Welfare Schemes for Registered Workers | नोंदणीकृत कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना शासनामार्फत राबविल्या जातात.
Table of Contents
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी स्थापना करणे आवश्यक आहे. (Welfare Schemes for Registered Workers) सर्वात मोठा असंघटित वर्ग म्हणजे बांधकाम व इतर बांधकाम कामगार हाेय. कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तींचे नियमन करण्याच्या उद्देशानें तसेच सुरक्षा, आरोग्य व कल्याणासाठीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने, भारत सरकारने “इमारत व इतर बांधकाम कामगार” (रोजगार व सेवाशर्ती नियमन ) कायदा 1996 ची तरतूद केली आहे. या कायद्याअंतर्गत राज्य सरकारने “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार” (रोजगार व सेवा शर्तीचे नियमन) 2007 देखील मंजूर केले.

ह्या कायद्यान्वये महाराष्ट्र शासनानेसुद्धा “महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम” पारित केला. ह्या अधिसूचनेनुसार सुरवातीस महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना 5 शासन प्रतिनिधी नेमून करण्यात आली. (Welfare Schemes for Registered Workers)
अधिनियम 2011, 2015 व 2018 नुसार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली व त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्यात आले. मंडळात अध्यक्ष तसेच शासन, मालक व कामगार ह्यांचे प्रत्येकी 3 प्रतिनिधी मंडळात घेण्यात आले.
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा मुख्य उद्देशअसा आहे की, इमारत व इतर बांधकाम कामगारांना विविध योजनांद्वारे आरोग्य, सुरक्षा व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.. वाचा: How hackers steal your data? | हॅकर्स तुमचा डेटा कसा चोरतात?
योजनेचा दृष्टीकोन (Welfare Schemes for Registered Workers)

कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे ,धोकादायक क्षेत्रांमध्ये बालकामगारांना काम न करु देणे ,तसेच रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे .
कल्याणकारी उपाय आणि सामाजिक सुरक्षेसाठी कार्य, व्यावसायिक आरोग्य, कामांची स्थिती, आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी धोरणे तयार करणे. योजना, कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे, घातक व्यवसायापासून बाल श्रम काढून टाकणे आणि प्रक्रिया, श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकट करणे आणि कौशल्य विकास आणि रोजगार सेवांचा प्रचार करणे.
उद्देश आणि उद्दीष्टे (Welfare Schemes for Registered Workers)

- ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभीकरण.
- बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करणे.
- लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत सुलभपणा आणणे.
- कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.
- लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.
- बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
- कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता आणणे.
- प्रत्येक बांधकाम कामगाराला एकमेव नोंदणी क्रमांक देणे.
- नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया.
- कल्याणकारी योजनांच्या व्यवस्थापनासाठी प्रगत विश्लेषण.
कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी

बांधकाम व बांधकामाशी संबंधीत इतर कार्य, म्हणजे याचा संबंध निर्माण, बदल, दुरुस्ती, देखभाल किंवा नाश करणे असा जोडलेला आहे
- इमारती,
- रस्त्यावर,
- रस्ते,
- रेल्वे,
- ट्रामवेज
- एअरफील्ड,
- सिंचन,
- ड्रेनेज,
- तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
- स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
- निर्मिती,
- पारेषण आणि पॉवर वितरण,
- पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
- तेल आणि गॅसची स्थापना,
- इलेक्ट्रिक लाईन्स,
- वायरलेस,
- रेडिओ,
- दूरदर्शन,
- दूरध्वनी,
- टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
- डॅम
- नद्या,
- रक्षक,
- पाणीपुरवठा,
- टनेल,
- पुल,
- पदवीधर,
- जलविद्युत,
- पाइपलाइन,
- टावर्स,
- कूलिंग टॉवर्स,
- ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
- दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
- लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
- रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
- गटार व नळजोडणीची कामे.,
- वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
- अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
- सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
- लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
- जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
- सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
- काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
- कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
- सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
- स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
- सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
- जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
- माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
- रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
- सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.
वाचा: Mucormycosis: एक बुरशीजन्य आजार धोकादायक का आहे घ्या जाणून
कामगारांसाठी असलेल्या लाभाच्या विविध योजना खालीलप्रमाणे आहेत.

(1) कामगारांसाठी असलेल्या लाभाच्या योजना (सामाजिक सुरक्षा)
- कामगाराच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु. 30,000/-
- कामगारास स्वत:साठी लागणारे आवश्यक हत्यारे/अवजारे खरेदीसाठी रु. 5,000/- ही रक्कम तीन वर्षातून एकदाच मिळते.
(सामाजिक सुरक्षा योजनेचे अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा या निळया रंगातील अक्षरांवर क्लिक करा) वाचा: Ceiling Fans: भारतात बहुतेक सीलिंगफॅन्सला 3 ब्लेड्स का आहेत?
(2) कामगारांसाठी असलेल्या लाभाच्या योजना (शैक्षणिक)
या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.

- 1 ली ते 7 वी प्रतीवर्षी रु.2,500/- (या योजनेसाठी 75% हजेरी बाबत शाळेचा दाखला आवश्यक आहे.)
- 8 वी ते 10 वी प्रतीवर्षी रु. 5,000/- (75%अथवा अधिक गुण असल्याचे गुणपत्रक आवश्यक आहे.)
- 11 वी 12 वी प्रतीवर्षी रु. 10,000/- (50%अथवा अधिक गुण प्राप्त केल्याचे गुणपत्रक आवश्यक आहे.)
- पदवीच्या अभ्यासक्रमा करिता प्रतिवर्षी रु. 20,000/- नोंदणीकृत कामगाराच्या पत्नीसही लागू. यासाठी आवश्यक कागदपत्र- (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा प्रमाणत्र तसेच चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्या बाबतची पावती किंवा बोनाफाईड)
- पदव्यूत्तर पदवीकेसाठी रु. 25,000/- (फक्त शासन मान्य अभ्यासक्रमाकरिता. मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा प्रमाणत्र तसेच चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्या बाबतची पावती किंवा बोनाफाईड)
- अभियांत्रिकी पदवीसाठी रु. 60,000/- नोंदणीकृत कामगाराच्या पत्नीसही लागू. यासाठी आवश्यक कागदपत्र- (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा प्रमाणत्र तसेच चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्या बाबतची पावती किंवा बोनाफाईड)
- वैद्यकीय पदवीसाठी रु. 1,00,000/- नोंदणीकृत कामगाराच्या पत्नीसही लागू. यासाठी आवश्यक कागदपत्र- (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा प्रमाणत्र तसेच चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्या बाबतची पावती किंवा बोनाफाईड)
- MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतीपूर्ती (MS-CIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणत्र व शुल्काची पावती)
(वरील सर्व योजनांचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा या निळया रंगातील अक्षरांवर क्लिक करा) वाचा: AC Without Electricity: वीज-बॅटरी नाही, पण एसी चालू! कसा ते वाचा…
(3) कामगारांसाठी असलेल्या लाभाच्या योजना (आरोग्यविषयक)

- कामगाराच्या पत्नीस 2 जीवीत आपत्यापर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी रु. 15,000/- व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी रु. 20,000/- (या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र-सक्षम वैद्यकीय अधिका-यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीचे प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराची देयके) वाचा: Know about loudspeakers & law in India | ध्वनी प्रदुषण कायदा
- कामगार त्याच्या किंवा तिच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी रु. 1,00,000/- अर्थसाहाय्य. (सक्षम वैद्यकीय अधिका-यांनी गंभीर आजार असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचार विषयक कागदपत्रे)
- एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत रु. 1,00,000/- मुदत बंद ठेव. (सक्षम वैद्यकीय अधिका-यांनी दिलेले कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र व अर्जदारास एक कन्या अपत्यापेक्षा जास्त अपत्य नसल्याचा पुरावा शपथपत्र) वाचा: ‘MEHRANGARH’ The most famous fort in the world | मेहरानगड
- नोंदणीकृत कामगारास 75% किंवा कायमचे अपगत्व आल्यास रु. 2,00,000/- अर्थसाहाय्य. (75% अपगत्व असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकारी/ मंडळाचे प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराची देयके)
- कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी रु. 6,000/- अर्थसाहाय्य (शासकीय/निमशासकय व्सनमुक्ती केंद्रातून उपचार घेतल्याचे शासकीय वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपत्र)
(वरील आरोग्यविषयक योजनांचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा या निळया रंगातील अक्षरांवर क्लिक करा) वाचा: GAS CYLINDER: ‘गॅस सिलिंडर बाबत तुम्हाला ‘हे’ माहित आहे का?
(4) कामगारांसाठी असलेल्या लाभाच्या योजना (आर्थिक)

- कामगाराचा कामावर असताना मूत्यु झाल्यास कायदेशीर वारसास रु. 5,00,000/- (त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिका-यांनी दिलेला मृत्यु दाखला व बांधकाम कामगार कामावर असताना मृत्यु झाल्याबाबतचा पुरावा.)
- कामगाराचा नैसर्गिक मूत्यु झाल्यास कायदेशीर वारसास रु. 2,00,000/- (त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिका-यांनी दिलेला मृत्यु दाखला) वाचा: Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र शासन
- कामगाराचा मृत्यु झाल्यास अंत्यविधीकरिता रु. 10,000/- (त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिका-यांनी दिलेला मृत्यु दाखला)
- कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा विधूर पतीस प्रति वर्ष असे सलग 5 वर्षे रु. 24,000/- (त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिका-यांनी दिलेला मृत्यु दाखला)
- अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी व ग्रामीण अर्थसाहाय्य रु. 2,00,000/- (प्रधनमंत्री आवास योजनेस पात्र असल्याबाबत सक्षम अधिका-याचे पत्र किंवा प्रमाणित यादी शहरी किंवा गामीण)
- घर खरेदी किंवा घर बांधणीकरिता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम रु. 6,00,000/- अथवा रु. 2,00,000/- अनुदान. (आवश्यक पात्रता: 1) राष्ट्रीयीकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा. 2) कर्ज विम्याची पावती. 3) घर पती-पत्नीच्या संयुक्तनावे नोंदणीकृत असल्याचा पुरावा.) वाचा: All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय?
(वरील आर्थिक योजनांचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा या निळया रंगातील अक्षरांवर क्लिक करा)
नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना लागू करणे.
वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी आपणास बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.
कामगार नोंदणी (Welfare Schemes for Registered Workers)
नोंदणीसाठी पात्रता निकष
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
- मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार.
Golden Opportunities for a Career in IT: माहिती तंत्रज्ञानात करिअर
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्मभरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
- वयाचा पुरावा
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- ओळखपत्र पुरावा
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
- नोंदणी फी- रु. 25/- व 5 वर्षासाठी वार्षिक वर्गणी रु. 60/-
खालील फॉर्म पाहा किंवा डाउनलोड करा. (फॉर्म डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड शब्दावर किंवा निळया रंगातील अक्षरांवर क्लिक करा)
- बांधकाम कामगारांचे नोंदणी फॉर्म (संदर्भासाठी डाउनलोड)
- बांधकाम कामगारांचे नूतनीकरण फॉर्म (संदर्भासाठी डाउनलोड)
- 90 दिवसांचे काम प्रमाणपत्र – कामगार नोंदणीसाठी ग्रामसेवक (संदर्भासाठी डाउनलोड)
- 90 दिवसांचे कार्य प्रमाणपत्र – कामगार नोंदणीसाठी विकसक (संदर्भासाठी डाउनलोड)
- ऑनलाईन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म (संदर्भासाठी डाउनलोड)
- ऑनलाईन नोंदणीसाठी सेल्फ डिक्लरेशन फॉर्म (संदर्भासाठी डाउनलोड)
- वाचा: How to stop net banking scams? नेट बँकिंग घोटाळे कसे थांबवायचे?
“Welfare Schemes for Registered Workers |नोंदणीकृत कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना” हा लेख आपणास कसा वाटला, या बद्दल आपला अभिप्राय व सूचना कमेंटमध्ये जरुर कळवा. आपला प्रतिसाद व सुभेच्छा आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत. त्या नवचैतन्य देतात व त्यामुळे नवीन लेख लिहिण्यास प्रेरणा मिळते. सर्व वाचकांना एक विनंती आहे की ही माहिती आपल्या कामगार बांधवापर्यंत पोहचवा. म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आपण हा लेख आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद…!

Diploma: The best career option after 10th | 10वी नंतर डिप्लोमा
Read More

The Best Law Courses After 12th | 12वी नंतर कायदा अभ्यासक्रम
Read More

4 Important Actions About Aadhaar card | आधार अपडेट्स बाबत
Read More

Latest Water Purification Technologies | नवीन जल शुध्दी तंत्रज्ञान
Read More

Psychology: The best career option after 12th | मानसशास्त्र
Read More

How to Make a Career in Merchant Navy | करिअर इन मर्चंट नेव्ही
Read More

Bachelor of Arts in Hotel Management | हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीए
Read More

Marine Engineering: the best option for a career | सागरी अभि.
Read More

How to become a corporate lawyer | कॉर्पोरेट वकील कसे व्हावे
Read More

Diploma in Information Technology | माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा
Read More