Skip to content
Marathi Bana » Posts » Maharashtra Day History and all 2023 | महाराष्ट्र दिन

Maharashtra Day History and all 2023 | महाराष्ट्र दिन

Maharashtra Day History and all 2023

Maharashtra Day History and all 2023 | ‘महाराष्ट्र दिन’ हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व.

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस; म्हणून साजरा केला जातो. 1 मे, 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे; या दिवशी महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात; विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. या दिवसाचे खास वैशिष्टये म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 107 हुतात्म्यांचे स्मरण; या दिवशी केले जाते. (Maharashtra Day History and all 2023)

मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार

स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरु होती. मात्र राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देणं नाकारलं होतं. (On May 1, 1960, the Mumbai Reorganization Act came into effect. This act was a result of many protests and movements, that demanded the creation of an individual state. This demand for a separate state was first made by ‘The Sanyukt Maharashtra Andolan’.)

संयुक्त महाराष्ट्र चळवळ (Maharashtra Day History and all 2023)

Maharashtra Day Significance History and all marathibana.in-samyukta maharashtra movement - 1st May Maharashtra din
Maharashtra Day History and all 2023 marathibana.in

महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी 21 नोव्हेंबर 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली; या चळवळीने जाेर धरला असतानाच एक घटना घडली, आणि या घटनेनंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. (Maharashtra Day History and all 2023) 

वाचा: Economic Sources of Maharashtra-2 | महा. आर्थिक स्रोत

आंदोलन पेटले (Maharashtra Day History and all 2023)

Maharashtra Day Significance History and all marathibana.in-samyukta maharashtra movement which led to the states creation maharashtra
Maharashtra Day History and all 2023 marathibana.in

मराठी माणसांपासून मुंबई तोडली जात असल्याची एक चीड तेव्हा धुमसत होती; 21 नोव्हेंबर 1956 रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी; कामगारांचा एक भव्य मोर्चा फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात जमला. वाचा: Know the Culture in Maharashtra (I) |महाराष्ट्राची संस्कृती

फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते; कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले; त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. संपूर्ण राज्यभर लहान-मोठया सभा घेतल्या जात होत्या; व त्यामध्ये या निर्णयाचा निषेध केला जात होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी; फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. वाचा: How to Celebrate the Festival of Bail Pola? | बैल पोळा सण

गोळीबाराचे आदेश (Maharashtra Day History and all 2023)

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत; फ्लोरा फाउंटनकडे जमला. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला; फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. आंदोलकांची प्रचंड गर्दी वाढू लागली; सरकार विरोधी घोषणाबाजी सुरु झाली. फोर्ट परिसरातील जमावबंदी; आणि सभाबंदी मोडून नागरिकांनी बंड पुकारले. अनेकांनी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात रस्त्यावर बसून सत्याग्रह सुरु केला.

वाचा: Gudhi Padva is the most important festival in India | गुढी पाडवा

आंदोलकांना हटवण्यासाठी आणि मोर्चा पोलिसी ताकद वापरुन उधळून लावण्यासाठी; लाठीचार्ज करण्यात आला. त्याचा सत्याग्रहींवर कोणताही परिणाम झाला नाही. ते आपल्या निर्णयाशी ठाम होते; त्यामुळे पोलिस दलाचे हे प्रयत्न अयशस्वी झाले; आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री; मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 107 आंदोलक हुतात्मे झाले. वाचा: What is Vaijayanti mala or Vana-mala? | वैजयंतीमाळ, वन-माळ

हुतात्मा स्मारकाची निर्मिती

Maharashtra Day Significance History and all marathibana.in-Samyukt maharashtra smriti
Maharashtra Day History and all 2023 marathibana.in

हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे; मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मंजुरी मिळाली. हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेल्या फ्लोरा फाउंटन येथे राज्याच्या स्थापनेनंतर हुतात्मा चौक बांधण्यात आला; व त्यावर सर्व हुतात्म्यांची नावं कोरण्यात आली. हुतात्मा स्मारकाची स्थापना 1965 मध्ये झाली. (Maharashtra Day History and all 2023)

1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली; यामुळेच 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात. ज्या 107 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली; त्या हुतात्म्यांना नागरिक आजही नमन करतात.

वाचा: Indian Independence Day 2023 | भारतीय स्वातंत्र्य दिन

महाराष्ट्र स्वतंत्र, परंतू अखंड महाराष्ट्राचे स्वप्न अपूर्ण

भारत सरकारने भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेतला; या निर्णयाला अनुसरुन मराठी बहुल नागरिकांसाठी; महाराष्ट् राज्याची स्थापना करण्याची मागणी पुढे आली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा या मागणीला विरोध होता.

राज्यकर्त्यांचा हा विरोध पाहून नागरिक संतापले; संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली. ही चळवळ आक्रमक झाली; आणि अखेर नागरिकांची मागणी मान्य झाली.

केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मंजुरी दिली; पण आजही मराठी बहुल बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग कर्नाटकमध्ये आहे. तो महाराष्ट्राला जोडलेला नाही; यामुळे महाराष्ट्र राज्य स्थापन झाले, परंतू संयुक्त महाराष्ट्र चळवळीची असलेली अखंड महाराष्ट्राची मूळ मागणी पूर्ण झाली नाही; ते स्वप्न मात्र अपूर्णच राहिले.

मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान देणारे 107 हुतात्मे

१) सिताराम बनाजी पवार
२) जोसेफ डेव्हिड पेजारकर
३) चिमणलाल डी. शेठ
४) भास्कर नारायण कामतेकर
५) रामचंद्र सेवाराम
६) शंकर खोटे
७) धर्माजी गंगाराम नागवेकर
८) रामचंद्र लक्ष्मण जाधव
९) के. जे. झेवियर
१०) पी. एस. जॉन
११) शरद जी. वाणी
१२) वेदीसिंग
१३) रामचंद्र भाटीया
१४) गंगाराम गुणाजी
१५) गजानन ऊर्फ बंडू गोखले
१६) निवृत्ती विठोबा मोरे
१७) आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
१८) बालप्पा मुतण्णा कामाठी
१९) धोंडू लक्ष्मण पारडूले
२०) भाऊ सखाराम कदम
२१) यशवंत बाबाजी भगत
२२) गोविंद बाबूराव जोगल
२३) पांडूरंग धोंडू धाडवे
२४) गोपाळ चिमाजी कोरडे
२५) पांडूरंग बाबाजी जाधव

What is the domestic violence prevention act?: कौटुंबिक हिंसाचार

२६) बाबू हरी दाते
२७) अनुप माहावीर
२८) विनायक पांचाळ
२९) सिताराम गणपत म्हादे
३०) सुभाष भिवा बोरकर
३१) गणपत रामा तानकर
३२) सिताराम गयादीन
३३) गोरखनाथ रावजी जगताप
३४) महमद अली
३५) तुळशीराम पुंजाजी बेलसरे
३६) देवाजी सखाराम पाटील
३७) शामलाल जेठानंद
३८) सदाशिव महादेव भोसले
३९) भिकाजी पांडूरंग रंगाटे
४०) वासुदेव सुर्याजी मांजरेकर
४१) भिकाजी बाबू बांबरकर
४२) सखाराम श्रीपत ढमाले
४३) नरेंद्र नारायण प्रधान
४४) शंकर गोपाल कुष्टे
४५) दत्ताराम कृष्णा सावंत
४६) बबन बापू भरगुडे
४७) विष्णू सखाराम बने
४८) सिताराम धोंडू राडये
४९) तुकाराम धोंडू शिंदे
५०) विठ्ठल गंगाराम मोरे
५१) रामा लखन विंदा
५२) एडवीन आमब्रोझ साळवी
५३) बाबा महादू सावंत
५४) वसंत द्वारकानाथ कन्याळकर
५५) विठ्ठल दौलत साळुंखे

बलिदान देणारे 107 हुतात्मे

Adverse effects of media on children | मीडिया आणि मुले

५६) रामनाथ पांडूरंग अमृते
५७) परशुराम अंबाजी देसाई
५८) घनश्याम बाबू कोलार
५९) धोंडू रामकृष्ण सुतार
६०) मुनीमजी बलदेव पांडे
६१) मारुती विठोबा म्हस्के
६२) भाऊ कोंडीबा भास्कर
६३) धोंडो राघो पुजारी
६४) हृदयसिंग दारजेसिंग
६५) पांडू माहादू अवरीरकर
६६) शंकर विठोबा राणे
६७) विजयकुमार सदाशिव भडेकर
६८) कृष्णाजी गणू शिंदे
६९) रामचंद्र विठ्ठल चौगुले
७०) धोंडू भागू जाधव
७१) रघुनाथ सखाराम बीनगुडे
७२) काशीनाथ गोविंद चिंदरकर
७३) करपैया किरमल देवेंद्र
७४) चुलाराम मुंबराज
७५) बालमोहन

बलिदान देणारे 107 हुतात्मे
७६) अनंता
७७) गंगाराम विष्णू गुरव
७८) रत्नु गोंदिवरे
७९) सय्यद कासम
८०) भिकाजी दाजी
८१) अनंत गोलतकर
८२) किसन वीरकर
८३) सुखलाल रामलाल बंसकर
८४) पांडूरंग विष्णू वाळके
८५) फुलवरी मगरु
८६) गुलाब कृष्णा खवळे
८७) बाबूराव देवदास पाटील
८८) लक्ष्मण नरहरी थोरात
८९) ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
९०) गणपत रामा भुते
९१) मुनशी वझीरअली
९२) दौलतराम मथुरादास
९३) विठ्ठल नारायण चव्हाण
९४) देवजी शिवन राठोड
९५) रावजीभाई डोसाभाई पटेल
९६) होरमसजी करसेटजी
९७) गिरधर हेमचंद लोहार
९८) सत्तू खंडू वाईकर
९९) गणपत श्रीधर जोशी
१००) माधव राजाराम तुरे(बेलदार)
१०१) मारुती बेन्नाळकर
१०२) मधूकर बापू बांदेकर
१०३) लक्ष्मण गोविंद गावडे
१०४) महादेव बारीगडी
१०५) कमलाबाई मोहिते
१०६) सिताराम दुलाजी घाडीगांवकर
१०७) शंकरराव तोरस्कर

सारांष (Maharashtra Day History and all 2023)

अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र शंभुराजांच्या पराक्रमी आणि तेजस्वी, इतिहासाची साक्ष देतो.

शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात आघाडीवर असलेला महाराष्ट्र हुतात्म्यांचे बलिदान विसरु शकत नाही.

या राज्यातील महान संत, समाज सुधारक, राजकीय नेते यांनी राज्याच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासालाही दिशा देण्याचे काम केलेले आहे आणि करत आहेत. अशाप्रकारे सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या या माझ्या महाराष्ट्राला “मराठी बाणा” चा मानाचा मुजरा.

“Maharashtra Day History and all | महाराष्ट्र दिन” हा लेख आपणास कसा वाटला; या बद्दल आपला अभिप्राय व सूचना कमेंटमध्ये जरुर कळवा. आपला प्रतिसाद व शुभेच्छा आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत; त्या नवचैतन्य देतात व त्यामुळे नवीन लेख लिहिण्यास प्रेरणा मिळते. आपण हा लेख आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद…!    

Related Posts

Post Categories

शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Marathi Bana
Best healthy foods to eat in winter

Best healthy foods to eat in winter | हिवाळ्यातील आरोग्यदायी पदार्थ

Best healthy foods to eat in winter | हिवाळ्यात आपले शरीर निरोगी व उबदार ठेवण्यासाठी सर्वोत्तम आरोग्यदायी पदार्थ व त्यामधील ...
Know about the winter skincare tips

Know about the winter skincare tips | स्किनकेअर टिप्स

Know about the winter skincare tips | हिवाळ्यातील स्किनकेअर टिप्स, त्वचेसाठी मोकळा श्वास घेऊ देण्याचे मार्ग व तेजस्वी त्वचेसाठी सुपरफूड ...
Most effective ways to reduce obesity

Most effective ways to reduce obesity | लठ्ठपणा कमी करण्याचे मार्ग

Most effective ways to reduce obesity | लठ्ठपणा कमी करण्याचे सर्वात प्रभावी मार्ग जे रक्तातील साखर, उच्च रक्तदाब आणि असामान्य ...
pexels-photo-269077.jpeg

Know the Types of Real Estate | RE गुंतवणुकीचे प्रकार

Know the Types of Real Estate | रिअल इस्टेट गुंतवणुकीचे प्रकार, रिअल इस्टेट गुंतवणूक सुरू करणे, गुंतवणुकीच्या श्रेणी व रिअलइस्टेटमध्ये ...
Direct Equity Investment Plans

Direct Equity Investment Plans | थेट इक्विटी गुंतवणूक

Direct Equity Investment Plans | थेट इक्विटी गुंतवणूक, इक्विटी गुंतवणूक म्हणजे काय? इक्विटी गुंतवणुकीचे प्रकार, फायदे आणि तोटे घ्या जाणून ...
Know The Best PO Saving Schemes

Know The Best PO Saving Schemes | PO बचत योजना-2

Know The Best PO Saving Schemes | PO बचत योजना-2 विविध पोस्ट ऑफिस बचत योजना, त्यांची ठळक वैशिष्टये, देय व्याज, ...
How drinking water helps to lose weight?

How drinking water helps to lose weight? | पिण्याचे पाणी व वजन

How drinking water helps to lose weight? | अधिक पाणी पिण्याने वजन कमी करण्यात कशी मदत होते? यामुळे अधिक कॅलरीज ...
Importance of the skin health

Importance of the skin health | त्वचा आरोग्याचे महत्त्व

Importance of the skin health | त्वचा शरीरातील द्रवपदार्थ आत ठेवते, निर्जलीकरण प्रतिबंधित करते व हानिकारक सूक्ष्मजंतू बाहेर ठेवते. त्वचा ...
Know All About Low Blood Pressure

Know All About Low Blood Pressure | कमी रक्तदाब

Know All About Low Blood Pressure | कमी रक्तदाबाची कारणे, लक्षणे, निदान, चाचण्या, उपचार, जीवनशैली आणि घरगुती उपचार व रक्तदाब ...
Know The Benefits of Multani Mitti

Know The Benefits of Multani Mitti | मुलतानी माती

Know The Benefits of Multani Mitti | मुलतानी माती त्वचेचा तेलकटपणा कमी करते, मुरुमांशी लढण्यात मदत करते तसेच त्वचा टोन ...
Spread the love