Categories
Sports

IPL धमाका: २०२१/IPL DHAMAKA 2021

IPL धमाका: २०२१ घरात बसणारांसाठी आनंदाची बातमी. आजपासून आयपीएल पर्व १४ च्या धमाक्याला आज थाटात सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता रस्त्यावरील गर्दी कमी होणार. न सांगता क्रिकेटप्रेमी आता घरात थांबणार.

आजपासून (आयपीएल) इंडियन प्रीमियर लीगचा धमाका सुरु होत आहे. अलिकडच्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे इच्छा नसताना घरात कैद झालेल्यांच्या चेह-यावर आता थोडेसे समाधान दिसणार आहे.

आयपीएलच्या वेगवेगळया संघातील खेळाडूनांही कोरोनाचा सामना करावा लागत आहे. मुंबई इंडियन्स संघाचे सल्लागार किरण मोरे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर आरसीबीच्या संघातील सलामीवीर देवदत्त पडिक्कल याने कोरोनावरती मात केलेली असताना, त्याच संघातील दुसरा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम याचा देखील कोरोना अहवाल पॉझिाटिव्ह आलेला आहे, त्यामुळे संघाचा कर्णधार विराट कोहलीची डोकेदुखी वाढली आहे.

मागीलवर्षी कोरोनाचे सावट असताना आयपीएलचे सामने अबु धाबी येथे आयोजित करण्यात आलेले होते. परंतू यावर्षी आयपीएलचे सामने भारतात होत असून काही सामने कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतही होणार आहेत. अर्थात कोरोनासंबंधीचे सर्व नियम खेळाडूंना मैदान, हॉटेल आणि प्रवास या सर्व ठीकाणी पाळावेच लागतील. क्रिकेटप्रेमिंना हे सामने प्रत्यक्ष क्रिकेट स्टेडियम मध्ये जाऊन पाहता येणार नाहीत, तर त्यांना सामन्यांचा आनंद टीव्हीवरच घ्यावा लागेल.

आपल्या मनात एक शंका आलेली असेल की, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये न जाता, तिकिट खरेदी न करता आयपीएलला उत्पन्न कसे मिळेल? आयपीएलच्या सर्व टीममध्ये सहभागी खेळाडूंचा  निवासापासून अनेक खर्चाची जबाबदारी कोण उचलते? तर, आयपीएलचे उत्पन्न हे केवळ दर्शकांनी खरेदी केलेल्या तिकिटावर अवलंबून असते असे नाही, तर आयपीएल हे मुळात एक इकॉनॉमिक मॉडैल आहे. आयपीएल सामन्याचे घरोघरी चॅनलद्वारे टीव्हीवर थेट प्रक्षेपण करण्याचे अधिकार क्रीडावाहिनी दोन ते अडीच हजार कोटी रुपयांना खरेदी करतात. चॅनलला जेवढे जास्त प्रेक्षक टीव्हीवर हे सामने पाहतील तेवढे जास्त उत्पन्न चॅनलला मिळते, कारण टीआरपीचे हे गणित त्यांना अधिक उत्पन्न जाहिरातीमधून मिळवून देते. ज्या सामन्यांना जास्त टीआरपी त्यानुसार टीमला वाहिन्यांकडून नफ्यातील हिस्सा दिला जातो. परंतू खेळाडूंचा निवासापासूनच्या अनेक खर्चाची जबाबदारी टीमचे मालक घेत नाहीत, तर बीसीसीआय घेते.

कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर असताना विदेशातील नामवंत क्रिकेट खेळाडू जीवाची पर्वा न करता खेळतात, त्याचे कारण म्हणजे त्यांना मिळणारा बक्कळ पैसा. आयपीएलमधून केवळ खेळाडूंनाच पैसा मिळतो असे नाही तर, त्यामध्ये सहभागी होणा-या कामगारापासून ते व्यवस्थापना पर्यंत प्रत्येकाला पैसा मिळतो. त्याचबरोबर सट्टाबाजार करणारे, अनेक गैरमार्गाने पैसा मिळविणारा वर्ग देखील आहे.

अशा या विविधतेने नटलेल्या आयपीएलची आज सुरुवात होत आहे. आयपीएलचा सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यामध्ये होणार आहे.  आज ठीक साडे सात वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदावरुन या सामन्याला सुरुवात होणार आहे. तर मग पाहूया विजयी सलामी कोण देणार…!

Marathi Bana's avatar

By Marathi Bana

Hi, I’m Pandurang Chemate, Previously a secondary school teacher, now, I became a full-time freelance writer in 2020. I spend most of my time with Family but this blog is for my love of writing and sharing my opinion on education, health, finance, current affairs, technology, food, sports and many other interesting subjects with you!

Leave a Reply

Discover more from मराठी बाणा

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading