How to Study Smarter | अधिक स्मार्टपणे अभ्यास करण्यासाठी प्रभावी अभ्यासतंत्र वापरली पाहिजेत त्या विषयी जाणून घ्या.
मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत बहुतेक पालकांची तक्रार असते की “मुलं अभ्यास करत नाहित”. परंतू ते का अभ्यास करत नाहीत, अभ्यासाच्या बाबतीत त्यांच्या काय अडचणी आहेत, त्या पालकांनी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. (How to Study Smarter)
पालकांनी मुलांना अभ्यासासंबंधीत काही गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. जसे की मुलांना ते सायकल चालवण्यास कसे शिकले. त्यावेळी सुरुवातीला काय घडले, तुम्हाला सायकल चालवण्याबाबत काय धडे दिले आणि नंतर तुम्ही खूप सराव केला व मग सायकल चांगल्याप्रकारे चालवू लागलात, जे तुम्ही आयुष्यात कधिही विसरु शकणार नाहीत. अभ्यासाच्या बाबतीतही तसेच आहे, आपण त्याच प्रकारे अभ्यास कसा करायचा हे शिकू शकता.
अभ्यास कसा करायचा हे तंत्र घेऊन कोणीही जन्माला येत नाही. तुम्हाला काही अभ्यास कौशल्ये शिकण्याची आणि नंतर त्यांचा सराव करण्याची आवश्यकता आहे. अभ्यासाच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित केल्यास ते तुमच्यासाठी शिकणे आणि वर्गात चांगले कार्य प्रदर्शन करणे सोपे करेल, विशेषत: जे विदयार्थी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतात. अधिक स्मार्टपणे अभ्यास करण्यासाठी विदयार्थी खालील अभ्यासतंत्रांचा वापर करु शकतात. (How to Study Smarter)
वर्गात शिक्षक शिकवतांंना लक्ष दया
अभ्यासाची आवड निर्माण होण्यासाठी व केलेला अभ्यास स्मरणात ठेवण्यासाठी आकलन हे सर्वात महत्वाचे असते. आणि आकलन होण्यासाठी वर्गात शिकताना लक्ष देणे हे त्याहुन अधिक महत्वाचे असते.
जेव्हा विदयार्थी वर्गात लक्ष देतात आणि शिकताना चांगल्या नोट्स घेतात तेंव्हा त्यांना तो टॉपीक अधिक चांगला समजतो. लक्ष केंद्रित करण्यासाठी बाकावरील मित्र, ब्लॅकबोर्ड व बेंच यांचेमधील अंतर, ब्लॅकबोर्डवरील शिक्षकांच्या नोदी स्वष्टपणे दिसतात की नाही या सर्वांचा परिणाम होतो. (How to Study Smarter)
पालकांनी मुलांना तुम्हाला वर्गात लक्ष देण्यास त्रास होतो का? तुम्ही मोठ्या आवाजात बोलणा-या मुलाच्या शेजारी बसता का? बोर्ड पाहणे कठीण आहे का? तुम्ही एका चांगल्या आसनावर बसला आहात याची खात्री करा जी विदययार्थ्यांना लक्ष केंद्रित करण्यास अडथळा आणू शकते.
असे असल्यास पालकांनी शिक्षकांशी विदयार्थ्यांच्या कोणत्याही समस्यांबद्दल बोलणे व समस्या निराकरण करणे महत्वाचे आहे. याकडे पालकांनी दुर्लक्ष केल्यास त्याचे भविष्यात विदयार्थ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. (How to Study Smarter)
कच्च्या नोटसवरुन पक्क्या नोटस स्वत: तयार करा
शिक्षक वर्गात शिकवत असतांना विदयार्थ्यांनी शिक्षकांच्या फळयावरील नोंदी लिहून घेतल्या पाहिजेत. त्यानुसार घरी अभ्यासाच्या वेळी संदर्भ पुस्तकांसह सविस्तर नोटस तयार केल्या पाहिजेत.
जेंव्हा विदयार्थी अशा प्रकारच्या नोटस स्वत: तयार करतात तेंव्हा त्यांना तो भाग अधिक चांगला समजण्यास मदत होते व आकलन झालेला भाग दिर्घकाळ स्मरणात राहण्यास मदत होते.
घरी पक्या नोटस तयार करताना चांगले हस्ताक्षर वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरुन तुम्ही तुमच्या नोट्स नंतर आनंदाने वाचू शकाल. ज्याचा उपयोग परीक्षेत चांगली ग्रेड मिळवण्यासाठी होतो. हे तंत्र अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी व परीक्षेत इतरांपेक्षा चांगले गुण मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. (How to Study Smarter)
मोठी माहिती छोटया भागांमध्ये खंडित करा
जेव्हा विदयार्थ्यांना अधिक मोठी माहिती लक्षात ठेवायची असते तेंव्हा माहिती छोटया भागांमध्ये खंडित करा. त्यासाठी मुख्य मुद्दे व उप मुद्दे वापरा ते लक्षात ठेवणे सोपे जाते व नंतर त्यांचा विस्तार सहज करता येतो. एखादया घटनेची कारणे व परिणाम लक्षात ठेवायचे असतील तर अगोदर ठळक मुद्दे वाचा, लिहून काढा व नंतर त्याचे स्पष्टीकरण वाचा.
स्पेलिंग पाठांतरासाठी 25 शब्द दिलेली असतीतल तर एका वेळी सर्व शब्दांचा विचार करण्याऐवजी, त्यांना पाच-शब्दांच्या तुकड्यांमध्ये विभाजित करा व उपलब्ध वेळेनुसार प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित करा.

पहिल्याच प्रयत्नात विदयार्थ्यांना काही आठवत नसेल तर काळजी करु नका. अशावेळी सरावाचे महत्व विचारात घ्या. तुम्ही एखाद्या गोष्टीचे पुनरावलोकन करण्यात जितका जास्त वेळ किंवा दिवस घालवाल तितके ते तुमच्या मेंदूमध्ये टिकून राहण्याची शक्यता जास्त असते.
जेव्हा तुम्ही गोष्टींची यादी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा प्रत्येकाचे पहिले अक्षर वापरणारे वाक्यांश तयार करा. उदाहरणार्थ, तुम्ही मुख्य दिशा व उपदिशा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता त्यासाठी “अदनपवा (वाजतो कसा) उईपू” ही अदयाक्षरे व त्यांची सुरुवात (आग्नेय पासून होते) हे लक्षात ठेवल्यास मुख्य दिशा व उपदिशा कायम लक्षात राहतात.
हा क्रम लक्षात ठेवण्यासाठी काही दिवस त्याचा सराव करणे महत्वाचे आहे. तुम्ही नेहमी तुमच्या टिपांचे पुनरावलोकन केल्यास मोठी माहिती स्मरणात राहण्यास मदत होते. (How to Study Smarter)
अभ्यासाचे लेखी नियोजन करा
प्रत्येक आठवडयात अभ्यासाचे नियोजन करा. हे करत असताना मागील आठवडयातील राहिलेल्या अभ्यासाला पुढील आठवडयात प्राधान्यक्रम दया. नियोजनात विषयाची काठिण्यपातळी विचारात घ्या. तुम्हाला अवघड वाटणा-या विषयांसाठी अधिक वेळ दया.
परीक्षेची तयारी करण्यासाठी परीक्षेच्या आदल्या रात्रीची वाट पाहण्यात अर्थ नाही. त्यामुळे अभ्यास कमी व गोधळ आणि अस्वस्थता अधिक वाढेल. वर्षभरातील महत्वाच्या परीक्षा व त्यांच्या तारखा तुमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये ठळक, सुदर व मोठया अक्षरांमध्ये नेहमी तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी ठेवा. अभ्यासाचे नियोजन कसे करावे हे जाणून घेण्यासाठी वाचा (How to Study Smarter)
हवी तेंव्हा मदत स्विकारा
कोणताही भाग शिकत असताना वर्गात समजला नाही तर शिक्षकांना विचारा. जर तुम्हाला साहित्य समजत नसेल तर तुम्ही प्रभावीपणे अभ्यास करू शकत नाही. तुम्हाला काहीतरी संभ्रम असल्यास तुमच्या शिक्षकांना मदतीसाठी विचारा.
घरी अभ्यास करत असतांना काही समस्या आल्यास आपल्या पालकांना किंवा शाळेत शिक्षकांना विचारुन समस्यांचे निराकरण करा. असे न केल्यास समस्या कधीच सुटनार नाही. यशस्वी विद्यार्थ्यांच्या 10 सवयी जाणून घ्या. (How to Study Smarter)
तंदुरुस्तीकडे लक्ष दया
जेंव्हा शरीर निरोगी आणि तंदुरुस्त असते तेंव्हा सर्व ॲक्टिव्हिटी करण्यासाठी लक्ष केंद्रित करता येते व सर्व कार्य सफल होते. त्यासाठी नियमित व्यायाम, सकस आहार व चांगली झोप यासर्वांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे कारण ती त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आरोग्यावर तसेच त्यांच्या वैयक्तिक वाढीवर सकारात्मक परिणाम करते.
शारीरिक क्रिया विद्यार्थ्यांना मजबूत हाडे आणि स्नायू तयार करण्यास, त्यांचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यास आणि निरोगी वजन राखण्यास मदत करते. तसेच शारीरिक क्रिया तणाव आणि चिंता कमी करतात. शारीरिक क्रिया लक्ष, स्मरणशक्ती आणि कार्यरत स्मरणशक्ती सुधारु शकतात आणि कार्याबाहेरील वर्तन कमी करु शकतात.
शारीरिक क्रियाकलाप सेरेब्रल रक्त परिसंचरण वाढवू शकतात, ज्यामुळे समस्या सोडवण्याची कौशल्ये आणि सर्जनशीलता सुधारु शकते. मुले आणि किशोरांना वयानुसार, आनंददायक आणि विविध प्रकारच्या शारीरिक क्रियांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. तुदुरुस्ती, अभ्यासाच्या सर्वोत्तम सवयी व उत्कृष्ट अभ्यास तंत्र विदयार्थ्यांना टॉपर बनवन्यात मदत करतात. (How to Study Smarter)
सारांष
अशाप्रकारे, विदयार्थ्यांनी अधिक स्मार्टपणे अभ्यास करण्यासाठी प्रत्येक आठवडयात सुधारित वेळापत्रक तयार करुन त्याची काटेकोरपणे अमलबजावणी करा. शिकण्याची आणि शिकलेला अभ्यास स्मरणात ठेवण्याची क्षमता सुधारण्यासाठी प्रभावी अभ्यास कौशल्ये विकसित करा. टॉपर्सचे 3 सर्वोत्तम गुण जाणून घ्या.
एकावेळी एकच काम करा, मल्टीटास्किंगमुळे कोणतेच काम कार्यक्षमतेने व त्रुटी-विरहित पुर्ण होत नाही. त्यामुळे मल्टीटास्किंग टाळा. अभ्यास करत असताना ठराविक वेळेनंतर ब्रेक घ्या, त्यामुळे अभ्यासतील लक्ष सुधारते आणि अभ्यास स्मरणात ठेवण्यास मदत होते. (How to Study Smarter)
फ्लॅशकार्ड्स लिहिणे हा तुम्ही काय शिकलात ते लक्षात ठेवण्यास मदत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. तसेच माईंड मॅप तुम्हाला समस्या आणि सिद्धांतांची कल्पना करण्यात मदत करतात आणि विचार आणि सर्जनशीलतेच्या मुक्त प्रवाहासाठी परवानगी देतात.
अभ्यास चांगला लक्षात ठेवण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे नोट्स, चांगल्या नोट्स घेणे हे चांगले शिकणारे होण्यासाठी अत्यंत महत्वाचे कौशल्य आहे. स्पष्ट ध्येये आणि उद्दिष्टे ठेवा व त्यानुसार विषयांना प्राधान्य द्या. अभ्यासासाठी असलेल्या सामग्रीचा वापर करा, गरज पडल्यास संबंधीतांची मदत घ्या. मुलांचा सर्वांगीण विकास या बाबत अधिक जाणून घ्या. (How to Study Smarter)
- How Important is the Study Plan | अभ्यास योजनाचे महत्व
- How to develop effective study skills | अभ्यास कौशल्ये विकसित करा
आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या
[pt_view id=”55cff900qc”]
One reply on “How to Study Smarter | अधिक स्मार्टपणे अभ्यास कसा करावा”
I love your quote: “Learn for yourselves and teach others.” I checked “like” on this post because I do want to study smarter but was unable to read how because I don’t know your language. Could you kindly tell me what it is so I can have it and some of your other posts translated into English? I’d appreciate it so much.
Blessings and love,
❤️Michele