Nag Panchami Festival 2023 the Best Information | नागपंचमी सणाचे महत्व, उपवास, झोका, कपडे, अलंकार, व नागपंचमी बद्दलच्या कथा घ्या जाणून…
भारतीय संस्कृतीमध्ये सणांच्या निमित्ताने; विविध वनस्पती आणि प्राणी यांना विशेष स्थान; आणि महत्व दिलेले आहे. हिंदू धर्मातील अनेक सण आणि उत्सव; वनस्पती आणि प्राणी या नैसर्गिक घटकांशी; संबंधीत आहेत. श्रावण महिन्यात येणा-या सनांपैकी नंगपंचमी हा एक सण आहे. (Nag Panchami Festival 2023 the Best Information)
श्रावण महिण्यातील शुक्ल पंचमीच्या दिवशी; नागपंचमी हा सण साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या घरी; नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागाची पूजा करतात. नाग भगवान शिवशंकर यांना प्रिय असल्यामुळे; नाग आणि भगवान शिवशंकर यांची पूजा करण्याची प्रथा आहे. (Nag Panchami Festival 2023 the Best Information)

Table of Contents
नागपंचमीचे महत्व
नागपंचमी सणाच्या दिवशी; नागदेवतेचे दर्शन व्हावे म्हणून; घराच्या दरवाजावर नागदेवतेचे चित्र काढून; किंवा नागदेवतेच्या फोटोची पूजा केली जाते. वारुळ हे नागदेवतेचे घर आहे असे मानतात; त्यामुळे स्त्रिया वारुळाची पूजा करतात.
पूजेसाठी फुले, दुर्वा, पाणी, दूध व लाह्या; नागदेवतेला अर्पण करतात. नागदेवतेची पूजा करुन; आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी अष्टनागमंत्राचा जपही केला जातो.
असे म्हटले जाते की, या दिवशी नागासोबत भगवान शिव आणि रुद्राभिषेक केल्याने; कालसर्पदोष दूर होतो; तसेच घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कारण नाग भगवान शिवशंकराच्या गळयात विराजमान आहे; आणि नाग पृथ्वीला संतुलित करतात; त्यामुळे नागपूजनाला पुराणामध्ये महत्व आहे.
वाचा: The Most Beautiful Birds in the World | जगातील सर्वात सुंदर पक्षी
धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की; नागदेवता लक्ष्मीचे रक्षण करते. त्यामुळे धनसंपदा आणि समृद्धी मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते.
असेही मानले जाते की, भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीमध्ये; कालिया नागाचे मर्दन केले तो दिवस म्हणजे; श्रावण शुक्ल पंचमी होता. तेंव्हापासून नागपूजेची प्रथा सुरु झाली. वाचा: How to Celebrate the Festival of Bail Pola? | बैल पोळा सण

नागपंचमी उपवासाचे महत्व
पुराणातील कथेनुसार, सत्येश्वरी नावाची दुय्यम दर्जाची एक देवता होती; त्या देवतेला सत्येश्वर नावाचा भाऊ होता. सत्येश्वरीच्या भावाचा मृत्यू नागपंचमी सणाच्या आदल्या दिवशी झाला; आपल्या भावाच्या शोकात सत्येश्वरीने त्या दिवशी अन्नग्रहण केले नाही; त्यामुळे स्त्रिया भावाच्या रक्षणासाठी या दिवशी उपवास करतात व नागाची पूजा करतात.
नागाची पूजा करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे; असे मानले जाते की, सत्येश्वरीला तिचा भाऊ नाग रुपामध्ये दिसला; त्यामुळे तिने त्या नागरुपाला, आपला भाऊ माणून पूजा केली; त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की, यापुढे कोणतिही स्त्री भाऊ म्हणून माझी पूजा करेल; त्या स्त्रीचे मी भाऊ म्हणून रक्षण करीन. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक स्त्री नागाला आपला भाऊ माणून नागाची पूजा करते.
वाचा: Mobile Phone and Children: पालकांनो! आपल्या मुलांकडे लक्ष द्या!
नागपंचमीला झोका खेळण्या मागील कारण

सत्येश्वरीला दुस-या दिवशी तिचा भाऊ दिसला नाही; त्यामुळे ती अतिशय दु:खी झाली; व ज्ंगलात इकडून तिकडे सैरावैरा धाऊ लागली. झाडांच्या फांदयांवर चढून ती भावाचा शोध घेऊ लागली; त्यावेळी नागराज सत्येश्वराच्या रुपात प्रकट झाले; ते पाहून सत्येश्वरीला प्रचंड आनंद झाला. आनंदाच्या भरात ती झाडाच्या फांदयांवर झोके घेऊ लागली; त्यामुळे स्त्रिया ना्गपंचमीच्या दिवशी झोका खेळतात.
वाचा: How to get rid of house lizards? | घरातून पाली घालविण्याचे उपाय
आपल्या भावासाठी सत्येश्वरीने केलेला शोक पाहून; नागदेव प्रसन्न झाले; त्यांनी तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्र व अलंकार दिले. तेंव्हापासून नागपंचमी सणाच्या दिवशी; स्त्रिया व मुली अलंकार व नवीन वस्त्र परिधान करतात. वाचा: Importance of the Teachers’ Day | शिक्षक दिनाचे महत्व
नागपंचमीच्या दिवशी काय करु नये
नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगरणी करु नये; टिकाव किंवा कुदळीसारख्या टोकदार अवजाराने जमीन खणू नये; विळी किंवा चाकूने भाज्या चिरु नयेत; खाण्याचे पदार्थ तळू नयेत, चुलीवर तवा ठेवू नये; असे विविध संकेत या दिवशी पाळले जातात.
वाचा: Welfare Schemes for Registered Workers | कामगारांसाठी योजना
ग्रामीण स्त्रिया हा सण कसा साजरा करतात
नागपंचमिच्या सणाच्या निमित्ताने मुली माहेरी येतात; नागपंचमीच्या सणाच्या दिवशी गावातील स्त्रिया; पारंपारिक वेषभूषा करतात. सणाच्या निमित्ताने माहेरी आलेल्या व गावातील सर्व स्त्रिया; एकत्र जमतात. वाजतगाजत सर्व स्त्रिया वारोळाला जातात; तेथे नागदेवतेची म्हणजे वारोळाची फुले, हळद, कुंकु, दूध व लाह्या वाहून पूजा करतात.
गावातील उंच झाडांना बांधलेले झोके; टोळक्या-टोळक्याने जाऊन खेळतात. संध्याकाळी पुन्हा सर्व स्त्रिया एकत्र जमून फेर धरतात; व नागोबाची गाणी गात हा सण अतिशय उत्साहाने व आनंदी वातावरणात साजरा करतात. वाचा: Importance of Krishna Janmashtami | श्रीकृष्णजन्माष्टमी 2022
नागपंचमी सणाबाबतची कथा (Nag Panchami Festival 2023 the Best Information)

श्रावण महिण्यातील बहुतेक सणांना; इतिहासाची पार्श्वभूमी आहे. वेगवेगळया कथांच्या स्वरुपात हा इतिहास; एका पिढीकडून दुस-या पिढीकडे कथांच्या रुपाने पोहोचवला जातो. नागपंचमी सणाबाबत अनेक कथा आहेत त्यापैकी एक प्रचलीत कथा खाली दिलेली आहे.
एका राज्यामध्ये एक गरीब शेतकरी; आपली पत्नी, दोन मुले व एक मुलगी यांच्या बरोबर राहात होता. त्या शेतक-याच्या शेतामध्ये एक वारुळ होते; त्या वारुळामध्ये एक नागीन आपल्या पिल्लांबरोबर रहात होती. शेतकरी आपले शेत नांगरत असताना; च्याकडून त्या वारुळातील नागाची तीन पिल्ले चिरडून मारली गेली.
मरण पावलेल्या पिल्लांना पाहून; नागिणीने प्रचंड आक्रोश केला. माझ्या पिल्लांना मारणा-यास मी सोडणार नाही; अशी सूडाची आग त्या नागिणीच्या मनामध्ये धगधगू लागली. सूड घेण्यासाठी एके दिवशी रात्री नागीण; शेतक-याच्या घरात घुसते. तेथे शेतकरी, त्याची पत्नी व दोन मुलांना दंश करुन ठार मारते.
वाचा: Insurance and Liability for Gas Cylinder Blast | गॅस अपघात विमा
अजुनही नागिणीची सुडाची आग शमलेली नव्हती; कारण शेतक-याची मुलगी अजून जिवंत होती. तिला दंश करण्यासाठी नागीन पुन्हा; शेतक-याच्या घरी जाते. नागिणीने आपले आई-वडील व भाऊ; यांना दंश करुन मारले होते; तरी, ती घरामध्ये नागदेवतेचे चित्र काढून पूजा करत होती; हे नागदेवतेने पाहिले.
आपण या मुलीच्या आई-वडिलांना व तिच्या दोन भावंडाना ठार मारले असताना देखील; ही मुलगी आपली पूजा करत आहे; तिची श्रद्धा व भक्ती पाहून नागदेवता तिच्यावर प्रसन्न होते; व त्या मुलीचे आई-वडील व भाऊ यांना पुन्हा जिवंत करते.
तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा; त्यामुळे या दिवसापासून; श्रावण महिण्यात येणा-या पंचमीला नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी; नागाची पूजा मोठ्या भक्तीभावाने केली जाते. वाचाा: वाचा: What is New BH Bharat Series? | नवीन ‘बीएच’ सिरीज काय आहे?

परीक्षित राजाची कथा (Nag Panchami Festival 2023 the Best Information)
परिक्षित नावाचा एक राजा होता; एकदा हा राजा शिकारीसाठी जंगलात गेला. शिकारीसाठी तो जंगलात खूप भटकला; तेंव्हा त्याला खूप तहान लागली. पाण्याचा शोध घेत घेत राजा एका झोपडी जवळ आला; झेपडीच्या बाजूला एक आश्रम होता; तिथे तो गेला. त्या अश्रमामध्ये एक ऋषी तपश्चर्या करीत बसलेले होते; हे त्याने पाहिले. राजाने ऋषींकडे जाऊन पिण्यास पाणी मागितले.
तपश्चर्यामध्ये मग्न असलेल्या ऋषींना; राजाचा आवाज ऐकू आला नाही. आपल्या आवाजाला प्रतिसाद दिला नाही; म्हणून, राजाला अतिशय राग आला. रागातच राजाने ऋषींच्या गळयात मेलेला एक साप टाकला. राजाचे हे कृत्य जवळच असलेल्या; त्या ऋषींच्या मुलाने पाहिले.
राजाच्या या कृत्याचा त्याला अतिशय राग आला; आणि त्याने परीक्षित राजाला शाप दिला की; “हे राजा तुला सातव्या दिवशी दक्षक नावाच्या सापाकडून सर्पदंश होईल आणि त्यातच तुझा मृत्यू होईल.”
वाचा: New 7 Wonders of the World: जगातील नवी सात आश्चर्ये
ऋषींच्या मुलाने दिलेल्या शापामुळे परीक्षित राजा अतिशय घाबरला; तो लगेच राजवाडयात आला आणि घडलेली सर्व घटना; त्याने आपल्या कुटुंबियांना सांगीतली. परीक्षित राजाच्या मुलाने आपल्या पित्याचे प्राण वाचवण्यासाठी; एक मोठा यज्ञ सुरु केला. यज्ञ सुरु असताना त्या ठिकाणी अनेक नाग येऊ लागले; आणि ते त्या यज्ञकुंडामध्ये स्वतःला झोकून जीव देऊ लागले.
त्यांनतर परीक्षित राजा, त्याचा मुलगा व सर्व नाग ऋषींना शरण गेले; राजाने व त्याच्या मुलाने आस्तिक ऋषींची क्षमा मागितली. परीक्षित राजाने व त्याच्या मुलाने ज्या दिवसापासून; नागदेवाची पूजा करण्यास सुरुवात केली; तो दिवस होता श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमी. तेंव्हापासून श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमी नागपंचमी म्हणून साजरी केली जाते. वाचा: What is Vaijayanti mala or Vana-mala? | वैजयंतीमाळ, वन-माळ
सारांष (Nag Panchami Festival 2023 the Best Information)
अशा प्रकारे या लेखाद्वारे नागपंचमी सणाचे महत्व; उपवास, नागपंचमीचा झोका, नवीन कपडे व अलंकार परिधान करण्यामागील कारण; ग्रामीण भागात साजरी केली जाणारी नागपंचमी; व नागपंचमी बद्दलच्या कथा; ही सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाचा: Know the Importance of Navratri 2022 | नवरात्री उत्सव
आशा आहे की, ही पोस्ट आपणास आवडली असेल; आपल्या प्रतिक्रिया व अभिप्राय जरुर कळवा; व आपल्या मित्रांबरोबर ही पोस्ट नक्की शेअर करा. धन्यवाद!…!

Related Posts
- Don’t want a girl but a daughter-in-law | मुलगी नको, पण सून हवी
- Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांती
- Janmashtami and Dahi Handi | कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी
- What is the Significance of Navratri? | नवरात्रीचे महत्व
Post Categories
- शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Ganpati-6 Know all about Girijatmaj Lenyadri | गिरिजात्मज, लेण्याद्री

What things give you energy? | कोणत्या गोष्टी तुम्हाला ऊर्जा देतात?

Ganpati-5 Know all about Chintamani Theur | चिंतामणी थेऊर

Ganpati-4 Know all about Varadvinayak Mahad | वरदविनायक, महाड

Ganpati-3 Know all about Ballaleshwar Pali | बल्लाळेश्वर, पाली

Ganpati-2 Know all about Siddhivinayak Siddhatek | सिद्धिविनायक

Ganpati-1 Know all about Moreshwar Morgaon | मोरेश्वर, मोरगाव

What are daily good habits? | रोजच्या चांगल्या सवयी काय आहेत?

Share the lessons you have learned in life | आयुष्यात शिकलेले धडे
