दिनांक: १९/०४/२०२१ ठिकाण: मुंबई स्टेडियम: वानखेडे टॉस: राजस्थान रॉयल्स निर्णय: क्षेत्ररक्षण संघ: राजस्थान रॉयल्स v/s चेन्नई सुपर किंग्ज वेळ: सायं.७.३०
चेन्नईची राजस्थानवर 45 धावांनी मात, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप
आयपीएल धमाका: इंडियन प्रीमियर लीग २०२१ पर्व १४ मधील 12 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दोन्ही संघातील Playing 11
चेन्नई: महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोइन अली, रविंद्र जडेजा, सैम करन, ड्वेन ब्रावो, शार्दूल ठाकुर आणि दीपक चाहर.
राजस्थान: मनन वोहरा, संजू सॅमसन (कर्णधार), डेविड मिलर, जोस बटलर, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, चेतन सकारिया, जयदेव उनादकट, मुस्तफिजुर रहमान.
प्रथम फलंदाजी करत चेन्नईने राजस्थानसमोर 9 विकेटस गमावून 188 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात चेन्नईकडून सलामीवीर फॅफ डुप्लेसीने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. तर मोईन अली 26 आणि सुरेश रैनाने 27 धावांचं योगदान दिलं. राजस्थानकडून चेतन सकारियाने उत्तम गोलंदाजी करत 4 षटकात 36 धावा देत चेन्नईचे 3 फलंदाज बाद केले. ख्रिस मॉरिसने 2 बळी घेतले. मुस्तफिजूर रहमान आणि राहुल तेवतियाने प्रत्येकी एक बळी घेत चांगली साथ दिली.
चेन्नईने दिलेलं 189 धावांचं आव्हान राजस्थानच्या फलंदाजांना पेलवलं नाही. जॉस बटलरव्यतिरिक्त राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. राजस्थानकडून जॉस बटलरने 49 धावांची खेळी करत चांगला प्रतिकार केला. राजस्थानच्या फलंदाजांना 9 विकेट्सच्या बदल्यात केवळ 143 धावाच करता आल्या.
चेन्नईच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. चेन्नईकडून या सामन्यात मोईन अलीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर रवींद्र जाडेजा आणि सॅम करन या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी एक विकेट घेत चेन्नईला 45 धावांनी विजय मिळवून दिला. चेन्नई स्पर्धेतील दुसरा सामना जिंकत ४ गुणांसह गुणतालिकेत दुस-या स्थानी आहे.