक; श्रीराम होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा.

त्याच्यातील गुण आपल्याला कसे अंगिकारता येतील; या साठी श्रीरामाची शिकवण अंगिकारली पाहिजे. आलेल्या प्रसंगाचा धिरोदात्तपणे सामना करण्याची शिकवण आपल्याला प्रभु श्री रामचंद्राच्या जीवनाकडे पाहून मिळते.

महर्षी वाल्मिकी म्हणतात, ‘सदगुणांचा सर्वोच्च बिंदु म्हणजे प्रभु श्रीराम’ असे राज्याभिषेकाची बातमी कानावर पडली त्याक्षणी तो अत्यानंदीत झाला नाही; आणि पुढच्या काही क्षणांत अयोध्या सोडुन चैदा वर्षे वनवासाची बातमी कानावर पडल्यावर देखील; तो शोकमग्न झाला नाही.

वाचा: Know the various names of Durga | दुर्गा मातेची नावे

प्रभू श्री रामचंद्र आपल्या वडिलांनी दिलेली आज्ञा प्रमाण माणून वनवासाला निघतांना; किंचीतही डगमगले नाही. प्रभू श्री रामचंद्रांच्या अंगी असलेल्या अनेक सद्गुणांपैकी; एक गुण जरी आपण आपल्यामध्ये अंगिकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, याही अर्थाने रामनवमी साजरी करण्याचे महत्व आहेच. वाचा: वैजयंतीमाळ, वन-माळ

प्राचीन काळापासून ते वर्तमान युगापर्यंत; प्रभु श्री रामाचे विचार, कल्पना, तत्त्वज्ञान आणि शहाणपण; या देशाच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. धार्मिकतेचे प्रतीक म्हणून गौरवलेले, भगवान श्री राम; बुद्धी आणि संयमाचे उदाहरण स्वत:च्या आचरणातून दाखवून देतात. वाचा: Know the Importance of Navratri 2022 | नवरात्री उत्सव

सुख आणि दुःख व्यक्तीच्या जीवनात पर्यायी असतात; कौशल्य आणि दशरथ यांचा पुत्र भगवान राम; भगवान विष्णूचा सर्वात लोकप्रिय आणि सातवा अवतार आहे.

श्रीकृष्णाने आपल्याला जीवनशैली शिकवली आहे; हे आपल्याला माहीत असतानाही; आपल्यासाठी भगवान रामाच्या शिकवणी आणि राम-वाणी; खूप उच्च-तत्वज्ञान आहेत. आणि, जर आपण त्यातील एक टक्का जीवनात समाविष्ट केला; तरी आपण आपले जीवन सार्थ होईल. वाचा: Importance of the Teachers’ Day | शिक्षक दिनाचे महत्व

रामनवमीच्या निमित्ताने खालील तत्वे अंगिकारण्याचा प्रयत्न करा

Image by giant on Wallpapers.com

श्रीराम म्हणजे नम्र, सन्माननीय, आदर्श मानवी अस्तित्वाचाl परिपूर्ण अवतार आहे; ज्यांनी अत्यंत सौम्य मनोवृत्तीने आणि शांततेनेl आलेली परिस्थिती हाताळली; ते सत्य, न्याय आणि खरे हिंदुत्वाचे प्रतीक आहेतl त्यांचेकडून आपण खालील प्रेरणा घ्याव्यात. वाचा: Significance Of Red Colour In Weddings | लाल रंगाचे महत्व      

कधिही हार मानू नका (Significance of Ram Navami in Indian Culture)   

जेव्हा आपण ध्येय निश्चित करता; तेव्हा एक दिवस, आठवडे किंवा वर्षे देखील लागू शकतात; कधीही मागे हटू नका. सीतेला लंकेचा राजा रावण याने कैद केले होते; आणि आपल्या पत्नीचा  शोध घेताना रामाला बराच संघर्ष करावा लागला; परंतु, त्यांनी कधीही माघार घेतली नाही; किंवा सितेशिवाय परत जाण्याचा विचारही केला नाही. वाचा: अष्टविनायक

अंगी नम्रता ठेवा (Significance of Ram Navami in Indian Culture)  

श्रीराम हे सर्वात कुशल तिरंदाज होते; त्यांना सर्वात मोठ्या अस्त्र आणि शास्त्रांचे संपूर्ण ज्ञान होते. परंतु त्या सर्व शक्ती आणि ज्ञानामुळे; त्याच्या दृष्टीच्या मार्गात कधीच घमंडीपणा आला नाही; आणि त्याची नम्रता अतुलनीय आहे. तुम्ही जे करता त्यात तुम्ही सर्वोत्तम असू शकता; पण त्यात घमंड असू नये तर नम्रता असावी.   

मन शांत ठेवा (Significance of Ram Navami in Indian Culture)    

प्रभु श्री रामचंद्र यांनी महान युद्धे लढली; पौराणिक क्लेशकारक अनुभव आले; परंतु त्यांनी कधीही आपले मन विचलीत होऊ दिले नाही. परिस्थिती काहीही असो, शांत डोकं ठेवण्याचा प्रयत्न करा.

वाचा: How to Celebrate Holi Festival in India | होळी उत्सव     

आई – वडिलांच्या आज्ञेचे पालन करा आणि त्यांचा आदर करा    

प्रभु श्री राम यांनी वडिलांच्या निर्णयावर कधीच प्रश्न केला नाही; जरी त्यांना जंगलात भयानक आणि धोकादायक जीवन जगावे लागले तरी. ते आपल्या सावत्र आईच्या इच्छेनुसार वनवासात गेले; ते आदर्श बालक यांचे मूर्तिमंत रुप आहेत.

आपण कदाचित आपल्या पालकांच्या कृतींना मान्यता देत नाही; परंतु दीर्घकाळात त्यांनी आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी सर्वोत्तम निवड केली असेल. वाचा: Janmashtami and Dahi Handi | कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी      

पूर्वग्रह हा कधीच उपाय नाही   

जेव्हा रावणाचा भाऊ विभीषण रामाकडे आला; जेव्हा त्याला त्याच्याच राज्यातून हद्दपार करण्यात आले, तेव्हा रामाला व त्यांच्या अनुयायांना; याची खात्री नसतानाही त्याच्याबद्दल कोणताही पूर्वग्रह नव्हता.

जेव्हा त्या सर्वांना विभीषणच्या ज्ञानाचे मूल्य समजले; आणि त्याने त्यांना कशी मदत केली, तेव्हा त्यांना रामाची दूरदृष्टी दिसू लागली. पूर्वग्रह हा कधीच महत्त्वाचा नसतो; कोणाला काय वाटेल यापेक्षा तुम्हाला काय वाटजे हे महत्वाचे आहे. वाचा: How to Celebrate the Festival of Bail Pola? | बैल पोळा सण     

मित्र आणि भाऊ यांचे महत्त्व    

लक्ष्मण आणि हनुमान हे भगवान रामाचे भक्त होते; आणि ते रामाचे सर्वात जवळचे मित्र देखील होते. त्यांनी ते वारंवार सिद्ध केले आहे; एक भाऊ म्हणून, त्यांनी भरतवर राज्याचा भार आणि कुटुंबाची जबाबदारी सोपवली; आणि भाऊ शत्रुघ्नवर विश्वास ठेवला. आपणही आपले भावंडे हेच सर्वोत्तम मित्र आहेत असे नाते निर्माण करा.    

एकपत्नीत्व (Significance of Ram Navami in Indian Culture)

भगवान रामाने आपल्या आयुष्यात सीतेपेक्षा इतर कोणत्याही स्त्रीचा विचार केला नाही; जेव्हा त्याच्या पत्नीचे अपहरण केले गेले तेंव्हा; त्यांनी निकराने लढा दिला आणि पत्नीची सुटका केली. एकपत्नीत्वाचा गुण त्यांच्याकडून आपण घेतला पाहिजे.

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा “जय श्री राम”

वाचा:

(टीप : या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे.) 

Bachelor of Technology Courses

Bachelor of Technology Courses | बीटेक कोर्स यादी

Bachelor of Technology Courses | इयत्ता 12वी सायन्स नंतर बीटेक कोर्स आणि स्पेशलायझेशनची यादी, जी विदयार्थ्यांना उद्योगाच्या आवश्यकतांसह अवगत करेल ...
Read More
Diploma in Textile Design After 10th

Diploma in Textile Design After 10th | टेक्सटाईल डिझाईन

Diploma in Textile Design After 10th | 10वी नंतर टेक्सटाईल डिझाईन मध्ये डिप्लोमासाठी पात्रता, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, महाविदयालये, नोकरी व ...
Read More
Diploma in Accounting After 12th

Diploma in Accounting After 12th | डिप्लोमा इन अकाउंटिंग

Diploma in Accounting After 12th | डिप्लोमा इन अकाउंटिंग, पात्रता, प्रवेश प्रक्रिया, कौशल्ये, अभ्यासक्रम, प्रमुख महाविद्यालये, जॉब प्रोफाईल, नोकरीचे क्षेत्र, ...
Read More
B.Tech in Information Technology

B.Tech in Information Technology | आय.टी बी.टेक

B.Tech in Information Technology | माहिती तंत्रज्ञानातील बी. टेक, पात्रता निकष, प्रवेश प्रक्रिया, प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रम, विषय, करिअर पर्याय, भविष्यातील ...
Read More
Hotel Management Courses After 10th

Hotel Management Courses After 10th | हॉटेल मॅनेजमेंट

Hotel Management Courses After 10th | 10वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस, कोर्स अभ्यासक्रम, कालावधी, महाविदयालये, सरासरी फी व शंका समाधान ...
Read More
Bachelor of Technology in Automobile Engineering

Bachelor of Technology in Automobile Engineering

Bachelor of Technology in Automobile Engineering | बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक), ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग कोर्स, पात्रता, प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रम, महाविदयालये व ...
Read More
Know About IT Courses After 10th

Know About IT Courses After 10th | आयटी अभ्यासक्रम

Know About IT Courses After 10th | दहावी नंतर कमी कालावधीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करुन देणा-या आयटी अभ्यासक्रमांबद्दल जाणून घ्या ...
Read More
Know the top 5 Courses after 10th

Know the top 5 Courses after 10th | 10 वी नंतरचे 5 कोर्स

Know the top 5 Courses after 10th | अभियांत्रिकी, वैदयकिय, व्यवसाय व्यवस्थापन, प्रमाणपत्र व व्यवसायाशी संबंधीत महत्वाचे 10 वी नंतरचे ...
Read More
Know what to do after 12th?

Know what to do after 12th? | 12वी नंतर पुढे काय?

Know what to do after 12th? | 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर विदयार्थी त्यांच्या आवडीनुसार विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेची निवड करु ...
Read More
Best 5 Computer Science Courses

Best 5 Computer Science Courses | संगणक विज्ञान पदवी

Best 5 Computer Science Courses | सर्वोत्कृष्ट 5 संगणक विज्ञान अभ्यासक्रम, बीटेक, बीई, बीसीएस, बीएस्सी व बीसीए विषयी सविस्तर माहिती ...
Read More
Spread the love