Marathi Bana » Posts » How to Choose the Right Water Purifier? | योग्य WP कसे निवडावे

How to Choose the Right Water Purifier? | योग्य WP कसे निवडावे

How to Choose the Right Water Purifier?

How to Choose the Right Water Purifier? |’शुद्ध पाण्याचे तंत्र, म्हणजे वॉटर प्यूरिफायर वापरणे, हाच आहे निरोगी आरोग्याचा खरा मंत्र’; हा लेख आपणास योग्य प्यूरिफायर निवडण्यासाठी निश्चितच मदत करेल.

पिण्यासाठी शुध्द पाणी न मिळणे; ही भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक समस्यांपैकी एक आहे. पूर्वी पावसाळयात पावसाचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मिसळल्यामुळे; पाणी दुषित होत होते. दुषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी; वॉटर प्युरिफायरचा वापर केला जात असे. परंतू आता शहरीकरण, वाढती लोकसंख्या, कारखाणदारी अशा विविध घटकांमुळे; पाण्यातील अशुध्दतेचे प्रमाण वाढत चालले आहे. दिवसेंदिवस जलप्रदूषणाची समस्या ही सर्वात महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक समस्यांपैकी एक होत आहे. (How to Choose the Right Water Purifier?)

How to Choose the Right Water Purifier?
How to Choose the Right Water Purifier?

आपणच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या

जलप्रदूषणाच्या समस्ये संदर्भातील अव्यवस्थेवर अनेक तज्ञ आपली मते मांडतात; वादविवाद व चर्चेद्वारे प्रदूषित पाण्याच्या दुष्परिणामांना समोर आणले जाते. पिण्याच्या पाण्याच्या क्षेत्रामधील प्रचलित समस्या म्हणजे; जलसाठयात मिसळणारे दुषित पाणी, जलप्रदूषण, पिण्याच्या पाण्याच्या साठयांमध्ये दिवसेंदिवस होत असलेली घट; तसेच जल शुद्धीकरण तंत्रज्ञानाचा अभाव, आणि जल शुद्धीकरणाच्या उपलब्धतेविषयी लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव, इ. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात; शासनाला सर्वच ठिकाणी शहरी व ग्रामीण शुद्ध पाणीपुरवठा करतांना; अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाने पाण्यासंदर्भात आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. (How to Choose the Right Water Purifier?)

How to Choose the Right Water Purifier?
How to Choose the Right Water Purifier? marathibana.in

पावसाळयात सर्वात जास्त संसर्गजन्य आजार पसरतात

उन्हाळयामध्ये असलेल्या प्रचंड उकाडय़ापासून सुटका व दिलासा देणाऱ्या पावसाळ्याची; प्रत्येकजण प्रत्येक वर्षी आतुरतेने वाट पहात असतो. पावसाळा हा आनंद प्रदान करणारा वातावरणीय बदल असला; तरी पावसाळयात सर्वात जास्त संसर्गजन्य आजार पसरतात. पावसाळयातील विषाणूंच्या प्रसारामुळे; अतिसार, उलटी, अन्नविषबाधा असे आजार होण्याची भिती जास्त असते. त्यामुळे आपण पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा संसर्ग टाळण्याकरिता; काही सोप्या सूचनांचे पालन करु शकतो. बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे वॉटर प्युरिफायर्स मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत; म्हणून आपण वेळीच जागे होऊन आपले पिण्याचे पाणी शुद्ध ,सुरक्षित व आरोग्यदायी करण्यासाठी ;योग्य प्युरिफायर्सची निवड करणे आवश्यक आहे. आपली निवड सोपी व्हावी या उद्देशाने योग्य वॉटर प्युरिफायरची निवड कशी करावी?  हा लेख सादर करत आहोत. (How to Choose the Right Water Purifier?)

उकळलेले पाणी संपूर्ण शुध्द असते का?

उकळलेले पाणी काही प्रमाणात शुध्द असते परंतू संपूर्ण शुध्द नसते. पाण्याच्या पूर्ण शुध्दतेसाठी केवळ पाणी उकळवणे पुरेसे नाही, कारण पाणी उकळवण्याची क्रिया जलनिर्मित विषाणूंवर मात करण्यासाठी प्रभावी आहे. परंतू उकळलेल्या पाण्यामधील क्लोरिन कन्टेन्टवर या क्रियेचा कोणताच परिणाम होत नाही. त्याचबरोबर पाणी उकळण्याच्या क्रियेमधून  पाण्यात असलेला कचरा, कार्बन व अकार्बनी पदार्थाना दूर करीत नाही. पाण्यामध्ये आढळणारे सुक्ष्म जीव, जे वेगवेगळया आजारांना कारणीभून ठरतात: त्यांना निष्क्रिय करण्यासाठी पाणी कमितकमी 20 मिनटे उकळणे गरजेचे असते. दुसरी बाब म्हणजे, बहुतेक लोकांना माहीत नसते, की उकळवलेले पाणी जेव्हा उघडय़ा जागेमध्ये थंड करण्याकरिता ठेवले जाते, तेव्हा ते पाणी काही विषाणूंसह पुन्हा प्रदूषित होण्याचा धोका असतो. म्हणजे अगदी निकडीच्या प्रसंगी ही क्रिया वापरण्यास हरकत नाही, परंतू कायमस्वरुपी हा पर्याय योग्य नाही.

Is boiled water completely pure?
How to Choose the Right Water Purifier? marathibana.in

जलशुध्दीसाठी एकच तंत्रज्ञान वापरले जाते का? (How to Choose the Right Water Purifier?)

Is the same technology used for water purification?
How to Choose the Right Water Purifier? marathibana.in

सर्व प्रकारचे जलशुध्दीसाठी एकच तंत्रज्ञान वापरले जात नाही; विविध संशोधन व अभ्यासामधून असे दिसून आले आहे की; प्रत्येक भागामधील पाण्याची स्थिती भिन्न असते. पाण्यामध्ये आढळणा-या अशुध्दतेच्या प्रकारानुसार ;जलशुध्दी तंत्रज्ञान वारले जाते. परंतू एक गोष्ट लक्षात घ्या की, असे कोणतेच तंत्रज्ञान नाही; जे प्रत्येक भागातील पाणी पूर्णपणे शुद्ध करु शकते. लोकांचा समज आहे की, असे एक तंत्रज्ञान आहे; जे पाण्याच्या सर्व समस्यांचे निराकरण करु शकते. खरे तर, विभागानुसार व भौगोलिक परिस्थितीनुसार विविध प्रकारच्या पाणी स्थिती आहेत; आणि सर्वासाठी एकच असा उपाय नाही; ज्याचा पाणी शुद्ध करण्याकरिता वापर करु शकतो. त्यासाठी पाणी परीक्षण करुन, पाण्याचा दर्जा समजून घेऊन; त्यानुसार प्युरिफायरची निवड करणे महत्त्वाचे असते.

कोणत्या प्यूरिफायरची निवड करावी, आरओ की यूव्ही?

प्यूरिफायर निवडणे हे पाण्यात असलेल्या घटकांवर (टीडीएस) अवलंबून असते. सर्वात प्रथम एका साध्या टीडीएस मीटरने टीडीएस तपासा. जर आपला टीडीएस 500 पीपीएमपेक्षा जास्त असेल, तर आरओ वॉटर प्युरिफायर निवडणे फायद्याचे ठरेल. हा काही ठिकाणी आढळून येणारे  जड धातू व दूषित घटकांना दूर करतो, पण सर्व नाही. जर एखाद्याने आवश्यक नसलेल्या भागात आरओ जल शुद्धीकरणाचा वापर केला, तर पाण्यातील मिनरल्स कमी होतात, परिणामी पाण्याचा अपव्ययसुद्धा होतो. जेव्हा अनावश्यक भागात आरओ प्युरिफायरचा वापर केला जातो, तेव्हा पिण्याच्या पाण्याच्या एका ग्लाससाठी  सात ग्लासेस पाण्याचा अपव्यय होतो.

Which purifier to choose, RO or UV?
How to Choose the Right Water Purifier? marathibana.in

कमी टीडीएस असलेल्या पाण्यासाठी आरओ प्युरिफायर वापरणे; नेहमी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांपासून दूर होते. आणि टीडीएस पातळी कमी ठेवते. चव किंवा आरोग्याच्या दृष्टीकोनातून; हे सर्वोत्तम असू शकत नाही. हे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आहे की; आरओ प्युरिफायर्स फार कार्यक्षम नसतात आणि 80% पाण्याचा अपव्यय करतात, जे फक्त नाल्यात जाते; यामुळे आपल्या आधीपासूनच दुर्मीळ जलसंपत्तीवर ताण पडतो.

जर टीडीएस 500 पीपीएमपेक्षा कमी असेल तर; पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी सुसज्ज युव्ही वॉटर प्युरिफायर प्रभावी ठरेल. शहरांमध्ये यूव्ही किंवा यूएफ तंत्रज्ञानाचे वॉटर प्युरिफायर; घरांमध्ये येणाऱ्या पाण्यासाठी सर्वात अनुकूल असून ते उत्तम दर्जाचे पिण्याचे पाणी देतील. वाचा: How to Start Mineral Water Plant? | असा सुरु करा वॉटर प्लांट

Water Filter
How to Choose the Right Water Purifier?marathibana.in

समारोप│Conclusion (How to Choose the Right Water Purifier?)

कमी-मिनरल्स असलेले पाणी किंवा पाण्यामधील आवश्यक मिनरल्सचे कमी प्रमाण किंवा अभाव असलेले पाणी पिण्यासाठी योग्य नाही आणि म्हणून अशा स्वरुपाच्या पाण्याच्या नियमित सेवनामधून शरीरास आवश्यक पोषके  पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाहीत. बाजारपेठेमध्ये उच्च दर्जाच्या व अनुकूल वॉटर सोल्यूशन्सची रेंज उपलब्ध आहे, हे सोल्यूशन्स पेटंट मिनरल कार्टजि अ‍ॅण्ड बायोट्रॉन तंत्रज्ञानासह सुसज्जित आहेत, जे पाण्यामधील कणांना खेचून एकत्र करते आणि सुरक्षित व आरोग्यदायी पाणी देते. वाचा: What is water purification? | जलशुद्धीकरण म्हणजे काय?

प्रगत तंत्रज्ञान, जे आधुनिक काळातील दूषित घटकांशी लढते सामान्यत:  तलाव, नद्यांमधून पाण्याचा पुरवठा होतो आणि साठवून ठेवलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये टीडीएसचे कमी प्रमाण असते, तर बोअरवेल्समधून काढलेल्या पाण्यामध्ये किंवा टँकर्सद्वारे पुरवठा करण्यात आलेल्या पाण्यामध्ये टीडीएस आणि इतर घातक रसायनांचे उच्च प्रमाण असते. अशा वॉटर प्युरिफायरची निवड करा, ज्यामध्ये आधुनिक काळातील दूषित घटकांना दूर करण्याची क्षमता आहे.

शुद्धीकरण ही इतर कोणत्याही प्रक्रियेप्रमाणेच आहे; तुमच्या जवळच्या व आवडत्या व्यक्तींच्या आरोग्याच्या खात्रीकरिता योग्य जलशुद्धीकरण तंत्रज्ञानाची निवड करणे, हाच सर्वोत्तम उपाय आहे.

कोणतेही उत्पादन खरेदी करताना खालील गोष्टींचा विचार करावा

  1. शिफारसी (Recommendations)
  2. प्रश्नमंजुषा (Quizzes)
  3. डिजिटल सल्लागार आणि उत्पादन शोधक (Digital Advisors and Product Finders)
  4. ऑनलाइन पुनरावलोकने (Online Reviews)
  5. थेट गप्पा (Live Chat)
  6. सोशल मीडिया (Social Media)
  7. निर्णय अॅप्स (Decision Apps)

(टीप: कोणतेही वॉटर प्युरिफायर खरेदी करतांना वॉटर प्युरिफायर तज्ञाच्या मदतीने खरेदीचा सर्वोत्तम निर्णय घ्या.)

All you need to know about sextortion

All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय?

All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय? सेक्सटोर्शनचे बळी होण्यापासून सावध राहण्यासाठी; तुम्हाला सर्व माहिती असणे ...
Read More
woman with face mask holding an alcohol bottle

All Information About Pharmacy Courses | फार्मसी कोर्सबद्दल

All Information About Pharmacy Courses | फार्मसी कोर्सबद्दल सविस्तर माहिती; प्रवेश प्रक्रिया, कौशल्ये, पात्रता निकष, अभ्यासक्रम, नोकरीच्या संधी, प्रमुख रिक्रूटर्स ...
Read More
Most Beautiful Flowers in the World

Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले

Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले; फुलांचे सौंदर्य, रंग, प्रकार, उगम व महत्व जाणून घ्या ...
Read More
How to Check Income Tax Refund?

How to Check Income Tax Refund? | टॅक्स रिफंड कसा तपासायचा?

How to Check Income Tax Refund? | आयकर विभागाने AY 2021-22 साठी आयकर परतावा जारी केला. तुम्हाला आयटी रिफंड मिळाला ...
Read More
Know the meaning of moles on the face

Know the meaning of moles on the face | चेह-यावरील तीळाचे अर्थ

Know the meaning of moles on the face | चेह-यावरील तीळाचे अर्थ, तीळ कशामुळे होतो; मोल्सचे प्रकार व मोल्सविषयी विविध ...
Read More
Know About the Importance of Makar Sankranti

Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांती

Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांतीचे प्रादेशिक, सामाजिक व धार्मिक महत्व; प्रादेशिक भिन्नता व रीतिरिवाज या ...
Read More
How to Get Rid of Pimples?

How to Get Rid of Pimples? | मुरुमांपासून सुटका कशी करावी?

How to Get Rid of Pimples? | मुरुम किंवा पुरळ हा एक सामान्य त्वचा रोग आहे; यापासून सुटका करण्यासाठी, नैसर्गिक ...
Read More
photo of woman tutoring young boy

The Role of Parents in the Success of their Children |मुलांचे यश

The Role of Parents in the Success of their Children | मुलांच्या यशात पालकांची भूमिका; मुलांच्या करिअरसाठी पालकांनी काय केले ...
Read More
A career in the Fashion Designing

A career in the Fashion Designing | फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर

A career in the Fashion Designing | फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर, कोर्सेस, अभ्यासक्रम पुस्तके, महाविदयालये, वेतन व कंपन्या फॅशन डिझायनिंग हे ...
Read More
Success is Around Yourself

Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे

Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे; फक्त ते शोधण्याची नजर हवी आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या आयुष्यात अनेक लोकांना ...
Read More
Spread the love