Information About Ashtavinayak in Marathi 2023 | अष्टविनायक ठिकाण, वैशिष्टये व महत्व या विषयी सविस्तर माहिती
गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय, मानाचे आणि प्रतिष्ठेचे आराध्यदैवत आहे; आपले इच्छित कार्य सफल व्हावे यासाठी सर्वप्रथम गणपतीचे पूजन करुन; त्याचे शुभाशीर्वाद घेतले जातात. अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे. ही आठही मंदिरे निसर्गरम्य ठिकाणी स्थित आहेत. Information About Ashtavinayak in Marathi 2023
अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट’ आणि ‘विनायक; या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे गणपतीच्या अनेक नावांपैकी एक; म्हणूनच गणपतीच्या मंदिरांचा संच म्हणजे; अष्टविनायक. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी; सर्वप्रथम गणपतीची पूजा करतात; कारण गणपती पूजेमुळे सर्व विघ्न दूर होतात; व समृद्धी येते. म्हणून गणपतीला सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता असे म्हटले आहे.
वाचा: Know All About Ganesh Chaturthi 2022 | गणेश चतुर्थी
पुणे जिल्ह्यातील पाच मंदिरे; मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री; रायगड जिल्ह्यातील दोन महाड, पाली आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक; सिद्धटेक या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. अष्टविनायकांपैकी रांजणगाव, महाड व सिद्धटेक या ठिकाणचे गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे. या सर्व गणपतींची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे-
Table of Contents
मोरेश्वर – मोरगांव

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर आहे; या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू व आद्यस्थान आहे; प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
हे सर्व अष्टविनायक मंदिरांपैकी सर्वात महत्वाचे ठिकाण आहे; आणि त्याला चार दरवाजे आहेत. मयुरेश्वराच्या रुपात मोरावर स्वार गणपतीची सोंड डावीकडे वळली आहे; त्यावर एक नाग उभा आहे; जो त्याचे संरक्षण करतो. गणेशाच्या या स्वरुपामध्ये; सिद्धी (क्षमता) आणि रिद्धी (बुद्धिमत्ता) या आणखी दोन मूर्ती आहेत.
जवळच क-हा नदी आहे; मोरेगाव गावाला हे नाव मिळाले कसे; याविषयी असे म्हटले जाते की; एकेकाळी या ठिकाणाचा आकार मोरासारखा होता; आणि या भागात मोर पक्ष्यांची विपुलता होती. शब्दशः मोरगव्हाण म्हणजे ‘मोरांचे गाव;’ असे हे दोन शब्दांचे मिश्रण आहे.
पौराणिक कथेनुसार; भगवान गणेशाने मयुरेश्वराच्या रुपात मोरावर स्वार होऊन; देवांच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून; सिंधू राक्षसाचा वध केला. अष्टविनायक मंदिर तीर्थक्षेत्रात भेट देणारे हे पहिले मंदिर आहे. वाचा: बैल पोळा सण
मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे; श्री मोरेश्र्वराच्या डोळयांत व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती; दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील, बारामती तालुक्यात; मोरगांव हे ठिकाण आहे.
मोरगाव बारामतीपासून 35 कि. मी. अंतरावर आहे; महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरीचा खंडोबा; या स्थळापासून, मोरगाव फक्त 17 किलोमीटर अंतरावर आहे. या सर्व ठिकाणांपासून; मोरगांव गणपतीला जाण्यासाठी, सार्वजनिक वाहतुकीची सुविधा आहे.
मोरगावच्या मयुरेश्वराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा: Ganpati-1 Know all about Moreshwar Morgaon | मोरेश्वर, मोरगाव
चिंतामणी – थेऊर

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी; हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली; श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा, मनशांती देणारा; मनातील गोंधळ दूर करणारा; म्हणून याला चिंतामणी म्हणतात.
तसेच गणपतीने या ठिकाणी; कपिलाऋषीचे, लोभी गुणाकडून, मौल्यवान चिन्तामणी रत्न परत मिळवले; व ते त्यांना दिले. दागिने परत आणल्यानंतर; कपिलाऋषींनी ते दागिने विनायकाच्या म्हणजे श्री गणेशाच्या गळ्यात घातले. अशा प्रकारे चिंतामणी विनायक; हे नाव देण्यात आले. हे सर्व कदंब वृक्षाखाली घडले, म्हणून थेऊरला जुन्या काळात; कदंबनगर म्हणून ओळखले जाते. वाचा: How to Celebrate Holi Festival in India | होळी उत्सव
श्री गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख असून; सोंड डावीकडे निर्देशित आहे. हे मंदिर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर असून; पुण्यापासून 22 किमी अंतरावर आहे. पुण्यापासून हे मंदिर जवळ आहे; थेऊर गाव मुळा, मुठा आणि भीमा या तीन प्रमुख प्रादेशिक नद्यांच्या; संगमावर वसले आहे. थेऊरपासून जवळच ऊरळीकांचन या ठिकाणी; महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.
वाचा: वैजयंतीमाळ, वन-माळ
पुण्यातील पेशवे घराणे या गणपतीचे खूप मोठे भक्त होते; थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले; यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई; यांची समाधी या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित; थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.
थेऊरच्या चिंतामणी विषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा: Ganpati-5 Know all about Chintamani Theur | चिंतामणी थेऊर
सिद्धिविनायक – सिद्धटेक

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा; अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा हा एकमेव; अष्टविनायक. असे मानले जातं की; येथे सिद्धटेक पर्वतावर; विष्णूने सिद्धी मिळवली. गणपतीची पूजा केल्यावर; देव विष्णूने असुर मधु आणि कैताभ यांचा पराभव केला.
हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. मंदिर उत्तरमुखी असून; एका छोट्या टेकडीवर आहे. असे मानले जाते की; मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता; पेशव्यांचे जनरल हरिपंत फडके यांनी बांधला होता.
आतील गर्भगृह सुमारे; 10 फूट रुंद आणि सुमारे 15 फूट उंच आहे. ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर; यांनी बांधले आहे. मूर्ती 3 फूट उंच आणि 2.5 फूट रुंद आहे. मूर्ती उत्तर दिशेला आहे. मुर्तीचे पोट रुंद नाही; पण रिद्धी आणि सिद्धी मुर्ती; एका मांडीवर बसल्या आहेत.
या मुर्तीची सोंड उजवीकडे वळत आहे; उजव्या बाजूचा सोंड असलेला गणेश; हा भक्तांसाठी अत्यंत कडक असावा; असे मानले जाते. सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीची मखर; पितळी असून त्याभोवती गरुड, चंद्र व सूर्य; यांच्या प्रतिमा आहेत.
मंदिराभोवती एक प्रदक्षिणा करण्यासाठी; टेकडीला फेरी मारावी लागते. मध्यम गतीसह एका फेरीस सुमारे; 30 मिनिटे लागतात. सिद्धिविनायक गणपती मंदिर; अहमदनगर जिल्ह्यातील; कर्जत तालुक्यात असून; दौंडपासून 19 किलोमीटर व राशिनपासून 23 कि.मी. अंतरावर आहे.
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक विषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा: Ganpati-2 Know all about Siddhivinayak Siddhatek | सिद्धिविनायक
महागणपती – रांजणगाव

अष्टविनायकांपैकी चौथा गणपती म्हणजे; रांजणगावचा महागणपती होय. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे; महागणपती मंदिर, रांजणगाव शहराच्या; अगदी मध्यभागी आहे. ते पूर्वाभिमुख असून; त्याला एक सुंदर आणि भव्य प्रवेशद्वार आहे. जय आणि विजयच्या मूर्ती; प्रवेशद्वाराजवळ आहेत. या मंदिराचे बांधकाम अशा पद्धतीने केले आहे की; सूर्य किरण थेट गणेश मूर्तीवर पडतात.
पुणे- अहमदनगर मार्गावर; शिरुर तालुक्यात हे ठिकाण आहे. रांजणगाव या ठिकाणासंदर्भात अशी दंतकथा आहे की; त्रिपुरासूर नावाच्या दैत्याला; भगवान शंकर यांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या.
या शक्तीचा दुरुपयोग करुन; त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोकांवरील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की; शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करुन; त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला; ‘त्रिपुरारिवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान; असे महागणपतीचे रुप आहे. हा गणपती उजव्या सोंडेचा असून; गणेशाचे आसन कमळाचे आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार; माधवराव पेशव्यांच्या काळात झाल्याचे पुरावे इतिहासात आढळतात. इंदूरच्या सरदाराने मंदिरातील लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.
हे श्री महागणपतीचे स्थान; इ.स. 10 व्या शतकातील आहे. या मुर्तीला दहा हात असून; ती प्रसन्न व मनमोहक आहे. वाचा: Gudhi Padva is the most important festival in India | गुढीपाडवा
विघ्नेश्वर – ओझर

अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्र्वर; हा पाचवा गणपती आहे. ओझर येथील भगवान गणेश मार्गात आलेले; सर्व अडथळे दूर करणारे म्हणून ओळखले जातात. अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून; श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते.
श्रींच्या डोळ्यात माणिक असून; कपाळावर हिरा आहे. रिद्धी आणि सिद्धीच्या मूर्ती; गणेशमूर्तीच्या दोन बाजूंना ठेवल्या आहेत. प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश; विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला; विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. वाचा:
मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी असून; मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर; एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा; यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख; इतिहासात आढळतो.
मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी; धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान; लेण्याद्रीपासून 14 कि. मी. अंतरावर तर; पुण्यापासून 85 कि. मी. अंतरावर आहे. या ठिकाणापासून जवळच; छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला आहे; तसेच आर्वी उपग्रह केंद्र व आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण असलेले ठिकाण; खोडद हे देखील जवळच आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी 2022
गिरिजात्मज – लेण्याद्री

अष्टविनायकापैकी सहावा गणपती; लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा आहे. हे मंदिर जुन्नर तालुक्यातील; प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात असल्यामुळे; त्यांना गणेश-लेणी असेही म्हणतात. कुकडी नदी परिसरात; डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे; हे स्वयंभू स्थान आहे.
श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून; ती खडकामध्ये कोरलेली आहे. मूर्तीची सोंड डावीकडे आहे; आणि मंदिराच्या मागील बाजूस; त्याची पूजा करावी लागते. ही मूर्ती उर्वरित अष्टविनायक मूर्तींपेक्षा; थोडी वेगळी आहे. ही मुर्ती इतर मूर्तींप्रमाणे; फार चांगली रचना केलेली नाही. मंदिर परिसरातील खडकामध्ये; कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे.
वाचा: Nag Panchami Festival 2022 the Best Information | नाग पंचमी
या मूर्तीची पूजा कोणीही करु शकते; पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात असलेल्या दगडी खांबांवर; वाघ, सिंह, हत्ती यांचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिराचे बांधकाम असे केले आहे की; दिवसा ते नेहमी सूर्य-किरणांनी उजळून निघते. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे; 400 पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा; जुन्नरपासून 7 कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे; 97 कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
लेण्याद्रीच्या गिरिजात्मज विषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा: Ganpati-6 Know all about Girijatmaj Lenyadri | गिरिजात्मज, लेण्याद्री
वरदविनायक – महाड

महााडचा वरदविनायक हा; अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून; त्याला मठ असेही म्हणतात. वरद विनायक म्हणून गणेश; सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण करतो; आणि सर्वांना वरदान देतो. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारु असून; मंदिराला घुमट आहे; व त्याला सोनेरी कळस आहे; कळसावर नागाची नक्षी आहे.
या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे; मंदिराच्या पाठीमागे असलेल्या तळयातील पाण्यात; गणेशमूर्ती एका भक्ताला स्वप्नात दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला असता; त्याला त्या ठिकाणी मूर्ती मिळाली.
तीच या मंदिरातील प्राण-प्रतिष्ठा करुन स्थापन केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून; गणेशाची मूर्ती सिंहासनारुढ; उजव्या सोंडेची आहे. इ.स. 1727 मध्ये मध्ये पेशवे काळात; हे मंदिर बांधले गेले.
वाचा: रामनवमीचे महत्व
रायगड जिल्हयातील हे मंदिर; पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली पासून; तीन किलोमीटर अंतरावर आहे. वरद विनायक, महाडचे मंदिर; मुंबई शहरापासून सर्वात जवळ आहे.
महाडच्या वरदविनायक गणपती विषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा: Ganpati-4 Know all about Varadvinayak Mahad | वरदविनायक, महाड
बल्लाळेश्वर – पाली (Information About Ashtavinayak in Marathi 2023)

पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे; या गणपतीला श्री बल्लाळेश्वर या नावाने ओळखले जाते. बल्लाळेश्वर गणपतीचे स्थान; हे स्वयंभू असून गणपतीचे मंदिर; पूर्वाभिमुख व चिरेबंदी आहे.
मंदिराचे बांधकाम अशा प्रकारे केले आहे की; संक्रांतीनंतर सूर्योदयाच्या वेळी; गणेशमूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. हे मंदिर दगडाने बांधलेले असून त्यासाठी; वितळलेले शिसे वापरले आहे; त्यामुळे बांधकाम अतिशय मजबूत आहे.
बल्लाळेश्वराचे कपाळ विशाल असून; डोळे व नाभीमध्ये हिरे बसवले आहेत. गणपतीची सोंड डावीकडे निर्देशित आहे. मंदिरात प्रचंड मोठी घंटा असून; ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.
हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून; सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी; व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात; बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. उन्हेरचे गरम पाण्याचे झरे; व सरसगड हा प्राचीन किल्ला पालीपासून जवळ आहेत. वाचा: The most amazing temples in the world |मनमोहक मंदिरे
या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे; पाली येथे या गणपतीला देण्यात येणारा प्रसाद; म्हणजे मोदकाऐवजी बेसन लाडू आहे; जो साधारणपणे इतर गणपतींना दिला जातो. या मंदिराची पार्श्वभूमी बनवणाऱ्या डोंगरासह; मूर्तीचा आकार स्वतःच एक उल्लेखनीय प्रतीक आहे. बल्लाळेश्वर मंदिर हे गणेशाचे अशे एकमेव मंदिर आहे; जे त्याच्या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे.
पाली हे खोपोलीपासून 38 कि.मी. अंतरावर आहे; खोपोली-पुणे रस्त्यावर पालीस जाण्यासाठी जोड रस्ता आहे. तसेच पनवेल-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर; वाकणपासून पालीस जाण्यासाठी रस्ता आहे.
पालीच्या बल्लाळेश्वर गणपती विषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा: Ganpati-3 Know all about Ballaleshwar Pali | बल्लाळेश्वर, पाली
सारांष (Information About Ashtavinayak in Marathi 2023)
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला; या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन; श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी; या काळात गणपती उत्सव सर्वत्र अतिशय आनंद; व डत्साहामध्ये साजरा केला जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी; भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी अहमदनगर; पुणे व रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास करावा लागतो. सर्व ठिकाणी श्री गणेशमूर्ती निरनिराळ्या रुपात असून; त्यांचे ठिकाण समुद्रकिणारी, डोंगरामध्ये, नदीकाठी किंवा खडकात आहे.
अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविक भक्तांना; यात्रेबरोबरच पर्यटनाचाही आनंद घेता येतो. अशा या अष्टविनायकाची महती; केवळ महाराष्ट्र, भारत देशातच नाही तर, संपूर्ण जगभर पसरली आहे.
- वाचा: Know about Anant Chaturdashi | अनंत चतुर्दशी
- Maharashtra Day History and all 2022 | महाराष्ट्र दिन

आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.
Related Posts
- The Religious Significance of Diwali | दिवाळीचे धार्मिक महत्त्व
- Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांती
- Significance of Mahalakshmi Vrat | महालक्ष्मी व्रत 2022
- Know the Importance of Navratri 2022 | नवरात्री उत्सव
Post Categories

Ganpati-6 Know all about Girijatmaj Lenyadri | गिरिजात्मज, लेण्याद्री

What things give you energy? | कोणत्या गोष्टी तुम्हाला ऊर्जा देतात?

Ganpati-5 Know all about Chintamani Theur | चिंतामणी थेऊर

Ganpati-4 Know all about Varadvinayak Mahad | वरदविनायक, महाड

Ganpati-3 Know all about Ballaleshwar Pali | बल्लाळेश्वर, पाली

Ganpati-2 Know all about Siddhivinayak Siddhatek | सिद्धिविनायक

Ganpati-1 Know all about Moreshwar Morgaon | मोरेश्वर, मोरगाव

What are daily good habits? | रोजच्या चांगल्या सवयी काय आहेत?

Share the lessons you have learned in life | आयुष्यात शिकलेले धडे
