How To Make Children Responsible | मुलाचे लाड करा पण ते हट्टी होणार नाही याची काळजी घ्या व त्याला जबाबदार नागरिक बनवा, कसे ते जाणून घ्या.
हल्ली एखादया कुटुंबात मुल जन्माला आले की, पालक त्याच्याकडून फार अपेक्षा ठेवतात. ते बाळ आपल्या पायावर उभे राहात नाही तेंव्हपासून पालक त्याला डॉक्टर बनवायचे की, इंजिनिअर याचा विचार करायला लागतात. म्हणजे बाळ जन्माला आल्यापासून तुम्ही त्याच्यामध्ये डॉक्टर किंवा इंजिनिअर शोधता. तुमच्या अपेक्षेचे ओझे डोक्यावर घेऊन बाळाची वाढ सुरु होते. (How To Make Children Responsible)
तुम्ही केवळ बाळाच्या करिअरचाच विचार करता असे नाही तर, ते आपल्याला सांभाळेल का?, ते आपल्याला समजून घेईल का?, ते म्हातारपणाचा आधार बनेल का? अशा अनेक प्रश्नांचा विचार करत त्याचे संगोपन सुरु करता. बालपणापासून त्याला हव्या नको त्या सर्व गोष्टींकडे लक्ष देता. थोडक्यात, त्याचे सर्व लाड तुम्ही पुरवता.
त्याचे लाड पुरवण्याकडे केवळ आई-वडील लक्ष देतात असे नाही, तर कुटुंबातील इतर सर्व सदस्य त्याच्या प्रत्येक पावलाकडे लक्ष देतात. मुलांचे अती लाड करणे, त्यांच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त लक्ष देणे, त्यांना एकटयाला खेळू न देणे याचा परिणाम असा होतो की ते बालपणापासून प्रत्येक बाबतीत तुमच्यावर अवलंबून राहते, परिणामी ते परावलंबी व आळशी बनते.
जे मागितले ते पटकण मिळत असल्यामुळे ते हट्टी बनते. जेंव्हा एखादी गोष्ट मागितल्याबरोबर मिळत नाही, तेंव्हा त्याचा हट्ट अधिक वाढत जातो आणि त्याच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम व्हायला लागतात. त्यामुळे पालकांनी त्याला बालपणी हट्टी बनवण्याऐवजी त्याला चांगले वळण लावण्याकडे लक्ष दिले पाहिजे कारण प्रत्येक मूल वेगळे असते.
पालक म्हणून ही सर्व जबाबदारी तुमच्या खांदयावर असते, ती इतरांवर ढकलून मोकळे होऊ नका. मुलांचे अतिलाड करुन ते बिघडण्यापासून थांबवायचे असेल तर, पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा. (How To Make Children Responsible)
Table of Contents
मुलांचा हट्ट पुरवताना विचार करा
मुलांचा हट्ट पुरवताना पालकांनी तो कोणता हट्ट करत आहे आणि तो पुरवणे गरजेचे आहे का याचा विचार केला पाहिजे. काही पालक मुलाने एखादी गोष्ट मागितली की त्याला खुष करण्यासाठी लगेच ती देतात. त्यामुळे त्याला असे वाते की, ‘आपण जे मागतो ते आपल्याला मिळते’ यामुळे त्याचा हट्टीपणा अधिकच वाढत जातो. त्याला वस्तूची किंमत कळत नाही, त्यामुळे त्याचा वापर कसा केला पाहिजे हेही त्याला कळत नाही. (How To Make Children Responsible)
त्याच्याकडून एखादी महागडी खेळणी तुटली तर लगेच पालक ओरडतात, ‘तुला वस्तूची किंमत नाही, वस्तू कशी वापरावी ही साधी गोष्ट तुला कळत नाही’ असे म्हणून रागवायला सुरुवात करतात, पण आपण हे लक्षात घेत नाही की, आपण त्याला ती वस्तू कशी वापरावी हे कधी सांगितलेच नाही, त्याच्याबरोबर वस्तूच्या मूल्याबाबत कधी संवादच केला नाही तर वस्तूच्या मूल्याची अपेक्षा त्याच्याकडून तुम्ही कशी करता?.
तेंव्हा पालकांनी मुलांसाठी एखादी वस्तू विकत घेतांना त्या वस्तूची मुलांना खरोखर गरज आहे का? त्यातून तो काही शिकणार आहे का? याचा विचार करुन वस्तू विकत घ्या. त्याच्याबरोबर बसून प्रत्यक्ष ती वस्तू कशी वापरायची हे त्यांना शिकवा, काय केल्यास वस्तू खराब होईल हेही सांगा. त्यामुळे त्याला वस्तूच्या वापराबाबत ज्ञान मिळेल. यातून मुलाबरोबरचा सुसंवाद वाढेल, तो मनमोकळेपणाने त्याच्या अडचणी सांगेल. सुसंवादातून मुलांवरती चांगले संस्कार करता येतात. (How To Make Children Responsible)
मुलांना तुमच्यावर अवलंबून ठेवू नका
मुलांना जास्त दिवस तुमच्यावर अवलंबून ठेवू नका. त्यांना वयानुसार त्यांच्या काही जबाबदा-या स्विकारण्यास तयार करा. जसे की, स्वत:च्या हाताने जेवण करणे, स्वत:चे दप्तर भरणे, सायकल काढणे, शाळेत जाणे, स्वत:चा स्वाध्याय पूर्ण करणे इ.
या सवयी योग्यवेळी पालकांनी लावल्या नाही, तो अजून लहान आहे असे म्हणून दुर्लक्ष केले तर, त्याचे परिणाम नंतर भोगावे लागतात कारण मुलं मोठी झाली तरी ते तुमच्यावर अवलंबून राहतील. (How To Make Children Responsible)
तुमची इच्छा मुलांवरती लादू नका
आपण टीव्ही शोमध्ये पाहिले किंवा ऐकले असेल की, एखादा मुलगा एखादी डान्स स्पर्धा जिंकतो, त्यानंतर पालक आपले मनोगत व्यक्त करतांना सांगतात की, मला डान्सर व्हयचे होते परंतू मला ते जमले नाही म्हणून मी हे स्वप्न मुलामध्ये पाहिले व त्याने ते आज पूर्ण केले.
म्हणजे तुम्ही मुलाच्या इच्छेचा विचार न करता, तुमची इच्छा त्याच्यावर लादली व त्याला ती पूर्ण करण्यास भाग पाडले. असे प्रत्येकाच्या बाबतीत होईलच असे नाही, अशा घटना अपवादात्मक यशस्वी होतात. त्यामुळे तुमची इच्छा मुलांवरती न लादता त्यांच्या आवडी-निवडींचाही विचार करा. बाल विकासावर परिणाम करणारे घटक जाणून घ्या. (How To Make Children Responsible)
मुलांमध्ये निर्णय क्षमता निर्माण करा
काही पालक बालपणापासून आपल्या पाल्याने मोठेपणी काय व्हावे याचा विचार करतात. त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन करणे सुरु करतात. त्यासाठी त्याने कोणत्या शाळेत जावे, कोणते माध्यम निवडावे, कोणती पुस्तके वाचावीत, कोणते कपडे घालावेत, सायकल कोणती चालवावी हे सर्व त्यांच्यावर अक्षरश: थोपतात. (How To Make Children Responsible)
हे सर्व लादत असतांना पालकांनी आपल्या पाल्याच्या इच्छा आकांक्षांचाही विचार केला पाहिजे. मुलाच्या बाबतीतले सर्व निर्णय तुम्ही घेत असल्यामुळे मुलं पूर्णपणे परावलंबी होतात, त्यांच्यामध्ये निर्णयक्षमता येत नाही, कोणताही निर्णय घेण्यास ते घाबरतात, प्रत्येकवेळी ते तुमच्या निर्णयावर अवलंबून राहतील.
असे होऊ नये यासाठी पालकांनी, मुलांना योग्य वेळी त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. तुम्ही केवळ मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली पाहिजे. भले काही वेळा त्यांचे निर्णय चूकतीलही, अशावेळी त्यांच्या सोबत राहा, त्यांना धीर दया यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल व भविष्यात त्या चूका टाळण्याचा प्रयत्न करतील व एक दिवस यशस्वी होतील. यासाठी केवळ तुमची सोबत त्यांच्यासाठी महत्वाची असेल. (How To Make Children Responsible)
मुलांच्या चूका स्विकारा
कोणतिही व्यक्ती चूक न करता आपल्या कामात तज्ञ झाली असे कधीच होत नाही. प्रत्येक व्यक्ती चूकांमधून शिकत जाते व तज्ञ बनते. हा नियम मुलांच्या बाबतीतही लागू होतो.
मुलांकडून एखादी वस्तू पडली व फुटली तर लगेच त्यांच्यावर रागावू नका, ती पुन्हा: पडणार नाही याची काळजी कशी घ्यावी हे त्यांना शिकवा. त्यामुळे मुलांना झालेल्या चुकीमधून कसे शिकायचे हे कळेल. त्यांच्या चूका न स्विकारता त्यांना त्या कामापासून दूर ठेवले तर ते कधीच शिकणार नाहीत, त्यांच्यामध्ये धाडस व आत्मविश्वास निर्माण होणार नाही. (How To Make Children Responsible)
मुलांबरोबर सुदृढ नाते निर्माण करा
तुमच्या मुलांच्या बाबतीत जशा काही अपेक्षा असतात, तशाच मुलांच्याही तुमच्याबाबतीत असतात. त्यांना नेहमी वाटते की आई-वडील आपल्यावर कधीच रागाऊ नये व आपल्यावर नाराज होऊ नये. परंतू प्रत्येक वेळी तशे होईल असे नाही.
त्यासाठी पालकांनी मुलांमध्ये सकारात्मक गुण जोपासले पाहिजेत. त्यांच्याशी सुसंवाद साधला पाहिजे, एकमेकात समज-गैरसमज असतील तर ते संवदाने दूर होतात. म्हणून पालक आणि मुलांमधील नाते सुदृढ असले पाहिजे. मुलांचे वर्तन कसे सुधारावे? व बाल विकासात समाजाची भूमिका हे पालकांशिवाय दुसरे कोणी जाणू शकत नाही. (How To Make Children Responsible)
- How to Grow Daughter? | मुलीचे संगोपन कसे करावे?
- Importance of Physical Activity for Kids | मुलांसाठी शारीरिक ॲक्टिव्हिटी
- How to stop children from being stubborn | मुलांना हट्टी होण्यापासून कसे थांबवायचे
आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

What is Pharmacy? | फार्मसी म्हणजे काय?

Importance of Celebrating Holidays

Pharmacy courses after 12th | १२वी नंतरचे फार्मसी अभ्यासक्रम

What is an examination? | परीक्षा म्हणजे काय?

Mobile Addiction in Students | विद्यार्थ्यांमधील मोबाईलचे व्यसन

