Everything About Chand Bibi | अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या ऐतिहासिक चांदबिबी महाल परिसरात बिबटयाचे दर्शन
अहमदनगर शहरापासून जवळ असलेल्या चांदबीबी महालावर; अनेक पर्यटक व नागरिक दररोज तसेच सुटीच्या दिवशी फिरण्यासाठी येतात. परिसरातील अनेक लोक सकाळी व्यायामासाठी या ठिकाणी येतात; महाल परिसरात दाट झाडी असल्यामुळे; अनेक प्रकारचे पक्षी व वन्य प्राणी देखील आढळतात. महालाच्या पायथ्याशी विरभद्र मंदीर असून; त्या परिसरात अनेक लोक वस्ती करुन राहात आहेत. नगर पाथर्डी रोडवर मंदीरापासून जवळच हॉटेल असल्यामुळे; अनेक लोक त्या ठिकाणी थांबलेले असतात. (Everything About Chand Bibi:)
अशा गजबजलेल्या ठिकाणी रविवार दिनांक 25/07/2021 रोजी सायंकाळी 8 वाजता; परिसरातील काही मुलांना अचानक रस्त्याच्या कडेला बिबटया दिसला. त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली; तेंव्हा तो न घाबरता रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडुपामध्ये शिरला. रात्रीची वेळ असल्यामुळे अंधारामध्ये; त्यांना तो पुढे कुठे गेला हे दिसले नाही; परंतू त्यांनी ते दृश्य मात्र कॅमेरात टिपले. बिबटयाच्या हालचालीवरुन; त्याचे वास्तव्य या परिसरामध्ये ब-याच दिवसापासून असावे असे वाटते. त्यांनी तातडीने याची कल्पना परिसरातील लोकांना दिली; आणि सावध राहण्यास सांगितले. बिबटयाच्या अचानक दिसण्यामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
महाल परिसरात अनेक वस्त्या असून; त्या ठिकाणी लहान मुले, वृद्ध, स्त्रिया व लोकांकडे शेळया, गायी-म्हशी आहेत. त्यामुळे लोक भितीच्या सावटाखाली आहेत; तसेच रात्रीच्या वेळी त्या रस्त्याने प्रवास करणारे अनेक प्रवासी असतात. त्यांच्यामध्येही भिती निर्माण झाली आहे; तेंव्हा वनविभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन, पिंजरा लावून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडावे अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
Table of Contents
चांदबिबी महाला विषयी (Everything About Chand Bibi)
अहमदनगर शहराला सुमारे 500 वर्षाचा इतिहास आहे; पेशव्यांनी 1759 साली अहमदनगरवर ताबा मिळवलेला होता. अहमदनगर 1817 साली ब्रिटिशांनी जिंकले होते; अहमदनगर शहराच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये चांदबिबी महाल हे एक वैशिष्टये आहे.
अहमदनगर शहराच्या पूर्वेला, सुमारे 10 किलोमीटर अंतरावर; नगर पाथर्डी रस्त्यालगत शाह डोंगरावर चांदबिबि महाल; या नावाने ओळखली जाणारी ही अष्टकोनी वास्तू आहे. या वास्तूला चांदबिबी महाल; या नावाने ओळखले जाते. असे असले तरी, ती दुस-या सलाबतखानाची कबर आहे; जो चौथा निजाम मूर्तजा याचा वजीर होता. मूर्तजाने त्याच्या चंगीजखान या वजिराला संसयावरुन मृत्युदंड दिला; आणि त्याच्या जागी 1579 मध्ये सलाबतखानाची नेमणूक केली. या दुस-या सलाबतखानाने अहमदनगर शहरात खापरी नळातून पाणी आणले. (Everything About Chand Bibi:)
चांदबिबी विषयी माहिती (Everything About Chand Bibi)
चांदबिबी ही विजापूरचा बादशाहा; अल्ली आदिलशहा ह्याची पत्नी व अहमदनगरचा बादशहा हुसेन निजामशहा ह्याची कन्या होती. हिचा जन्म अदमासे इ. स. 1547 मध्ये झाला. चांदबिबीचा अहमदनगर व विजापूर ह्या दोन्ही राजघराण्यांशी संबंध असल्यामुळे; तिला ह्या दोन्ही ठिकाणी आपले राजकारणचातुर्य; व पराक्रमकौशल्य दाखविण्याचे अनेक प्रसंग आले, व दोन्ही ठिकाणच्या इतिहासात तिने आपले नांव गाजविले. अल्ली आदिलशहा गादीवर बसल्यानंतर; विजापूर व अहमदनगर, ह्या दोन्ही राज्यांमध्ये तह झाला; व दोन्ही बादशहांचे सख्य झाले. त्यावेळी हुसेनने ही लावण्यवती शहाजादी, अल्ली यास अर्पण करुन, सोलापुरचा किल्ला त्यास अंदण दिला (1564).
चांदबिबी व अल्ली यांच्या विवाहानंतर विजापूरच्या पातशाहीचा चांगला उत्कर्ष झाला; अल्ली यास राज्यकारभाराच्या कामी चांदबिबीचे फार सहाय्य झाले, ती मूळची कुशाग्र, सद्गुणी व राज्यव्यवहारदक्ष होती. (Everything About Chand Bibi)
युद्धकलेमध्ये निष्णात (Everything About Chand Bibi)
ती युद्धकलेमध्ये चांगली निष्णात होती, ती पतीच्या प्रत्येक स्वारीमध्ये घोड्यावर बसून आपल्या पतीबरोबर जात असे. तिला फारसी, अरबी इत्यादी भाषांचे ज्ञान होते, तर कानडी, मराठी इत्यादि भाषाही समजत असत. त्याचबरोबर या राणीला चित्रकला व संगीतशास्त्र ह्यांचीहि चांगली माहिती होती.
अल्ली हा इ. स. 1580 मध्यें निपुत्रिक मरण पावला; मृत्यूपूर्वीं त्याने आपल्या बंधूचा मुलगा इब्राहिम ह्यास गादीवर बसवून ;आपल्या पत्नीने सर्व राज्यकारभार चालवावा अशी योजना केली होती. त्याप्रमाणे चांदबिबीने इब्राहिमला विजापूरच्या गादीवर बसवले; व त्याच्या वतीने राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. इब्राहीमचे वय त्यावेळी अवघे नऊ वर्षांचे होते; त्यामुळे चांदबिबीने सर्व राज्यकारभार दिवाण कामीलखान ह्याच्या सहाय्याने उत्कृष्ट रीतीने चालविला. (Everything About Chand Bibi)
न्यायदानामुळे प्रजेत लोकप्रिय (Everything About Chand Bibi)
दक्षिणेतील सर्व राज्यांमध्ये विजापूरचे राज्य विस्तीर्ण व मोठे होते; चांदबिबीने नव-याच्या पश्चात् विजापुरच्या बादशाहीचा लौकिक व दरारा; तसाच कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने राजपुत्राच्या शिक्षणाकडे चांगले लक्ष पुरविले; व सर्व राजदरबारी कामे मोठ्या तत्परने चालविली; ती न्यायाच्या कामात फार दक्ष असे. चांदबिबी बुधवार व शुक्रवार व्यतिरिक्त प्रत्येक दिवशी; दरबार भरवून व राजपुत्रास तख्तावर बसवून न्यायनिवाडे स्वत: करीत असे; त्यामुळे ती प्रजेस फार प्रिय झाली होती.
पुढे दिवाण कामीलखान हा राणीस जुमानीनास झाला; व त्याने तिचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न चालविला. तेव्हा तिने त्यास कामावरुन दूर केले; किशवर नामक दुसर्या एका जुन्या वजिरास दिवाणगिरी दिली. परंतु तोहि लवकरच उन्मत्त होऊन राणी व तिचे अनुयायी; ह्यांच्या विरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न करु लागला. त्यामुळे त्यास चांदबिबी व तिच्या सरदारांनी पदावरुन काढून टाकले. परंतु ती सिद्धीस जाण्यापूर्वींच; कोणी विश्वासघात करुन ती किशवर यास कळविले. त्याने एकदम इब्राहिमच्या नांवाने द्वाही फिरवून; चांदबिबी हिला कैद केले, व तिची फार अप्रतिष्ठा करुन, सातारच्या किल्ल्यावर तिला बंदिवासांत टाकले. (1582).
हबशी व दक्षिणींचा वाद (Everything About Chand Bibi)
चांदबिबी विजापूरातून गेल्यानंतर सर्वत्र झोटिंग पादशाही माजली; किशवर ह्याची सत्ता कोणी जुमानीनासे झाले, शेवटी अमीर उमराव व लष्करी लोक एकत्र होऊन; दिवाण किशवरखान ह्यास विजापुराहून पिटाळून लावले. पुन्हा चांदबिबीस सातार्याहून परत आणले; व एखलासखान नामक एका हबशीला दिवाण केले. परंतु त्याचा परिणाम असा झाला की; ‘हबशी’ व ‘दक्षिणी’ असे दोन पक्ष राज्यामध्ये झाले व ते परस्परांशी मत्सरबुद्धीने वागू लागले, त्याचा परिणाम बादशाहीस भोगावा लागला. (Everything About Chand Bibi)
चांदबिबीचे शैर्य (Everything About Chand Bibi)
गोवळकोंडा, बेइर व व-हाड येथील बादशहांनी आदिलशाही कमजोर झाली; असे पाहून तिकडे स्वार्या करण्यास सुरूवात केली. अशा एका प्रसंगी खुद्द विजापूर शहरास शत्रूंनी वेढा घातला; व राजधानी काबीज करण्याचा प्रयत्न केला. या कठीण प्रसंगी चांदबिबीने हिंमतीने किल्ल्याचे रक्षण केले; व सैनिकांस प्रोत्साहन देऊन शत्रूंची चढाई होऊ दिली नाही. तिचे शौर्य व हिंमत सर्व लोकांस कळून चुकल्यामुळे; सतत एक वर्ष कालावधी पर्यंत वेढा पडला असतांहि; सर्व सैन्याने मोठ्या उत्साहाने व निकराने शत्रूसी टक्कर दिली, व अखेर त्यासच वेढा उठवून परत जाण्यास भाग पाडले. (1584) वाचा: Quit Bad Habits│आता तरी बदला, आणि ‘वाईट सवयी’ सोडा…
पुढे सन 1585 मध्ये पुन्हा, अहमदनगर व विजापूर येथील बादशहांचा संबंध जडण्याचा योग आला. इब्राहिम आदिलशाहाची बहिण खुदिजा बेगम; व चांदबिबीचा भाऊ मूर्तिजा निजामशाहा यांचा विवाह झाला. त्यावेळी चांदबिबी अहमदनगरास आली; अर्थात् हे लग्न उरकून घेऊन राहिलेले आयुष्य शांत चित्ताने ईश्वर भक्तीत घालवावे; असा तिचा संकेत होता. परंतु त्यावेळी नगर येथील दरबारामध्ये; विजापूरपेक्षाहि अधिक कलह माजलेला होता. त्यामुळे मूर्तिजा व त्याचा मुलगा मिरान मध्ये कलह सुरु झाला; आणि या पितापुत्रांच्या झटापटींत मूर्तिजा ह्याचा वध झाला.
ह्या प्रसंगी इतिहासकार फेरिस्ता हा राजवाड्यामध्ये हजर होता. त्याने स्वत: पाहिलेला हा वृत्तांत आपल्या ग्रंथांत लिहिला आहे. ह्यावेळी चांदबिबी नगरच्या किल्ल्यांत हजर होती. मिरान ह्याने आपल्या बापाचा वध करुन गादी बळकाविली, परंतु लवकरच त्याचाहि शिरच्छेद होऊन अहमदनगर येथे झोटिंगबादशाही सुरु झाली. त्यानंतर मूर्तिजाच्या पुतण्याला गादीवर बसवून जुमालखान मुख्य दिवाण झाला. परंतु ह्या बादशहाच्या विरुद्ध विजापूर व वर्हाड येथील शहांनी प्रतिकार करुन जुमालखानाचा पराभव केला.
विजापूरास परत
चांदबिबी ही ह्या परिस्थितीस कंटाळून; पुन्हा विजापूरास परत गेली. तेथे तिचा प्रजेकडून चांगला सत्कार झाला; व बादशहानेहि तिची मानमान्यता कायम ठेवली. चांदबिबी विजापुरास गेल्यानंतर; अहमदनगर येथे राज्यक्रांति होऊन रक्तपात व मारामार्या चालू झाल्या. बुर्हाण निजामशहा मृत्यु पावल्यानंतर; दरबारातील निरनिराळ्या पक्षांनी बहादुरशहा, अहमदशहा वगैरे अज्त्र बालके गादीवर बसवून; जो तो आपल्या हाती सत्ता घेण्याचा प्रयत्न करु लागला. ह्यावेळी मिया मंजू नामक एक वजनदार मुत्सद्दी पुढे आला; व त्याने अहमदशहाची बाजू उचलली व शहाजादा मुराद, जो गुजराथप्रांतांमध्ये तीस हजार सैन्यानिशी होता; त्यास आपल्या मदतीस बोलाविले. दिल्लीच्या सैन्यास दक्षिणेत प्रवेश करण्याची उत्कट इच्छा होतीच. (Everything About Chand Bibi) वाचा: Oximeter शिवाय तपासा रक्तातील ऑक्सिजन पातळी आणि पल्सरेट
मंजू ह्यांस प्रथमदर्शनी आपल्या कृतीचे भावी फळ लक्षांत आले नाही. परंतु जेंव्हा मोगली फौजा नगरावर चालून आल्या त्या वेळी त्याचे डोळे उघडले व त्याने नगरच्या इतर अमीरउमरावांना सल्ला विचारला. सर्वांनी त्याच्या कृत्याचा निषेध करुन त्यास चांदबिबीस नगरास आणण्यास सांगितले व त्याप्रमाणे त्याने बोलावणे केले. तेव्हा तिने निजमशाहीची संकटावस्था पाहून उदार अंत:करणाने साह्य करण्याचे मान्य केले व ती नगरास आली. तिचे वय ह्या वेळी अदमासे 50 वर्षांचे होते. तथापि तिचा अभिमान, तेजस्विता, शौर्य आणि धैर्य यत्किंचितही कमी झाले नव्हते. वाचा: 20 Plants that Release Oxygen at Night | ही झाडे रात्री O2 देतात!
तिने नगरास येऊन सर्व राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली आणि प्रथम सर्व सैनिकांस प्रोत्साहन देऊन किल्ल्याची तटबंदीचा पक्का बंदोबस्त केला; आणि मिया मंजू ह्यास गोवळकोंडे व विजापूर येथे पाठवून; तिकडून कुमकेसाठी अधिक सैन्य बोलाविले. परंतु तिकडून कुमक येऊन पोहोंचण्यापूर्वींच; नगरास दिल्लीच्या फौजा येऊन दाखल झाल्या व त्यांनी शहराभोंवती वेढा घातला (1595); तेव्हा चांदबिबीने स्वत: मोठे शौर्य दाखवून किल्ल्याचे रक्षण केले. वाचा: 10 Trees that release O2 at Night |’ही’ झाडं रात्री ऑक्सिजन देतात!
चांदबिबीला ‘चांद-सुलताना किताब बहाल
मुराद हा राणीचे अलौकिक शौर्य व विलक्षण धैर्य अवलोकन करून आश्चर्याने थक्क झाला; व त्याने तिचे अभिनंदन करण्यासाठी आपले प्रतिष्ठित सरदार तिजकडे पाठवून; तिच्या मर्दुमकीबद्दल तिला ‘चांद-सुलताना’ असा किताब समर्पण केला (1596); यानंतर मंजु याने पुन्हा अहमद शहाचा पक्ष स्वीकारला. चांदबिबीने मात्र बहादुरशहा हाच खरा वारसदार असल्याचे ठरवून; त्याची बाजू लावून धरली. हा तंटा लवकर मिटनार नाही; हे लक्षात आल्यानंतर चांदबिबीने इब्राहिम यास; विजापुराहून सैन्यानिशी नगरास बोलावले. त्याने निजामशाहीच्या खर्या वारसाची चौकशी करुन; बहादूरशहाच्या नांवाने द्वाही फिरविली. यानंतर कांही दिवस राज्यामध्ये शांतता झाली; आणि चांदबिबीने राज्यसुधारणेंकडे लक्ष दिले. वाचा: What is the domestic violence prevention act?: कौटुंबिक हिंसाचार
अकबर बादशाहा ह्याचा अहमदनगरचे राज्य काबीज करुन घेण्याचा हेतु होता; सबब काहीहि कारण नसता त्याने नगरवर स्वारी केली. चांदबिबी हिने हे मोगलांचे प्रचंड सैन्य येण्यापूर्वीं; पुन्हा एकदा विजापुराहून सोहिलखान नामक एक अनुभवी मुत्सद्दी आणून; राज्यांतील अंतर्गत कलह नाहीसे करण्याचा प्रयत्न केला. अकबराचा पुत्र दानियल हा खानखान; राज अल्लीखान, राजा जगन्नाथ वगैरे मोठमोठ्या योध्यांसह प्रचंड सैन्यानिशी इ. स. 1597 च्या जानेवारीमध्ये नगरच्या राज्यावर चढाई करुन आला; निजामशाही सरदारांनी मोठ्या निकराने मोगली सैन्याशी टक्कर दिली; व त्यांचा पराभव केला. अकबर बादशहाचा इतिहासकार अबुलफजल ह्याने; ह्या घनघोर रणसंग्रामाचे विस्तृत वर्णन केले आहे. वाचा: वाचा: What is New BH Bharat Series? | नवीन ‘बीएच’ सिरीज काय आहे?
नगर मोगलांच्या ताब्यात
इ. स. 1599 मध्ये दानियल हा पुन्हा नगरावर चालून आला; त्यावेळी चांदबिबीने कोणाहि दरबारी इसमावर विश्वास न ठेवता; आपल्या स्वत:च्या विचाराने या आलेल्या संकटाचा परिहार करण्याचा संकल्प केला. मोगली सैन्य प्रचंड असल्यामुळे; त्याशी टक्कर देण्याचे सामर्थ्य निजामशाही सैन्यांत बिलकुल राहिले नव्हते. तेव्हा चांदबिबी हिने युक्तीने तह करुन; बालराजासह जुन्नरास जाण्याचा विचार मनात आणला. परंतु निजामशाही सरदारांमध्ये दुफळी होऊन त्यांनी चांदबिबीवर हल्ला केला; व मोगल सैन्याशी लढाई चालू असतानाच हमीदखान नामक एका पठाण सरदाराने तिचा राजवाड्यात खून केला (सन 1599); अर्थात चांदबिबीच्या मागे मोगलास नगर जिंकून घेण्यास फारसा वेळ लागला नाही. (Everything About Chand Bibi)
Related Posts
- Choose the Right and Buy Perfect-Laptop Guide | लॅपटॉप गाईड
- Majhi Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र शासन
- Amazing Places in the World | जगातील आश्चर्यकारक ठिकाणे
- Most Dangerous Places in the World | जगातील सर्वात धोकादायक ठिकाणे
Post Categories
शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Diploma: The best career option after 10th | 10वी नंतर डिप्लोमा
Read More

The Best Law Courses After 12th | 12वी नंतर कायदा अभ्यासक्रम
Read More

4 Important Actions About Aadhaar card | आधार अपडेट्स बाबत
Read More

Latest Water Purification Technologies | नवीन जल शुध्दी तंत्रज्ञान
Read More

Psychology: The best career option after 12th | मानसशास्त्र
Read More

How to Make a Career in Merchant Navy | करिअर इन मर्चंट नेव्ही
Read More

Bachelor of Arts in Hotel Management | हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीए
Read More

Marine Engineering: the best option for a career | सागरी अभि.
Read More

How to become a corporate lawyer | कॉर्पोरेट वकील कसे व्हावे
Read More

Diploma in Information Technology | माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा
Read More