Know the Importance of Navratri and Dasara | नवरात्री व दसरा, दुर्गम राक्षसाचा वध, देविंचे विविध अवतार; सीमोल्लंघन- दसरा, नवरात्रोत्सवाचा विस्तार, शस्त्र व श्रद्धेचे महत्व.
मराठी महिन्यानुसार पावसाळयातील शेवटचा महिना म्हणजे ‘अश्विन’ हस्तनक्षत्राच्या सरी अधून मधून कधी जोरात तर कधी सावकाश कोसळत हिरव्या शालूने नटलेल्या सृष्टीसौंदर्यात भर घलतात. हिरवीगार झाडी आणि त्यावर बसलेल्या पक्षांची किलबील ऐकून मन प्रसन्न होते. अशा या उत्सवाविषयी Know the Importance of Navratri and Dasara अधिक जाणून घ्या.
धरणीमातेसह सर्वजन सुखावलेले असतात, सर्वत्र आनंदी वातावरण असते, अशा या प्रसन्न वातावरणात शुध्द प्रतिपदेपासूनच नवरात्रोत्सवाचे आगमन होते त्यामुळे आनंद अधिकच द्विगुणित होतो. (Know the Importance of Navratri and Dasara)
दुर्गम राक्षसाचा वध

भारतीय सांस्कृतिक इतिहासानुसार पुराणकाळ हा देवी-देवतांची पूजा करण्याच्या दृष्टीने अत्यांत समृद्ध काळ मानला जातो. नवरात्रोत्सव हा मुख्यत: विश्वव्यापी, त्रिगुणात्मक आदिमायेचे सगुण रुप असलेल्या देवी दुर्गेशी निगडित आहे.
देवांचा नाश करण्यासाठी ‘दुर्गम’ नावाच्या राक्षसाने तपश्चर्या करुन ब्रम्हदेवाला प्रसन्न करुन घेतले आणि त्यांच्याकडून चार वर मागून घेतले. त्याचा परिणाम असा झाला की, राक्षसांनी सर्वत्र आपले भय पसरविण्यास सुरुवात केली.
त्यांनी देवतांचे यज्ञ विधी बंद करण्यास भाग पाडले. शेवटी देवांनी व अनेक आश्रमातील ऋषी- मुनींनी एकत्र येत आदिमायेची उपासना केली. आदिमायेने उन्मत झालेल्या दुर्गम राक्षसाचा वध केला, म्हणून आदिशक्तीला ‘दुर्गा’ म्हटले गेले.
दुर्गेलाच आदिशक्ती दुर्गा, भवानी, रेणूका, एकविरा, चंडिका, चामुंडा, कालिका, अंबिका, अंबा, लक्ष्मी, सरस्वती, संतोषी, महिषासुरमर्दिनी अशा विविध नावांनी ओळखल्या जाणा-या मातृशक्तींची उपासना केली जाते.
देविंचे विविध अवतार
ज्या-ज्या वेळी भूतलावर क्रुर प्रवृत्तीच्या राक्षसांचे, दुर्जनांचे प्राबल्य वाढले त्या-त्या वेळी दुर्जनांचा संहार करण्यासाठी आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देवींनी वरील विविध नावाने अवतार धारण केलेले आहेत.
भारतभर असलेल्या शक्तिस्थानांच्या ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत प्रत्येक घरोघरी सलग नऊ रात्रंदिवस उपवास करुन पूजा केली जाते. हा नऊ रात्रींचा कालखंड म्हणून या उत्सवास ‘नवरात्र उत्सव’ असे म्हटले जाते.
या उत्सवाबाबत असे मानले जाते की, जो नऊ दिवस दुर्गामातेची मनापासून पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे नऊ दिवस देवी दुर्गामातेची वेगवेगळया स्वरुपात पूजा केली जाते.
महिषासूर मर्दिनी- Know the Importance of Navratri and Dasara

महिषासूर नावाच्या राक्षसाने तपश्चर्या करुन ब्रह्मदेवाला प्रसन्न करुन घेतले व वरदान मागितले की, कोणताही देव, राक्षस किंवा पृथ्वीवर राहणारी व्यक्ती महिषासुराला मारु शकणार नाही आणि ब्रह्माजींनी तथास्तू म्हटले.
ब्रह्माजींच्या वरदानानंतर त्याने पृथ्वीवर दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. महिषासुराचा वध करण्यासाठी दुर्गा देवीचा जन्म झाला. देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यात नऊ दिवस भयंकर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला. तेंव्हापासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे असे मानले जाते.
सीमोल्लंघन- दसरा- Know the Importance of Navratri and Dasara
नवरात्राचे नऊ दिवस संपले की दहावा दिवस म्हणजे दसरा. पौराणिक कथेनुसार देव आणि राक्षस यांचे घनघोर युध्द आश्विन शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले होते. त्यानंतर दहाव्या दिवशी देवी पार्वतीने विजयी होऊन काशीत प्रवेश केला.
तो दिवस होता आश्विन शुध्द दशमीचा. विजयारुपी पार्वतीने विजय मिळविला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. (Know the Importance of Navratri and Dasara)
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. कोणत्याही मंगल कार्याचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा श्रीगणेशा या दिवशी केला जातो. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीपूजन करुन शिक्षणाचा प्रारंभ करतात.
वाचा: Celebration of the Festival of Durga Puja | दुर्गा पूजा
या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते. रामाने रावणाशी युध्द करुन त्याचा वध केला व वनवासात जाताना शमीच्या वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रास्त्रे परत ताब्यात घेतली म्हणून शमीच्या वृक्षाला या दिवशी महत्व आहे.
उत्तरभारतात या दिवशी रावणाची प्रतिमा जाळण्याची प्रथा आहे. वनवासाला जाताना सीतेचे सुवर्ण अलंकार आपटयाच्या झाडामधे ठेवले होते असे मानतात. म्हणून आपटयाची पाने सोने म्हणून सर्वांना वाटतात.
वाचा: Rituals and Traditions of Durga Puja | दुर्गा पूजा विधी
प्रभू श्री रामचंद्र यांनी नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केली; दुर्गादेवीने प्रसन्न होवून प्रभू श्री राम यांना विजयी होण्याचा आशिर्वाद दिला. त्यानंतर, दहाव्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाशी युद्ध करत त्याचा वध केला आणि लंकेवर विजय मिळवला, म्हणून दहावा दिवस विजयादशमी म्हणूनही साजरा केला जातो.
वाचा: Know about the Narak Chaturdashi | नरक चतुर्दशी
या दिवशी घरातील पुरुष सीमोल्लंघन करतात. सोने घेऊन देवीचे दर्शन घेतात. घरी आल्यावर घरातील स्त्री त्यांना ओवाळते असा प्रघात आहे. पूर्वी साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीने ज्या मोहिमा आखल्या जात त्यांची सुरुवात सीमोल्लंघनाने होत असे.
नवरात्रोत्सवाचा विस्तार

विजयादशमीचा नवरात्रोत्सव, संवत्सरांचे व्यापक संस्कार घेत घेत पुढे सीमोल्लंघनापर्यंत विस्तारित झाला. आपल्या प्रत्येक सणात वर्षांनुवर्षे काहीतरी नवीच भर पडत गेली व सणांचे रुप विस्तारत गेले. (Know the Importance of Navratri and Dasara)
दुर्गादेवीच्या या मूळ उत्सवात रावणवधाचा जल्लोष मिळाला. खंडेनवमीच्या दिवशी पांडवांचा शमीवृक्षावरुन शस्त्रे उतरवून विराटाच्यावतीने अर्जुनाने कौरवांवर विजय मिळवला. त्याचा आनंदोत्सव यात अंतर्भूत झाला.
वाचा: How to Celebrate Durga Puja 2022 | दुर्गा पूजा परंपरा
आजचा हा उत्सव दुर्गादेवीचा, शस्त्र पूजनाचा व सीमोल्लंघनाचा असा आशय घेऊन अपार उत्साहात देशभर साजरा होतो. नवरात्रोत्सव, विजयादशमी व सीमोल्लंघन असा विस्तारित झाला.
पुढे शिवरायांच्या संग्रामशील व कालोचित अशा सीमोल्लंघनाच्या पायंडयाने; नवरात्रोत्सवाला जबरदस्त ऐतिहासिक परिमाण बहाल केला आहे. (Know the Importance of Navratri and Dasara)
वाचा: Know All About Durga Puja 2022 | दुर्गा पूजा उत्सव
नवरात्रोत्सवात पहिला दिवस हा घटस्थापनेचा दिवस असतो. या दिवशी मातीच्या वेदीवर घटाच्यावर पसरलेल्या ताम्हणात कुलदेवतेच्या प्रतिमेची व कुलदेवाच्या टाकांची प्रतिष्ठापना करुन घटाभोवती पसरलेल्या निवडक मातीच्या गादीवाफ्यात गहू, ज्वारी, हरभ्ररा, जवस अशी सप्त धान्य पेरली जातात.
या दिवशी घटाजवळ एकदा शिलगावलेला नंदादीप पुढे नऊ दिवस-रात्र तेवत राहणार असतो. हा घटस्थापनेचा दिवस. पुढे प्रत्येक दिवशी विविध फुलांची एक एक चढत्याक्रमाची भरगच्च माळ या घटावर टांगली जाते.
प्रत्येक दिवसानुसार तिला पहिली, दुसरी, तिसरी माळ असे संबोधतात. या काळात पाऊस पडलाच तर तो घटमाळेत सापडला आता किमान नऊ दिवस पूर्ण होईतोपर्यंत ताे हटणार नाही असे पूर्विपासून लोक मानत आलेले आहेत.
वाचा: What is the Significance of Navratri? | नवरात्रीचे महत्व
नवरात्रात प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे दुर्गासप्तशतीच्या एकएका पाठाचे सविध पठन केले जाते. काही घराण्यात आदिमायेच रुप मानलेली देवी कुलदेवी असते. तिच्या स्तुतीचे पाठ असलेल्या त्या त्या घराणांच्या पोथ्या असतात. त्यांचेही पठन या काळात केले जाते.
नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी दुर्गेच्या नावाने कोरडा शिधा जोगवा मागण्याची पध्दत आजही काही घराण्यात चालू आहे. यासंदर्भात एक ऐतिहासिक व ठोस संदर्भ सदैव ध्यानात ठेण्यासारखा आहे.
पुढे 1674 साली रायगडावर बत्तीस मणी संपन्न सुवर्णी. सिंहासन उठविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर व नंतर रायगडावरही स्वत:ला भवानीचा भक्त मानून असा जोगवा मागितला होता.
वाचा: Know the various names of Durga | दुर्गा मातेची नावे
नवव्या दिवशी हवन होऊन दहाव्या दिवशी दसरा साजरा करुन या उत्सवाची सांगता होते. विजयादशमीला आपटयाची किंवा शमीच्या वृक्षाची पान ‘सोन’ म्हणून सर्वांना वाटण्याची प्रथा सुरु झाली. पेशवाईत सरंजाम, नगारा, नोबत्ती याची त्यात उत्साही वाढ झाली.
महाराष्ट्रात आज गावोगाव ‘दसरामाळ’ आहे. या माळावर चिवाटयांच्या बंदीस्त चौकात गावचा गुरव भल्या पहाटेच आपटयाच्या किंवा शमीच्या फाद्यांचे ढिग आणून रचतो. संध्याकाळी गावच्या तालेवार मानकऱ्याकडून हा ‘सोनचौक’ सर्व प्रथम फोडला जातो.
वाचा: What is the Importance of Ghatasthapana? | घटस्थापना
मग गावकऱ्यांची चौकातील सोन लुटण्यासाठी झुंबड उडते. हाती लागेल तो भाग घेऊन गावकरी गावाच्या ग्रामदैवताला प्रथम सोन वाहतो. मग आपल्या सर्व गावबंधुंना हे सोन देण्यासाठी त्याचा मित्रगणांसह ग्रामदौरा सुरु होतो.
फेटयाच्या शेमल्यात पिवळयाजर्द कोभांचे तुरे रोवलेले शिवरायांचे मऱ्हाटमोळे ग्रामीण लाेक एकमेकांना सोन्याची पान देतांना म्हणतात, “सोन घ्या-सोन्यासारख- ऱ्हावा। आमच सोन सांडू नगा । आमच्यासंग भांडू नगा।”
ते एकमेकांना निकोप गावरान प्रेम देत एकमेकांना उराउरी भेटतात. त्यावेळी त्यांच्या फेटयाच्या शेमल्यात खोवलेले देखणे कोंभ लयीत मागेपुढे उडतात. ते बघतांना खरा महाराष्ट्र कळतो.
वाचा: Dasara the Most Important Hindu Festival | विजया दशमी
शिवकाळापासून ‘सिमोल्लंघनाला’ फार महत्व आलेे. मावळे सैनिक जवळजवळ सर्वच शेतकरी होते. ते आपआपल्या गावाकडे पावसाळाभर शेताात राबत. (Know the Importance of Navratri and Dasara)
पावसाळा संपला की, मळणी, आबादानी आवरुन मावळा आपल्या गावाच्या किंवा वस्तिच्या शिव (सीमा) ओलंडून निघे. त्याच्या कमरेला तलवार, हाती भाला आणि पाठीवर ढाल आवळलेली असे. आता तो शिवरायांच्या सेनेचा ‘धारकरी’ असे, हे सीमोल्लंघन तो विजयादशमीच्या सोनवाणाच्या मुहूर्तावर करे. आता त्याला ‘जिकडं पूढा-तिकड मुलूख थोडा.’ असे.
वाचा: Know the Importance of Navratri 2022 | नवरात्री उत्सव
मैसूरमध्ये दस-याच्या या दिवशी विविध रंगी झुली पांघरलेले शेकडो हत्ती ‘दसरा मिरवणूकीसाठी’ रस्त्यावर येतात. बंगालमध्ये दुर्गापूजा व तिचे स्तवन यास महत्व असते.
महाराष्ट्राचा मावळा नवरात्रांच्या नऊ दिवस आपल्या कुलदैवतांच्या टाकांसमोर रोज एक अशा नऊ माळा टांगून, विजयादशमीची पोळी खाऊन संध्याकाळी सोनचौक फोडून गावभर सोन वाटतो.
दुस-या दिवशीच पाठीला खंडेनवमीची पूजलेली हत्यार पेलत नवरात्रीची कात टाकून विजयादशमीचे पराक्रमाचे नवकोंभ मिरवत-सीमोल्लंघन करतो हे आगळ वेगळ वाटत नाही काय? नक्कीच वाटेल फक्त त्यासाठी सशक्त मनोबैठक आणि दृष्टी हवी!
वाचा: Know the Significance of Karwa Chauth | करवा चौथ
शस्त्र व श्रद्धेचे महत्व- Know the Importance of Navratri and Dasara
- विष्णूच्या हातात सुदर्शन चक्र, रामजवळ धनुष्यबाण आणि परशुरामजवळ परशु असे प्रत्येकि एकच शस्त्र असताना या देविजवळ मात्र अनेक शस्त्रे आहेत. या शस्त्रबळावर ती सामर्थ्यवान व बलवान ठरली.
- प्रतापगडाच्या भवानी देवीने श्री शिवछत्रपतींना तलवार प्रसाद म्हणून दिली. या तलवारीच्या सामर्थ्यावरच शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
- पेशवेसुद्धाप्रतिपादिदिवशी स्वतः घटस्थापना करुन अंबेची स्थापना करित असत. द्वितीयेला रेणुकादी चौसष्ट योगिनींची पूजा करीत श्रद्धा. तृतीयेला अंबा अष्टभुजा शिणगार घालून विराजमान होत असे. सप्तमीच्या दिवशी सप्तशृंगी गडावर आदिमातेची पेशवयांकडून पूजा बांधली जात असे.
- चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला जिंकला, जो वज्रेश्वरीच्या प्रेरणेमुळेच. अशा या शक्तिदेवतेचे, आदिमातेचे स्वरुप आपण अनेक रुपात पाहत आलो आहोत.
- राधेसारखे प्रणयिनीचे रुप, गौरीसारखे ममतामयी रुप किंवा दुर्गेसारखे संहारक रुप या आदिमातेने घेतले आहे.
- वाचा: Kartik: Significance of the holiest month | कार्तिक महिना

Related Posts
- Janmashtami and Dahi Handi | कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी
- Importance of Krishna Janmashtami | श्रीकृष्ण जन्माष्टमी 2022
- The Religious Significance of Diwali | दिवाळीचे धार्मिक महत्त्व
- How to Celebrate the Festival of Bail Pola? | बैल पोळा सण
- Nag Panchami Festival 2022 the Best Information | नाग पंचमी
Post Categories
आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Know the early life of Lord Ram | श्रीरामाचे प्रारंभिक जीवन
Read More

Know all about Diabetes | मधुमेहाविषयी सर्व काही
Read More

Popular Varieties of Mangoes in India | आंब्याचे प्रकार
Read More

The Deadliest Places in the World | प्राणघातक ठिकाणे
Read More

Online Teaching and Learning | ऑनलाइन शिक्षण
Read More

The best ways to deal with Acne | मुरुमांना असे सामोरे जा
Read More

Strange facts about the human body | मानवी शरीर तथ्ये
Read More

How to Manage Time at Work | कामाचे वेळ व्यवस्थापन
Read More

Know the Amazing Benefits of Amla | आवळयाचे फायदे
Read More

How to avoid NFT Scams? | एनएफटी घोटाळे कसे टाळावेत
Read More