How to get rid of house lizards? | प्रत्येक गृहिणी घरामध्ये स्वच्छता ठेवतेच; तरीही घरात विविध प्रकारच्या किटकांचा व जीवजंतूचा प्रादुर्भाव होत असतो.
घरामध्ये प्रामुख्याने माशा, पाल व झुरळ आढळतात; या जीवजंतू व किटकांचा वावर आरोग्याच्या दृष्टीने घातक असतो. यांच्यामुळे शरीरात विषबाधा होऊ शकते. ‘पाल’ हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी; अनेकांची तारांबळ उडते. लहान मुलं; आणि स्त्रियांच्या बाबतीत तर विचारायलाच नको. घरामध्ये पाल दिसणं ही सामान्य बाब आहे; केवळ पालींच्या दिसण्याचीच भिती वाटते असं नाही तर; त्यांचा आवजही भयभित करणारा असतो. वास्तविक घरातील पाली विषारी नसतात; तरीही त्या कीटक आहेत, काहीजन त्यांना घाबरत नाहीत, म्हणून आपण त्यांना घरात ठेवू शकता नाही; घर कीटक-मुक्त ठेवणे हा स्वच्छता सुनिश्चित करण्याचा एक मार्ग आहे. (How to get rid of house lizards?)
पाली कधी भिंतींवर; स्वयंपाक घरातील डब्यांच्या मागे; पुस्तकांच्या कपाटांच्या मागे; खिडक्यांमध्ये; दरवाजाच्या पाठीमागे आणि सहसा अडगळीच्या ठिकाणी आढळतात. घरात पाल फिरताना दिसली की किळस वाटते; मनात शंका येते की एखाद्या खाद्य पदार्थात तिने तोंड तर घातले नसेल ना? बाजारात पाल मारण्यासाठी अनेक विषारी औषधे मिळतात, परंतू ते लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक असतात. अनेकजण घरातील पाली घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. जर आपण पालींपासून सुटका करुन घेण्याचा मार्ग शोधत असाल तर, त्यांना ठार न करता घरातून घालविण्याचे काही निरुपद्रवी परंतू प्रभावी घरगुती उपाय येथे दिलेले आहेत.
Table of Contents
घरातून पाली घालविण्याचे प्रभावी उपाय
1) अंड्याचे छिलके (How to get rid of house lizards?)

जर तुम्ही ओमेलेट्स बनवल्यानंतर अंडयांची छिलके फेकूण देत असाल तर तुम्हाला पुन्हा विचार करावा लागेल! अंडयांची छिलके फेकूण देण्याऐवजी; त्रासदायक पालींपासून मुक्त होण्यासाठी त्यांचा वापर करु शकता. आपल्या घरात ज्या ज्या ठिकाणी पाली आढळतात; त्या त्या ठिकाणी अंड्यांचे छिलके ठेवा. यामुळे पाली पळून जातील; रात्रीच्या वेळी घरातील कोप-यांमध्ये अंड्याचे छिलके ठेवा; यामुळे पाली घरात येणार नाही. वाचा: GAS CYLINDER: ‘गॅस सिलिंडर बाबत तुम्हाला ‘हे’ माहित आहे का?
अंडयांना पाली का घबरतात?
कारण त्या अंडयांच्या कवचांचा पालींना वास येतो; त्या वासाचा पाली तिरस्कार करतात. त्यांना तो वास सहन होत नाही; तो वास नको म्हणून पाली घर सोडून जातात. त्यासाठी अंडी खाण्यासाठी वापरण्यापूर्वी; पुसून घ्या, नंतर छिलके पुसणे किंवा धुणे टाळा; अन्यथा त्यांचा वास न आल्यामुळे पाली घरातून जाणार नाहीत.
2) मोरपिस (How to get rid of house lizards?)

अनेक लोक पालींना पळवण्यासाठी मोरपिसांचा वापर करतात. परंतू खरोखरच घरामध्ये मोरपिस ठेवले तर पाली येत नाहीत का? की घरामध्ये मोरपिस लावल्यानंतर पाली येत नाहीत; ही फक्त एक अंधश्रद्धाच आहे; तर त्यामागे एक अर्थपूर्ण कारण आहे. घरामध्ये मोरपिस ठेवल्याने; पालींना एक विशिष्ट प्रकारचा गंध येतो. त्यांना असे वाटते की; इथे एखादा पक्षी आहे. जो आपल्यावर हल्ला करु शकतो. दुसरे अशे की मोर हे पालींचे शिकारी म्हणून ओळखले जातात; घरात मोरपिस ठेवण्याने पाली तो पाहून घाबरतात; आणि लगेचच पळून जातात. वाचा: Adverse effects of media on children | मीडिया आणि मुल.
3) कांदा किंवा लसूण (How to get rid of house lizards?)

पाली घालवण्यासाठी; कापलेला कांदा किंवा सोललेल्या लसणाच्या पाकळया; पाली येतात त्या ठिकाणी ठेवा. कांदा किंवा लसणाच्या तिव्र गंधामुळे; पाली घर सोडून जातात. किंवा पाली घरात दिसल्या की; त्यांच्यावर कांद्याचा रस फवारा. त्यासाठी एका बाटलीमध्ये कांद्याचा रस तयार करुन ठेवा; आणि पाली दिसल्या की, त्यांच्यावर फवारा, यामुळे पाली पळून जातील. कांद्याच्या रसाच्या वासामुळे पाली परत घरात येत नाहीत. (Effective ways to get rid of house lizards!)
4) कॉफी आणि तंबाखूच्या गोळ्या

कॉफी पॉवडर आणि तंबाखूचे मिश्रण तयार करा; आणि त्या मिश्रणाच्या लहान गोळ्या तयार करुन; ज्या ठिकाणी पाली सर्वाधिक येतात, तिथे या गोळ्या ठेवा.
5) डांबर गोळ्या (How to get rid of house lizards?)
आपल्याकडे लहाण मुले किंवा पाळीव प्राणी घरात नसतील तर आपण नेफ्थलीनच्या गोळ्या वापरण्याचा विचार करु शकता. यास एक उग्र गंध आहे जो मानवांना अंगवळणी पडतो परंतु पाली तो गंध सहन करु शकत नाहीत. या गोळया लहान खोली, स्वयंपाकघरातील ड्रॉवर्स, खाली-सिंक, कॅबिनेट आणि शेल्फमध्ये ठेवू शकता. फक्त हे सुनिश्चित करा की ते अन्न आणि पाण्याच्या स्त्रोतांपासून बरेच दूर आहे नेफ्थलीनच्या गोळ्या कीटकनाशकांमध्ये येतात. या गोळया प्रत्येक ड्रॉवर, कपाट किंवा घराच्या कोप-यात जिथे तिथे पाली येतात, तिथे या गोळ्या ठेवा. त्याच्या वासामुळे पाली पळूण जातील व पुन्हा घरात येणार नाहीत.
6) आपल्या खोलीचे तापमान कमी करा

पाली या सस्तन प्राणी नाहीत; पाली गरम हवामान पसंत करतात आणि त्यांच्या शरीराचे तापमान; त्या नियमित करु शकत नाहीत. पाली थंड देशांमध्ये क्वचितच आढळतात; कारण तिथे त्यांचे जगणे कठीण असते. खोलीचे तापमान थंड ठेवताना; खिडक्या किंवा दरवाजे उघडे ठेवू नका; अन्यथा त्यांना अस्वस्थ करणारे वातावरण तयार होणार नाही. आपले घर कमीतकमी 22 डिग्री सेल्सिअस ठेवा; कारण थंड तापमानामुळे पाली अस्वस्थ होतात.
7) मिरपूड किंवा मिरची पावडर स्प्रे

आपल्याला जेवढे गरम आणि मसालेदार पदार्थ आवडत; तेवढेच पालींना आवडतात की नाही; हे सांगता येणार नाही. परंतू त्यांना मिरचीचा तिरस्कार आहे; जसे आपण मिरची भाजल्यानंतर ठसका सहन करु शकत नाही; तसेच किंवा मिरचीचा गंध पाली सुध्दा सहन करु शकत नाहीत. एक मोठा चमचा मिरची सॉस पाण्यामध्ये मिसळा; आणि एका फवारणीच्या बाटलीमध्ये ठेवा. याचा वापर पाल दिसली की; पालीच्या अंगावर फवारा मारुन करता येतो. किंवा ज्या ठिकाणी पाली वारंवार येतात; त्या ठिकाणी फवारा मारला तरी पाली पुन्हा येत नाहीत.
पालींपासून मुक्त होण्यासाठी; आणि परत येण्यापासून रोखण्यासाठी; मिरपूड पाणी ही वापरण्याजोगी युक्ती आहे. पाण्यात काही मिरपूड पावडर मिसळा; आणि आपणास सहसा आक्षेपार्ह कीटक आढळल्यास; त्या द्रावणाची फवारणी करा. असे म्हटले जाते की येणा्-या एलर्जीक प्रतिक्रियेमुळे पाली चिडतात आणि पुन्हा त्या ठिकाणी येत नाहीत.
8) उरलेले अन्न पदार्थ घरात ठेवू नका

घरात उरलेले अन्न पदार्थ उघडे ठेवणे; म्हणजे पालींना आमंत्रण दिल्या सारखे आहे; कारण पाली सामान्यत: अन्न किंवा खाण्याच्या उरलेल्या वस्तू शोधत घरात प्रवेश करतात. कीटकांना आकर्षित करण्याचा; आणि त्यांना घरात राहू देण्याचा एक निश्चित मार्ग म्हणजे ;किचन ओटयावर पडलेले अन्नाचे तुकडे; म्हणूनच, सांडलेले किंवा उडालेले अन्न पदार्थ; त्वरित साफ केल्याची खात्री करा. वाचा: Eat dates every day│दररोज खा खजूर आणि अनेक आजार ठेवा दूर
किचन आणि डायनिंग टेबल नियमित स्वच्छ करण्यासाठी; एक दिनचर्या तयार करा. खासकरुन पडलेले अन्न पदार्थ ओला कचरा डस्टबिनमध्ये टाका आणि डस्टबिन नियमितपणे स्वच्छ ठेवा.
9) नियमितपणे कॅबिनेट एअर आउट करा

पाली ओलसर जागेकडे आकर्षित होतात; आणि आपल्या कॅबिनेटमध्ये बसतात. अंडर-सिंक कॅबिनेटचा सर्वात जास्त धोका असतो; म्हणून याची खात्री करुन घ्या की; ती कोरडे व स्वच्छ असू शकेल. आपल्याकडे पाईप गळती असल्यास; शक्य तितक्या लवकर त्याची दुरुस्ती करा; कारण ते पालींसाठी अनुकुल वातावरणास योगदान देते. जर आपण पालींना दूर ठेवण्याचा विचार करत असाल तर; नियमितपणे आपले कॅबिनेट साफ करा. अशा ठिकाणी पाली अंडी डालतात, त्यासाठी नियमित सफाई हा एक सोपा मार्ग आहे.
10) फ्लायपेपर | Flypaper (How to get rid of house lizards?)

सरकणा-या पाली पकडण्यासाठी फ्लायपेपर देखील उपयुक्त आहेत; फ्लायपेपर भिंतीवर चिकटवा त्याच्या खाली दडण्यासाठी जेंव्हा पाली येतील; तेंव्हा त्या चिकट्यात अडकल्या जातील. आपण नंतर त्वरित त्याची विल्हेवाट लावू शकता.
निष्कर्ष | Conclusion (How to get rid of house lizards?)
आपल्या घरात पालींनी प्रवेश करु नये असे वाटत असेल तर, आपल्या घराच्या खिडक्या आणि दारे बंद ठेवा. पाली घरात प्रवेश करु शकतील अशी छिद्रे किंवा भेगा बंद करा.
इतर कीटक रात्री दिव्याकडे आकर्षित होतात व त्या ठिकाणी येतात; त्यांना खाण्यासाठी पालीही येतात; म्हणून, जेव्हा आपण खोलीत नसता तेव्हा किंवा जेव्हा आपल्याला प्रकाशाची आवश्यकता नसते तेव्हा आपले दिवे बंद करा.
घराच्या भिंतीवर फ्रेम केंवा इतर लटकणा-या वस्तू; किंवा घराच्या कोप-यात ज्या ठिकाणी पाली सहज लपू शकतील; अशा जागा शक्यतो तयार करु नका. फर्निचर आणि भिंती दरम्यान सुमारे 5 ते 6 इंच जागा ठेवा.
“How to get rid of house lizards? घरातून पाली घालविण्याचे उपाय” हा लेख आपणास कसा वाटला; या बद्दल आपला अभिप्राय व सूचना कमेंटमध्ये जरुर कळवा. आपला प्रतिसाद व सुभेच्छा; आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत. त्या नवचैतन्य देतात; व त्यामुळे नवीन लेख लिहिण्यास प्रेरणा मिळते. आपण हा लेख आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद…! वाचा: Mucormycosis एक बुरशीजन्य आजार धोकादायक का आहे घ्या जाणून
शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Diploma: The best career option after 10th | 10वी नंतर डिप्लोमा
Read More

The Best Law Courses After 12th | 12वी नंतर कायदा अभ्यासक्रम
Read More

4 Important Actions About Aadhaar card | आधार अपडेट्स बाबत
Read More

Latest Water Purification Technologies | नवीन जल शुध्दी तंत्रज्ञान
Read More

Psychology: The best career option after 12th | मानसशास्त्र
Read More

How to Make a Career in Merchant Navy | करिअर इन मर्चंट नेव्ही
Read More

Bachelor of Arts in Hotel Management | हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीए
Read More

Marine Engineering: the best option for a career | सागरी अभि.
Read More

How to become a corporate lawyer | कॉर्पोरेट वकील कसे व्हावे
Read More

Diploma in Information Technology | माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा
Read More