Categories
Finance

Know the Impact of Marginal Relief | मार्जिनल रिलीफचा प्रभाव

Know the Impact of Marginal Relief | नवीन कर प्रणालीमध्ये करमुक्त मर्यादा, स्टॅन्डर्ड डिडक्शन व मार्जिनल रिलीफचा आयकरावर कसा प्रभाव पडतो ते जाणून घ्या.

Know the Impact of Marginal Relief | नवीन कर प्रणालीमध्ये करमुक्त मर्यादा, स्टॅन्डर्ड डिडक्शन व मार्जिनल रिलीफचा आयकरावर कसा प्रभाव पडतो ते जाणून घ्या.

फेब्रुवारी 2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये नवीन कर प्रणालीमध्ये करदात्यांसाठी किरकोळ कर सवलत दिली. Know the Impact of Marginal Relief, या सवलतीचा फायदा ज्यांचे उत्पन्न 7.5 लाख करमुक्त मर्यादेपेक्षा थोडे जास्त आहे, त्यांच्यासाठी हा एक स्वागतार्ह बदल आहे. परंतू प्रथम, नवीन कर प्रणाली नियमात 7.5 लाख रुपये करमुक्त कसे होतात ते पाहू.

नवीन कर प्रणालीमध्ये रु. 7 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागू नाही. तसेच यामध्ये करदात्यांना रु 50,000 चे स्टॅन्डर्ड डिडक्शनची वजावट दिली आहे. म्हणजे रु 7.5 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागू नाही. स्टँडर्ड डिडक्शन आणि रिबेटमुळे टॅक्स कसा कमी होतो या विषयी अधिक माहिती देणारा खालील तक्ता पहा. (Know the Impact of Marginal Relief)

मार्जिनल रिलीफ

तपशीलउत्पन्न व त्यावरील कर
एकूण उत्पन्नरु 7.5 लाख
स्टॅन्डर्ड डिडक्शनरु 50,000
करपात्र उत्पन्नरु 7 लाख
कर दायित्वरु 25,000
कर सवलतरु. 25,000
देय कररु. 00
तक्ता:1

परंतू, जर एखादया व्यक्तीचे उत्प्नन्न रु. 7,60,000 असेल तर नवीन कर प्रणाली अंतर्गत त्यांचे कर दायित्व कसे असेल, त्यासाठी खालील त्क्त तक्ता पहा. (Know the Impact of Marginal Relief)

तपशीलरक्कम
एकूण उत्पन्नरु 7.6 लाख
स्टॅन्डर्ड डिडक्शनरु 50,000
करपात्र उत्पन्नरु. 7,10,000
रु. 3 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर कररु. 00
रु. 3 ते 6 लााख दरम्यानच्या उत्पन्नावर कर (5%)रु. 15,000
रु. 6 ते 9 लाख दरम्यानच्या उत्पन्नावर कर (10%)रु. 11,000
एकूण कररु. 26,000
उपकरासह एकूण कर (देय कराच्या 4%)रु. 27.040
तक्ता:2

अशाप्रकारे तक्ता क्रमांक 2 मध्ये, तक्ता क्रमांक 1 पेक्षा केवळ रु. 10,000 वाढल्यामुळे रु. 27,040 इतका कर आकारला जातो. तक्ता क्रमांक 2 मध्ये केवळ रु. 10,000 अतिरिक्त उत्पन्नातील वाढीमुळे  तक्ता क्रमांक 1 च्या तुलनेत जास्त कर भरावा लागत आहे. ही दरी कमी करण्यासाठी इथेच (Marginal Relief) किरकोळ कर सवलत लागू होते.

किरकोळ कर सवलतीनुसार, रु.7,50,0001 ते रु. 7,77,778 च्या दरम्यानच्या उत्पन्नावर कराची रक्कम भरावी लागेल. हे 7.5 लाख रुपयांपेक्षा अतिरिक्त उत्पन्न आहे आणि स्लॅबनुसार त्यावर कर दायित्व नाही. यामुळे करपात्र उत्पन्नात किरकोळ वाढ झाल्यामुळे कर खर्चात बरीच वाढ होते अशी परिस्थिती टाळण्यात मार्जिनल रिलिफची मदत होते. ते खालील तक्यावरुन लक्षात यते. (Know the Impact of Marginal Relief)

वार्षिक उत्पन्नस्टॅन्डर्ड डिडक्शनकरपात्र उत्पन्नस्लॅबनुसार कर दायित्ववास्तविक कर दायित्वमार्जिनल रिलिफ
रु. 7,50,000रु 50,000रु.7,00,000रु. 00रु. 00रु. 00
रु. 7,55,000रु 50,000रु.7,05,000रु. 25,500रु. 5,000रु. 20,500
रु.7,60,000रु 50,000रु. 7,10,000रु. 26,000रु. 10,000रु. 16,000
रु.7,65,000रु 50,000रु.7,15,000रु. 26,500रु. 15,000रु. 11,500
रु.7,70,000रु 50,000रु.7,20,000रु. 27,000रु. 20,000रु. 7,000
रु.7,75,000रु 50,000रु. 7,25,000रु. 27,500रु. 25,000रु. 2,500
रु. 7,77,778रु 50,000रु. 7,27,778रु. 27,778रु. 27,778रु. 00
तक्ता: 3

यावरुन हे लक्षात येते की, रु. 7,77,778 उत्पन्न स्तरासाठी, कर स्लॅबनुसार कर रु. 27,778 असेल परंतू प्रत्यक्षात रु. 8 लाख उत्पन्नावर कर स्लॅब नुसार कर दायित्व रु. 35,000 असेल. म्हणजे रु. 22,222 उत्पन्न वाढीवर रु. 7,222 एवढा जास्त कर भरावा लागेल. कसे ते खालील तक्तयामध्ये पहा. (Know the Impact of Marginal Relief)

उत्पन्नकर दरगणना पद्धतकर दायित्व
रु. 0 ते 3 लाख0%रु. 3 लाखापर्यंतरु. 0
रु. 3 ते 6 लाख5%रु. 3 लाखावर 5% प्रमाणेरु. 15,000
रु. 6 ते 8 लाख10%रु. 2 लाखावर 10% प्रमाणेरु. 20,000
एकूणरु. 8 लाखरु. 35,000
तक्ता: 4

मार्जिनल रिलिफ म्हणजे काय?

नवीन कर प्रणालीमध्ये आयकर स्लॅबमध्ये बदल केले आहेत, ज्यांचे करपात्र उत्पन्न रु. 7 लाखांपर्यंत आहे अशा वैयक्तिक करदात्यांना रु. 25,000 ची कर सवलत दिली आहे. तथापि, रु. 7 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नात थोडीशी वाढ झाल्यास कर दायित्व अधिक होऊ शकते. यावर उपाय म्हणून कर दायित्व कमी करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत म्हणजे मार्जिनल रिलिफ होय.

मार्जिनल रिलिफ ही सवलत का देण्यात आली?

नवीन कर प्रणाली अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न करपात्र उत्पन्नापेक्षा रु. 10 ने वाढले, तरी कलम 87A अंतर्गत दिली जाणारी रु. 25,000 ची सूट मिळत नाही. (Know the Impact of Marginal Relief)

त्यांच्या संपूर्ण करपात्र उत्पन्नावर लागू स्लॅब दरांनुसार कर आकारला जाईल, परिणामी कर दायित्व अधिक असेल. यामुळे एक विरोधाभासी परिस्थिती निर्माण होते जिथे उत्पन्नात थोडीशी वाढ झाल्याने कर भरणा जास्त होतो. हे कमी करण्यासाठी, वित्त मंत्रालयाने करदात्यांना दिलासा देण्यासाठी ही सवलत दिली आहे. (Know the Impact of Marginal Relief)

किरकोळ सवलतीचा लहान करदात्यांना कसा फायदा होईल?

किरकोळ सवलत हे सुनिश्चित करते की देय कर रु. 7 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नापेक्षा जास्त नसावा. नवीन नियमांतर्गत मिळकतीवर गणना केलेला कर रु. 7 लाखांपेक्षा जास्त अतिरिक्त उत्पन्नापेक्षा जास्त असल्यास, करदात्याला कराच्या अतिरिक्त रकमेसाठी सूट मिळण्यास पात्र असेल. किरकोळ सवलतीचा लहान करदात्यांना कसा फायदा होतो हे लक्षात घेण्यासाठी तक्ता क्रमांक 3 पहा.

ही सवलत जुन्या कर प्रणालीसाठी लागू आहे का?

मार्जिनल रिलिफ ही सवलत आर्थिक वर्ष 2023-24 साठी करदात्यांना 115BAC(1A) अंतर्गत नवीन कर प्रणालीसाठी उपलब्ध आहे. परंतू, नवीन कर प्रणालीची निवड करणा-यांसाठी गुंतवणुकीवर कोणतीही सूट/वजावट दिली जात नाही. तथापि, जर लहान करदात्याने 1 एप्रिल 2023 पासून, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जुन्या कर प्रणालीची निवड करण्याची योजना आखली असेल, तर ते किरकोळ सवलतीचा लाभ घेण्यास पात्र नसतील. (Know the Impact of Marginal Relief)

सारांष

अशाप्रकारे, नवीन आयकर प्रणालीमध्ये लहान करदात्यांना मार्जिनल रिलीफचा फायदा होतो. मार्जिनल रिलीफ नवीन कर प्रणालीला अधिक आकर्षक बनवते. नवीन कर प्रणाली अंतर्गत ज्यांचे उत्पन्न रु. 7.5 लाखाच्या करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना याचा फायदा होतो. (Know the Impact of Marginal Relief)

आमच्या Etopcollectionवेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत”शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

[pt_view id=”55cff900qc”]

Leave a Reply

Discover more from मराठी बाणा

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading