Know About BA Mathematics | बी.ए. गणित अभ्यासक्रम, पात्रता, प्रवेश, प्रमुख महाविद्यालये, नोकरीच्या संधी, भविष्यातील व्याप्ती, भारतीय गणितज्ञव शंका समाधान.
बॅचलर ऑफ आर्ट्स इन मॅथेमॅटिक्स किंवा बीए मॅथेमॅटिक्स हा तीन वर्षे कालावधी असलेला अंडरग्रेजुएट अभ्यासक्रम आहे. या विषयाचा अभ्यासक्रम सहा सेमिस्टरमध्ये विभागलेला असून विषयाचे सैद्धांतिक ज्ञान शिकणे, कला आणि मानवी क्षेत्रातील ज्ञान संपादन करणे हा अभ्यासक्रमाचा मुख्य हेतू आहे. (Know About BA Mathematics)
या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी पात्रता निकष म्हणजे उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची इ. 12वी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. गणित विषयासह विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून प्रवेशासाठी किमान एकूण 50% गुण आवश्यक आहेत.
काही महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेच्या आधारावर किंवा प्रवेश परीक्षांच्या आधारावर प्रवेश दिले जातात. बीए गणित अभ्यासक्रमासाठी आकारले जाणारे सरासरी अभ्यासक्रम शुल्क रु. 1 ते +3 लाखांपर्यंत असते.
उमेदवारांना खाजगी आणि सरकारी दोन्ही संस्थांमध्ये शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ, संशोधक, सांख्यिकीशास्त्रज्ञ इत्यादी पदांवर नियुक्त केले जाते. सरासरी प्लेसमेंट पॅकेज रु. 2 ते 7 लाखाच्या श्रेणीत आहे.
वाचा: Bachelor of Science in Genetics after 12th | बीएस्सी जेनेटिक्स
Table of Contents
1) बीए गणित अभ्यासक्रमा विषयी थोडक्यात

- कोर्स: बॅचलर ऑफ आर्ट्स इन मॅथेमॅटिक्स
- पदवी: बॅचलर
- कालावधी: 3 वर्षे
- परीक्षा प्रकार: सेमिस्टर
- पात्रता: इ. 12 वी विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत गणित हा अनिवार्य विषय म्हणून मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 45% गुणांसह उत्तीर्ण.
- प्रवेश प्रक्रिया: या अभ्यासक्रमासाठी प्रवेश गुणवत्तेवर आधारित दिले जातात.
- सरासरी शुल्क: कोर्सची सरासरी अंदाजे फी रुपये 1 ते 3 लाख पर्यंत आहे
- पगार: वार्षिक सरासरी पगार रुपये 2 लाखा पासून सुरु होतो आणि हळूहळू वाढीसह 7 ते 10 लाखापर्यंत पोहोचू शकतो.
- नोकरीचे पद: लेखापाल, शिक्षक, संशोधक, सांख्यिकीशास्त्रज्ञ, वायुगतिकी विशेषज्ञ इ.
- रोजगार क्षेत्र: महाविद्यालये आणि विद्यापीठे, बँका, वित्तीय संस्था, खाजगी आणि सरकारी संस्था, अभियांत्रिकी कंपन्या, संशोधन संस्था इ. वाचा: Bachelor of Commerce after 12th | बॅचलर ऑफ कॉमर्स
2) पात्रता निकष (Know About BA Mathematics)
बीए गणित विषयाच्या प्रवेशासाठीचे पात्रता निकष प्रत्येक महाविद्यालयानुसार वेगळे असतील. उच्च महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लागू असलेले किमान पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.
- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इ. 12वी स्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- किमान एकूण 50 टक्कयाहून अधिक गुण मिळणे आवश्यक आहे.
- 12 वी स्तरावरील शिक्षणाची शाखा गणितासह विज्ञान किंवा वाणिज्य असावी.
- वाचा: BA Animation is the best career option | बीए ॲनिमेशन
3) प्रवेश प्रक्रिया (Know About BA Mathematics)
बीए गणित अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर किंवा प्रवेश परीक्षेच्या आधारावर दिले जातात. टॉप रँकिंग महाविद्यालये आणि विद्यापीठे 12 वी स्तरावरील एकूण गुणांचा विचार करतात आणि कट ऑफवर आधारित विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.
वाचा: B.Sc. in Applied Science | अप्लाइड सायन्समध्ये बी.एस्सी.
4) अभ्यासक्रम (Know About BA Mathematics)
बी.ए. गणिताचा अभ्यासक्रम प्रत्येक महाविद्यालयात वेगळा असतो. अभ्यासक्रमातील प्रत्येक सेमिस्टरमध्ये समाविष्ट असलेले प्रमुख विषय खालीलप्रमाणे आहेत.
वाचा: Know the Importance of B.Ed. | बी.एडचे शिक्षणातील महत्व
i) सेमिस्टर I & II
- शास्त्रीय बीजगणित आधुनिक बीजगणित
- त्रिकोणमिती भूमिती 2D
ii) सेमिस्टर III & IV
- विभेदक कॅल्क्युलस विभेदक समीकरणे
- इंटिग्रल कॅल्क्युलस वेक्टर विश्लेषण
iii) सेमिस्टर V & VI
- डायनॅमिक्स लिनियर प्रोग्रामिंग
- स्टॅटिक्स सॉलिड भूमिती 3D
5) प्रमुख महाविदयालये (Know About BA Mathematics)
बीए गणित अभ्यासक्रम सुविधा पुरविणारे काही प्रमुख महाविद्यालये खालीलप्रमाणे आहेत.
- दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली
- विश्व भारती, शांतिनिकेतन
- बनस्थली विद्यापिठ, जयपूर
- लवली व्यावसायिक विद्यापीठ, जालंधर
- मिरांडा हाऊस, नवी दिल्ली
- गार्गी कॉलेज, नवी दिल्ली
- फर्ग्युसन कॉलेज, पुणे
- इंद्रप्रस्थ कॉलेज फॉर वुमन, नवी दिल्ली
- कमला नेहरू कॉलेज, नवी दिल्ली
6) नोकरीच्या संधी आणि करिअर पर्याय

बीए गणित पदवी प्राप्त केल्यानंतर, उमेदवार नोकरी करु शकतात किंवा उच्च शिक्षण अभ्यासक्रमात नावनोंदणी करु शकतात. सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांमध्ये नोकरीचे असंख्य पर्याय आहेत.
BA गणित पदवीधरांना खाजगी आणि सरकारी दोन्ही संस्थांमध्ये विविध पदांवर नियुक्त केले जाते.
- लेखापाल: या पदावर संस्थेचे आर्थिक विवरण रेकॉर्ड आणि देखरेख करण्यासाठी नियुक्त केले जाते. आर्थिक वर्षाच्या समाप्तीची विवरणपत्रेही त्यांना तयार करावी लागतात.
- एरोडायनॅमिक्स स्पेशलिस्ट: हे विमान आणि इतर स्पेस क्राफ्ट्सची योजना, डिझाईन, बांधणी आणि देखभाल करण्यासाठी नियुक्त केले जातात. ते उत्पादनासाठी सर्वोत्तम साहित्य आणि उपकरणे समजून घेण्यासाठी संशोधन करतात.
- शिक्षक: शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नियुक्त केले जातात. ते गणित विषयतज्ञ म्हणून नियोजन करतात, शिकवतात आणि परीक्षा देखील घेतात.
- सांख्यिकीशास्त्रज्ञ: यांना मोठ्या प्रमाणात डेटा हाताळण्यासाठी नियुक्त केले जाते जेणेकरुन त्यामधील नमुने आणि इतरांनी काम करण्यासाठी अंदाज ओळखावे.
7) भविष्यातील व्याप्ती (Know About BA Mathematics)
अनेक उमेदवार नोकरी शोधण्याऐवजी उच्च पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणे निवडतात. सर्वात लोकप्रिय उच्च शिक्षण अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत.
- एमए गणित: उच्च शिक्षणाची पहिली पसंती म्हणजे गणितातील मास्टर ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेणे. हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे जो गणित विषय आणि त्याचे विविध कला आणि मानवि क्षेत्रांविषयी शिकवतो. हा अभ्यासक्रम बॅचलर स्तरावरील अभ्यासक्रमाचे विस्तारित रुप आहे. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या अभ्यासाच्या क्षेत्रात तज्ञ बनण्याची परवानगी देतो. पहिल्या वर्षात उन्हाळी इंटर्नशिप देखील अनिवार्य आहे आणि दुसऱ्या वर्षाच्या शेवटी एक प्रबंध केला जातो.
- M.Sc. गणित: मास्टर ऑफ सायन्स इन मॅथेमॅटिक्स हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे जो पुढील शिक्षणाचा आणखी एक लोकप्रिय पर्याय आहे. प्रवेश परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत फेरीद्वारे प्रवेश दिले जाता.
- एमबीए: जर एखाद्याला व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल, तर उमेदवार एमबीए अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्याचा विचार करू शकतात. CAT, XAT किंवा MAT सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेच्या आधारे प्रवेश दिले जातात. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर, गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीची फेरी घेतली जाते. उमेदवारांना फायनान्स, मार्केटिंग, हॉटेल मॅनेजमेंट इ.
- स्पर्धात्मक परीक्षा: विविध स्पर्धात्मक परीक्षांद्वारे भारतातील अनेक उमेदवार सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती होण्याचा प्रयत्न करतात. तयारीसाठी वेळ आणि मेहनत आवश्यक आहे आणि दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात.
8) काही प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ
जेव्हा गणिताचा विचार केला जातो तेव्हा आपल्याकडे नेहमी दोन प्रकारचे लोक असतात, जे गणितात पूर्णपणे आश्चर्यकारक असतात आणि ज्यांच्यासाठी गणित हे एका भयानक स्वप्नापेक्षा कमी नसते.
पण जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाहिले तर गणित हा त्यातला मोठा भाग आहे. गणिताशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण असतं, केकचे समान तुकडे कापण्यापासून वजन किंवा उंची मोजण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत गणित गुंतलेले असते.
या जादुई गणिती संकल्पना कशा आल्या आणि त्यांच्या शोधामागील लोक कोण आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? गणित दिन साजरा केला जाणा-या उल्लेखनीय भारतीय गणितज्ञ खालील प्रमाणे आहेत.
- आर्यभट
- ब्रह्मगुप्ता
- श्रीनिवास रामानुजन
- पी.सी. महालनोबीस
- सीआर राव
- डी.आर. कापरेकर
- हरिशचंद्र
- सत्येंद्र नाथ बोस
- भास्कर
- नरेंद्र करमरकर
वाचा: BA English: The Most Popular Language | बीए इंग्रजी
9) बीए गणिता विषयी वारंवार विचारले जाणारे प्रष्न

i) बीए गणित अभ्यासक्रमाचा कालावधी किती आहे?
बीए गणित अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा असून तो सहा सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे.
ii) बीए गणित पूर्ण केल्यानंतर एमएस्सी गणितासाठी प्रवेश मिळतो का?
होय, बीए गणित पूर्ण केल्यानंतर एमएस्सी गणितासाठी प्रवेश मिळतो परंतु तुम्हाला यूजी परीक्षेत किमान 60% गुण मिळणे आवश्यक आहे.
iii) खाजगी विद्यापीठातील बीए गणित अभ्यासक्रमासाठी किती फी आहे?
कोर्सची सरासरी फी रु. 1लाख ते 3 लाखांपर्यंत आहे.
iv) बीए गणितानंतर कोणती नोकरी मिळेल?
उमेदवारांना शिक्षक, सांख्यिकीशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, लेखापाल इत्यादी पदांवर नियुक्त केले जाऊ शकते.
v) बीए गणिताचा पदवीधर कोणता उच्च शिक्षण अभ्यासक्रम निवडू शकतो?
उच्च शिक्षणाचे लोकप्रिय पर्याय एमए गणित, एमएस्सी गणित, एमबीए किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी.
Related Posts
- Economics is the best career option | बीए अर्थशास्त्र
- BA Geography is the best career option | बीए भूगोल
- BA in English Literature | इंग्रजी साहित्यामध्ये बीए
Post Categories
आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Best healthy foods to eat in winter | हिवाळ्यातील आरोग्यदायी पदार्थ

Know about the winter skincare tips | स्किनकेअर टिप्स

Most effective ways to reduce obesity | लठ्ठपणा कमी करण्याचे मार्ग

Know the Types of Real Estate | RE गुंतवणुकीचे प्रकार

Direct Equity Investment Plans | थेट इक्विटी गुंतवणूक

Know The Best PO Saving Schemes | PO बचत योजना-2

How drinking water helps to lose weight? | पिण्याचे पाणी व वजन

Importance of the skin health | त्वचा आरोग्याचे महत्त्व

Know All About Low Blood Pressure | कमी रक्तदाब
