What is New BH Bharat Series? | नवीन ‘बीएच’ भारत सिरीज काय आहे? BH सिरीजचे नवे नियम, रजिस्ट्रेशन, वाहन कर आकारणी व फायदे.
Table of Contents
नवीन ‘बीएच’ सिरीज काय आहे?
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच); प्रवासी वाहनांसाठी एक नवीन नोंदणी चिन्ह सादर केले आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहने; जेव्हा वाहनाचा मालकी हक्क एकाकडून दुस-याकडे स्थलांतरित होतो; तेव्हा स्थलांतरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी; नवीन नोंदणी चिन्हाला भारत सिरीज (BH Series) असे म्हटले जाते. एकदा एखाद्या व्यक्तीला हे नवीन नोंदणी चिन्ह मिळाले की; त्यांना त्यानंतर नवीन राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात जाताना; त्यांची कार किंवा दुचाकी वाहनाची पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही. What is New BH Bharat Series?
ही वाहन नोंदणी योजना स्थलांतरानंतर; भारतातील राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये वैयक्तिक वाहनांची विनामूल्य वाहतूक सुलभ करेल. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेहमी जावं लागतं; अशा लोकांसाठी सरकारने विशेष नोंदणी व्यवस्था करण्यासाठी ही योजना तयार केली आहे. जेणेकरुन त्यांना प्रत्येक राज्यात; नोंदणी करुन घेण्याच्या त्रासापासून सुटका मिळेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने; नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी केली आहे. What is New BH Bharat Series?
या योजने अंतर्गत आता वाहनधारक; बीएच सिरीजमध्ये आपली नवीन वाहने नोंदवू शकतील. या सिरीजचा सर्वात मोठा फायदा म्हणजे; ज्यांना नोकरीच्या निमित्ताने, पुन्हा- पुन्हा बदली प्रक्रियेतून जावे लागते; त्यांना सर्वात अधिक फायदा होईल. या संदर्भात इतर कोणत्याही राज्यात जाताना; बीएच सिरीज क्रमांकाच्या वाहन धारकांना; नवीन नोंदणी क्रमांक घेण्याची गरज भासणार नाही. या सुविधे अंतर्गत, बीएच सिरीज असलेली वाहने; जुन्या नोंदणी क्रमांकासह; आपले वाहन इतर राज्यात चालवू शकतील.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने; भारत सिरीज नावाने नवीन वाहनांसाठी; नोंदणी चिन्ह सादर केले. वास्तविक काही वाहनांना नोंदणीच्या वेळी भारत सीरिज म्हणजेच बीएच सीरिजचा टॅग दिला जातो; आणि त्यांची नोंदणी इतर वाहनांपेक्षा वेगळी असते. ज्या वाहनांना BH Series चा मार्क मिळेल; त्या वाहनांना एकवेळ नोंदणी आवश्यक असेल. म्हणजेच, जर वाहन मालक दुसऱ्या राज्यात शिफ्ट झाला; तर त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज भासणार नाही, कारण त्यांना ती प्रक्रिया एकदाच करावी लागेल.
बीएच सिरीज चिन्हा शिवाय (अगाेदर किंवा पूर्वी) प्रक्रिया कशी होती?

- जेव्हा एखादा वाहन मालक नवीन राज्यात जातो; तेव्हा बीएच सीरिजच्या चिन्हाशिवाय, त्यांना आधी दुसऱ्या राज्यात नवीन नोंदणी चिन्ह नियुक्त करण्यासाठी; पालक राज्याकडून ना हरकत प्रमाणपत्र (NoC); मिळणे आवश्यक होते. तसेच त्याला एक वर्षाच्या आत; आपल्या वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक होते.
- नवीन नोंदणी चिन्ह मिळवण्यासाठी; वापरकर्त्याला नवीन राज्याला प्रो-रेटा आधारावर रस्ता कर भरावा लागतो.
- त्यानंतर वापरकर्त्याला मूळ राज्यात; रस्ता कराच्या परताव्यासाठी अर्ज करावा लागेतो. ही सर्व अवघड व किचकट प्रक्रिया आहे; आणि ती राज्या- राज्यात बदलते. What is New BH Bharat Series?
- परंतू आता BH Series मध्ये वाहन मालक; आपले वाहन नोंदणी करु शकतील. तसेच त्यांना दुसऱ्या राज्यात; पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही. वाचा: Mobile Phone and Children: पालकांनो! आपल्या मुलांकडे लक्ष द्या!
नवीन BH सिरीज कशी मदत करेल? (What is New BH Bharat Series?)
- हे नोंदणी चिन्ह असलेल्या वाहनाला; नवीन नोंदणी चिन्ह नियुक्त करण्याची आवश्यकता नसते. जेव्हा वाहनाचा मालक एका राज्यातून; दुसऱ्या राज्यात शिफ्ट होतो. पूर्वी, वाहन मालक, नवीन राज्यात गेल्यानंतर; 12 महिन्यांच्या आत वाहन नोंदणी क्रमांक बदलणे बंधनकारक होते.
- यासह वाहन मालकास त्याच्या मूळ राज्याकडून; ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच रस्ता कर परताव्या विषयी समस्या येणार नाही. वाचा: New 7 Wonders of the World: जगातील नवी सात आश्चर्ये
‘असा’ आकारला जाईल वाहन कर (What is New BH Bharat Series?)
मोटार वाहन कर दोन वर्षांसाठी आकारला जाईल; ही योजना नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात; स्थलांतर झाल्यावर भारतातील राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये; वैयक्तिक वाहनांची विनामूल्य वाहतूक सुलभ करेल.
चौदावे वर्ष पूर्ण झाल्यानंतर; मोटार वाहन कर दरवर्षी आकारला जाईल; जो त्या वाहनासाठी आधी आकारण्यात आलेल्या रकमेच्या अर्धा असेल.

नवीन बीएच सिरीजचे स्वरु खालील प्रमाणे असेल
- YY BH #### XX अशी संख्या दिसेल.
- YY- म्हणजे पहिल्या नोंदणीचे वर्ष
- BH- हा भारत मालिकेसाठी कोड असेल
- ####- 0000 ते 9999 – अशा प्रकारे चार अंकी संख्या असेल.
- XX – वर्णमाला (AA ते ZZ) दोन अक्षरे असतील.
- वाचा:Know All About Driving Licence 2022 | वाहन चालविण्याचा परवाना
प्रवासी वाहन नोंदणी करण्याची कृती
ना हरकत प्रमाणपत्र : दुसऱ्या राज्यात नवीन नोंदणी चिन्ह मिळवण्यासाठी वाहनधारकांना पहिल्या पालक राज्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक असेल.
नवीन नोंदणी चिन्ह : नवीन राज्यात प्रो-रेटा तत्त्वावर रस्ता कर भरल्यानंतर नवीन नोंदणी चिन्ह मिळेल.
कर परतातवा : मूळ राज्यात रस्ता कराच्या परताव्यासाठी अर्ज दाखल करावा लागेल. मूळ राज्यातून परतावा मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. वाचा: Don’t want a girl but a daughter-in-law | मुलगी नको, पण सून हवी
बीएच सिरीज नोंदणी शुल्काचे स्वरुप
BH Series मधील वाहनांसाठी खालीलप्रमाणे मोटार वाहन कर भरावा लागेल.
- 10 लाखा रुपयापर्यंतच्या वाहनांना 8 टक्के मोटार वाहन कर भरावा लागेल.
- 10 ते 20 लाखा पर्यंतच्या वाहनावर 10 टक्के मोटार वाहन कर भरावा लागेल.
- 20 लाख रुपयांपेक्षा अधिक किंमत असणा-या वाहनांसाठी; 12 टक्के मोटार वाहन कर भरावा लागेल.
- तसेच खरेदी केलेले वाहन जर डिझेल वाहन असेल तर; 2 टक्के अतिरिक्त कर भरावा लागेल.
- याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांसाठी 2 टक्के कर भरावा लागेल.
- BH Series अंतर्गत मोटार वाहन कर 2, 4, 6 किंवा 8 वर्षासाठी आकारला जाईल.
बीएच सिरीज अंतर्गत नोंदणी शुल्क नियम

BH सिरीजसाठी शासनाने काही नियम तयार केले आहेत; नोंदणीशुल्क नियमात असे म्हटले आहे की; वाहन मालक ज्या राज्यात राहतो; त्याच राज्यात त्याला नोंदणी शुल्क भरावे लागेल. उदाहरनार्थ, वाहन मालकाचे घर महाराष्ट्रात असेल; आणि त्याचे हस्तांतरण कर्नाटकामध्ये होतेय, तर नोंदणी शुल्क कर्नाटकामध्ये नाही; तर महाराष्ट्रातच भरावे लागेल. परंतू बीएच सिरीजचा नोंदणी क्रमांक; देशातील प्रत्येक राज्यात वैध असेल. वाचा: Most Beautiful Birds: जगातील सर्वात सुंदर पक्षी
बीएच सिरीजच्या नियमांनुसार; वाहन मालक दोन वर्षांसाठी नोंदणी शुल्क भरु शकतो आणि उर्वरित रक्कम पुढील वर्षांमध्ये; हप्त्यांमध्ये देखील भरु शकतो. हा हप्ता 2 च्या पटीत असेल; म्हणजेच वाहन मालक 4, 6, 8 किंवा 10 वर्षांसाठी हप्ता भरु शकतो. नवीन नोंदणी करताना वाहन मालकाला; पंधरा वर्षांसाठी नोंदणी शुल्क भरावे लागेल. या कालावधीत वाहनाचे हस्तांतरण; किंवा स्थलांतर झाल्यास; राज्य सरकार प्रो-रेटा बेसिसवर नोंदणी शुल्क परत करेल.
BH सिरीज क्रमांकासाठी कोण अर्ज करु शकतो?
‘बीएच’ भारत सिरीज अंतर्गत; ही वाहन नोंदणी सुविधा योजना; स्वेच्छिक आधारावर सुरु केली जात आहे. या योजनेचा लाभ प्रथम संरक्षण कर्मचारी; केंद्र सरकारचे कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी; केंद्र व राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम; यांच्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. तसेच ज्या खाजगी क्षेत्रातील कंपन्या; किंवा संस्थांना स्वेच्छिक आधारावर उपलब्ध असेल. ज्यांची कार्यालये चार किंवा अधिक राज्ये; किंवा केंद्रशासित प्रदेशात आहेत. यासह BF मार्क असलेल्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकाचे; स्वरुपदेखील इतर वाहनांपेक्षा वेगळे असेल. What is New BH Bharat Series?
Related Posts
- New Rules From 1 November 2021 | 1 नोव्हेंबर पासून होणारे बदल
- How Can Pensioners Submit Life Certificates? जीवन प्रमाणपत्र
- How to stop net banking scams? नेट बँकिंग घोटाळे कसे थांबवायचे?
- Uses and Benefits of Aadhaar Card | आधार कार्डचे उपयोग
Related Post Categories
आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Ganpati-2 Know all about Siddhivinayak Siddhatek | सिद्धिविनायक

Ganpati-1 Know all about Moreshwar Morgaon | मोरेश्वर, मोरगाव

What are daily good habits? | रोजच्या चांगल्या सवयी काय आहेत?

Share the lessons you have learned in life | आयुष्यात शिकलेले धडे

Know the effects of multitasking on health | मल्टीटास्किंगचे परिणाम

Value of additional courses to get a job | नोकरीसाठी अतिरिक्त कोर्स

How to Memorize Study? | अभ्यास लक्षात कसा ठेवावा?

Best Qualities of a Great Lawyer | चांगल्या वकिलाचे गुण

Sources of water pollution and its control | जल प्रदूषण
