Thing is small but tricks are big | तुमच्या नावावर किती SIM ॲक्टिव्ह आहेत?, माहित नाही, मग त्या बाबत ‘अशी’ माहिती मिळवा.
आपण आपल्या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड वापरतो त्या सिम कार्ड विषयी काही महत्वाच्या गोष्टी आपणास माहित असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्ही किती सिम कार्ड वापरता?, तुमच्या नावावर अन्य कुणी सिमकार्ड वापरत आहे का? एक व्यक्ती किती सिम कार्ड वापरु शकते? (Thing is small but tricks are big)
एका व्यक्तीच्या नावावर किती सिम कार्ड ॲक्टिव्ह असू शकतात? हे सर्व तुम्हाला माहित आहे का, किंवा तुमच्या नावावर अन्य कुणीतरी सिम कार्ड वापरत आहे का?, यासारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे तुम्हाला माहिती करुन घ्यायची असतील तर हा लेख तुमच्यासाठी खास आहे. चला तर मग जाणून घेवूया या छोटयाशा सिम कार्ड विषयी असलेल्या करामती बद्दल. (Thing is small but tricks are big)
आपण अनेकदा पाहतो की, काही लोक बेकायदेशीर मार्गाने दुस-याचे डॉक्युमेंट वारुन सिम कार्ड मिळवतात व त्याचा गैरवापर करतात. आपण जेंव्हा अशा प्रकारच्या बातम्या वाचतो, ऐकतो किंवा पाहतो, तेंव्हा आपण विचार करायला लागतो की हे आपल्या बाबतीतही होऊ शकते का? आपल्या नावावर दुसरे कोणी मोबाइल नंबर वापरु शकते क? तर याचे उत्तर होय असेच आहे. मग अशा परिस्थित आपण काय करायला हवे? तर सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या नावावर असलेल्या सिमचा शोध घ्या. (Thing is small but tricks are big)
Table of Contents
सिम कार्ड म्हणजे काय?
A subscriber identity module or subscriber identification module (SIM) सिम म्हणजे ग्राहक ओळख कार्ड आहे. हे एक लहान प्लास्टिक कार्ड आहे, जे आपल्या फोनमध्ये बसवले जाते. हे एक कार्ड ऑपरेटिंग सिस्टम (सीओएस) चालविणारे एकात्मिक सर्किट आहे; जे आंतरराष्ट्रीय मोबाइल ग्राहक ओळख (आयएमएसआय) क्रमांक आणि त्याच्या संबंधित की सुरक्षितपणे संचयित करण्याच्या उद्देशाने तयार केलेले आहे.
जे मोबाइल टेलिफोन डिव्हाइस (जसे की मोबाइल फोन आणि संगणक) वरील ग्राहकांना ओळखण्यासाठी आणि प्रमाणीकृत करण्यासाठी वापरले जातात. ब-याच सिमकार्डवर संपर्क माहिती संग्रहित करणे देखील शक्य आहे. (Thing is small but tricks are big)
सिम कार्ड विषयी माहिती देणारे पोर्टल
आपल्या नावावर किती मोबाइल नंबर ॲक्टिव्ह आहेत. यासाठी दूरसंचार विभाग (DoT) ने एक पोर्टल ‘टेलीकॉम ॲनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन’ (टीएएफ-सीओपी – The Telecom Analytics for Fraud management and Consumer Protection (TAF-COP) portal) लाँच केले आहे. (Thing is small but tricks are big)
पोर्टल लाँच करण्याचा उद्देश
दुसऱ्याच्या डिटेल्सचा वापर करुन मोबाइल सिम कार्ड घेणे हे बेकायदेशीर आहे. परंतु, अशा घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे यावर उपाय म्हणून डिपार्टमेंटने हा टूल लाँच केला आहे. तुम्ही जो नंबर वापरत नाहीत त्या नंबरपासून सुटका करुन घेण्यासाठी या ऑनलाइन टूलची मदत घेता येईल. या वेबसाइटद्वारे लोकांना ही माहिती मिळू शकेल की, त्यांच्या नावावर कोण-कोण सिम कार्ड वापरत आहेत. किती मोबाइल नंबर्स सुरु आहेत. याबराेबरच हे नंबर्स ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट ते टाकू शकतात.
ही वेबसाइट ग्राहकांना मदत करण्यासाठी, त्यांच्या नावावर कार्यरत मोबाइल कनेक्शनची संख्या तपासण्यासाठी आणि त्यांचे अतिरिक्त मोबाइल कनेक्शन नियमित असल्यास आवश्यक कारवाई करण्यासाठी तयार केली गेली आहे. तथापि, ग्राहक अधिग्रहण फॉर्म (सीएएफ) हाताळण्याची प्राथमिक जबाबदारी सेवा पुरवठादारांवर आहे.(Thing is small but tricks are big)
एक व्यक्ती किती सिम कार्ड वापरु शकते?
दूरसंचार विभागाने दूरसंचार सेवा प्रदात्यांद्वारे (टीएसपी) ग्राहकांना टेलिकॉम स्रोतांचे योग्य वाटप आणि फसवणूकीचे प्रमाण कमी करण्यासाठी, त्यांचे हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. विद्यमान मार्गदर्शक सूचनांनुसार वैयक्तिक मोबाइल ग्राहक त्यांच्या नावावर नऊ मोबाइल कनेक्शन नोंदवू शकतात.
एका व्यक्तीला जास्तीत जास्त नऊ मोबाइल कनेक्शन दिले जाऊ शकते. अनेक युजर्संच्या नावावर नऊ पेक्षा जास्त मोबाइल कनेक्शन सुरु आहेत. सध्या या पोर्टलचा वापर आंध्र प्रदेश आणि तेलंगाना राज्यांच्या लायसन्स असलेल्या सेवा क्षेत्रात केला जात आहे. नंतर हळूहळू ही सेवा इतरत्र लागू केली जाणार आहे. (Thing is small but tricks are big)
तुमच्या नावावर किती सिम कार्ड ॲक्टिव्ह आहेत, अशी माहिती मिळवा
युजर्स या पोर्टलद्वारे सहज आपल्या नावावर सुरु असलेले कनेक्शनसंबंधी माहिती करु शकतात. यासाठी त्यांना आपला बी ॲक्टिव्ह नंबर टाकावा लागेल. त्यानंतर एक ओटीपी मिळेल. याच्या मदतीने ते सर्व ॲक्टिव्ह नंबर्सच्या संबंधी माहिती मिळवू शकतात.
डिपार्टमेंटच्या सर्व कंज्यूमर्सला एसएमएस द्वारे याची माहिती देण्यात येते की, त्यांच्या नावावर किती नंबर्स ॲक्टिव्ह आहेत. त्यानंतर कंज्युमर्स पोर्टलवर जाऊन त्या नंबर्स संबंधी रिपोर्ट करु शकतात. युजर्सच्या तक्रारीनंतर टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइडर या नंबरला ब्लॉक करेल किंवा त्याला डिॲक्टिव्हेट करेल. (Thing is small but tricks are big)
- Why Mobile Security is Important? | मोबाईल सुरक्षा
- Many languages but app one | भाषा अनेक, पण ॲप एक
- How to Block Messages on WhatsApp? | संपर्क कसे ब्लॉक करावे
- How to link Mobile with Aadhaar and Pan? |आधार पॅन मो.लिंकिंग
आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.
