Tree Plantation Maharashtra Government 2021-22 | वन महोत्सव कालावधीत, करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दरांबाबत शासन निर्णय; रोप मागणी पत्र-अर्ज व इतर सर्व संबंधित माहिती.
दि. 15 जून ते 30 सप्टेंबर, हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून; दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्षलागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्ट्टीने; शासनामार्फत सवलतीच्या दराने, रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. जनतेला वनीकरणाचे महत्व पटवून देता यावे; त्याचबरोबर वृक्ष लागवड व संगोपन; हा लोकांचा कार्यक्रम झाला पाहिजे. या दृष्ट्टीने वन महोत्सवाच्या कालावधीत सुधारीत केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा केला जातो. (Tree Plantation Maharashtra Government)
त्यानुसार संदर्भ क्र. (2) येथील दिनांक 15 जून 2020 च्या शासन निर्णयान्वये; सन 2020-21 साठी सदर योजना पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती. आता सन 2021-22 या आर्थिक वर्षात सदर योजना; चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. (Tree Plantation Maharashtra Government)

शासन निर्णय
1. सन 2020-21 या वर्षातील अनुभव तसेच जनतेचा प्रतिसाद लक्षात घेऊन; ही योजना सन 2021-22 या आर्थिक वर्षात दिनांक 15 जून 2021ते 30 सप्टेंबर 2022 या वन महोत्सवाच्या कालावधीत; पुढे चालू ठेवण्यास व ती प्रभावीपणे राबववण्यास; शासन मान्यता देण्यात येत आहे. (Tree Plantation Maharashtra Government)
वाचा: Lockdown and Environment│लॉकडाऊन काळातील पर्यावरण
2. राज्यात सन 2017पासून “50 कोटी वृक्ष लागवड” हा कायणक्रम हाती घेण्यात आला होता. सदर कायणक्रमांतर्गत सन 2019-20 या वर्षासाठी 33 कोटी वृक्ष लागवडीचे उविष्ट्ट निश्चित करण्यात आले होते. या वृक्षलागवडीचा कार्यक्रम अखंडपणे पुढेही चालू राहावा व या कार्यक्रमांतर्गत खाजगी मालकीचे पडीक क्षेत्र आणि शेत बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामूहीक पडीक क्षेत्र, व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा.
तसेच सर्व सामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना अल्पदरात रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी वनमहोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येईल. वन महोत्सवाच्या (Van Mahotsav) कालावधीत आणि सर्वसाधारण कालावधीत रोपांचा पुरवठा, सन 2021-22 या आर्थिक वर्षात पुढील तक्त्यात नमूद केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे. (Tree Plantation Maharashtra Government)
वाचा: 20 Plants Release Oxygen at Night: ही झाडे रात्री ऑक्सिजन देतात!

अ.क्र. | रोपांचे वर्गीकरण | वनमहोत्सव कालावधीतील रोप विक्रीचे दर प्रति रोप (रुपये) | सर्वसाधारण कालावधीतील रोप विक्रीचे दर प्रति रोप (रुपये) |
1 | 9 महिन्याचे रोप (लहान पिशवीतील रोप) (12.5 सेंमी x 25 सेंमी) | 10/- | 21/- |
2 | 18 महिन्याचे रोप (मोठया पिशवीतील रोप) (20 सेंमी x 30 सेंमी) | 40/- | 73/- |
3 | 18 महिन्याचे रोप (मोठया पिशवीतील रोप) (25 सेंमी x 40 सेंमी) | 50/- | 105/- |
3. राज्यात सन 2021 च्या पावसाळयात, 15 जून ते 30 सप्टेबर या कालावधीत; वृक्ष लागवड करणेसाठी सर्व शासकीय यंत्रणा व आस्थापना; तसेच निमशासकीय यंत्रणा व लोकांना, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेता यावा; यासाठी वरीलप्रमाणे सवलतीचे दरात रोपांचा पुरवठा करण्यात येत आहे.
वाचा: Don’t sleep under a tree at night, why? | रात्री झाडाखाली झोपू नये
4. ज्या शासकीय यंत्रणांना वृक्ष लागवड करावयाची आहे; अशा यंत्रणांना रोप निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसल्यास; अशा यंत्रणांना या वनमहोत्सव कालावधीत; रोपांचा मोफत पुरवठा केला जाईल. यासाठी त्यांनी लागणा-या रोपांची आगाऊ मागणी नजीकच्या उपवनसंरक्षक; किंवा विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, यांचेकडे सोबतच्या मागणी पत्राद्वारे करावी.
5. उपवनसंरक्षक/विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग; हे जिल्हयात उपलब्ध प्रादेशिक/ सामाजिक वनीकरण रोपवाटीकेमधून यंत्रणानिहाय / मागणीदार यांना रोप पुरवठ्याचे आदेश निर्गमित करतील; व इतर यंत्रणेशी योग्य समन्वय साधतील.
वाचा: 10 Trees release oxygen at night: ‘ही’ झाडं रात्री ऑक्सिजन देतात!
6. संदर्भ क्र. 1 मधील दि. 04/06/2016 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. 10 मध्ये नमूद केल्याप्रमाणे वनमहोत्सव काळात वन व सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा केला जातो. या योजनेचा फायदा सर्व संबंधित विभागांनी घ्यावा. जिथे अडचण असेल तिथे वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत रोपे देण्याचा प्रयत्न केला जाईल.
मात्र त्याबाबतची आवश्यक नोंद आणि लेखा, रोपे उपलब्ध करून घेणारा विभाग आणि रोपे उपलब्ध करुन देणारा विभाग अशा दोन्ही विभागामार्फत ठेवण्यात यावे. याबाबतची माहिती व अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य यांचेकडे पाठवावी.
7. वनमहोत्सवाच्या कालावधीत (15 जून ते 30 सप्टेंबर) वनमहोत्सवाचे प्रयोजन व महत्व याबाबत प्रभावीपणे सर्वदूर पोहोचणा-या माध्यमातून योग्य प्रसिद्धी देण्यात यावी. या बाबतचा खर्च “मागणी क्र.सी-7, मुख्य लेखाशिर्षक -2406 वनीकरण व वन्यजीवन-101-वन संरक्षण व विकास व पुननिर्मीत-(११) (३४) (२४०६ ८५५१) (योजनेंत्तर्गत) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व सन 2021-22 वर्षाकरिता मंजूर केलेल्या निधीतून मागविण्यात यावा”.
8. उपवनसंरक्षक (प्रादेशिक), विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण यांनी विक्रीतून एकूण जमा झालेला महसूल याबाबत चालू आर्थिक वर्षाचा तपशिल सोबतच्या विहीत नमून्यात प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांना सादर करावा.
9. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून; त्याचा सांकेतांक 202106041215476619 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षाकित करुन काढण्यात येत आहे.
रोप मागणी पत्र / अर्ज
प्रति,
उपवनसंरक्षक (प्रादेशिक) / विभागीय वन अधिकारी,
सामाजिक वनीकरण विभाग, ——
जिल्हा
विषय :- इतर शासकीय यंत्रणाद्वारे वृक्ष लागवडी करीता मोफत रोपांचा पुरवठा होणे बाबत.
महोदय,
मी ———- पदनाम —— जिल्हा यंत्रणाप्रमुख —— प्रमाणित करतो की, शासन निर्णयानुसार वृक्ष लागवडीसाठी; आमच्या —— यंत्रणेस —— एवढया ठिकाणी —— एवढे खडडे खोदून ठेवलेले आहेत. तरी वृक्ष लागवडीसाठी —— रोपांची गरज आहे.
१) सदर रोपे शासकीय दरात घेण्याकरीता आमच्या यांत्रणेजवळ रोप लागवडीकरीता अनुदान उपलब्ध नाही.
२) सदर रोपे खरेदी करीता आम्ही /इतर स्त्रोतातून प्रयत्न केला परंतू निधी उपलब्ध झालेला नाही.
३) आमच्याकडे कार्यालय खर्च, व इतर किरकोळ खर्चाकरिता सुद्धा; अनुदान उपलब्ध नाही. करीता आम्हाला लागणारे —— रोपे मोफत उपलब्ध करुन देण्यात यावे; ही विनंती. उपलब्ध रोपे स्वतंत्र नोंदवहीमध्ये नोंद घेतली जातील; व वरिष्ट्ठ कार्यालयास याबाबत कळविण्यात येईल.
दिनांक
स्थान
आपला विश्वासू,
सही, नाव. पदनाम व जिल्हा ही सर्व माहिती लिहा.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड बटणवर क्लिक करा
वृक्ष लागवडीचे महत्व
वृक्ष लागवड ही पृथ्वी हिरवी, सजीव आणि निरोगी बनवण्यासाठी; सर्वोत्तम उपक्रमांपैकी एक आहे. लागवड केलेली झाडे; जैवविविधतेला मदत करतात. पुढील पिढ्यांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित करतात; आणि विविध संसाधने प्रदान करतात. झाडांशिवाय, मानवी जीवनाचे; तसेच पृथ्वीवरील इतर प्रजातींचे; अस्तित्व अशक्य आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त झाडे; लावली पाहिजेत. वाचा: 20 Plants that Release Oxygen at Night | ही झाडे रात्री O2 देतात!
वृक्षारोपण हे ठिकठिकाणी झाडे लावण्याला सूचित करते; वृक्ष लागवडीचे पृथ्वीवर आणि आपल्या कल्याणासाठी; अनेक फायदे आहेत. आपण संपूर्णपणे ऑक्सिजनवर जगतो; आणि झाडे ऑक्सिजनचा मुख्य स्त्रोत आहेत. वृक्षारोपण हमी देते की; झाडांमुळे ऑक्सिजनचा पुरवठा कधीही संपत नाही. पक्षी झाडांमध्ये आपले घर बनवतात; त्यानंतर निसर्गाच्या सौंदर्यात भर घालतात. पक्षी बियाणे आणि परागकण जमिनीवर विखुरतात; परिणामी विविध वनस्पतींचा विकास होतो. तर, वृक्ष लागवड विशिष्ट प्रदेशातील जैवविविधता वाढवते.
10 Ways to Make Money from Home: घरी राहून ‘असे’ कमवा पैसे
झाडे पृथ्वीचे जीवन सहाय्यक नेटवर्क आहेत; त्यामुळे ते पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक आहेत. ऑक्सिजन देण्याव्यतिरिक्त, झाडे ध्वनी प्रदूषणाचे सामान्य संरक्षक म्हणून काम करतात. जंगले नैसर्गिकरित्या विकसित होतात; परंतु, वृक्षतोडीचे प्रमाण लक्षणीय असल्यामुळे आपला; ऑक्सिजन पुरवठा आणि विविध आवश्यकता पूर्ण करण्यासाठी; तुलनेने काही झाडे शिल्लक आहेत. वाचा: 10 Trees that release O2 at Night |’ही’ झाडं रात्री ऑक्सिजन देतात!
झाडे अनेक प्रजाती, सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांसाठी आश्रय; आणि पोषणाचे स्त्रोत आहेत. कोणत्याही ठिकाणी झाड लावले जाते; ते या प्रजातींना आणखी एक जीवनदान देते; झाडे अतिरिक्त पाऊस पाडण्यास मदत होते. आज, अधिकाधिक व्यक्तींना; वृक्ष लागवडीचे महत्व समजले आहे. वाचा: Importance of the World Environment Day | पर्यावरण दिन
अनेक व्यक्ती आपला छंद म्हणून वृक्षारोपण करत आहेत. लोक त्यांच्या परिसरात झाडे लावत आहेत; आणि इतरांना असे करण्याचे आव्हाण करत आहेत. शाळा परिसरात विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी; यांच्या सहकार्याने झाडे लावतात. वाचा: How Can Pensioners Submit Life Certificates? जीवन प्रमाणपत्र
Related Posts
- Smartest Talking Birds In The World | जगातील 10 बोलणारे पक्षी
- Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले
- Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र शासन
- The Most Inspirational Personalities | सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्व
Post Categories
शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या

Diploma: The best career option after 10th | 10वी नंतर डिप्लोमा
Read More

The Best Law Courses After 12th | 12वी नंतर कायदा अभ्यासक्रम
Read More

4 Important Actions About Aadhaar card | आधार अपडेट्स बाबत
Read More

Latest Water Purification Technologies | नवीन जल शुध्दी तंत्रज्ञान
Read More

Psychology: The best career option after 12th | मानसशास्त्र
Read More

How to Make a Career in Merchant Navy | करिअर इन मर्चंट नेव्ही
Read More

Bachelor of Arts in Hotel Management | हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीए
Read More

Marine Engineering: the best option for a career | सागरी अभि.
Read More

How to become a corporate lawyer | कॉर्पोरेट वकील कसे व्हावे
Read More

Diploma in Information Technology | माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा
Read More