Income Tax Return Filing Date Extended | आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची मुदत वाढली; AY 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे.
करदात्यांसाठी एक चांगली बातमी, प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 होती. ती 30/09/2021 करण्यात आली हाेती. पुन: आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2020-21 साठी; आयकर परतावा (ITR) भरण्याची अंतिम मुदत; 30 सप्टेंबर 2021 ऐवजी; ती आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. (Income Tax Return Filing Date Extended)
सध्या सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे; केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत; दोन महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे; सांगण्यात येत आहे. कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की; कोरोनामुळे कंपन्या आणि सामान्य करदात्यांशी संबंधित अनेक करांच्या तारखांची मुदत वाढविण्यात आली आहे. (Income Tax Return Filing Date Extended)
Table of Contents
प्राप्तिकराशी संबंधित तारखां बदलल्या आहेत
करदाते आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत ITR भरु शकतील
आर्थिक वर्ष 2020-21 साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2021 होती; ती वाढवून सर्वसामान्य नागरिक जे वैयक्तिक कर भरतात ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरु शकतील. पुन: आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2020-21 साठी; आयकर परतावा (ITR) भरण्याची अंतिम मुदत; 30 सप्टेंबर 2021 ऐवजी; ती आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. CDBT कडून इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या कलम 119 नुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवून दिली आहे. (Income Tax Return Filing Date Extended)
इन्कम टॅक्स ऑडिट रिपोर्ट भरण्यासाठी मुदतवाढ
इन्कम टॅक्स ऑडिट (Income for Tax Audit Assesses); भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 होती. ती आता वाढवून 30 नोव्हेंबर 2021 करण्यात आली आहे; त्याचबरोबर टॅक्स ऑडिट रिपोर्ट फायनल करण्याची अंतिम तारीख; 30 सप्टेंबर होती. ती वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे. (Income Tax Return Filing Date Extended)
भारतात असे अनेक कायदे आहेत ज्यात आयकर ऑडिट, स्टॉक ऑडिट, कॉस्ट ऑडिट; कंपनी किंवा कंपनीच्या कायद्यानुसार वैधानिक ऑडिट इ. प्राप्तिकर अधिनियम 1961 च्या कलम 44 एबी मध्ये; आयकर लेखापरीक्षणाची तरतूद देण्यात आली आहे. कर ऑडिट म्हणजे करदात्यांच्या खात्यांचा आढावा; अशा करदात्यांमध्ये स्वत: चा व्यवसाय असणारे किंवा व्यावसायिक सेवा पुरवणाऱ्यांचा समावेश आहे.
कंपन्यांसाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे
आयकर विभागाने कंपन्यांना देखील; इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढ दिली आहे. कंपन्या एक महिन्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न; भरु शकतात. आता कंपन्या 30 नोव्हेंबरपर्यंत गेल्या वर्षीचा इन्कम टॅक्स रिटर्न; भरु शकणार आहेत. सर्वसाधारणपणे नेहमी 31 ऑक्टोंबरला गेल्या आर्थिक वर्षातील; इन्कम टॅक्स रिटर्न कंपन्यांना भरावा लागतो, यावर्षी 30 नोव्हेंबरपर्यंत भरता येईल.
फॉर्म 16 भरण्याची तारीखही वाढवली फॉर्म 16 भरण्याची तारीखही वाढवली
आयकर विभागाने कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचा फार्म 16 भरणं गरजेचे असते; आता कोणतीही कंपनी 15 जुलैपर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांचे फॉर्म 16 भरु शकणार आहे.
बिलेटेड/ सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढ
बिलेटेड/सुधारित आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची मुदतही वाढवली असून शेवटची तारीख 31 जुलै 2022 ही असणार आहे. कर तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR); भरण्यासाठी मूळ मुदत संपल्यानंतर बिलेटेड रिटर्न भरले जाते. यासाठी करदात्यास दंड भरावा लागतो; सुधारित आयटीआर दाखल करणारा करदाता मूळ कर परतावा भरताना; काही त्रुटी असल्यास ते दाखल करु शकेल. यात क्लेमचा दावा विसरणे, उत्पन्न किंवा बँक खात्याचा अहवाल न देणे; इत्यादी चुका समाविष्ट आहेत. बिलेटेड आयटीआर प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 139(4) अंतर्गत दाखल आहे; त्याचबरोबर सुधारित आयटीआर कलम 139 (5) अन्वये दाखल केला आहे.
AY 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे
ITR दाखल करण्यापूर्वी, करण्यायोग्य गोष्टी आणि आवश्यक कागदपत्रे तपासा; जर व्यक्तींचे करपात्र उत्पन्न दरवर्षी 250,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरणे अनिवार्य आहे.
प्राप्तिकर नियमानुसार, ज्या लोकांनी आर्थिक वर्षात 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त वीज बिल भरले आहे; किंवा 2 लाख रुपयांपेक्षा जास्त परदेश प्रवास केला आहे; त्यांच्यासाठी आयटीआर भरणे देखील आवश्यक आहे. तथापि, तज्ञ सल्ला देतात की एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असले तरीही; त्याने कर विवरणपत्र दाखल करावे. परतावा दाखल केल्याने अनेक फायदे होतात.
या वर्षी आयकर विभागाने नवीन आयटीआर फाइलिंग पोर्टल सुरु केले आहे; रिटर्न भरण्यापूर्वी, या वर्षी तुम्ही पूर्ण करण्याच्या गोष्टींची यादी येथे आहे.
1. पॅन आणि आधार लिंक करा (Income Tax Return Filing Date Extended)
पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य आहे. आधार आणि पॅन लिंक केल्याशिवाय; तुम्ही आयटीआरला आधार-ओटीपी पर्यायाद्वारे ई-सत्यापित करु शकत नाही. पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.
2. बँक खाते आणि पॅन लिंक करा (Income Tax Return Filing Date Extended)
बँक खात्याशी पॅन लिंक करणे आवश्यक आहे कारण परतावा; थेट करदात्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. तसेच, बँक खात्याशी पॅन लिंक केल्याशिवाय; तुम्ही FD उघडू शकत नाही किंवा ठराविक मर्यादेपेक्षा रोख रक्कम जमा करु शकत नाही.
3. नियोक्त्याकडून फॉर्म 16, फॉर्म 16 ए कलेक्ट करा.
फॉर्म 16 तुमच्या वेतनातून कापलेल्या कराचा तपशील देतो; हे जारी करण्यासाठी नियोक्ता जबाबदार आहे. फॉर्म 16 ए बँकांसारख्या इतर कपातीद्वारे प्रदान केले जाते; फॉर्म 16 आणि फॉर्म 16 ए जारी करण्याची शेवटची तारीख; 31 जुलै 2021 होती. आयटीआर भरण्यासाठी तुम्हाला ते फॉर्म 26AS आणि बँक स्टेटमेंटसह पडताळणे आवश्यक आहे.
4. तुमचा भांडवली नफा कर दायित्व तपासा
शेअर्स, म्युच्युअल फंड, निवासी मालमत्ता, सोने इत्यादी कोणत्याही भांडवली मालमत्तेची विक्री केल्यानंतर; तुम्हाला भांडवली नफा कर भरणे आवश्यक आहे; जर तुम्ही आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान असे कोणतेही व्यवहार केले असतील तर; तुम्ही तुमची भांडवली नफा कर दायित्व तपासावे.
5. फॉर्म 15G/ 15H सबमिट करा (Income Tax Return Filing Date Extended)
तुमच्या बँक खात्यावर भरलेल्या व्याजावर कर कपातीची तरतूद आहे. तथापि, जर तुमच्याकडे करपात्र कंसात उत्पन्न नसेल तर; तुम्ही फॉर्म 15G /फॉर्म 15 H (जे लागू असेल) सबमिट करुन ही कर कपात टाळू शकता.
6. फॉर्म 26AS डाउनलोड करा (Income Tax Return Filing Date Extended)
फॉर्म 26AS हे तुमचे वार्षिक कर क्रेडिट स्टेटमेंट आहे; आयटीआर भरण्यासाठी हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. या वर्षी फॉर्म 26AS मध्ये अनेक बदल करण्यात आले; तुम्ही हा फॉर्म नवीन आयकर वेबसाइट, TRACES वेबसाइट; किंवा तुमच्या नेट बँकिंग खात्यातून डाउनलोड करु शकता. वाचा: Good News for Taxpayers | करदात्यांसाठी चांगली बातमी
7. इतर आवश्यक कागदपत्रे (Income Tax Return Filing Date Extended)
कर भरण्यापूर्वी तुम्हाला इतर काही कागदपत्रे हाताळण्याची गरज आहे. जसे:
- बँकेचे व्याज प्रमाणपत्र
- लाभांश उत्पन्नाचा तपशील
- गृहकर्जासाठी व्याज प्रमाणपत्र (असल्यास)
- कर भरण्यासाठी कर बचत गुंतवणुकीचा पुरावा
- वाचा: How to get one lakh monthly pension | दरमहा रु.1 लाख पेन्शन
Related Posts
- File your income-tax returns easily | ITR भरण्यासाठी महत्वाचे टप्पे
- What to do if you fail to file ITR in time? |वेळेत ITR भरला नाही!
- Important Questions About Income Tax | आयकर बाबतचे प्रश्न
Post Category
- शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Bachelor of Technology Courses | बीटेक कोर्स यादी
Read More

Diploma in Textile Design After 10th | टेक्सटाईल डिझाईन
Read More

Diploma in Accounting After 12th | डिप्लोमा इन अकाउंटिंग
Read More

B.Tech in Information Technology | आय.टी बी.टेक
Read More

Hotel Management Courses After 10th | हॉटेल मॅनेजमेंट
Read More

Bachelor of Technology in Automobile Engineering
Read More

Know About IT Courses After 10th | आयटी अभ्यासक्रम
Read More

Know the top 5 Courses after 10th | 10 वी नंतरचे 5 कोर्स
Read More

Know what to do after 12th? | 12वी नंतर पुढे काय?
Read More

Best 5 Computer Science Courses | संगणक विज्ञान पदवी
Read More