Marathi Bana » Posts » How to Celebrate the Festival of Bail Pola? | बैल पोळा सण

How to Celebrate the Festival of Bail Pola? | बैल पोळा सण

How to Celebrate the Festival of Bail Pola?

How to Celebrate the Festival of Bail Pola? | बैल पोळा सणाचे महत्व, तो कसा साजरा करतात; बैलपोळा या सणाविषयीची कथा व कवीता

श्रावण महिना हा सणांची उधळण करणारा महिना आहे; या महिन्यात सणांची अगदी रेलचेल असते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला; नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करत असताना; या श्रावण महिन्याची सांगता होते ती या महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या बैल पोळा या सणाने. How to Celebrate the Festival of Bail Pola?

श्रावणातील पिठोरी अमावस्येला; बैलपोळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्याला बैलपोळा; किंवा बेंदूर म्हणून ओळखले जाते. कर्नाटकाच्या काही भागात; करुनुर्नामी असे म्हणतात. श्रावण अमावस्येला अर्थात पिठोरी अमावस्येला; शेतकरी बांधव बैलपोळा हा सण पारंपारिक पध्दतीने अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा करतात.

बैलपोळा हा सण कसा साजरा करतात

शेतक-यांसाठी बैल हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य असतात; कुटुंबातील व्यक्तीप्रमाणेच शेतकरी त्यांची काळजी घेतात. वर्षभर बैलांचा उपयोग शेतीकामासाठी केला जातो; शेतकरी पोळा हा सण बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी; साजरा करतात. बैलांकडून या दिवशी कष्टाचे कोणतेही काम करुन घेतले जात नाही; तर या दिवशी शेतकरी आपल्या बैलांसाठी उपवास करतात.

बैलांना रितसर आमंत्रण दिले जाते

पोळयाच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांना रितसर; विधिवत आमंत्रण देतात ते असे, ‘आज आवतन घ्या आणि उदया जेवायला या’; पोळयाच्या दिवशी शेतकरी सकाळी बैलांना सुवासिक साबन लावून आंघोळ घालतात. सकाळी त्यांना लाडवाचा नैवेद्य खायला घालतात. दुपारनंतर बैलांची सजावट करतात.

मातीचे बैल सजवून त्यांची पूजा केली जाते

बैलांबरोबरच इतर जनावरांनाही सजवले जाते; शेतक-यांच्या दृष्टीने इतर सर्व जनावरे देखील बैलांप्रमाणे तितकेच महत्वाचे आहेत. एवढेच नाही तर बैलांचा गोठाही फुलांच्या माळांनी; व वेगवेगळी चित्रे काढून सजवला जातो. स्त्रिया घरी पुरणपोळी, करंजी, कापणी, शंकरपाळी असे विविध; गोड पदार्थ तयार करतात. घरातील देव देवतेशेजारी मातीचे तयार केलेले बैल सजवून; त्यांची प्रत्येक घरी पूजा केली जाते.

‘असी’ करतात बैलपोळयाला बैलांची सजावट

बैल सजावटीसाठी बैलांच्या शिंगांवर वेगवेगळया रंगांचा हिगुळ लावून; त्यावर चमकदार बेगड लावले जाते. शिंगांच्या टोकांवर रंगीबेरंगी; रेशमी गोंडे बांधले जातात. डोक्याला बाशिेग बांधतात, गळयात कवडया, विविधरंगी मणी; आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायामध्ये फुलांचे तोडे बांधतात. बैलांच्या अंगावर चमचमणारी, विविध नक्षी असलेली; आणि अतिशय आकर्षक रेशमी झुल पांघरतात.

बैल सजावट स्पर्धेचे आयोजन केले जाते  

सायंकाळी सजवलेल्या बैलांना शेतकरी वाजत गाजत गावातील; हनुमान मंदीराजवळ वेशीबाहेर रांगेत उभे करतात. बैल पोळयाच्या दिवशी गावोगावी; बैल सजवण्याची स्पर्धा घेतली जाते. प्रत्येकजण आपले बैल स्पर्धेत जिंकण्यासाठी; मनापासून सजवत असतो. गावातिल प्रतिष्ठित मंडळी पोळा फुटण्यापूर्वी बैलांची पाहणी करुन; क्रमांक ठरवतात. स्पर्धा जिंकणा-या बैलाच्या मालकाला मानाचा फेटा बांधतात व सत्कार करतात.

बैलपोळा फुटण्यापूर्विचा जल्लोष (How to Celebrate the Festival of Bail Pola?)

गावातील वेसही पानाफुलांनी सजवली जाते; वेशीत आंब्याची पाने व फुलांचे तोरण बांधतात. गावातील सर्व बैल गोळा होईपर्यंत; सनई, ढोल, ताशे व नगारे वाजवले जातात. फटाके फोडले जातात, लोक आनंदाने लेझीम खेळतात; मुलं इकडून तिकड धावतात, आनंदाने उडया मारतात,

एका बाजूला उभे राहून स्त्रियाही हा नयनरम्य सोहळा  पाहण्याचा आनंद घेतात. आपले बैल व आपला धनी कुठे आहे याचा नजरेने शोध घेतात. बैलांची सजावट पाहण्यासाठी प्रत्येक बैलावरुन नजर फिरवतात. काही बैल शांतपणे उभे असतात, तर काही या आवाजामुळे घाबरतात, उडया मारतात, हंबरतात, काही तर लाथाही मारतात. त्यांना आवरण्याची मालकाची धडपड पाहून काही त्यांना हसतात तर काही मदत करतात. वाचा: अष्टविनायक

तोरण सोडल्यानंतरचे दृष्य (How to Celebrate the Festival of Bail Pola?)

वेशीत नारळ फोडून बांधलेले तोरण सोडले जाते; त्याला पोळा फुटणे असे म्हटले जाते. त्यानंतर शेतकरी वेशीतून आपले बैल मंदीरासमोर उभे करुन; बैलांना खांदा द्यायला लावतात. खांदा देणे म्हणजे बैलाचा खांदा हाताने दाबला की; बैल आपले पुढच्या पायाचे गुढगे जमीनीवर टेकवून देवासमोर नतमस्तक होतात, देवाचे दर्शन घेतात असे मानले जाते. How to Celebrate the Festival of Bail Pola?

बैलांना खांदा दयायला लावण्याचे दृष्य पाहण्यासारखे असते; काही बैल खांदा दाबल्याबरोबर खांदा देतात, तर काहींच्या खांदयावर लटकले; तरी ते खांदा देत नाहीत. काही बैल तर खांदयाला लटकलेल्या मालकासह पळ काढतात; अर्थात बैलाला खांदा दयायला लावणे; हे मालकाची कला व बैलाची ताकद यावर अवलंबून असते. वाचा: श्रीकृष्ण जन्माष्टमी 2021

बैलपोळयाची सांगता (How to Celebrate the Festival of Bail Pola?)

गावोगावच्या परंपरेनुसार उत्सव साजरा केला जातो, काही गावांमध्ये पोळा फुटल्यानंतरही त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढतात व नंतर  कार्यक्रम संपन्न होतो. त्यानंतर शेतकरी आपले बैल घरी आनतात, गोठया बाहेर बैलांना उभे करुन घरातील स्त्रिया बैल व मालक यांना ओवाळतात व दोघांचीही पूजा करतात. त्यांना पुरणपोळीचा नैवदय खायला घालतात. बैल वर्षभर शेतात शेतकऱ्यासाठी कष्ट करतात, राबतात म्हणून बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणुन पोळा या सणाकडे पाहिले जाते. परंपरेने चालत आलेल्या रुढी शेतकरी जपतात. व त्याचा वारसा पुढच्या पिढीकडे देतात. वाचा: शिक्षक दिन

बैलपोळा हा सण साजरा करण्यामागील कथा

कैलास पर्वतावर भगवान शंकर व देवी पार्वती सारीपाट खेळत होते; खेळताना देवी पार्वतीने डाव जिंकला; परंतू भगवान शंकर ते मानन्यास तयार नव्हते. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला; या वादाचा न्यायनिवाडा करण्यासाठी; त्यांच्या वादाला साक्षी होता तो म्हणजे फक्त नंदी. तेव्हा देवी पार्वतीने नंदीला विचारले की, डाव कोणी जिंकला; त्यावेळी नंदीने शंकराची बाजू घेतली. तेंव्हा देवी पार्वतीला नंदीचा खूप राग आला आणि देवी पार्वतीने नंदीला शाप दिला. How to Celebrate the Festival of Bail Pola?

‘मृत्यु लोकी तुझ्या मानेवर जू बसेल आणि तुला जन्मभर कष्ट करावे लागतील’; हा शाप ऐकून नंदीला त्याची चूक समजली. त्याला खूप वाईट वाटले त्याने देवी पार्वतीचीी माफी मागितली; तेव्हा देवी पार्वतीने सांगितले की; शेतकरी वर्षातून एक दिवस; देव मानून तुझी पूजा करतील; त्या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाहीत. तो एकदिवस म्हणजेच बैलपोळा; तेव्हा पासून बैलपोळा हा सण साजरा काण्याची प्रथा सुरु झाली; असे मानले जात आहे. वाचा: वैजयंतीमाळ, वन-माळ

श्रावणातील सणांची कवितेतून गुंफलेली माळ

How to Celebrate the Festival of Bail Pola?
How to Celebrate the Festival of Bail Pola?

महिना श्रावणाचा

महिना असे हा श्रावणाचा,

आनंद आणि उत्साहाचा.

कुणी म्हणे हा व्रतवैकल्याचा,

तर, कुणी म्हणे हा संणांचा…1

वाचा: गुढीपाडवा

नागपंचमीने होते सुरुवात,

नारळी पौर्णिमा येते डौलात.

बहीण भावाच्या नात्याचा,

सण असे रक्षाबंधनाचा…2

वाचा: नागपंचमी

महत्व असे श्रावणी सोमवाराचे,

व्रत वैकल्य शंकर महादेवाचे.

साजरी होताना जन्माष्टमी,

आनंदाने नाचतात गौळणी…3

वाचा: रामनवमीचे महत्व

येते गोपाळांची दहीहंडी,

रचल्या जातात उतरंडी.

दिसते मग गुंफलेली माला,

असा साजरा होतो दहिकाला…4

वाचा: महाराष्ट्र दिन

दर्श पिठोरी आमावस्येला,

पारावर नसतो आनंदाला.

वेशीभोवती होऊनी गोळा,

साजरा होतो बैलपोळा…5

वाचा: हिंदू कायदा व महिला अधिकार

महिना असे हा श्रावणाचा,

आनंद आणि उत्साहाचा.

कुणी म्हणे हा व्रतवैकल्याचा,

तर, कुणी म्हणे हा संणांचा…6

Related Posts

Post Categories

आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या. How to Celebrate the Festival of Bail Pola?

All you need to know about sextortion

All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय?

All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय? सेक्सटोर्शनचे बळी होण्यापासून सावध राहण्यासाठी; तुम्हाला सर्व माहिती असणे ...
Read More
woman with face mask holding an alcohol bottle

All Information About Pharmacy Courses | फार्मसी कोर्सबद्दल

All Information About Pharmacy Courses | फार्मसी कोर्सबद्दल सविस्तर माहिती; प्रवेश प्रक्रिया, कौशल्ये, पात्रता निकष, अभ्यासक्रम, नोकरीच्या संधी, प्रमुख रिक्रूटर्स ...
Read More
Most Beautiful Flowers in the World

Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले

Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले; फुलांचे सौंदर्य, रंग, प्रकार, उगम व महत्व जाणून घ्या ...
Read More
How to Check Income Tax Refund?

How to Check Income Tax Refund? | टॅक्स रिफंड कसा तपासायचा?

How to Check Income Tax Refund? | आयकर विभागाने AY 2021-22 साठी आयकर परतावा जारी केला. तुम्हाला आयटी रिफंड मिळाला ...
Read More
Know the meaning of moles on the face

Know the meaning of moles on the face | चेह-यावरील तीळाचे अर्थ

Know the meaning of moles on the face | चेह-यावरील तीळाचे अर्थ, तीळ कशामुळे होतो; मोल्सचे प्रकार व मोल्सविषयी विविध ...
Read More
Know About the Importance of Makar Sankranti

Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांती

Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांतीचे प्रादेशिक, सामाजिक व धार्मिक महत्व; प्रादेशिक भिन्नता व रीतिरिवाज या ...
Read More
How to Get Rid of Pimples?

How to Get Rid of Pimples? | मुरुमांपासून सुटका कशी करावी?

How to Get Rid of Pimples? | मुरुम किंवा पुरळ हा एक सामान्य त्वचा रोग आहे; यापासून सुटका करण्यासाठी, नैसर्गिक ...
Read More
photo of woman tutoring young boy

The Role of Parents in the Success of their Children |मुलांचे यश

The Role of Parents in the Success of their Children | मुलांच्या यशात पालकांची भूमिका; मुलांच्या करिअरसाठी पालकांनी काय केले ...
Read More
A career in the Fashion Designing

A career in the Fashion Designing | फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर

A career in the Fashion Designing | फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर, कोर्सेस, अभ्यासक्रम पुस्तके, महाविदयालये, वेतन व कंपन्या फॅशन डिझायनिंग हे ...
Read More
Success is Around Yourself

Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे

Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे; फक्त ते शोधण्याची नजर हवी आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या आयुष्यात अनेक लोकांना ...
Read More
Spread the love