Categories
Current Affairs

मुंबई आणि ठाणे वीकेण्ड लॉकडाऊन बाबत नवीन सूचना जारी केल्या आहेत

एप्रिल ९: दिनांक ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंन्त राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हे निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं.

सार्वजनिक व खासगी वाहतूक तसेच शेतीविषयक कामे सुरळीतपणे सुरुच राहील मात्र उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय घेण्यात आला.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात लादण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळी कडक लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकीकडे लसीकरण सुरु असताना लॉकडाऊन बाबत नेमके नियम काय असतील, याविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे. आता मुंबई शहरातील वीकेण्ड लॉकडाऊन बाबत नवी माहिती समोर आली आहे.

मुंबईत आज रात्रीपर्यंत १ लाख ८८ हजार लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या आणि परवा वीकेण्ड लॉकडाऊन असला तरी लसीकरण सुरु राहणार आहे. नागरिकांना नोंदणीचा मेसेज दाखवून प्रवास करता येईल, अशी माहिती आहे. मुंबई महापालिकेने कोरोना बाबतच्या सर्व उपाययोजना या जून महिन्यापर्यंत तयार ठेवल्या आहेत, असंही सांगण्यात येत आहे.

वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये मुंबईत काय सुरु राहणार?

  • वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील.
  • वाहतुकीची साधने जसे रेल्वे सेवा, बस, रिक्षा सुरु राहतील.
  • हॉटेलमधून होम डिलिवरी सुरु राहील.
  • नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार.
  • अनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडण्यास मनाई असेल.

ठाणे शहरासाठी असे असणार नियम

  • परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट जवळ बाळगणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांनाही कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
  • शनिवार आणि रविवारी खासगी वाहनांना पूर्णतः बंदी असून विनाकारण खासगी वाहन रस्त्यावर दिसल्यास ती वाहने जप्त देखील केली जाऊ शकतात.
  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतिही सेवा सुरु ठेवल्यास त्यांना देखील कठोर कारवाईला सामोरे जावा लागेल.
  • जर कोणाला डॉक्टरकडे जायचे असेल, मेडिकलमधून काही औषधे आणायचे असतील, किंवा जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करायची असेल तर शासनाने दिलेल्या नियमानुसार जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाऊ शकते.  
  • मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक किंवा कोणत्याही कारणाविना रस्त्यावर फिरताना जर कोणी दिसले तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
  • पाळीव प्राण्यांची खाद्याची दुकाने दवाखाने सुरु राहणार असून अगदीच गरज असेल, तरंच पाळीव प्राण्यांच्या मालकांनी बाहेर पडावे. ठाणेकर नागरीक सुज्ञ असून सर्व नियमांचे पालन करतील पण जर कोणी नियमांचे उल्लंघन केलं तर कठोर कारवाई करण्याशिवाय पोलिसांना पर्याय उरत नाही, त्यामुळे सर्व नागरिकांना घरी राहण्याचा, आपल्या कुटुंबासोबत पुढील दोन दिवस वेळ घालवण्याचं आवाहन यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी केलं.
Marathi Bana's avatar

By Marathi Bana

Hi, I’m Pandurang Chemate, Previously a secondary school teacher, now, I became a full-time freelance writer in 2020. I spend most of my time with Family but this blog is for my love of writing and sharing my opinion on education, health, finance, current affairs, technology, food, sports and many other interesting subjects with you!

Leave a Reply

Discover more from मराठी बाणा

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading