Skip to content
Marathi Bana » Posts » Way to find a lost smartphone | लॉस्ट स्मार्ट फोन शोधा

Way to find a lost smartphone | लॉस्ट स्मार्ट फोन शोधा

Way to Find a lost smartphone

Way to find a lost smartphone | Google Map द्वारे आपण हरवलेला किंवा चोरी झालेला स्मार्टफोन; शोधू शकता ‘कसे’ ते वाचा…

स्मार्टफोन्स शिवाय लोकांची सकाळ उजाडत नाही; फोन हे लोकांच्या दिनचर्येतील अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. स्मार्टफोन हे प्रत्येकाच्या जगण्याचा; एक अविभाज्य भाग बनले आहेत. सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम स्मार्टफोनकडे नजर जाते. मेसेज टोन वाजला नाही तरी; टोन बंद आहे की काय, हे तपासले जाते. यावरुन स्मार्टफोनची (Smartphone) सर्वांनाच किती सवय झालेली आहे; हे लक्षात येते. Way to find a lost smartphone

अशा परिस्थितीत फोन हरवला (lost); किंवा चोरी झाला तर विचारायलाच नको. कधी कधी तर महत्वाची कामंही अडून राहतात; महत्वाचा डेटा फोनमध्ये सेव्ह असल्याने; फोन शोधणं गरजेचं असतं. आपला जो मोबाईल चोरीला गेलेला आहे; त्या मोबाईलमध्ये जर महत्वाची माहिती असेल; तर ती माहिती लीक होण्याची शक्यताही अधिक असते. त्यामुळे जो स्मार्टफोन हरवलेला किंवा चोरीला गेलेला आहे; तो शोधणे अधिक महत्वाचे असते.

Way to find a lost smartphone
Way to find a lost smartphone-Photo by Brett Jordan on Pexels.com

कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन काळामध्ये स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर केला जात आहे. अशात मोबाईल हरवला किंवा चोरी झाला तर; मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यात आणखी लॉकडाउनमध्ये अनेक राज्यात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सकडून; अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची डिलीव्हरीही होत नाही. त्यामुळे ऑनलाईन नवा फोन खरेदी करणं; कठीण ठरु शकतं. वाचा: How to make AC at home without electricity |विजेशिवाय एसी चालू

स्मार्टफोन शोधण्यासाठी फोनमधील फाइंड माय फोन (Find My Phone) ही सर्व्हिस एनेबल करणं गरजेचं आहे; त्यामुळं फोन हरवला तरी तो सहज ट्रॅक करता येईल. बहुतांश अँड्रॉइड फोनमध्ये हे फीचर इन्स्टॉल असतं; पण नसेल तर, ते प्ले स्टोरवरुन डाउनलोडही करता येईल. त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन सेक्युरिटीवर टॅप करुन; डिव्हाइस ॲडमिनिस्ट्रेशनवर क्लिक करावं लागेल. फाइंड माय डिव्हाइस समोरील बॉक्सवर टिक केलेले आहे का याची खात्री करुन घ्यावी. (Way to find a lost smartphone)

Google Maps वरुन असा शोधता येईल स्मार्टफोन

Way to find a lost smartphone
Way to find a lost smartphone-Photo by Samson Katt on Pexels.com

1) अँड्रॉईड किंवा स्मार्टफोनमध्ये असलेले Find My Device हे फीचर असते; तर काही फोनमध्ये Find My Phone नावाचं फीचर असत. हे फीचर जागा आणि लोकेशन ट्रॅक करत, जिथे तुम्ही गेले आहात. (Way to find a lost smartphone)

2) गुगल मॅपच्या मदतीने, हरवलेला स्मार्टफोन शोधण्यासाठी; युजरकडे फोन किंवा लॅपटॉप असणे गरजेचे आहे. तसेच तो फोन किंवा लॅपटॉप यामध्ये; इंटरनेट कनेक्ट असलं पाहिजे. त्यातील लोकेशन सर्व्हिसेसही ऑन असली पाहिजे; त्याशिवाय Gmail अकाउंटचा युजर आयडी आणि पासवर्ड असावा. वाचा: Most Indian fans have 3 blades Why? | सीलिंग फॅनला 3 पाते का?

3) सर्वात आधी गुगलवर http://www.googlemaps.google.co.in टाईप करा. त्यानंतर गुगल मॅप ओपन होईल.

4) इथे Google ID टाकावा लागेल, जो तुमच्या हरवलेल्या स्मार्टफोनशी लिंक्ड असेल; आयडी साइन-इन (Sign-In) झाल्यानंतर, वरच्या बाजूला कोप-यात तीन डॉट दिसतील.

वाचा: What an innovative app skype is! | स्काईप एक नाविन्यपूर्ण ॲप!

5) त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Your Timeline हा पर्याय दिसेल. तो पर्याय निवडल्यानंतर दिवस, महिना व वर्ष टाकावा लागेल; डिव्हाइस लोकेशन हिस्ट्री कधीपर्यंतची हवी आहे; याचाही पर्याय उपलब्ध असेल. त्यामुळं तुमचा फोन कुठे-कुठे होता; आणि आता कुठे आहे याचं लाइव्ह लोकेशनह मिळू शकतं. ज्या दिवसाची युजरची लोकेशन हिस्ट्री (Location History); माहित करायची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर युजरची Location History दिसेल.

6) हे फीचर कोणत्याही अँड्रॉईड फोनमध्ये असलेल्या गुगल मॅप्समध्ये वापरता येतं; गुगल मॅपमध्ये तोच आयडी साइन-इन करा; जो तुमच्या मोबाईलशी लिंक आहे. वाचा: Never commit mistakes on WhatsApp |’या’ चुका करु नका,अन्यथा!

7) या फीचरला काम करण्यासाठी युजरचा मोबाईल आणि  त्या मोबाईल मध्ये असलेलं लोकेशन सर्विस फीचर ऑन असल्यास हे फीचर काम करेल. वाचा: Many languages, but app one | भाषा अनेक, पण ॲप एक

स्मार्ट होम स्पीकरसह आपला फोन शोधा (Way to find a lost smartphone)

Way to find a lost smartphone
Way to find a lost smartphone-Photo by Caio on Pexels.com

काही वेळेस आपण आपल्या घरात असत;, परंतू कामामध्ये आपण फोन कुठे ठेवला हे लक्षात येत नाही. अशा वेळी आपला स्मार्ट स्पीकर; कदाचित आपली मदत करण्यास सक्षम असेल. त्यासाठी आपले डिव्हाइस आणि स्मार्ट स्पीकर एकाच खात्यावर साइन इन केलेले असायला पाहिजे; म्हणजे होम स्पीकर आपला फोन शोधण्यात मदत करेल. वाचा: 1 जून पासून Google चे नियम बदलणार, काय आहे ‘बदल’ घ्या जाणून…

आपल्याकडे Google मुख्यपृष्ठ असल्यास; आपण असे काही म्हणू शकता, “ठीक आहे; Google, माझा फोन शोधा.” आपला स्मार्ट स्पीकर नंतर आपल्याबद्दल विचारणा-या डिव्हाइसची पुष्टी करेल; आणि मग फोनची रिंगटोन आवाज करेल. यात सर्वात महत्वाचे म्हणजे; आपला फोन मूक किंवा कंपन चालू नसला तरीही तो आवाज काढेल.

ब्ल्यूटूथ ट्रॅकरसह आपला फोन शोधा (Way to find a lost smartphone)

person using a smartphone
Way to find a lost smartphone-Photo by cottonbro on Pexels.com

आपण आपला फोन कोठे ठेवला आहे हे आपण नेहमी विसरता? काळजी करु नका. बॅकअपच्या अतिरिक्त सुविधेसाठी; ब्लूटूथ ट्रॅकर्सची मदत घ्या. आपल्याला फक्त आपला फोन ट्रॅकरवर ठेवणे गरजेचे आहे; जेणेकरुन जेव्हा आपला फोन एका पलंगाच्या उशीच्या मागे तात्पुरता गहाळ होतो, तेव्हा आपला फोन जलद शोधण्यात मदत करण्यासाठी; ट्रॅकर आपल्या फोनवर अलार्म स्थापित करेल. वाचा: How hackers steal your data | हॅकर्स तुमचा डेटा कसा चोरतात?

प्रायव्हसीची काळजी घ्या (Way to find a lost smartphone)

स्मार्टफोनमध्ये बरेचदा खाजगी गोष्टी असतात; फोन हरवला तरी तो परत मिळेपर्यंत, त्यातील खासगी माहितीचा गैरवापर होऊ शकतो. यासाठी ‘find my phone’ हा पर्याय निवडल्यानंतर; ‘Enable lock & erase’ हा पर्याय निवडावा. यामुळे एखादा पिन किंवा पासवर्ड टाकून; फोन लॉक करता येतो. एवढंच नाही, तर ज्याला फोन सापडला आहे; त्याला तो परत करणं सोपं जावं यासाठी एखादा मेसेज; किंवा फोन नंबरही लिहीता येतो. हा मेसेज मोबाईलच्या स्क्रिनवर दिसतो; शिवाय, ‘इरेझ’ हा पर्याय निवडला तर; मोबाइलच्या इंटरनल मेमरीमध्ये असणारा; सगळा डाटा डिलीट होतो. वाचा: Why Mobile Security is Important? | मोबाईल सुरक्षेचे महत्व

आता आपल्या स्मार्टफोनचे संरक्षण करा

सुमारे 25 वर्षांहून अधिक काळापासून, दशलक्ष ग्राहकांना त्यांच्या सर्वात जास्त आवडत्या तंत्रज्ञानाचे संरक्षण, कनेक्ट; आणि आनंद घेण्यात सॉफटवेअर मदत करत आहेत. स्मार्टफोन त्याला अपवाद नाहीत; आपले जीवन आपल्या डिव्हाइसवर आहे; ते संरक्षित असल्याचे सुनिश्चित करा. कव्हरेजबद्दल अधिक जाणून घ्या आणि आजच फोन विमा योजनेत नोंदणी करा.

Related Posts

Related Posts Categories

Know the early life of Lord Ram

Know the early life of Lord Ram | श्रीरामाचे प्रारंभिक जीवन

Know the early life of Lord Ram | प्रभू श्री रामाचे प्रारंभिक जीवन, रामनाम नामकरण, प्रभु श्रीराम एक महापुरुष, राम ...
Read More
person holding black tube

Know all about Diabetes | मधुमेहाविषयी सर्व काही

Know all about Diabetes | मधुमेहाविषयी सर्व काही जाणून घ्या, भविष्यातील धोके टाळण्यासाठी तुम्हाला मधुमेहाबद्दल काही गोष्टी माहित असणे आवश्यक ...
Read More
Popular Varieties of Mangoes in India

Popular Varieties of Mangoes in India | आंब्याचे प्रकार

Popular Varieties of Mangoes in India | भारतातील प्रसिद्ध आंब्याच्या जाती, त्यांची वैशिष्टये, उत्पन्न विभाग आणि आंब्याचा प्रकार कसा ओळखायचा ...
Read More
The Deadliest Places in the World

The Deadliest Places in the World | प्राणघातक ठिकाणे

The Deadliest Places in the World | जगातील सर्वात प्राणघातक ठिकाणे, जी साहसी पर्यटकांना आकर्षित करतात अशा 11 ठिकाणांविषयी जाणून ...
Read More
Online Teaching and LearningOnline Teaching and Learning

Online Teaching and Learning | ऑनलाइन शिक्षण

Online Teaching and Learning | ऑनलाइन टिचींग, ऑनलाइन शिकवणाऱ्या शिक्षकांनी शिक्षण अधिक मनोरंजक आणि आकर्षक बनवण्यासाठी त्यांच्या बोटांच्या टोकावर असलेला ...
Read More
a woman in white long sleeves holding flowers

The best ways to deal with Acne | मुरुमांना असे सामोरे जा

The best ways to deal with Acne | मुरुमांना सामोरे जाण्याचे सर्वोत्तम मार्ग. मुरुमाचे विविध प्रकार असून, प्रत्येकाला सामोरे जाण्याचे ...
Read More
Strange facts about the human body

Strange facts about the human body | मानवी शरीर तथ्ये

Strange facts about the human body | मानवी शरीराबद्दल 105 मजेदार, अद्भुत आणि विचित्र तथ्ये आहेत, जी तुम्हाला जाणून घ्यायला ...
Read More
How to Manage Time at Work

How to Manage Time at Work | कामाचे वेळ व्यवस्थापन

How to Manage Time at Work | कामाच्या ठिकाणी वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी काय केले पाहिजे; या विषयी सविस्तर माहिती या ...
Read More
Know the Amazing Benefits of Amla

Know the Amazing Benefits of Amla | आवळयाचे फायदे

Know the Amazing Benefits of Amla | या सुपरफ्रूटचा आहारात ताज्या किंवा वाळलेल्या स्वरुपात समावेश केल्यास त्वचा, केस आणि एकूणच ...
Read More
How to avoid NFT Scams?

How to avoid NFT Scams? | एनएफटी घोटाळे कसे टाळावेत

How to avoid NFT Scams? | एनएफटी घोटाळे कसे टाळावेत, एनएफटी म्हणजे काय? एनएफटीचे धोके काय आहेत? सर्वात सामान्य एनएफटी ...
Read More
Spread the love