Marathi Bana » Posts » Nag Panchami Festival 2021 the Best Information | नाग पंचमी

Nag Panchami Festival 2021 the Best Information | नाग पंचमी

Nag Panchami Festival 2021 the Best Information

Nag Panchami Festival 2021 the Best Information | नागपंचमी सणाचे महत्व, उपवास, झोका, कपडे, अलंकार, व नागपंचमी बद्दलच्या कथा घ्या जाणून…

भारतीय संस्कृतीमध्ये सणांच्या निमित्ताने; विविध वनस्पती आणि प्राणी यांना विशेष स्थान; आणि महत्व दिलेले आहे. हिंदू धर्मातील अनेक सण आणि उत्सव; वनस्पती आणि प्राणी या नैसर्गिक घटकांशी; संबंधीत आहेत. श्रावण महिन्यात येणा-या सनांपैकी नंगपंचमी हा एक सण आहे. श्रावण महिण्यातील शुक्ल पंचमीच्या दिवशी; नागपंचमी हा सण साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या घरी; नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागाची पूजा करतात. नाग भगवान शिवशंकर यांना प्रिय असल्यामुळे; नाग आणि भगवान शिवशंकर यांची पूजा करण्याची प्रथा आहे. (Nag Panchami Festival 2021 the Best Information)

Nag Panchami Festival 2021 the Best Information
Nag Panchami Festival 2021 the Best Information/Photo by Sanketh Rao on Pexels.com

नागपंचमीचे महत्व

नागपंचमी सणाच्या दिवशी; नागदेवतेचे दर्शन व्हावे म्हणून; घराच्या दरवाजावर नागदेवतेचे चित्र काढून; किंवा नागदेवतेच्या फोटोची पूजा केली जाते. वारुळ हे नागदेवतेचे घर आहे असे मानतात; त्यामुळे स्त्रिया वारुळाची पूजा करतात. पूजेसाठी फुले, दुर्वा, पाणी, दूध व लाह्या; नागदेवतेला अर्पण करतात. नागदेवतेची पूजा करुन; आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी अष्टनागमंत्राचा जपही केला जातो.

असे म्हटले जाते की, या दिवशी नागासोबत भगवान शिव आणि रुद्राभिषेक केल्याने; कालसर्पदोष दूर होतो; तसेच घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कारण नाग भगवान शिवशंकराच्या गळयात विराजमान आहे; आणि नाग पृथ्वीला संतुलित करतात; त्यामुळे नागपूजनाला पुराणामध्ये महत्व आहे.  

वाचा: Most Beautiful Birds: ‘आम्ही’ आहोत जगातील सर्वात सुंदर पक्षी

धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की; नागदेवता लक्ष्मीचे रक्षण करते. त्यामुळे धनसंपदा आणि समृद्धी मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते.

असेही मानले जाते की, भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीमध्ये; कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस म्हणजे; श्रावण शुक्ल पंचमी होता. तेंव्हापासून नागपूजेची प्रथा सुरु झाली.  वाचा: How to Celebrate the Festival of Bail Pola? | बैल पोळा सण

Nag Panchami Festival 2021 the Best Information/black and white snake on brown soil
Nag Panchami Festival 2021 the Best Information/Photo by Petr Ganaj on Pexels.com

नागपंचमी उपवासाचे महत्व

पुराणातील कथेनुसार, सत्येश्वरी नावाची दुय्यम दर्जाची एक देवता होती; त्या देवतेला सत्येश्वर नावाचा भाऊ होता. सत्येश्वरीच्या भावाचा मृत्यू नागपंचमी सणाच्या आदल्या दिवशी झाला; आपल्या भावाच्या शोकात सत्येश्वरीने त्या दिवशी अन्नग्रहण केले नाही; त्यामुळे स्त्रिया भावाच्या रक्षणासाठी या दिवशी उपवास करतात व नागाची पूजा करतात.

नागाची पूजा करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे; असे मानले जाते की, सत्येश्वरीला तिचा भाऊ नाग रुपामध्ये दिसला; त्यामुळे तिने त्या नागरुपाला, आपला भाऊ माणून पूजा केली; त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की, यापुढे कोणतिही स्त्री भाऊ म्हणून माझी पूजा करेल; त्या स्त्रीचे मी भाऊ म्हणून रक्षण करीन. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक स्त्री नागाला आपला भाऊ माणून नागाची पूजा करते. वाचा: Importance of the Teachers’ Day on 5th September | शिक्षक दिन

वाचा: Mobile Phone and Children: पालकांनो! आपल्या मुलांकडे लक्ष द्या!

नागपंचमीला झोका खेळण्या मागील कारण

Nag Panchami Festival 2021 the Best Information/back view photo of woman swinging
Nag Panchami Festival 2021 the Best Information/Photo by Afvzi on Pexels.com

सत्येश्वरीला दुस-या दिवशी तिचा भाऊ दिसला नाही; त्यामुळे ती अतिशय दु:खी झाली; व ज्ंगलात इकडून तिकडे सैरावैरा धाऊ लागली. झाडांच्या फांदयांवर चढून ती भावाचा शोध घेऊ लागली; त्यावेळी नागराज सत्येश्वराच्या रुपात प्र्कट झाले; ते पाहून सत्येश्वरीला प्रचंड आनंद झाला. आनंदाच्या भरात ती झाडाच्या फांदयांवर झोके घेऊ लागली; त्यामुळे स्त्रिया ना्गपंचमीच्या दिवशी झोका खेळतात.

वाचा:Effective ways to get rid of house lizards! पाली घालवण्याचे उपाय!

आपल्या भावासाठी सत्येश्वरीने केलेला शोक पाहून; नागदेव प्रसन्न झाले; त्यांनी तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र व अलंकार दिले. तेंव्हापासून नागपंचमी सणाच्या दिवशी; स्त्रिया व मुली अलंकार व  नवीन वस्त्र परिधान करतात.   

नागपंचमीच्या दिवशी काय करु नये

नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगरणी करु नये; टिकाव किंवा कुदळीसारख्या टोकदार अवजाराने जमीन खणू नये; विळी किंवा चाकूने भाज्या चिरु नयेत; खाण्याचे पदार्थ तळू नयेत, चुलीवर तवा ठेवू नये; असे विविध संकेत या दिवशी पाळले जातात. 

वाचा: Various Welfare Schemes for Registered Workers | नोंदणीकृत कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना

ग्रामीण स्त्रिया हा सण कसा साजरा करतात

नागपंचमिच्या सणाच्या निमित्ताने मुली माहेरी येतात; नागपंचमीच्या सणाच्या दिवशी गावातील स्त्रिया; पारंपारिक वेषभूषा करतात. सणाच्या निमित्ताने माहेरी आलेल्या व गावातील सर्व स्त्रिया; एकत्र जमतात. वाजतगाजत सर्व स्त्रिया वारोळाला जातात; तेथे नागदेवतेची म्हणजे वारोळाची फुले, हळद, कुंकु, दूध व लाह्या वाहून पूजा करतात. गावातील उंच झाडांना बांधलेले झोके; टोळक्या-टोळक्याने जाऊन खेळतात. संध्याकाळी पुन्हा सर्व स्त्रिया एकत्र जमून फेर धरतात; व नागोबाची गाणी गात हा सण अतिशय उत्साहाने व आनंदी वातावरणात साजरा करतात. वाचा: Importance of Krishna Janmashtami | श्रीकृष्णजन्माष्टमी 2021

नागपंचमी सणाबाबतची कथा (Nag Panchami Festival 2021 the Best Information)

grey and brown snake opening mouth
Nag Panchami Festival 2021 the Best Information/ Photo by Donald Tong on Pexels.com

श्रावण महिण्यातील बहुतेक सणांना; इतिहासाची पार्श्वभूमी आहे. वेगवेगळया कथांच्या स्वरुपात हा इतिहास; एका पिढीकडून दुस-या पिढीकडे कथांच्या रुपाने पोहोचवला जातो. नागपंचमी सणाबाबत अनेक कथा आहेत त्यापैकी एक प्रचलीत कथा खाली दिलेली आहे.

एका राज्यामध्ये एक गरीब शेतकरी; आपली पत्नी, दोन मुले व एक मुलगी यांच्या बरोबर राहात होता. त्या शेतक-याच्या शेतामध्ये एक वारुळ होते; त्या वारुळामध्ये एक नागीन आपल्या पिल्लांबरोबर रहात होती. शेतकरी आपले शेत नांगरत असताना; च्याकडून त्या वारुळातील नागाची तीन पिल्ले चिरडून मारली गेली. मरण पावलेल्या पिल्लांना पाहून; नागिणीने प्रचंड आक्रोश केला. माझ्या पिल्लांना मारणा-यास मी सोडणार नाही; अशी सूडाची आग त्या नागिणीच्या मनामध्ये धगधगू लागली. सूड घेण्यासाठी एके दिवशी रात्री नागीण; शेतक-याच्या घरात घुसते. तेथे शेतकरी, त्याची पत्नी व दोन मुलांना दंश करुन ठार मारते.

वाचा:GAS CYLINDER: ‘गॅस सिलिंडर बाबत तुम्हाला ‘हे’ माहित आहे का?

अजुनही नागिणीची सुडाची आग शमलेली नव्हती; कारण शेतक-याची मुलगी अजून जिवंत होती. तिला दंश करण्यासाठी नागीन पुन्हा; शेतक-याच्या घरी जाते. नागिणीने आपले आई-वडील व भाऊ; यांना दंश करुन मारले होते; तरी, ती घरामध्ये नागदेवतेचे चित्र काढून पूजा करत होती; हे नागदेवतेने पाहिले. आपण या मुलीच्या आई-वडिलांना व तिच्या दोन भावंडाना ठार मारले असताना देखील; ही मुलगी आपली पूजा करत आहे; तिची श्रद्धा व भक्ती पाहून नागदेवता तिच्यावर प्रसन्न होते; व त्या मुलीचे आई-वडील व भाऊ यांना पुन्हा जिवंत करते. तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा; त्यामुळे या दिवसापासून; श्रावण महिण्यात येणा-या पंचमीला नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी; नागाची पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जाते. वाचाा: वाचा: What is New BH Bharat Series? | नवीन ‘बीएच’ सिरीज काय आहे?

brown and beige snake in the grass during daytime
Nag Panchami Festival 2021 the Best Information/ Photo by Pixabay on Pexels.com

परीक्षित राजाची कथा (Nag Panchami Festival 2021 the Best Information)

परिक्षित नावाचा एक राजा होता; एकदा हा राजा शिकारीसाठी जंगलात गेला. शिकारीसाठी तो जंगलात खूप भटकला; तेंव्हा त्याला खूप तहान लागली. पाण्याचा शोध घेत घेत राजा एका झोपडी जवळ आला; झेपडीच्या बाजूला एक आश्रम होता; तिथे तो गेला. त्या अश्रमामध्ये एक ऋषी तपश्चर्या करीत बसलेले होते; हे त्याने पाहिले. राजाने ऋषींकडे जाऊन पिण्यास पाणी मागितले.

तपश्चर्यामध्ये मग्न असलेल्या ऋषींना; राजाचा आवाज ऐकू आला नाही. आपल्या आवाजाला प्रतिसाद दिला नाही; म्हणून, राजाला अतिशय राग आला. रागातच राजाने ऋषींच्या गळयात मेलेला एक साप टाकला. राजाचे हे कृत्य जवळच असलेल्या; त्या ऋषींच्या मुलाने पाहिले. राजाच्या या कृत्याचा त्याला अतिशय राग आला; आणि त्याने परीक्षित राजाला शाप दिला की; “हे राजा तुला सातव्या दिवशी दक्षक नावाच्या सापाकडून सर्पदंश होईल आणि त्यातच तुझा मृत्यू होईल.”

वाचा: New 7 Wonders of the World: जगातील नवी सात आश्चर्ये

ऋषींच्या मुलाने दिलेल्या शापामुळे परीक्षित राजा अतिशय घाबरला; तो लगेच राजवाडयात आला आणि घडलेली सर्व घटना; त्याने आपल्या कुटुंबियांना सांगीतली. परीक्षित राजाच्या मुलाने आपल्या पित्याचे प्राण वाचवण्यासाठी; एक मोठा यज्ञ सुरु केला. यज्ञ सुरु असताना त्या ठिकाणी अनेक नाग येऊ लागले; आणि ते त्या यज्ञकुंडामध्ये स्वतःला झोकून जीव देऊ लागले. त्यांनतर परीक्षित राजा, त्याचा मुलगा व सर्व नाग ऋषींना शरण गेले; राजाने व त्याच्या मुलाने आस्तिक ऋषींची क्षमा मागितली. परीक्षित राजाने व त्याच्या मुलाने ज्या दिवसापासून; नागदेवाची पूजा करण्यास सुरुवात केली; तो दिवस होता श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमी. तेंव्हापासून श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमी नागपंचमी म्हणून साजरी केली जाते. वाचा: What is Vaijayanti mala or Vana-mala? | वैजयंतीमाळ, वन-माळ

सारांष (Nag Panchami Festival 2021 the Best Information)

अशा प्रकारे या लेखाद्वारे नागपंचमी सणाचे महत्व; उपवास, नागपंचमीचा झोका, नवीन कपडे व अलंकार परिधान करण्यामागील कारण; ग्रामीण भागात साजरी केली जाणारी नागपंचमी; व नागपंचमी बद्दलच्या कथा; ही सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे की, ही पोस्ट आपणास आवडली असेल; आपल्या प्रतिक्रिया व अभिप्राय जरुर कळवा; व आपल्या मित्रांबरोबर ही पोस्ट नक्की शेअर करा.

धन्यवाद!…!

Related Posts

Post Categories

  • शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.
All you need to know about sextortion

All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय?

All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय? सेक्सटोर्शनचे बळी होण्यापासून सावध राहण्यासाठी; तुम्हाला सर्व माहिती असणे ...
Read More
woman with face mask holding an alcohol bottle

All Information About Pharmacy Courses | फार्मसी कोर्सबद्दल

All Information About Pharmacy Courses | फार्मसी कोर्सबद्दल सविस्तर माहिती; प्रवेश प्रक्रिया, कौशल्ये, पात्रता निकष, अभ्यासक्रम, नोकरीच्या संधी, प्रमुख रिक्रूटर्स ...
Read More
Most Beautiful Flowers in the World

Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले

Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले; फुलांचे सौंदर्य, रंग, प्रकार, उगम व महत्व जाणून घ्या ...
Read More
How to Check Income Tax Refund?

How to Check Income Tax Refund? | टॅक्स रिफंड कसा तपासायचा?

How to Check Income Tax Refund? | आयकर विभागाने AY 2021-22 साठी आयकर परतावा जारी केला. तुम्हाला आयटी रिफंड मिळाला ...
Read More
Know the meaning of moles on the face

Know the meaning of moles on the face | चेह-यावरील तीळाचे अर्थ

Know the meaning of moles on the face | चेह-यावरील तीळाचे अर्थ, तीळ कशामुळे होतो; मोल्सचे प्रकार व मोल्सविषयी विविध ...
Read More
Know About the Importance of Makar Sankranti

Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांती

Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांतीचे प्रादेशिक, सामाजिक व धार्मिक महत्व; प्रादेशिक भिन्नता व रीतिरिवाज या ...
Read More
How to Get Rid of Pimples?

How to Get Rid of Pimples? | मुरुमांपासून सुटका कशी करावी?

How to Get Rid of Pimples? | मुरुम किंवा पुरळ हा एक सामान्य त्वचा रोग आहे; यापासून सुटका करण्यासाठी, नैसर्गिक ...
Read More
photo of woman tutoring young boy

The Role of Parents in the Success of their Children |मुलांचे यश

The Role of Parents in the Success of their Children | मुलांच्या यशात पालकांची भूमिका; मुलांच्या करिअरसाठी पालकांनी काय केले ...
Read More
A career in the Fashion Designing

A career in the Fashion Designing | फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर

A career in the Fashion Designing | फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर, कोर्सेस, अभ्यासक्रम पुस्तके, महाविदयालये, वेतन व कंपन्या फॅशन डिझायनिंग हे ...
Read More
Success is Around Yourself

Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे

Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे; फक्त ते शोधण्याची नजर हवी आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या आयुष्यात अनेक लोकांना ...
Read More
Spread the love