Marathi Bana » Posts » Corona Free Village Competition | कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजना

Corona Free Village Competition | कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजना

Corona Free Village Competition

“कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजना”, पारितोषिक, निकष व सर्व काही घ्या जाणून… (Corona Free Village Competition)

महाराष्ट्र राज्यातील, अनेक सरपंचानी व गावांनी कोरोनाला आपल्या गावाच्या वेशीच्या बाहेर रोखण्यासाठी; चांगले उपक्रम राबविलेले आहेत. अशा सर्व ग्रामपांचायतींच्या कामांची दखल घेत; मा.मुख्यमांत्री महोदयांनी राज्याच्या जनतेला उद्देशून केलेल्या भाषणामधून; याचा संदर्भ देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. मा.मुख्यमांत्री महोदयांच्या आवाहनानुसार; आपण आपले कुटुंब, आपला मोहल्ला, आपली वाडी-वस्ती, आपले गांव कोरोनामुक्त केले तर; तालुका, जिल्हा व राज्य कोरोनामुक्त होणेस वेळ लागणार नाही. (Corona Free Village Competition/ Corona mukta Gaon Spardha Yojana, prizes, criteria and everything…)

गावागावामध्ये कोरोना मुक्तीसाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे; व त्यासाठी स्पधा ठेवणे; त्यांचा यथोचित गौरव केला व ग्रामविकास विभागाअंतर्गत असलेल्या विकासकामांच्या निधीमधून; जादाचा निधी दिला तर; गावातील सरपंच; उपसरपंच, सदस्य, ग्रामसभामध्ये; कोरोनाचे काम करण्याची जिद्द उत्पन्न होईल. लोकांच्यामध्ये एकदा इर्षा तयार झाली की मग चांगले काम होईल. या हेतूने कोविड-19 व्यवस्थापनासाठी; कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजना सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. (Corona Free Village Competition/ Corona mukta Gaon Spardha Yojana, prizes, criteria and everything…)

शासन निर्णय (Corona Free Village Competition)

राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी  सर्व ग्रामपांचायतींनी कोरोनावर मात करण्यासाठी जिद्द उत्पन्न व्हावी यासाठी कोविड-19 व्यवस्थापनासाठी कोरोनामुक्त स्पर्धा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वाचा: कोरोना रुग्णांसाठी अतिशय दिलासादायक बातमी…

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायतीच्या स्तरावर खालील 5 पथकांची स्थापना करुन त्यांनी नेमूण दिलेली  कार्ये व निकषानुसार गुणांकन खालीलप्रमाणे दिलेली आहेत.

1) कुटुंबसर्वेक्षण पथक (ग्रामपांचायत प्रभाग निहाय)

सदर पथक वार्ड, तांडा, वाडी अथवा वस्तीनिहाय; गामपंचायत सदस्य, आरोग्यसेविका/अंगणवाडी सेविका/आशा वर्कर/ जिल्हा परिषद शिक्षक; तसेच अन्य संस्थेचा प्रतिनिधी (स्वयंसेवक) इत्यादी सदस्यांचा समावेश करुन संबंधित ग्रामपंचायतीनी पथकाची स्थापना करावी. वाचा: Quit Bad Habits│आता तरी बदला, आणि ‘वाईट सवयी’ सोडा…

कुटुंबसर्वेक्षण पथकांची कार्य (Corona Free Village Competition)

 • कुटुंबातील प्रत्येक सदस्याची कोविड-19 संबंधित आजाराची लक्षणे ऑक्सीजन पातळी, तापमान तसेच ताप, सर्दी, खोकला, थकवा आणि दतर लक्षणे बाधित  लोकांची नोंद घेणे. 
 • प्रत्येक कुटुंबाला भेट देताना कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करुन; कुटुंबातील वृध्द व्यक्ती, लहान मुले, गरोदर स्त्रीया यांची घ्यावयाची काळजी यांचे नियम समजावून सांगणे.  

श्वसनाशी संबंधीत आजार जसे की, दमा किंवा इतर आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, इ; आजाराची माहिती घेणे व तद्संबंधीत आजाराची व्यक्ती असल्यास त्या व्यक्तींची यादी करणे व त्यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करणे.

2) विलगीकरण कक्ष स्थापन करुन खालीलप्रमाणे काये करण्यात यावे  

Corona Free Village Competition-woman in gray knit cap and beige coat
Corona Free Village Competition-Photo by Anna Shvets on Pexels.com
 1. कोविड-19 विलगीकरण कक्ष सरकारी नियमानुसार संबंधित प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायतीमधील कार्यरत अधिकृत डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात यावे. त्यात दोन  स्वतंत्र कक्ष तयार करुन त्यामध्ये बाधित व्यक्ती आणि संपर्कातील व्यक्तींना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात यावे.
 2. यात गरम पाणी, स्वच्छ शौचालय याची नियमीतता ठेवणे.  
 3. कोविड बाधित रुग्णांच्या आहार व औषध उपचारावर नियमीत लक्ष ठेवणे.
 4. कोणत्याही रुग्णाचे लक्षणे वाढले असता तात्काळ हेल्पलाईन पथकातील डॉक्टरांना सूचित करणे.

3) कोरोना तपासणीसाठी व रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणा-या वाहनचालकांचे पथक.

Corona Free Village Competition-photo of ambulance parked in parking lot
Corona Free Village Competition-Photo by Nothing Ahead on Pexels.com

विलगीकरण कक्षातील लोकांना आवश्यकतेनुसार रुग्णालयात ॲडमीट करण्याची गरज असेल त्यासाठी गावातील उपलब्ध गाड्या त्यांच्या येण्या-जाण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील प्रतयके ग्रामपंचायतीने कोरोना तपासणीसाठी  व रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांचे पथक ग्रामपंचातीच्या स्तरावर गावातील वाहनचालकांची स्वयंसेवक म्हणून वनिड करुन पथकांची स्थापना करावी.

वाहनचालकांचे पथकांची काये (Corona Free Village Competition)

 1. आपल्या गाडयांना ड्रायव्हर सीटच्या मागे प्रोटेक्टिव्ह शिल्ड लावणे.
 2. रुग्णांना तयांच्या ठिकाणाहुन प्रोटेक्टिव्ह शिल्डच्या मागे बसुन हॉस्पिटलला घेऊन जाणे व लगेच गाडी  निर्जंतुक करणे.
 3. या पथकातील वाहन चालकांनी केलेल्या कार्यामुळे रुग्ण स्वत:च्या  कुटुंबातील व्यक्तींना तपासणीसाठी  घेऊन जाण्याची गरज कुटुंबातील व इतर व्यक्तीना पडली नाही त्यामुळे रुग्णा बरोबर थेट संवर्क टाळल्यामुळे कोविड -19 चा प्रसार रोखण्यास मदत होईल.

4) कोविड हेल्पलाईन पथक

Corona Free Village Competition
Corona Free Village Competition

सदर पथकामध्ये गावातील खाजगी डॉक्टर; प्राथमिक आरोग्य उपकेंद्र/ केंद्र येथील डॉक्टर, फॉर्मसी (औषध निर्माता); आणि इतर क्षेत्रातील लोकांचा समावेश करुन ग्रामपंचायतीने डॉक्टर हेल्पलाईन पथकांची स्थापना करावी.

डॉक्टर हेल्पलाईन पथकाची कार्ये

Doctors' Team
Corona Free Village Competition-Photo by RODNAE Productions on Pexels.com
 1. कोविड -19 POSITIVE आलेल्या रुग्णांना आवश्यक ते उपचार तातडीने डॉक्टरांचे सहाय्य घेऊन चालु करण्यास मदत करणे.
 2. रुग्णाची वेळोवेळी तपासणी करणे व आवश्यक तपासण्या नाममात्र दरात करणे.
 3. आवश्यकता असलेल्या रुग्णांना जिल्हयाच्या ठिकाणी मुख्य रुग्णालयात भरती करणे.
 4. रुग्ण ॲडमिट करताना बेडच्या उपलब्धतेबाबत व उपचारादरम्यान औषधांच्या कमतरतेबाबत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत करणे.
 5. विलगीकरण कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची ऑक्सीजन पातळी आणि  इतर बाबीचा आढावा घेणे.
 6. कोविड -19 या आजारानांतर जे काही शरीरात काही गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. उदा नविनच आढलेल्या MUCARMYCOSIS आजाराशी साधर्म्य  लक्षणाची माहिती देणे व पुढील उपचार संबंधीत हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचारासाठी पाठविण्याची व्यिस्था करणे.
 7. विशेष म्हणजे लहान मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी संबंधीत नियम वेळोवेळी कुटुंबापर्यंत पोहचविणे.

5) लसीकरण पथक

person holding syringe and vaccine bottle
Corona Free Village Competition- Photo by cottonbro on Pexels.com

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने; कोविड-19 लसीकरण करण्यासाठी तपासणीसाठी; ग्रामपांचातीच्या संबंधित वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक; आरोग्य केंद्र/ उपकेंद्र, आरोग्य सेविका/ आरोग्यसेवक, खाजगी डॉक्टर, स्वयंसेवक आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी अशा सदस्यांचा समावेश करुन पथकांची स्थापना करावी.

लसीकरण पथकांची काये (Corona Free Village Competition)

 1. शासकीय नियमनुसार वय वर्षे 45 च्या वरील; विशेषत: जुने आजार उदा. मुधुमेह, दमा, उच्च रक्तदाब इत्यादी असणाऱ्या व्यक्तींचे पथकाच्या माध्यमातून प्राधान्याने कोविड 19 चे लसीकरण करण्यात यावे.
 2. लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्याची यादी अगोदर तयार करुन त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयात स्वयंसेवकामार्फत नोंदणी करणे.
 3. लसीकरणा दरम्यान कुठेही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेणे.
 4. प्रथम कोविड प्रतिबंध लसीकरण 100% पुर्ण करण्यात येईल असे नियोजन करणे.
 5. गावातील नागरिकांची वेळोवेळी ANTIGEN TEST करण्यात यावी.

3. उपरोक्त निकषानुसार गुणांकन बाबतचे  स्वयंमुल्यांकन ग्रामपंचायतींनी तयार करुन 1 महिन्याच्या कालावधित संबंधित ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे पुरस्कारासाठी निवड होण्याच्या दृष्टीने सादर करावीत. गट विकास अधिकारी  यांनी पुरस्कार प्राप्त झालेल्या सर्व स्वयंमुल्यांकनाचे तपासणी करुन सर्वाधिक गुण प्राप्त 10 ग्रामपंचायतींची वनिड करुन मुख्य कार्यकारी अधिकारी, व जिल्हा परिषद यांच्याकडे गुणांसह यादी सादर करावी.

वाचा: Lockdown and Environment│लॉकडाऊन काळातील पर्यावरण

मुख्य कार्यकारी अधिकारी, व जिल्हा परिरषद यांनी प्राप्त गुणांकन यादी मधील गावांची तपासणी करुन व जिल्हयातून सर्वाध्कि गुण प्राप्त 3 गावांची शिफारस उपायुक्त (विकास ) , विभागीय आयुक्त कायालय यांच्याकडे सादर करावी. विभागीय आयुक्त (विकास) यांनी विभागातील सर्व जिल्हयाकडून प्राप्त झालेल्या गुणांकनाची पडमाळणी करुन विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने विभागवार प्रथम, व्दितीय  आणि तृतीय सर्वाधिक गुण प्राप्त होणाऱ्या ग्रामपंचायतींची अंतिम निवड करण्यात यावी. त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा. (Corona Free Village Competition/ Corona mukta Gaon Spardha Yojana, prizes, criteria and everything…) वाचा: पालकांनो सावधान! आपल्या मुलांच्या बाबतीतही ‘अस’ घडेल..! Mobile Phone and Children

4. ग्रामविकास विभागाच्या लेखाशीर्ष 2515 व 3054 या दोन्ही योजना मिळून प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना अनुक्रमे (1) रु. 50 लक्ष, (2) रु 25 लक्ष व (3) रु.15 लक्ष इतका निधी विकास कामांसाठी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार प्राधान्याने वितरीत करण्यात येईल.

5. ‘कोरोनामुक्त गाव’ स्पधेत विजेते ठरणा-या ग्रामपंचायतींना पुरस्काराची रक्कम दिली जाईल.

6. कोरोनामुक्त गाव स्पर्धासाठी; सोबतच्या परिशिष्ट- अ मधील निकषानुसार; सर्वात जास्त गुण प्राप्त ग्रामपंचायतीना राज्यातील 6 महसुली विभाग निहाय प्रत्येक महसुल विभागातुन प्रथम बक्षीस रु. 50 लक्ष, व्दितीय बक्षीस रु. 25 लक्ष व तृतीय बक्षीस रु. 15 लक्ष असे 3 विभागवार पुरस्कार रोखीने वितरीत करण्यात येईल.

7. आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना अंतर्गत; पुरस्कार वितरण व कोविड-19 व्यवस्थापन कोरोनामुक्त गाव स्पधेत विजेता ठरलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्काराची रक्कम जिल्हयाच्या ठिकाणी एकत्रित कार्यक्रमांत वितरीत करण्यात येईल.

8. या योजनांकरीता निवडण्यात येणारी ग्रामपंचायत शासनाकडून देण्यात आलेल्या सोबतच्या परिशिष्ट- अ मधील निकषांच्या आधारे गुणांकन पध्दतीने पारदर्शकपणे निवड करण्यात यावी.

9. परिशिष्ट- अ मधील निकषानुसार मुल्यांकण करुन गुण देण्यासाठी दिनांक 1 जून, 2021 ते दिनांक 31 मार्च, 2022  या कालावधीत ग्रामपंचायतींनी केलेले कार्य विचारात घेण्यात यावे.

सदर शासन निर्णय पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा, या निळया अक्षरातील शब्दांवर क्लिक करा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक 202106021446526320 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने  साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. वाचा: Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र शासन

“Corona Free Village Competition;”कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजना” हा लेख आपणास कसा वाटला; या बद्दल आपला अभिप्राय व सूचना कमेंटमध्ये जरुर कळवा. आपला प्रतिसाद व सुभेच्छा; आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत. त्या नवचैतन्य देतात व त्यामुळे ;नवीन लेख लिहिण्यास प्रेरणा मिळते. सर्व वाचकांना विनंती आहे की; ही माहिती आपल्या सर्व ग्रामपंचायतीपर्यंत पोहचवा; म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आपण हा लेख आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद…! 

All you need to know about sextortion

All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय?

All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय? सेक्सटोर्शनचे बळी होण्यापासून सावध राहण्यासाठी; तुम्हाला सर्व माहिती असणे ...
Read More
woman with face mask holding an alcohol bottle

All Information About Pharmacy Courses | फार्मसी कोर्सबद्दल

All Information About Pharmacy Courses | फार्मसी कोर्सबद्दल सविस्तर माहिती; प्रवेश प्रक्रिया, कौशल्ये, पात्रता निकष, अभ्यासक्रम, नोकरीच्या संधी, प्रमुख रिक्रूटर्स ...
Read More
Most Beautiful Flowers in the World

Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले

Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले; फुलांचे सौंदर्य, रंग, प्रकार, उगम व महत्व जाणून घ्या ...
Read More
How to Check Income Tax Refund?

How to Check Income Tax Refund? | टॅक्स रिफंड कसा तपासायचा?

How to Check Income Tax Refund? | आयकर विभागाने AY 2021-22 साठी आयकर परतावा जारी केला. तुम्हाला आयटी रिफंड मिळाला ...
Read More
Know the meaning of moles on the face

Know the meaning of moles on the face | चेह-यावरील तीळाचे अर्थ

Know the meaning of moles on the face | चेह-यावरील तीळाचे अर्थ, तीळ कशामुळे होतो; मोल्सचे प्रकार व मोल्सविषयी विविध ...
Read More
Know About the Importance of Makar Sankranti

Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांती

Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांतीचे प्रादेशिक, सामाजिक व धार्मिक महत्व; प्रादेशिक भिन्नता व रीतिरिवाज या ...
Read More
How to Get Rid of Pimples?

How to Get Rid of Pimples? | मुरुमांपासून सुटका कशी करावी?

How to Get Rid of Pimples? | मुरुम किंवा पुरळ हा एक सामान्य त्वचा रोग आहे; यापासून सुटका करण्यासाठी, नैसर्गिक ...
Read More
photo of woman tutoring young boy

The Role of Parents in the Success of their Children |मुलांचे यश

The Role of Parents in the Success of their Children | मुलांच्या यशात पालकांची भूमिका; मुलांच्या करिअरसाठी पालकांनी काय केले ...
Read More
A career in the Fashion Designing

A career in the Fashion Designing | फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर

A career in the Fashion Designing | फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर, कोर्सेस, अभ्यासक्रम पुस्तके, महाविदयालये, वेतन व कंपन्या फॅशन डिझायनिंग हे ...
Read More
Success is Around Yourself

Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे

Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे; फक्त ते शोधण्याची नजर हवी आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या आयुष्यात अनेक लोकांना ...
Read More
Spread the love