Skip to content

Covid-19 Free Vaccination | काेराेना लसीकरण

Covid-19 Free Vaccination

Covid-19 Free Vaccination | लसीकरण हेच कोरोना विरुद्धच्या लढाईतील मोठं शस्त्र त्यामुळे, 18 वर्षावरील सर्वांना; कोरोना लस मोफत.

संपूर्ण देशात गेल्या अनेक दिवसापासून; कोरोनाने हाहाकार मांडला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयानक; आणि वेगाने पसरणारी आहे. त्यामुळे रुग्नसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे; यापूर्वी सर्वात आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. (Covid-19 Free Vaccination)

त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना; कोरोना लस (Corona vaccine) देण्यास सुरुवात झाली. परंतू आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास; भारत सरकारने मान्यता दिली आहे. सोमवार दि. 19/04/2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी; वाढत्या कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर; डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत व आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाईन बैठक घेतल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Covid-19 Free Vaccination)

18 वर्षावरील सर्वांना; कोरोना लस मोफत

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून सरकार जास्तीत जास्त लोकांना; कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि आता वाढणारी रुग्नसंख्या पाहता लसीकरण प्रक्रियेस गती देण्याचा निर्णय; सरकारने घेतला आहे. कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मे पासून सुरु होईल; आणि 18 वर्षावरील वयोगटातील सर्वांना कोरोना लस (Corona vaccine) मिळू शकेल.

कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरु करण्यात येणार आहे; तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांना 50 टक्के लस; खुल्या बाजारात विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या 50 टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला; म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत. आणि उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Covid-19 Free Vaccination)

लसीकरण हेच कोरोना विरुद्धच्या लढाईतील मोठं शस्त्र

नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत लसीकरण हेच; कोरोना विरुद्धच्या लढाईतील मोठं शस्त्र असल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी रुग्णांना कोरोनावरील लस घेण्यास प्रोत्साहन द्यावं; असं आवाहन त्यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी देशातील डॉक्टर आणि मेडिकल फार्मा कंपन्यांशी चर्चा केली; शहरांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे.

कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड लस देशभरात दिल्या जात आहेत. लसीसाठी नोंदणी कशी करावी? यासाठी कोणती प्रक्रिया आहे, खासगी रुग्णालयांमध्येही कशी तरतूद आहे; याबाबत सरकारकडूनही माहिती देण्यात येत आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी इतर गोष्टींबद्दलही स्पष्ट माहिती दिलीय; विशेष म्हणजे पूर्वीप्रमाणेच सरकारी रुग्णालयांमध्ये ही लस विनामूल्य असेल, तर खासगी रुग्णालयांमध्ये लस फी 250 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. (Covid-19 Free Vaccination)

लस घेण्यासाठी नोंदणी कशी करावी?

लस घेण्यासाठी असलेली नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे; आपल्या मोबाईल फोनवर किंवा संगणक ब्राऊझरवर https://www. cowin.gov.in/ या लिंकवर लॉगिन करा.

वर लॉगिन करा. आपला  मोबाईल नंबर नाेंदवा, आपण पोर्टलद्वारे निर्धारित वेळ मर्यादेत लसीसाठी नोंदणी करु शकता. सुमारे चार लोक एका मोबाईल फोनवरुन कोरोना लसीसाठी (Corona Vaccine) नोंदणी करु शकतात. बरेच लोक मोबाईल किंवा संगणकाचा वापर करु शकत नाहीत त्यांनी इतरांची मदत घ्यावी. किंवा आपण आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रास भेट देऊन नोंदणी करु शकता. (Covid-19 Free Vaccination)

कोविन पोर्टलवर बदल करण्याचे पर्याय आहेत का?

एकदा नोंदणी केल्यानंतर आपल्याला काही बदल नोंदवायचे असल्यास; आपण ते बदलू शकता किंवा रद्द देखील करु शकता. जर आपण शहरात लसीचा पहिला डोस घेतला असेल; तर आपण दुस-या डोससाठी केंद्र देखील बदलू किंवा निवडू शकता. (Covid-19 Free Vaccination)

अगोदर घेतलेल्या लसीचाच डोस घेणे आवश्यक आहे काय?

होय! अर्थात, लसीचा पहिला डोस कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्डकडून घेणे आवश्यक आहे; तसेच दुसरा डोस देखील घेणे आवश्यक आहे. कोविन सिस्टम आपल्याला लस उपलब्ध असलेल्या लसीकरण केंद्रांची यादीची माहिती देईल. (Covid-19 Free Vaccination)

कोविड -19  लस माहितीचे स्त्रोत अचूक आहेत हे कसे कळेल?

लसीची अचूक माहिती गंभीर आहे आणि सामान्य समज आणि अफवा थांबवण्यात मदत करु शकते. आपण कोणत्या माहितीच्या स्त्रोतांवर विश्वास ठेवू शकता; हे जाणून घेणे कठीण होऊ शकते. इंटरनेटवर लसीच्या माहितीचा विचार करण्यापूर्वी; माहिती विश्वसनीय स्त्रोताकडून आली आहे; आणि नियमितपणे अद्ययावत केली जाते ते तपासा. (Covid-19 Free Vaccination)

गर्भवती महिलांसाठी कोविड -19 लस घेणे सुरक्षित आहे का?

होय. प्लेसेंटाच्या विकासासह कोविड -19 लसीकरणामुळे गर्भधारणेमध्ये; कोणतीही समस्या उद्भवते याचा सध्या कोणताही पुरावा नाही. याव्यतिरिक्त, स्त्रिया किंवा पुरुषांच्या प्रजननक्षमतेच्या समस्या; कोणत्याही लसीचा दुष्परिणाम असल्याचा कोणताही पुरावा नाही; ज्यात कोविड -19 लसींचा समावेश आहे. (Covid-19 Free Vaccination)

COVID-19 लसीच्या तिसऱ्या डोसची गरज आहे का?

बहुतेक लोकांना सध्या कोविड -19 लसीच्या अतिरिक्त डोसची आवश्यकता नसली तरी; रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) अलीकडेच लोकांच्या एका लहान गटासाठी; तिसरा डोस सूचित करतात.

हा निर्णय निष्कर्षांवर आधारित होता की काही लोकांमध्ये ज्यांच्या रोगप्रतिकारक यंत्रणेशी तडजोड केली गेली आहे; अशा काही लोकांमध्ये एमआरएनए लसीचे दोन डोस मिळाल्यानंतर; रोगप्रतिकार प्रतिसाद तितकाच मजबूत नाही; ज्यांच्या प्रतिकारशक्तीशी तडजोड केली जात नाही.

या अतिरिक्त डोसला “बूस्टर डोस” म्हणून चित्रित केले गेले आहे; खरं तर, हा या व्यक्तींसाठी अतिरिक्त प्राथमिक डोस आहे. अंतिम परिणाम बहुधा समान असला तरी; – उच्च पातळीची प्रतिकारशक्ती – बूस्टर आणि अतिरिक्त प्राथमिक डोसमधील फरक हा आपल्यापैकी बहुसंख्य लोकांसाठी एक महत्त्वाचा फरक आहे. (Covid-19 Free Vaccination)

अतिरिक्त डोसची शिफारस केली जात आहे, परंतु केवळ काही लोकांसाठी. कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजना या विषयी अधिक जाणून घ्या.

आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Why are some tasks never completed?

Why are some tasks never completed?

Why are some tasks never completed? | A combination of neurological, psychological, and logistical factors often leaves tasks incomplete. Almost ...
Know All About Cholesterol

Know All About Cholesterol | कोलेस्ट्रॉल विषयी सर्व काही

Know All About Cholesterol | हृदयरोग रोखण्यासाठी कोलेस्टेरॉल समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका ...
5 Top Favorite Dishes to Cook at Home

5 Top Favorite Dishes to Cook at Home

5 Top Favorite Dishes to Cook at Home | Having your favourite foods available at home is essential. It helps ...
How to Boost Children's Self-confidence

How to Boost Children’s Self-confidence | मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा

How to Boost Children's Self-confidence | मुलांचा आत्मविश्वास हा मानसिक आरोग्य, लवचिकता आणि यशाचा पाया आहे, जो त्यांना आव्हानांना तोंड ...
Exploring the Magic of My First Computer

Exploring the Magic of My First Computer

Exploring the Magic of My First Computer | ENIAC was introduced on February 14, 1946, and began the computing era ...
Natural Ways to Lower High Cholesterol

Natural Ways to Lower High Cholesterol | उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे नैसर्गिक मार्ग

Natural Ways to Lower High Cholesterol | काही सवयी आणि पदार्थांचे सेवन कमी केल्याने कमी घनतेचे लिपोप्रोटीन (LDL) कोलेस्ट्रॉल "वाईट" ...

Get 30% off your first purchase

X