Skip to content
Marathi Bana » Posts » Diploma in Aerospace Engineering after 10th | एरोस्पेस

Diploma in Aerospace Engineering after 10th | एरोस्पेस

Diploma in Aerospace Engineering after 10th

Diploma in Aerospace Engineering after 10th | एरोस्पेस डिप्लोमा पात्रता, प्रवेश, शुल्क्, अभ्यासक्रम, महाविदयालये, करिअर संधी, नोकरीचे पद, सरासरी वेतन इत्यादी.

डिप्लोमा इन एरोस्पेस इंजिनिअरिंग हा 2 ते 3 वर्षे कालावधी असलेला डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमासाठी पात्रता निकष म्हणजे उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची एसएससी परीक्षा (इ. 10वी) किंवा एचएससी परीक्षा (इ. 12वी) किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असलेले उमेदवार; Diploma in Aerospace Engineering after 10th कोर्ससाठी पात्र आहेत.

या अभ्यासक्रमामध्ये उमेदवारांना विमान आणि अंतराळ यानाविषयी सैद्धांतिक आणि व्यावहारिक ज्ञान दिले जाते. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मंजूर केलेल्या अभ्यासक्रमाचा शैक्षणिक कालावधी पूर्ण केल्यानंतर; विद्यार्थ्याला Diploma in Aerospace Engineering after 10th प्रमाणपत्र दिले जाते.

या कोर्समध्ये स्पेसक्राफ्ट आणि विमानाची रचना, उत्पादन, सेवा आणि चाचणी याबद्दल विशिष्ट ज्ञान आणि सखोल अभ्यास प्रदान केला जातो. हा अभ्यासक्रम विमान डिझाइन आणि विमान निर्मितीच्या भागांच्या अभ्यासावर केंद्रित आहे. हा कोर्स ज्या विद्यार्थ्यांना डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस आणि टेस्टिंग एअरक्राफ्टमध्ये खूप रस आहे अशा विदयार्थ्यांसाठी चांगला आहे.

डिप्लोमा इन एरोस्पेस अभियांत्रिकी हा असा अभ्यासक्रम आहे जिथे विद्यार्थ्यांना विमान आणि अंतराळ यानाची रचना, उत्पादन, सर्व्हिसिंग आणि चाचणी याबद्दल ज्ञान मिळते. हा कोर्स स्वारस्य असलेल्या विदयार्थ्यांना योग्य सहाय्य आणि प्रशिक्षण मिळण्यासाठी डिझाइन केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांपैकी एक मानला जातो.

डिप्लोमा इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग विषयी थोडक्यात माहिती

air air travel airbus aircraft
Photo by Pixabay on Pexels.com
 • कोर्स: डिप्लोमा इन एरोनॉटिकल इंजिनीअरिंग
 • प्रकार: डिप्लोमा
 • कालावधी: 2 ते 3 वर्षे
 • परीक्षा: सेमिस्टर
 • पात्रता: इ. 10वी गणित व विज्ञान विषयांसह किमान 45% गुण असावेत. किंवा इ. 12वी परीक्षेत विज्ञान आणि गणित विषयांसह सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी 50% गुण आणि राखीव श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी 45% गुण असणे आवश्यक आहे.
 • प्रवेश: प्रवेश परीक्षेवर आधारित
 • शुल्क: वार्षिक सरासरी फी संस्थांनुसार रुपये 2 लाख ते 4 लाखांपर्यंत असेल.
 • नोकरीचे पद: अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थी डिझाइन, विकास, देखभाल, संस्थांमध्ये व्यवस्थापकीय पदावर आणि शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक म्हणून करिअर सुरु करु शकतात.
 • भविष्यातील संधी: विद्यार्थी पदवी पूर्ण करण्यासाठी अधिक शैक्षणिक पात्रता जोडून स्वतःला अपग्रेड करु शकतात.
 • सरासरी वेतन: वेतन हे भर्ती करणार्‍याचा प्रकार, नोकरीच्या भूमिका, स्थान इत्यादींवर अवलंबून असते. परंतु सामान्यतः या कोर्सच्या व्यावसायिकांना नवीन म्हणून दरमहा सरासरी रुपये 40 ते 50 हजाराच्या दरम्यान दिला जातो.
 • रोजगार क्षेत्र: हा अभ्यासक्रम रोजगारक्षमतेने समृद्ध आहे. विमान वाहतूक उद्योगाशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये उमेदवार नोकरी करु शकतात.

पात्रता निकष- Diploma in Aerospace Engineering after 10th

qantas airlines plane on air
Photo by Raf Jabri on Pexels.com

Diploma in Aerospace Engineering after 10th अभ्यासक्रमातील डिप्लोमामध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराला खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

 • या अभ्यासक्रमासाठी पात्रता निकष म्हणजे उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची एसएससी परीक्षा इ. 10वी मध्ये गणित व विज्ञान विषयांसह एकूण किमान 45% गुण मिळवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • किंवा इ. 12वी परीक्षेत विज्ञान आणि गणित विषयांसह सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी 50% गुण आणि राखीव श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी 45% गुण असणे आवश्यक आहे.

प्रवेश- Diploma in Aerospace Engineering after 10th

 • एरोस्पेस डिप्लोमा कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराने एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे AME CET पात्र असले पाहिजे.
 • उमेदवारानेAME CET परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, AME CET च्या ऑल इंडिया रँक नुसार त्यांना AICTE, सरकार द्वारे मान्यता दिलेल्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल.
 • वाचा: Diploma in Construction Technology | बांधकाम तंत्रज्ञान

सरासरी शुल्क- Diploma in Aerospace Engineering after 10th

डिप्लोमा कोर्स फी संरचना अनेक पैलूंवर व संस्थांवर अवलंबून असते. संपूर्ण अभ्यासक्रमासाठी उमेदवाराला दयावी लागणारी वार्षिक सरासरी फी रुपये 2 लाख ते 4 लाखांपर्यंत असेल. ही फी उमेदवारांना सेमिस्टरनुसार भरावी लागेल. स्कॉलर उमेदवारांना AME CET मधून शिष्यवृत्ती मिळेल. वाचा: List of the most popular courses after 10th: 10 वी नंतर पुढे काय?

अभ्यासक्रम कालावधी

Diploma in Aerospace Engineering after 10th अभ्यासक्रम हा 3 वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम असून तो 6 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. या अभ्यासक्रमात विदयार्थी विमान आणि अंतराळ यानाच्या विविध संकल्पनांसह व्यावहारिक ज्ञाना प्राप्त करतात. 3 वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतात किंवा त्यांच्या आवडीनुसार उच्च शिक्षण घेऊ शकतात.

अभ्यासक्रम- Diploma in Aerospace Engineering after 10th

Diploma in Aerospace Engineering after 10th
Photo by Yaroslav Shuraev on Pexels.com

Diploma in Aerospace Engineering after 10th खालील अभ्यासक्रम प्रदान करते.

 • एअरक्राफ्ट इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम
 • CAR (नागरी विमान वाहतूक नियमन)
 • विमानाची देखभाल आणि सराव
 • विमान प्रणाली
 • विमानाची रचना
 • एव्हीओनिक्स आणि एअरक्राफ्ट रेडिओ सिस्टम
 • एअरक्राफ्ट स्ट्रक्चर्स सर्व्हिसिंग लॅब
 • देखभाल व्यवस्थापन
 • C- प्रोग्रामिंग लॅब
 • एव्हीओनिक्स लॅब
 • विमान प्रणाली सर्व्हिसिंग लॅब
 • प्रकल्प कार्य (कार्यरत मॉडेल)
 • विमान विद्युत प्रणाली
 • एअरक्राफ्ट इन्स्ट्रुमेंट सिस्टम लॅब
 • विमान साहित्य
 • उपयोजित गणित
 • व्यावहारिक विज्ञान
 • मूलभूत वायुगतिकी
 • मूलभूत संगणक कौशल्य प्रयोगशाळा
 • मूलभूत इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी
 • मूलभूत इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी प्रयोगशाळा
 • वाचा: Diploma in Architecture Engineering | आर्किटेक डिप्लोमा
 • मूलभूत कार्यशाळा व्यावहारिक
 • संगणक-अनुदानित अभियांत्रिकी ग्राफिक्स
 • अभियांत्रिकी ग्राफिक्स (पारंपारिक)
 • इंग्रजी संप्रेषण
 • फ्लुइड मेक आणि न्यूमॅटिक्स लॅब
 • औद्योगिक भेट
 • ISAP लॅब
 • जेट इंजिन लॅब
 • जेट इंजिन सिद्धांत
 • मटेरियल टेस्टिंग (NDT) प्रक्रिया प्रयोगशाळा
 • संस्थात्मक व्यवस्थापन
 • पिस्टन इंजिन लॅब
 • पिस्टन इंजिन सिद्धांत
 • फ्लुइड मेक आणि न्यूमॅटिक्स एअरक्राफ्ट तपासणी आणि दस्तऐवजीकरण
 • वाचा: Career Opportunities in the Arts Stream: 10 वी नंतर करिअर संधी

डिप्लोमा इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे फायदे

Diploma in Aerospace Engineering after 10th
Photo by Asad Photo Maldives on Pexels.com
 • या कोर्सनंतर विद्यार्थी डिझाईन, डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स यांसारख्या विविध क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी पात्र असतील.
 • विदयार्थी कोर्सनंतर विविध संस्थांमधील व्यवस्थापकीय आणि अध्यापनाच्या क्षेत्रात नोकरी शोधू शकतात.
 • Diploma in Aerospace Engineering after 10th या कोर्सनंतर विदयार्थी शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी पुढील उच्च शिक्षण घेऊ शकतात.
 • वाचा: The Best ITI Trades After 8th and 10th | सर्वोत्तम आयटीआय कोर्स

करिअर संधी- Diploma in Aerospace Engineering after 10th

डिप्लोमा इन एरोस्पेस इंजिनीअरिंगचे भारतात आणि परदेशात उज्ज्वल करिअर आहे. शासकीय क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत तर, खाजगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी निर्माण होत आहेत. कारण भारतातील विमान वाहतूक क्षेत्र वेगाने वाढत आहे.

डिप्लोमा इन एरोस्पेस इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर प्लेसमेंटच्या खालीलप्रमाणे संधी आहेत.

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)
 • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)
 • राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळा (NAL)
 • विमान/ अंतराळ यान निर्मिती कंपन्या
 • विमान/ अंतराळ यानाचे पार्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या
 • एअरलाईन्स
 • नागरी विमान वाहतूक विभाग
 • देखभाल दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (MRO) संस्था.
 • वाचा: Importance of the Career Guidance after 10th | करिअर मार्गदर्शन

नोकरीचे पद- Diploma in Aerospace Engineering after 10th

 • लॉजिस्टिक अभियंता
 • एअरफ्रेम डिझाइन अभियंता
 • उत्पादन अभियंता
 • डिझाईन अभियंता
 • एकत्रीकरण अभियंता
 • विश्वसनीयता अभियंता
 • गुणवत्ता व्यवस्थापक
 • संमिश्र अभियंता
 • पदवीधर अभियंता
 • थर्मल डिझाईन अभियंता
 • सल्लागार
 • वाचा: How To Choose The Right Stream After 10th | योग्य शाखा निवड

सरासरी वेतन- Diploma in Aerospace Engineering after 10th

Diploma in Aerospace Engineering after 10th; एरोस्पेस अभियांत्रिकी डिप्लोमा धारकाचा पगार कौशल्ये, अनुभव, जॉब प्रोफाईल इत्यादींवर अवलंबून असतो. प्रारंभिक पगार पॅकेज वार्षिक सरासरी 4 लाख ते 5 लाख आहे. अनुभव मिळाल्यानंतर पगार वाढ मिळते. कारण भारतात विमान वाहतूक क्षेत्र वाढीस चांगली संधी आहे. विमान वाहतूक क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. वाचा: Bachelor of Education: A Professional Course | बी.एड

स्पेशलायझेशन- Diploma in Aerospace Engineering after 10th

 • विमानाची रचना आणि साहित्य
 • स्ट्रक्चरल डिझाईन आणि अभियांत्रिकी
 • इन्स्ट्रुमेंटेशन आणि कम्युनिकेशन
 • संरचनात्मक विश्लेषण
 • वाहतूक व्यवस्था
 • एरोडायनॅमिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स
 • एरोस्पेस प्रोपल्शन
 • ग्राउंड व्हेईकल सिस्टम्स
 • इलेक्ट्रॉनिक प्रणाली
 • नेव्हिगेशनल मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणाली
 • वाचा:Diploma: The best career option after 10th | 10वी नंतरचे डिप्लोमा

भारतातील एरोस्पेस अभियांत्रिकी महाविद्यालये

Diploma in Aerospace Engineering after 10th
Image by thelester from Pixabay
 1. NMIT बंगलोर – निट्टे मीनाक्षी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बंगलोर, कर्नाटक
 2. ओपीजेएस विद्यापीठ, राजगढ, चुरु, राजस्थान
 3. सिंघानिया विद्यापीठ, झुंझुनू, रसूलपूर, राजस्थान
 4. पारुल विद्यापीठ, वडोदरा, वाघोडिया, गुजरात
 5. YBN विद्यापीठ, रांची, झारखंड
 6. छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, अंबाजोगाई, महाराष्ट्र
 7. आचार्य पॉलिटेक्निक, बंगलोर, कर्नाटक
 8. भुवनेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय, भुवनेश्वर, ओडिशा
 9. सर्वोच्च विद्यापीठ, जयपूर, राजस्थान
 10. हिंदुस्थान इलेक्ट्रॉनिक्स अकादमी, बंगलोर, कर्नाटक
 11. भुवन पॉलिटेक्निक, येलाहंका, बंगलोर, कर्नाटक
 12. श्री साईबाबा पॉलिटेक्निक कॉलेज, तिरुचेनगोडे, तामिळनाडू
 13. मंगलोर इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग, मंगळुरु, कर्नाटक
 14. SSB प्रादेशिक विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, चित्राडा, ओडिशा
 15. करवली पॉलिटेक्निक, मंगलोर, कर्नाटक
 16. स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेज, पटियाला, बानूर, पंजाब
 17. नेव्हल इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल टेक्नॉलॉजी, एर्नाकुलम, केरळ
 18. विंग्स कॉलेज ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, पुणे, महाराष्ट्र
 19. एरो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नमक्कल, तामिळनाडू

महाराष्ट्रातील एरोस्पेस अभियांत्रिकी महाविद्यालये

 1. अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, सांगली
 2. आयआयटी बॉम्बे कोर्सेस, पवई, मुंबई
 3. इंडियन इन्स्टिट्यूट फॉर एरोनॉटिकल इंजिनीअरिंग आणि माहिती तंत्रज्ञान, शिवणे, पुणे
 4. एमआयटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंग, एमआयटी-एडीटी विद्यापीठ, लोणी काळभोर, पुणे
 5. एमिटी युनिव्हर्सिटी, पनवेल, मुंबई
 6. क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर शारिरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कोल्हापूर
 7. गुरुग्राम इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (GGIAET), नागपू
 8. तुळशीरामजी गायकवाड-पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नागपूर
 9. प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नागपूर
 10. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
 11. लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नागपूर
 12. शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, शिवणे, पुणे
 13. संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर
 14. संदिप विद्यापीठ, नाशिक

सारांष- Diploma in Aerospace Engineering after 10th

Diploma in Aerospace Engineering after 10th या कोर्समध्ये विदयार्थी विमानाचे डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग आणि टेस्टिंगमध्ये कौशल्य संपादन करतात. तसेच विद्यार्थी विमान आणि रॉकेट नियंत्रित करण्याचे तंत्र देखील शिकतात.

एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा विमानाच्या यांत्रिक ज्ञानाची प्राथमिक सुरुवात करतो. या कोर्समध्ये नोकरीच्या मोठ्या संधी आहेत. वाचा: Fire and Safety Engineering | अग्निशमन सुरक्षा

हा कोर्स तुमची कौशल्ये सुधारेल आणि तुम्हाला सहाय्यक वैमानिक अभियंता म्हणून तयार करेल. या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी आपणास “मराठी बाणा” कडून हार्दिक शुभेच्छा… धन्यवाद …!

Related Posts

Post Categories

आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Know the most common online scams

Know the most common online scams | ऑनलाइन घोटाळे

Know the most common online scams | इंटरनेट फसवणूक ही एक प्रकारची सायबर क्राइम फसवणूक आहे, जी इंटरनेटचा वापर करुन ...
Read More
The Deadliest Places in the World

The Deadliest Places in the World | प्राणघातक ठिकाणे

The Deadliest Places in the World | जगातील सर्वात प्राणघातक ठिकाणे, जी साहसी पर्यटकांना आकर्षित करतात अशा 11 ठिकाणांविषयी जाणून ...
Read More
Online Teaching and LearningOnline Teaching and Learning

Online Teaching and Learning | ऑनलाइन शिक्षण

Online Teaching and Learning | ऑनलाइन टिचींग, ऑनलाइन शिकवणाऱ्या शिक्षकांनी शिक्षण अधिक मनोरंजक आणि आकर्षक बनवण्यासाठी त्यांच्या बोटांच्या टोकावर असलेला ...
Read More
a woman in white long sleeves holding flowers

The best ways to deal with Acne | मुरुमांना असे सामोरे जा

The best ways to deal with Acne | मुरुमांना सामोरे जाण्याचे सर्वोत्तम मार्ग. मुरुमाचे विविध प्रकार असून, प्रत्येकाला सामोरे जाण्याचे ...
Read More
Strange facts about the human body

Strange facts about the human body | मानवी शरीर तथ्ये

Strange facts about the human body | मानवी शरीराबद्दल 105 मजेदार, अद्भुत आणि विचित्र तथ्ये आहेत, जी तुम्हाला जाणून घ्यायला ...
Read More
How to Manage Time at Work

How to Manage Time at Work | कामाचे वेळ व्यवस्थापन

How to Manage Time at Work | कामाच्या ठिकाणी वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी काय केले पाहिजे; या विषयी सविस्तर माहिती या ...
Read More
Know the Amazing Benefits of Amla

Know the Amazing Benefits of Amla | आवळयाचे फायदे

Know the Amazing Benefits of Amla | या सुपरफ्रूटचा आहारात ताज्या किंवा वाळलेल्या स्वरुपात समावेश केल्यास त्वचा, केस आणि एकूणच ...
Read More
How to avoid NFT Scams?

How to avoid NFT Scams? | एनएफटी घोटाळे कसे टाळावेत

How to avoid NFT Scams? | एनएफटी घोटाळे कसे टाळावेत, एनएफटी म्हणजे काय? एनएफटीचे धोके काय आहेत? सर्वात सामान्य एनएफटी ...
Read More
How to Celebrate Holi Festival in India

How to Celebrate Holi Festival in India | होळी उत्सव

How to Celebrate Holi Festival in India | होळी उत्सव, होळीचे सांस्कृतिक महत्त्व, विविध कथा, महाराष्ट्रात होळी कशी साजरी करतात ...
Read More
Most Popular Sports in India

Most Popular Sports in India | भारतातील लोकप्रिय खेळ

Most Popular Sports in India | भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ, खेळांचे महत्त्व, यश मिळविण्यासाठी समर्पण, चिकाटी व सहकार्याची भावना व ...
Read More
Spread the love