How to File Income Tax Return (ITR-1) | कोणता आयटीरिटर्न फॉर्म भरावा?, रिटर्न भरताना कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत?, फॉर्म 16 म्हणजे काय? आयटी रिटर्न (ITR-1) कसा भरावा? या बाबतची सर्व माहिती.
प्रत्येक महिन्यात करदात्याच्या उत्पन्नातून; सरासरी कर कपात केली जाते. कपात केलेला कर; प्रत्येक महिन्यात टीडीएसच्या माध्यमातून भरला जातो. आर्थिक वर्ष संपल्यानंतर; करदात्यास आयटी रीटर्न फाईल करावा लागतो. परंतू आयटी रिटर्न कसे भरायचे; हा आपल्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो. मात्र आपण थोडी जरी माहिती घेतली; तरी आयटी रिटर्न भरणे किती सुलभ आहे; हे आपल्याला कळेल. कोणतिही नवीन गोष्ट माहिती होत नाही तोपर्यंत; ती अवघड वाटते. परंतू आपण त्यामध्ये लक्ष घातलं की सगळं व्यवस्थित समजायला लागतं. आयटी रिटर्नच्या बाबतीतही तसंच आहे; चला तर मग आता आयटी रिटर्नची; सविस्तर माहिती घेऊया. How to File Income Tax Return (ITR-1)
Table of Contents
कोणता आयटीरिटर्न फॉर्म भरावा? (How to File Income Tax Return (ITR-1)

(1) सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण कोणता आयटी रिटर्न फॉर्म भरला पाहिजे हा आहे. जर आपले उत्पन्न केवळ पगारातून असेल, आणि ते 50 लाखाच्या आत असेल, तर आयटीआर 1 म्हणजे ‘सहज’ हा फॉर्म भरावा. (ITR -1 Form is for individuals having income up to Rs 50 lakh from the sources : (1) Income from Salary/Pension. (2) Income from One House Property. (excluding cases where loss is brought forward, from previous years). (3) Income from Other Sources (excluding winning from Lottery and Income from Race Horses. File your IT Return)

(2) 50 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणा-या पगारदार व्यक्तीने आयटीआर 2 दाखल करावा. (ITR 2 is for the use of an individual or a Hindu Undivided Family (HUF). Whose total income for the AY 2020-21 includes: (1) Income from Salary/ Pension; or (2) Income from House Property; or (3) Income from Other Sources (including Winnings from Lottery and Income from Race Horses). (Total income from the above should be more than Rupees 50 Lakhs)
वाचा: New Rules of Income Tax Return from June-1 | ITRचे नवे नियम

(3) व्यावसायिक किंवा पगाराशिवाय अन्य मार्गातून उत्पन्न मिळत असेल, तर आयटीआर 3 किंवा 4 हा फॉर्म भरावा लागेल. (The ITR 3 is applicable for individuals and HUF who have income from profits and gains from business or profession. The persons having income from the following sources are eligible to file ITR 3. (1) Carrying on a business, or profession (both tax audit, and non-audit cases). (2) The return may include income from House property, Salary/ Pension, capital gains, and Income from other sources)
जर चुकीच्या फॉर्मवरुन आयटी रिटर्न फाईल केला गेला; तर आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. त्यावेळी मुदतीत दुसरा रिटर्न फॉर्म फाईल करण्याच्या; सूचना दिल्या जातात. जर आयटीआर फॉर्मची निवड बरोबर असेल; परंतू तो भरताना चूक झाली असेल तर; मुदतीत रिवाइज्ड आयटीआर भरला पाहिजे. जर रिवाइज्ड आयटीआर मुदतित भरला नाही, तर रिटर्न फाईल केलं असं मानलं जाणार नाही. वाचा: How to Check Income Tax Refund? | टॅक्स रिफंड कसा तपासायचा?
रिटर्न भरताना कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत?

- PAN Card│पॅन कार्ड: आयकर विभागाकडून दिले जाणारे आयकर ओळखपत्र.
- Aadhaar Card│आधार कार्ड: भारत सरकारकडून सामान्य माणसाचा अधिकार म्हणून दिलेले ओळखपत्र.
- Form No 16│फॉर्म 16: करदात्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार कागदपत्रांची आवश्यकता असते. जर करदाता नोकरदार असेल, तर फॉर्म 16 सर्वात महत्त्वाचा आहे. वाचा: What to do if you fail to file ITR in time? |वेळेत ITR भरला नाही!
- Bank Details│बँक डिटेल्स: याशिवाय बचतं खातं, सेव्हिंग अकाऊंट किंवा मुदत ठेव, फिक्स्ड डिपॉझिट असेल; तर, त्यावर मिळणाऱ्या व्याजाचे सर्टिफिकेट. व्याजाचे सर्टिफिकेटची बँकेकडे मागणी केल्यास; ते बँकेमार्फत दिले जाते. टीडीएस सर्टिफिकेट, पगारातून जी कपात होते त्याचे पुरावे; जर गृहकर्ज असेल तर त्याचे सर्टिफिकेट हेही बँकेकडून मिळते, किंवा महत्त्वाची सर्टिफेकटस ऑनलाईन उपलब्ध आहेत. वाचा:Complete these tasks before 31 March | ITR बद्दलची कार्ये
- जर एखाद्याने गेल्या आर्थिक वर्षात नोकरी बदलली असेल तर दोन्ही ठिकाणचे फॉर्म 16 आवश्यक आहे.
- इन्कम टॅक्स रिटर्न भरताना, प्रत्येक खात्याचे डिटेल्स द्यावे लागतात; याशिवाय रिटर्न फाईल करताना नोटबंदीच्या काळात किती रुपये अकाऊंटमध्ये भरले याचेही डिटेल्स द्यावे लागणार आहेत.
फॉर्म 16 म्हणजे काय? (How to File Income Tax Return (ITR-1)

नोकरदारास नोकरी करत असलेल्या स्त्रोतामार्फत नोकरीतून मिळत असलेल्या उत्पन्नाचा दिला जाणारा अधिकृत दाखला म्हणजे फॉर्म 16 होय. हा फॉर्म तुमची कंपनी, कार्यालय किंवा ज्या ठिकाणी व्यक्ती नोकरी करते त्यांचेकडून दिला जातो कारण नोकरीच्या स्त्रोतांमार्फत पगारातून टीडीएस कापला जातो. फॉर्म 16 नोकरीच्या स्त्रोतांमार्फत दिला जात असला तरी, नोकरी करत असलेले कार्यालय किंवा कंपनी तो तयार करत नाही, तो आयकर विभागाच्या ट्रेसेस https://www.tdscpc.gov.in/app/login.xhtml या अधिकृत सॉफ्टवेअरवर लॉगीन करुन मिळवावा लागतो.
आयटी रिटर्न कसा भरावा? आयटीआर 1 साठी
1) आयकर विभागाच्या वेबसाईटला क्लिक करा http://incometaxindiaefiling.gov.in/ या वेबसाईटवर करदात्याला त्याचे लॉग इन बनवून रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यासाठी पॅन नंबर हा युझर आयडी असेल. पासवर्ड करदात्याला जनरेट करता येतो. फॉर्म ज्यांचे नावे रजिस्टर केला जातो त्यांचे रजिस्टर मोबाईलवर ओटीपी येतो, त्यावरुन पासवर्ड जनरेट केला जातो. वाचा: Tax-saving rules and ways to save tax |करबचत नियम आणि मार्ग
2) लॉग इन केल्यानंतर – ई फाईल टॅबमध्ये Prepare & Submit Online Form त्यावर क्लिक करा.
3) यानंतर पत्ता विचारणारा पर्याय येईल; त्यापैकी पॅन डेटा निवडल्यास, प्रोफाईल अपडेट आपोआप येईल. तसेच मागील आर्थिक वर्षात भरलेला तपशील निवडल्यास देखील; प्रोफाईल आपोआप अपडेट होईल. जर पत्ता बदलायचा असेल; तर, तो टाईप करावा लागेल. आधीच्या दोन पर्यायात; पत्ता लिहिण्याची गरज नाही. यानंतर पुढील पानावर; उत्पन्नाचा तपशील भरावा लागतो. फॉर्म 16 वरील तपशील; इथे भरावा लागेल. फॉर्म 16 मधील पार्ट B मध्ये असलेला करपात्र उत्पनाचा तपशील भरायचा आहे. जसे की – GROSS TOTAL INCOME. वाचा: Important Questions About Income Tax | आयकर बाबतचे प्रश्न
वाचा: All About Income Tax Return Form1 Sahaj |सर्वकाही ITR-1 विषयी
4) यानंतर Sections 80C हा पर्याय आहे. त्यामध्ये फॉर्म 16 मध्ये Sections 80C मध्ये केलेली एकूण गुंतवणूक; एकरकमी घेतली तरी चालेल. करसवलतीचे अनेक पर्याय आहेत; त्यातील गुंतवणूक वेगवेगळी न लिहिता, एकत्रच भरता येते. जर तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मध्ये गुंतवणूक केली असेल; तर, ती xqro.kwd 80CCD मध्ये भरा. (C) Section 80CCD: अंतर्गत National Pension Scheme) NPS साठी रुपये 50 हजार अतिरिक्त करसवलत मिळेल. वाचा: How to plan IT for the FY 2022-23 | आयकर नियोजन
5) यानंतर भरलेल्या कराचा तपशील दिसेल. जो फॉर्म 16 Part A मध्ये असतो. या फॉर्ममधील आणि इन्कम टॅक्स रिटर्नवरील एकूण रक्कम समान असते. जर ती रक्कम समान येत नसेल, तर आकडे भरताना काहीतरी चूक असण्याची शक्यता आहे. फॉर्म 16 जनरेट झाल्यानंतर काही गुंतवणूक केली असेल, तर ती माहिती भरावी लागेल. त्यानंतर रिफंड असेल तर तो मिळेल.
6) यानंतर सर्व बँक खात्यांचा तपशील द्या. बँक अकाऊंट नंबर आणि IFSC कोड टाकल्यानंतर बँक तपशील आपोआप येईल.
7) नोटांबंदीच्या कालावधीमध्ये केलेल्या व्यवहारांचा तपशील; म्हणजे कोणत्या खात्यात किती रुपये भरले हेही दयावे लागेल. जर या काळात काही रक्कम भरली नसेल; तर तो रकाना रिकामा सोडा. वाचा: Avoid these mistakes while filing ITR | ITR भरताना या चुका टाळा
8) यानंतर, प्रिव्ह्यू दिसेल तो बरोबर आहे का; हे तपासूनच फॉर्म सबमिट करा. त्यानंतर, भरलेला रिटर्न व्हॅलिडेट करा. यामध्ये तीन पर्याय असतील. 1) प्रिंट काढून सही करुन बंगळुरुला पाठवणे. 2) डिजिटल सिग्नेचरचा पर्याय व 3 ) आधार ओटीपी; यापैकी आधार ओटीपी हा पर्याय सोईचा आहे. हा सिलेक्ट केल्यानंतर; आधार ओटीपी नंबर रजिस्टर मोबाईलवर येईल. तो सबमिट करा. Excellent Tax Saving Investment Options | कर बचत योजना
9) करदात्याचा टॅक्स रिटर्न इन्कम टॅक्स विभागाकडे फाईल झाला असेल.
Related Posts
- 24Q-TDS Return Filing on Salary Payment |पगारावर TDS रिटर्न
- TDS time limit to deposit and file | TDS भरणे व रिटर्न फाइल करणे
- TDS deducted but not deposited by deductor | TDS भरला नाही
- How to Claim TDS Refund? | टीडीएस परताव्याचा दावा कसा करावा
- TDS: All about tax deducted at source | सर्वकाही कर कपाती विषयी
- Good News for Taxpayers | करदात्यांसाठी चांगली बातमी
- Tax Free Income in India | भारतात कोणते ‘उत्पन्न करमुक्त’ आहे
(टीप: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिलेला आहे. This article is for informational purposes only)

Ganpati-8 Know all about Mahaganpati Ranjangaon | महागणपती

Ganpati-7 Know all about Vigneshwar Ozar | विघ्नेश्वर, ओझर

Ganpati-6 Know all about Girijatmaj Lenyadri | गिरिजात्मज, लेण्याद्री

What things give you energy? | कोणत्या गोष्टी तुम्हाला ऊर्जा देतात?

Ganpati-5 Know all about Chintamani Theur | चिंतामणी थेऊर

Ganpati-4 Know all about Varadvinayak Mahad | वरदविनायक, महाड

Ganpati-3 Know all about Ballaleshwar Pali | बल्लाळेश्वर, पाली

Ganpati-2 Know all about Siddhivinayak Siddhatek | सिद्धिविनायक

Ganpati-1 Know all about Moreshwar Morgaon | मोरेश्वर, मोरगाव
