Marathi Bana » Posts » Education from the Vision of Swami Vivekananda | शिक्षण विचार

Education from the Vision of Swami Vivekananda | शिक्षण विचार

Education in the Vision of Swami Vivekananda

Education from the Vision of Swami Vivekananda | स्वामी विवेकानंदांचे शिक्षण विचार, एकदा वाचा, आणि आपल्या मुलांना देखील वाचण्यास सांगा.

भारतीय आध्यात्म आणि तत्वज्ञानाची ओळख ख-या अर्थाने; समर्थपणे संपूर्ण जगाला स्वामी विवेकानंदांनी करुन दिली. त्यांनी आपल्या अनेक लेखांमधून आणि भाषणांमधून, मानवी धर्माचे; अतिशय सहज व सरळ वर्णन केले आहे. याबरोबरच मानवी जीवनात विकासासाठी शिक्षण किती महत्वाचे आहे; हे त्यांनी सांगीतले. शिक्षणाचे तत्त्वज्ञान राष्ट्रनिर्मितीसाठी आणि विकासासाठी किती महत्त्वपूर्ण आहे, हे सुद्धा त्यांनी पटवून दिले आहे. (Education in the Vision of Swami Vivekananda)

शिक्षणा विषयीचे स्वामी विवेकानंदांचे परखड मत

सध्याची शिक्षण व्यवस्था सर्व चुकीची आहे. विचार कसा करायचा हे जाणून घेण्यापूर्वी मनात तथ्य असते. आमच्या लोकांना शिक्षित करा, जेणेकरून ते त्यांच्या स्वत: च्या समस्या सोडवू शकतील. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत या सर्व सुधारणा केवळ आदर्शच राहतील आपल्यास हवे असलेले हे मानवनिर्मितीचे शिक्षण आहे. पुस्तके असंख्य आहेत आणि वेळ कमी आहे; म्हणून ज्ञानाचे रहस्य जे आवश्यक आहे ते घेणे महत्वाचे आहे. ते घ्या आणि त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करा.

‘दुसऱ्यांच्या काही गोष्टी परक्या भाषेमध्ये घोकंपट्टी करुन, पाठ करुन मेंदूत अखरश: कोंबून परीक्षा देता; व पास झाल्यावर मानू लागता की, आपण शिक्षित झालो, याला का शिक्षण म्हणायचे?, अत्यंत परखडपणे प्रचलित शिक्षणासंबंधी स्वामी विवेकानंदांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्व (Education from the Vision of Swami Vivekananda)

शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी पूर्णत्व हे अगोदरच अस्तित्वात आहे, विद्यमान आहे; फक्त त्याचे प्रकटीकरण करण्याची गरज आहे; अशी पायाभूत संकल्पना स्पष्ट करुन त्यांनी शिक्षणाचे महत्व विशद केले आहे. संपूर्ण शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करणे होय; ज्ञानप्राप्तीच्या काही मूलभूत आणि महत्वपूर्ण तत्वांची मिमांसा स्वामी विवेकानंद यांनी केली आहे.

वाचा: Adverse effects of media on children | मीडिया आणि मुले

ज्ञानसाधनेसाठी एकाग्रता हवी

Education from the Vision of Swami Vivekananda
Education from the Vision of Swami Vivekananda-Photo by Budgeron Bach on Pexels.com

ज्ञानसाधनेची एकमेव रीत म्हणजे एकाग्रता होय; हे सांगत असतांनाच ही एकाग्रताच ज्ञानाची एकमात्र गुरुकिल्ली होय. मनाच्या या एकाग्रतेसाठी; ब्रह्मचर्य अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन, स्वामी विवेकानंद यांनी केले आहे. असामान्य बौद्धिक व आत्मिक शक्तीचा अविष्कार; ब्रह्मचर्य पालनामुळेच होतो. विचार, उच्चार आणि आचार याबाबतीत सदासर्वकाळ सर्व प्रकारच्या अवस्थेत पावित्र्य टिकविणे म्हणजेच ब्रह्मचर्य होय; हे पण स्पष्ट करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंदांनी स्पष्ट केले आहे की; मनुष्याच्या विकासाचे मुळ श्रद्धा होय, हे विशद करताना त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय पुढील शब्दात स्पष्ट केले आहे.

वाचा: 10 Study Tips for Students: अभ्यास नको ! मग वाचा या टिप्स

शील आणि चारित्र्य निर्माण हे शिक्षणाचे तत्व

स्वामिजी सांगतात, श्रद्धेचा किंवा खऱ्या विश्वासाचा प्रचार; हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. मनुष्याचा विकास हेच शिक्षणाचे ध्येय असते; अर्थात यामध्ये श्रद्धा आणि विश्वासाचे स्थान महत्त्वपूर्ण असते. मनुष्याचे शील आणि चारित्र्य निर्माण हे शिक्षणाचे महत्वाचे तत्व होय; मनुष्याचे संस्कार आणि प्रवृत्ती, चारित्र्य निर्मितीसाठी अत्यावश्यक असतात. त्याच्या प्रवृत्ती आणि संस्कार; त्याच्या व्यक्तिमत्वाच्या सवयी आणि स्वभाव बनतात. शिक्षणाद्वारे मनुष्याच्या व्यक्तिमत्वात अशा प्रवृत्ती; आणि संस्कार अनायास निर्माण झाल्या पाहिजेत; असे स्वामी विवेकानंदांचे आग्रही प्रतिपादन आहे. अशा सर्व प्रवृत्ती आणि संस्कारामधून मानवी जीवनाचे कल्याण साध्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ असणे; हे शिक्षणाचे सर्वार्थाने ध्येय होय. शिक्षणाचे सर्वार्थाने ध्येयाचे विवेचन करुन स्वामींनी मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी पुढील बाबींचा उल्लेख केला आहे.

गुरु-शिष्य संबंध (Education from the Vision of Swami Vivekananda)

Education in the Vision of Swami Vivekananda-anonymous ethnic tutor helping little multiracial students with task in classroom
Education from the Vision of Swami Vivekananda-Photo by Katerina Holmes on Pexels.com

गुरु-शिष्य संबंधांची चर्चा करतांना, त्यांनी गुरुगृहवास ही त्यांची शिक्षणाची कल्पना असून; शिक्षक चारित्र्यवान असल्या खेरीज कोणत्याही प्रकारचे शिक्षण शक्य नाही, हे स्पष्ट केले. शिष्याच्या बाबतीत त्यांनी सांगीतले आहे की; शिष्यामध्ये पावित्र्य, ज्ञानोपार्जनाची खरी तृष्णा व चिकाटी, हे गुण आवश्यक आहेत. शास्त्रांचे मर्म गुरुला अवगत असणे महत्वाचे असून; त्याबरोबरच पापशून्यता ही दुसरी आवश्यक गोष्ट आहे. शिक्षकाविषयी त्यांनी आपले मत अतिशय परखडपणे व्यक्त केले आहे; ते म्हणतात की, शिक्षकाने पैसा किंवा नाव लौकिक मिळवणे किंवा पैसा मिळवणे या सारख्या स्वार्थी हेतूने शिक्षणाचे काम करु नये.

धर्म आणि शिक्षण (Education from the Vision of Swami Vivekananda)

Education in the Vision of Swami Vivekananda
Education from the Vision of Swami Vivekananda-Photo by Stas Knop on Pexels.com

स्वामी विवेकानंदांच्या मते धर्म हा शिक्षणाचा गाभा होय; धर्माची व्याख्या ही संकुचित नव्हे; तर एका व्यापक अर्थाने धर्माची व्याख्या प्रस्तुत केली आहे. धर्म म्हणजे अनंत बल, बल म्हणजेच पुण्य, दुर्बलता म्हणजेच पाप; अशा सहजसोप्या अध्यात्म संकल्पनातून; त्याचे मानवी जीवनातील तहत्व विशद केले आहे. शिक्षणात साध्य आणि साधन यांचा विचार करताना; साध्य इतकेच साधनेकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. एकदा आपण आपले ध्येय आणि त्याची साधने निश्चित केली; म्हणजे ध्येयाचा विचार सोडून दिला तरी हरकत नसल्याचे ते मानत असत.

स्त्री-शिक्षणाचे महत्व (Education from the Vision of Swami Vivekananda)

The importance of women's education
Education from the Vision of Swami Vivekananda-Photo by Anastasiya Gepp on Pexels.com

‘स्त्री-शिक्षणाचे महत्व विशद करताना स्वामींनी हे स्पष्ट केले आहे की, स्त्रियांचे जीवन विषादमय असेल; तर कोणत्याही कुटुंबांची वा देशाची उन्नती होण्याची आशाच नको.’ स्त्री जाती पुढील अनेक गंभीर प्रश्न शिक्षणाने सहज सुटू शकतील; असा स्वामींचा विश्वास आहे. सर्वसाधारण समाजाचे शिक्षण आवश्यक आहे, याकडे दुर्लक्ष करणे हेच आपले राष्ट्रीय पातक असून; घोर अध:पतनाचे मूळ कारण आहे. अशी अवस्था पाहून स्वामी विवेकानंदांच्या अंतकरणाला कसा पीळ पडतो; हे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. अशा शिक्षण विचाराच्या तात्विक विवेचनात स्वामी विवेकानंदांनी संदेशाच्या स्वरुपात म्हटले आहे. “आपले चारित्र्य बनवा, आपले ज्योतिर्मय, स्वयंप्रकाश, नित्य शुद्ध, वास्तविक स्वरुप प्रकट होऊ द्या.”

शिक्षणाचा वापर देशहितासाठी करा

man connection utp cables on switch hub inside room
Education from the Vision of Swami Vivekananda-Photo by Field Engineer on Pexels.com

प्रत्येक मनुष्य आयुष्यभर शिकतच असतो; जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही ज्ञान त्याला मिळत असते; किंवा तो ते प्राप्त करत असतो. अनेकदा आपल्याला मिळणारे ज्ञान, माहिती वा शिक्षण उथळ असू शकते; स्वामी विवेकानंदांनी खऱ्या शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आहे. जाणून घेऊया नेमके काय घडले. वाचा: The Role of the Teacher in Child Protection: बालसंरक्षण व शिक्षक

स्वामी विवेकानंदांची विद्यार्थ्यांसोबत ‘शिक्षण’ या विषयावर चर्चा

एक दिवस स्वामी विवेकानंद काही विद्यार्थ्यांसोबत ‘शिक्षण’ या विषयावर चर्चा करत होते; शिक्षण म्हणजे नेमके काय, हे तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का? असा प्रश्न विवेकानंदांनी विद्यार्थ्यांना विचारला. ज्ञान आत्मसात करणे म्हणजे शिक्षण, एक विद्यार्थी उत्तरला. शिक्षणाचा उद्देश नेमका काय असतो, या प्रश्नाची  विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. वाचा: Study Tips: अभ्यास विसरता, लक्षात राहात नाही, मग ही माहिती वाचा

त्यावर स्वामिजी म्हणाले, केवळ घोकंपट्टी म्हणजे शिक्षण नाही. मानवी शक्तींचा, व्यक्तिमत्वाचा  विकास झाला पाहिजे. असे शिक्षण उपयोगी पडते. त्यानंतर, एक विद्यार्थी म्हणाला की, शिक्षणामुळे आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यावर स्वामिजी म्हणतात, ती नवीन माहिती आपण पचवू शकू अशी असली पाहिजे. त्यासाठी आपण चारित्र्यसंपन्न बनले पाहिजे, आपल्यामध्ये समंजसपणा आला पाहिजे, नकारात्मकता दूर झाली पाहिजे, असे स्वामी उत्तरले. शिक्षण तेव्हाच सार्थकी लागते, जेव्हा विपरीत, प्रतिकूल परिस्थितींमध्ये त्याचा उपयोग करुन समस्येतून बाहेर पडता येईल. आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ कुटुंबाला नाही तर, समाजाला, देशाला, देशहितासाठी झाला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

वाचा: Mobile Phone and Children: पालकांनो! आपल्या मुलांकडे लक्ष द्या!

स्वामी विवेकानंदांचे म्हणणे ऐकून विद्यार्थी भारावले आणि स्वामीजींना आश्वस्थ केले की; आम्ही घेतलेल्या शिक्षणाचा वापर आम्ही अशिक्षित व्यक्तीला शिक्षित करण्यासाठी करु; चुकीच्या गोष्टी समाजात पसरवल्या जात आहेत, त्यावर जनजागृती करुन सत्य माहिती लोकांना सांगू; सत्य माहिती उजेडात आणण्यासाठी आमच्या शिक्षणाचा उपयोग करु. वाचा: Information on Education in Maharashtra: महाराष्ट्रातील शिक्षण

या गोष्टीला प्रारंभ केल्यास भारत विश्वगुरु बनेल; तो दिवस दूर नाही. भारतात विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती, व तंत्रज्ञान यांची माहिती; मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. याचा परिणाम असा होईल की; भारतीयांच्या कतृत्वाची दखल जागतिक स्तरावर देखील घेतली जाईल. यामुळे जगासमोर एक आदर्श उदाहरण प्रस्तापित होईल; यात शंका नाही. अशा प्रकारे स्वामी विवेकानंद यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले विचार मांडले.

सारांष | Conclusion (Education from the Vision of Swami Vivekananda)

स्वामिजी सांगतात की, जीवनाचे रहस्य आनंद घेण्याचे नसून अनुभवाद्वारे शिक्षण घेण्याचे आहे. संपूर्ण जीवनातील शिक्षणाचा एकच उद्देश आहे. आम्ही पुस्तके वाचू शकतो, व्याख्याने ऐकू शकतो आणि बराच वेळ बोलू शकतो, परंतु अनुभव म्हणजे एक शिक्षक, डोळा उघडणारा. हे जसे आहे तसे उत्तम आहे.

शिक्षण म्हणजे काय? हे पुस्तक शिक्षण आहे? नाही. हे वैविध्यपूर्ण ज्ञान आहे का? तसेही नाही. ज्या प्रशिक्षणाद्वारे विद्यमान आणि इच्छेची अभिव्यक्ती नियंत्रणात आणली जाते आणि फलद्रूप होतात त्यांना प्रशिक्षण म्हणतात. वाचा: The Role of Parents in the Success of their Children | मुलांच्या यशात पालकांची भूमिका

वाचा:
शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.
All you need to know about sextortion

All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय?

All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय? सेक्सटोर्शनचे बळी होण्यापासून सावध राहण्यासाठी; तुम्हाला सर्व माहिती असणे ...
Read More
woman with face mask holding an alcohol bottle

All Information About Pharmacy Courses | फार्मसी कोर्सबद्दल

All Information About Pharmacy Courses | फार्मसी कोर्सबद्दल सविस्तर माहिती; प्रवेश प्रक्रिया, कौशल्ये, पात्रता निकष, अभ्यासक्रम, नोकरीच्या संधी, प्रमुख रिक्रूटर्स ...
Read More
Most Beautiful Flowers in the World

Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले

Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले; फुलांचे सौंदर्य, रंग, प्रकार, उगम व महत्व जाणून घ्या ...
Read More
How to Check Income Tax Refund?

How to Check Income Tax Refund? | टॅक्स रिफंड कसा तपासायचा?

How to Check Income Tax Refund? | आयकर विभागाने AY 2021-22 साठी आयकर परतावा जारी केला. तुम्हाला आयटी रिफंड मिळाला ...
Read More
Know the meaning of moles on the face

Know the meaning of moles on the face | चेह-यावरील तीळाचे अर्थ

Know the meaning of moles on the face | चेह-यावरील तीळाचे अर्थ, तीळ कशामुळे होतो; मोल्सचे प्रकार व मोल्सविषयी विविध ...
Read More
Know About the Importance of Makar Sankranti

Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांती

Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांतीचे प्रादेशिक, सामाजिक व धार्मिक महत्व; प्रादेशिक भिन्नता व रीतिरिवाज या ...
Read More
How to Get Rid of Pimples?

How to Get Rid of Pimples? | मुरुमांपासून सुटका कशी करावी?

How to Get Rid of Pimples? | मुरुम किंवा पुरळ हा एक सामान्य त्वचा रोग आहे; यापासून सुटका करण्यासाठी, नैसर्गिक ...
Read More
photo of woman tutoring young boy

The Role of Parents in the Success of their Children |मुलांचे यश

The Role of Parents in the Success of their Children | मुलांच्या यशात पालकांची भूमिका; मुलांच्या करिअरसाठी पालकांनी काय केले ...
Read More
A career in the Fashion Designing

A career in the Fashion Designing | फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर

A career in the Fashion Designing | फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर, कोर्सेस, अभ्यासक्रम पुस्तके, महाविदयालये, वेतन व कंपन्या फॅशन डिझायनिंग हे ...
Read More
Success is Around Yourself

Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे

Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे; फक्त ते शोधण्याची नजर हवी आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या आयुष्यात अनेक लोकांना ...
Read More
Spread the love