Maharashtra Day History and all | ‘महाराष्ट्र दिन’ हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस; म्हणून साजरा केला जातो. 1 मे, 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे; या दिवशी महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. (Maharashtra Day History and all)
हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात; विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. या दिवसाचे खास वैशिष्टये म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 107 हुतात्म्यांचे स्मरण; या दिवशी केले जाते. (Maharashtra Day History and all)
Table of Contents
मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार
स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरु होती. मात्र राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देणं नाकारलं होतं. (On 01/05/1960, the Mumbai Reorganization Act came into effect. This act was a result of many protests and movements that demanded the creation of an individual state. This demand for a separate state was first made by ‘The Sanyukt Maharashtra Andolan’.)
संयुक्त महाराष्ट्र चळवळ

महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी 21 नोव्हेंबर 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली; या चळवळीने जाेर धरला असतानाच एक घटना घडली, आणि या घटनेनंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. (Maharashtra Day History and all)
आंदोलन पेटले

मराठी माणसांपासून मुंबई तोडली जात असल्याची एक चीड तेव्हा धुमसत होती; 21 नोव्हेंबर 1956 रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी; कामगारांचा एक भव्य मोर्चा फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात जमला. (Maharashtra Day History and all)
फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते; कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले; त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. संपूर्ण राज्यभर लहान-मोठया सभा घेतल्या जात होत्या; व त्यामध्ये या निर्णयाचा निषेध केला जात होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी; फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. (Maharashtra Day History and all)
गोळीबाराचे आदेश
त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत; फ्लोरा फाउंटनकडे जमला. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला; फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. आंदोलकांची प्रचंड गर्दी वाढू लागली; सरकार विरोधी घोषणाबाजी सुरु झाली. फोर्ट परिसरातील जमावबंदी; आणि सभाबंदी मोडून नागरिकांनी बंड पुकारले. अनेकांनी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात रस्त्यावर बसून सत्याग्रह सुरु केला.
आंदोलकांना हटवण्यासाठी आणि मोर्चा पोलिसी ताकद वापरुन उधळून लावण्यासाठी; लाठीचार्ज करण्यात आला. त्याचा सत्याग्रहींवर कोणताही परिणाम झाला नाही. ते आपल्या निर्णयाशी ठाम होते; त्यामुळे पोलिस दलाचे हे प्रयत्न अयशस्वी झाले; आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री; मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 107 आंदोलक हुतात्मे झाले. (Maharashtra Day History and all)
हुतात्मा स्मारकाची निर्मिती

हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे; मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मंजुरी मिळाली. हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेल्या फ्लोरा फाउंटन येथे राज्याच्या स्थापनेनंतर हुतात्मा चौक बांधण्यात आला; व त्यावर सर्व हुतात्म्यांची नावं कोरण्यात आली. हुतात्मा स्मारकाची स्थापना 1965 मध्ये झाली. (Maharashtra Day History and all)
1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली; यामुळेच 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात. ज्या 107 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली; त्या हुतात्म्यांना नागरिक आजही नमन करतात. (Maharashtra Day History and all)
महाराष्ट्र स्वतंत्र, परंतू अखंड महाराष्ट्राचे स्वप्न अपूर्ण
भारत सरकारने भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेतला; या निर्णयाला अनुसरुन मराठी बहुल नागरिकांसाठी; महाराष्ट् राज्याची स्थापना करण्याची मागणी पुढे आली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा या मागणीला विरोध होता. राज्यकर्त्यांचा हा विरोध पाहून नागरिक संतापले; संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली. ही चळवळ आक्रमक झाली; आणि अखेर नागरिकांची मागणी मान्य झाली.
केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मंजुरी दिली; पण आजही मराठी बहुल बेळगाव, कारवार, निपाणी हा भाग कर्नाटकमध्ये आहे. तो महाराष्ट्राला जोडलेला नाही; यामुळे महाराष्ट्र राज्य स्थापन झाले, परंतू संयुक्त महाराष्ट्र चळवळीची असलेली अखंड महाराष्ट्राची मूळ मागणी पूर्ण झाली नाही; ते स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. (Maharashtra Day History and all)
मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान देणारे 107 हुतात्मे
| १) सिताराम बनाजी पवार २) जोसेफ डेव्हिड पेजारकर ३) चिमणलाल डी. शेठ ४) भास्कर नारायण कामतेकर ५) रामचंद्र सेवाराम ६) शंकर खोटे ७) धर्माजी गंगाराम नागवेकर ८) रामचंद्र लक्ष्मण जाधव ९) के. जे. झेवियर १०) पी. एस. जॉन ११) शरद जी. वाणी १२) वेदीसिंग १३) रामचंद्र भाटीया १४) गंगाराम गुणाजी १५) गजानन ऊर्फ बंडू गोखले १६) निवृत्ती विठोबा मोरे १७) आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर १८) बालप्पा मुतण्णा कामाठी १९) धोंडू लक्ष्मण पारडूले २०) भाऊ सखाराम कदम २१) यशवंत बाबाजी भगत २२) गोविंद बाबूराव जोगल २३) पांडूरंग धोंडू धाडवे २४) गोपाळ चिमाजी कोरडे २५) पांडूरंग बाबाजी जाधव २६) बाबू हरी दाते २७) अनुप माहावीर २८) विनायक पांचाळ २९) सिताराम गणपत म्हादे ३०) सुभाष भिवा बोरकर ३१) गणपत रामा तानकर ३२) सिताराम गयादीन ३३) गोरखनाथ रावजी जगताप ३४) महमद अली ३५) तुळशीराम पुंजाजी बेलसरे | ३६) देवाजी सखाराम पाटील ३७) शामलाल जेठानंद ३८) सदाशिव महादेव भोसले ३९) भिकाजी पांडूरंग रंगाटे ४०) वासुदेव सुर्याजी मांजरेकर ४१) भिकाजी बाबू बांबरकर ४२) सखाराम श्रीपत ढमाले ४३) नरेंद्र नारायण प्रधान ४४) शंकर गोपाल कुष्टे ४५) दत्ताराम कृष्णा सावंत ४६) बबन बापू भरगुडे ४७) विष्णू सखाराम बने ४८) सिताराम धोंडू राडये ४९) तुकाराम धोंडू शिंदे ५०) विठ्ठल गंगाराम मोरे ५१) रामा लखन विंदा ५२) एडवीन आमब्रोझ साळवी ५३) बाबा महादू सावंत ५४) वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५५) विठ्ठल दौलत साळुंखे ५६) रामनाथ पांडूरंग अमृते ५७) परशुराम अंबाजी देसाई ५८) घनश्याम बाबू कोलार ५९) धोंडू रामकृष्ण सुतार ६०) मुनीमजी बलदेव पांडे ६१) मारुती विठोबा म्हस्के ६२) भाऊ कोंडीबा भास्कर ६३) धोंडो राघो पुजारी ६४) हृदयसिंग दारजेसिंग ६५) पांडू माहादू अवरीरकर ६६) शंकर विठोबा राणे ६७) विजयकुमार सदाशिव भडेकर ६८) कृष्णाजी गणू शिंदे ६९) रामचंद्र विठ्ठल चौगुले ७०) धोंडू भागू जाधव | ७१) रघुनाथ सखाराम बीनगुडे ७२) काशीनाथ गोविंद चिंदरकर ७३) करपैया किरमल देवेंद्र ७४) चुलाराम मुंबराज ७५) बालमोहन ७६) अनंता ७७) गंगाराम विष्णू गुरव ७८) रत्नु गोंदिवरे ७९) सय्यद कासम ८०) भिकाजी दाजी ८१) अनंत गोलतकर ८२) किसन वीरकर ८३) सुखलाल रामलाल बंसकर ८४) पांडूरंग विष्णू वाळके ८५) फुलवरी मगरु ८६) गुलाब कृष्णा खवळे ८७) बाबूराव देवदास पाटील ८८) लक्ष्मण नरहरी थोरात ८९) ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९०) गणपत रामा भुते ९१) मुनशी वझीरअली ९२) दौलतराम मथुरादास ९३) विठ्ठल नारायण चव्हाण ९४) देवजी शिवन राठोड ९५) रावजीभाई डोसाभाई पटेल ९६) होरमसजी करसेटजी ९७) गिरधर हेमचंद लोहार ९८) सत्तू खंडू वाईकर ९९) गणपत श्रीधर जोशी १००) माधव राजाराम तुरे(बेलदार) १०१) मारुती बेन्नाळकर १०२) मधूकर बापू बांदेकर १०३) लक्ष्मण गोविंद गावडे १०४) महादेव बारीगडी १०५) कमलाबाई मोहिते १०६) सिताराम दुलाजी घाडीगांवकर १०७) शंकरराव तोरस्कर |
सारांष
अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र शंभुराजांच्या पराक्रमी आणि तेजस्वी, इतिहासाची साक्ष देतो. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात आघाडीवर असलेला महाराष्ट्र हुतात्म्यांचे बलिदान विसरु शकत नाही.
या राज्यातील महान संत, समाज सुधारक, राजकीय नेते यांनी राज्याच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासालाही दिशा देण्याचे काम केलेले आहे आणि करत आहेत. अशाप्रकारे सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या या माझ्या महाराष्ट्राला “मराठी बाणा” चा मानाचा मुजरा. (Maharashtra Day History and all)
- Jai Jai Maharashtra Maza | जय जय महाराष्ट्र माझा
- Importance of the Teachers’ Day | शिक्षक दिनाचे महत्व
- Know the Culture in Maharashtra (II) |महाराष्ट्राची संस्कृती
- Governance & Administration in Maharashtra | शासन व प्रशासन
- Why is Maharashtra Day Celebrated? | महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?
आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.



You must be logged in to post a comment.