Eating Walnuts is the best way to lose weight | दररोज अक्रोड खाल्ल्याने वजन कमी होते. हृदयरोगचा धोका कमी होतो. यासह जाणून घ्या ‘अक्रोड’ खाण्याचे अधिक फायदे.
हल्ली लहान मुलांपासून ते मोठया व्यक्तींपर्यंत वजन वाढणे ही एक मोठी समस्या बनली आहे. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली जीवनशैली आणि आहारपद्धती. ज्यामुळे आपले आपल्या वजनावर आणि आरोग्यावर नियंत्रण राहिलेलं नाही. एकदा हे नियंत्रण सुटलं की मग ते आटोक्यात येणे फारच कठीण होते. आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम या दोन घटकांकडे आपण दुर्लक्ष करतो. मग त्याचे परिणाम काय होतात तर, पोट सुटणे, गाल फुगणे आणि शरीर अवाढव्य होणे. (Eating Walnuts is the best way to lose weight)
यापुढे आपण आपल्या संतुलित आहारामध्ये अक्रोडचा(eat walnuts) समावेश करा. जे तुम्हाला वजन कमी (loss weight) करण्यात मदत करेल. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्याबरोबरच अक्रोड कसे फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी सर्वात अगोदर चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा. आहारात कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करा. त्यासाठी अक्रोड अत्यंत फायदेशीर आहेत. भिजवलेले अक्रोड खाणं, वजन कमी करण्यासाठी मदत करतं. अक्रोडमधील गुणधर्म रक्तप्रवाह सुरळित ठेवतात. (Eating Walnuts is the best way to lose weight)
Table of Contents
‘अक्रोड’ खाण्याचे आरोग्यदायी फायदे
वजन कमी करण्यास मदत होते (Eating Walnuts is the best way to lose weight)

अनेकजन स्नॅक्समध्ये वेगवेगळे पदार्थ खातात; त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते. त्याऐवजी स्नॅक्समध्ये ओटस आणि अक्रोड एकत्र खाल्ल्याने पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते; भूक लवकर लागत नाही; त्यामुळे अवेळी खाणे टळते, चयापचय क्रिया सुधारते; ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते; अक्रोडमध्ये फायबर, प्रथिने आणि चरबीचे बरेच प्रमाण असते जे सर्व आपल्याला अधिक परिपूर्ण बनविण्यात मदत करते. (Eating Walnuts is the best way to lose weight)
हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते

अनेक देशातील तज्ञांच्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला गेला आहे की; कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी अक्रोड शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. अक्रोडमध्ये जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात; त्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅंगनीज मोठ्या प्रमाणता आढळते; त्याचबरोबर ओमेगा 3 फॅटी ॲसिडस् आणि लिनोलिक ॲसिड देखील आढळतेय; अक्रोडचे हे गुणधर्म हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
त्वचा तजेल आणि निरोगी राहण्यास मदत होते

अक्रोडमध्ये असलेले शक्तिशाली अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन ई आणि ओमेगा- 3 मुळे शरीराची त्वचा तरुण आणि निरोगी दिसण्यास मदत होते; हे सर्व घटक त्वचेतील कोलेजन वाढवण्यास मदत करतात. कोरड्या त्वचेपासून संरक्षण करण्यासाठी नियमित अक्रोडचे तेल देखील वापरु शकता; त्याचा फायदा त्वचा तरुण, आरोग्यसंपन्न आणि अधिक कोमल दिसण्यासाठी होतो. अक्रोड हे स्कीन स्क्रबसाठी वापरला जाणारा मुख्य घटक आहे. (Eat walnuts and lose weight)
स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते

अक्रोडला ब्रेन फूड म्हटलं जातं; आपल्या मेंदूचं स्वास्थ उत्तम राखण्यासाठी अक्रोड फायदेशीर आहे; अक्रोडमध्ये असलेले ओमेगा 3 मेंदूच्या कार्यासाठी तसेच आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे; ओमेगा-3 फॅटी ॲसिडस् मेंदूसाठी चमत्कार करतात. अक्रोड मध्यम प्रमाणात सेवन केल्यास मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते; नैराश्यापासून बचाव करण्यासाठी व सांधेदुखीसाठी अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-3 गुणकारी आहे. (Eat walnuts and lose weight)
भरपूर प्रमाणात उर्जा देते (Eating Walnuts is the best way to lose weight)

अक्रोडचा महत्वाचा फायदा म्हणजे अक्रोडमध्ये मोठया प्रमाणात बी जीवनसत्वे असतात; ज्यामुळे शरीरात उर्जा वाढते. शरीराची उर्जा वाढली की उत्साह वाढतो; त्यामुळे आळस कमी होऊन वजन कमी होतो. अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतं.
दाह कमी करण्यास मदत होते (Eating Walnuts is the best way to lose weight)
हृदयरोग, मधुमेह, अल्झायमर रोग आणि कर्करोग यासह अनेक रोगांमुळे जळजळ होते आणि ऑक्सिडेटिव्ह ताणामुळे ती वाढू शकते.
अक्रोडमधील पॉलिफेनोल्समुळे ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी करण्यास मदत करते; एलागिटॅनिन्स नावाच्या पॉलिफेनोल्सचे उपघटक जळजळ होण्यापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त असल्याचे आढळले आहे.
अक्रोड मध्ये ओमेगा -3 फॅट, मॅग्नेशियम आणि अमीनो ॲसिड अर्जिनिन देखील जळजळ कमी करु शकते.
निरोगी, मजबूत केस आणि नखांसाठी फायदेशीर

अक्रोड बायोटिन किंवा व्हिटॅमिन बी 7 चा एक चांगला स्त्रोत आहे; जो केस आणि नखे मजबूत करण्यास आणि जास्त वाढण्यास तसेच केस गळती रोखण्यासाठी मदत करतो; व्हिटॅमिन ई आपल्या केसांना आणि नखांना निरोगी चमक देण्यासाठी देखील मदत करु शकते. वाचा: Health Benefits of Soybean: सोयाबीनचे आरोग्यदायी फायदे
प्रकार 2 मधुमेह नियंत्रीत करण्यात मदत होते
अभ्यास व निरिक्षणानुसार असे सुचविले आहे की; अक्रोडमुळे टाईप २ मधुमेह नियंत्रीत ठेवण्यास मदत होते. कारण अक्रोड वजन नियंत्रित करण्यास मदत करते; जास्त वजन आपल्या रक्तातील साखर वाढविते त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. टाइप २ डायबिटीजग्रस्त लोकांसाठी अक्रोड अतिशय फायदेशीर आहेत. (Eat Walnuts and lose weight)
टाइप २ मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी कोल्ड-प्रेस केलेले अक्रोड तेल दररोज एक चमचा; नियमित मधुमेहावरील औषधे आणि संतुलित आहार घेतल्यास रक्तातील साखर कमी होते. वाचा:How to get rid of house lizards? | घरातून पाली घालविण्याचे उपाय
प्रोस्टेट व ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करते
अक्रोडला एक एन्टी कॅन्सर फूडदेखील म्हटलं जातं; अक्रोडमध्ये सर्वाधिक प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. अँटिऑक्सिडेंट्सच्या या गुणधर्मामुळे प्रोस्टेट आणि स्तनाचा कर्करोग रोखण्यास मदत होते. (Eat Walnuts and lose weight)
खोकला व दातांसाठी फायदेशीर (Eating Walnuts is the best way to lose weight)

अक्रोड खाणे आपल्या दातांसाठी खूप फायदेशीर आहे; अक्रोडाच्या झाडाच्या सालीपासून पावडर तयार करा त्यात चिमूटभर लवंग मिसळून दंत पावडर म्हणून वापरु शकता; त्यामुळे हिरड्या आणि दातांच्या इतर समस्या उद्भवत नाहीत.
वाचा: Know the Health Benefits of Pineapple | अननसाचे फायदे
जगातील प्रमुख अक्रोड उत्पादक देश (Eating Walnuts is the best way to lose weight)
अक्रोडच्या दोन प्रमुख प्रजाती आहेत; इंग्रजी अक्रोड आणि काळा अक्रोड. पर्शियामध्ये उगम झाल्यापासून याला; फारसी अक्रोड म्हणूनही ओळखले जाते. नंतरचे त्याचे मूळ उत्तर अमेरिकेत आहे; इंग्रजी अक्रोड व्यावसायिक स्वरुपात व प्रमाणात घेतले जात होते. कालांतराने असंख्य लागवडी विकसित केल्या गेल्या आहेत. वाचा Amazing Health Benefits of Almonds | असे खा बदाम
अक्रोड सामान्यतः थंड हवामानात चांगले वाढतात; उच्च तापमानामुळे पिकाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. साधारणपणे वार्षिक पाऊस सुमारे 800 मिमी असेल तर पिकाचे चांगले उत्पादन मिळते. वाचा: Eat Healthy and Live Happy | निरोगी खा आणि आनंदी राहा
प्रमुख अक्रोड उत्पादक देश
चीन
चीन हा जगातील सर्वात मोठा अक्रोड उत्पादक देश आहे; जगातील एकूण अक्रोड उत्पादनात चीनचा वाटा सुमारे; 50% आहे. हा देश जगातील अक्रोडचा सर्वात मोठा ग्राहक आहे. चीनमध्ये अक्रोडचा दरडोई वापर 1995 मध्ये फक्त 0.17 किलो वरुन; 2016 मध्ये 1.8 किलो पर्यंत वाढला आहे. चीनच्या दरडोई अक्रोडच्या वापराच्या दरात 24% वाढ; जागतिक सरासरी 5.8% च्या पुढे आहे. वाचा: Valache Birde A Wonderful Dish | वालाचे बिरडे एक अप्रतिम पदार्थ
युनायटेड स्टेट्स (यूएस)
अक्रोड उत्पादनात अमेरिकेचा जगात दुसरा क्रमांक लागतो; अक्रोडच्या जागतिक उत्पादनाच्या जवळपास; एक तृतीयांश देशात आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया; हे देशातील सर्वाधिक अक्रोड उत्पादक राज्य आहे. कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो आणि सॅन जोक्विन व्हॅली प्रदेश; अक्रोड उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. कॅलिफोर्नियातील जवळपास 4,900 शेतकरी अक्रोड पिकतात.
इतर प्रमुख अक्रोड उत्पादक राष्ट्रे
चीन आणि अमेरिकेचा जागतिक अक्रोड उत्पादनाच्या जवळपास; तीन चतुर्थांश वाटा आहे. युरोपियन युनियन, युक्रेन, चिली, तुर्की आणि मोल्दोव्हा; हे अक्रोड उत्पादनासाठी इतर प्रमुख देश आहेत. वाचा: Amazing Health Benefits of Ghee | तुपाचे आश्चर्यकारक फायदे
टीप: खूप चांगल्या असलेल्या पदार्थांचा अतिरेक चांगला नसतो; अक्रोड नियमित आहारात ठेवा पण योग्य प्रमाणात; आपणास जर अक्रोडची ॲलर्जी असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाचा: Lemonade and mint are useful in summer | पुदिन्यासह लिंबू पाणी
“Eat Walnuts and lose weight: ‘अक्रोड’ खा आणि वजन कमी करा” हा लेख आपणास कसा वाटला; या बद्दल आपला अभिप्राय व सूचना कमेंटमध्ये जरुर कळवा; आपला प्रतिसाद व शुभेच्छा आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत. त्या नवचैतन्य देतात व त्यामुळे नवीन लेख लिहिण्यास प्रेरणा मिळते; आपण हा लेख आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद…!
हेही वाचा:
- Amazing Benefits of Dates for Health | खजूराचे अद्भुत आरोग्य लाभ
- The Amazing Benefits of Coconut Water: नारळ पाण्याचे फायदे
- Amazing Health Benefits of Onions | कांद्याचे आरोग्यदायी फायदे
- शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Ganpati-8 Know all about Mahaganpati Ranjangaon | महागणपती

Ganpati-7 Know all about Vigneshwar Ozar | विघ्नेश्वर, ओझर

Ganpati-6 Know all about Girijatmaj Lenyadri | गिरिजात्मज, लेण्याद्री

What things give you energy? | कोणत्या गोष्टी तुम्हाला ऊर्जा देतात?

Ganpati-5 Know all about Chintamani Theur | चिंतामणी थेऊर

Ganpati-4 Know all about Varadvinayak Mahad | वरदविनायक, महाड

Ganpati-3 Know all about Ballaleshwar Pali | बल्लाळेश्वर, पाली

Ganpati-2 Know all about Siddhivinayak Siddhatek | सिद्धिविनायक

Ganpati-1 Know all about Moreshwar Morgaon | मोरेश्वर, मोरगाव

Pingback: Amazing Health Benefits of Dates: खजूराचे आश्चर्यकारक फायदे - मराठी बाणा
आपण दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्विकार व आपले आभार. असेच प्रेम असू द्या, धन्यवाद
Sincerely accept your likes, wishes and thank you for your compliments.
Pingback: Health Benefits of Soybean: सोयाबीनचे आरोग्यदायी फायदे - मराठी बाणा
Thanks for the likes and comments
Pingback: The Amazing Benefits of Coconut Water: नारळ पाण्याचे फायदे - मराठी बाणा
Thanks for your likes and comments
Pingback: Which is the best time to eat fruits? | फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ - मराठी बाणा
Pingback: Amazing Uses of Orange Peel | संत्र्याच्या सालीचे अप्रतिम उपयोग - मराठी बाणा
Pingback: Reasons for Drinking Coconut Water | नारळ पाणी का प्यावे? - मराठी बाणा
Pingback: Lemonade and mint are useful in summer | पुदिन्यासह लिंबू पाणी - मराठी बाणा
Pingback: Health benefits of the king of fruits | फळांच्या राजाचे आरोग्य फायदे - मराठी बाणा
Pingback: Best healthy foods to eat in summer | सर्वोत्तम आरोग्यदायी पदार्थ - मराठी बाणा
Pingback: How to make green bananas ripen faster | अशी पिकवा केळी - मराठी बाणा
Pingback: Amazing Health Benefits of Bananas | केळीचे आरोग्यदायी फायदे - मराठी बाणा
Pingback: Amazing Health Benefits of Ghee | तुपाचे आश्चर्यकारक फायदे - मराठी बाणा
Pingback: Amazing Health Benefits of Onions | कांद्याचे आरोग्यदायी फायदे - मराठी बाणा
Pingback: Good Foods for Students | विद्यार्थ्यांसाठी आहार | मराठी बाणा
Pingback: Valache Birde A Wonderful Dish | वालाचे बिरडे | मराठी बाणा
Pingback: Best Foods for Healthy Hearts | हृदयासाठी सर्वोत्तम पदार्थ | मराठी बाणा
Pingback: What is the right stage to eat banana? | केळी कशी खावी | मराठी बाणा
Pingback: What is the right time to eat banana? | केळी केंव्हा खावी? | मराठी बाणा
Pingback: Know the best foods for Senior Citizens | ज्येष्ठांसाठी | मराठी बाणा