New Rules From 1 November 2021 | 1 नोव्हेंबर पासून फॅमिली पेन्शन, बँक सेवा शुल्क; रेल्वे वेळापत्रक, एलपीजी सिलेंडर, व्हॉट्सॲप आणि जीवन प्रमाणपत्र नियमात होणारे बदल.
आपण आता, 2021 या वर्षाच्या अखेरच्या दिशेने वाटचाल करत आहोत; कारण ऑक्टोबर महिना, हा कॅलेंडरमधील 10 वा महिना असून; तो रविवार दिनांक 31 रोजी संपणार आहे. सोमवार हा नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस आहे; आणि या दिवशी अनेक कंपन्या तसेच सरकार; अनेक बदल आणि नवीन नियम लागू करणार आहेत. यापैकी काही नियमांचा संपूर्ण भारतातील; सामान्य लोकांच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. नवीन बदल महिन्याच्या सुरुवातीलाच लागू केले जाणार आहेत; त्यामुळे त्याचा नागरिकांवर विविध मार्गांनी परिणाम होईल. या संदर्भात, 1 नोव्हेबर पासून लागू होणा-या; मार्गदर्शक तत्त्वांबद्दल नागरीकांनी अपडेट राहणे महत्त्वाचे आहे.(New Rules From 1 November 2021)
१ नोव्हेंबरपासून बँकिंग नियमांमध्ये बदल होणार आहेत; बँक ऑफ बडोदा एक नियम सुरु करत आहे; ज्यानुसार ग्राहकाला पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी; सेवा शुल्क भरावे लागते. त्याचप्रमाणे, रेल्वेच्या बाबतीत; गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होत आहेत. एलपीजी सिलिंडरच्या किंमती; वाढण्याची शक्यता आहे. व्हॉट्सॲप काही आयफोन आणि अँड्रॉइड फोनवरील; आपली सेवा 1 नोव्हेंबरपासून बंद करणार आहे. फॅमिली पेन्शन नियमातही; बदल करण्यात आलेला आहे. हे काही बदल आहेत; जे सोमवारपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम ग्राहकांच्या बजेटवर होणार आहे; तेंव्हा 1 नोव्हेंबर 2021 पासून होणारे बदल नागरींकांनी जाणून घेणे गरजेचे आहे.
Table of Contents
नोव्हेंबर 2021 पासून लागू होणारे सर्व प्रमुख बदल
1) फॅमिली पेन्शन (New Rules From 1 November 2021)

संरक्षण मंत्रालयाने, फॅमिली पेन्शन नियमात बदल केला आहे; आता आश्रितांना 2.5 लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाने 29 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या आदेशात; 7 व्या केंद्रीय वेतन आयोग (CPC) नुसार; बालक किंवा मुलांना देय असलेल्या; कौटुंबिक निवृत्ती वेतनाच्या; कमाल मर्यादेत वाढ करण्याची घोषणा केली. मंत्रालयाने दिवाळीपूर्वी हा निर्णय घेतल्याने; कौटुंबिक निवृत्ती वेतन घेणारांसाठी दिवाळीचा सण आणखी गोड झाला आहे.
अधिकृत निवेदनात, मंत्रालयाने जाहीर केले की; सातव्या CPC नंतर सरकारमधील सर्वोच्च वेतन 2.5 लाख रुपये प्रति महिना करण्यात आले आहे. याचा अर्थ निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबांना; सर्व संभाव्य स्त्रोतांकडून; एकत्रित पेन्शन 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी.
त्यानुसार, “निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग (DoP&PW) ने दोन्ही पालकांच्या संदर्भात; मुलाला किंवा मुलांना देय असलेल्या दोन कौटुंबिक निवृत्ती वेतनाची कमाल मर्यादा; सुधारित केली आहे. वर्धित दराने 75,000 प्रति महिना (2.5 लाख सामान्य कुटुंब निवृत्ती वेतनाच्या 30 टक्के); 1 जानेवारी 2016 पासून लागू होईल,” असा पीटीआयने मंत्रालयाच्या निवेदनाचा हवाला दिला.
मंत्रालयाने असेही निदर्शनास आणून दिले की; हा आदेश 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षीपणे लागू करण्यात आला आहे. Live Hindustan च्या अहवालानुसार; ज्यांचे पालक दोघेही संरक्षण मंत्रालयात कर्मचारी आहेत; अशा मुलांना पेन्शन लाभ मिळू शकतात.(New Rules From 1 November 2021)
तथापि, लाभ प्राप्त करण्यासाठी; पालकांनी त्यांच्या शेवटच्या नोकरीच्या भूमिकेत; 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या (CPC) कक्षेत काम केले पाहिजे. संरक्षण मंत्रालयापूर्वी केंद्र सरकारनेही; केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक निवृत्ती वेतनाशी संबंधित; नियमांमध्ये बदल केले होते.
ताज्या बदलानुसार, केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1972 अंतर्गत; केंद्र सरकारी कर्मचा-यांचे अवलंबित आता 1.25 लाख रुपयांपर्यंतचे; दोन कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र आहेत.
2) बँक सेवा शुल्क (New Rules From 1 November 2021)

तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर; ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरु शकते. केंद्रीकृत बँक, बँक ऑफ बडोदा, 1 नोव्हेंबरपासून एक नियम लागू करेल; ज्यामुळे त्यांना बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी; स्वतंत्र शुल्क आकारता येईल. खातेधारकांना कर्ज घेण्यासाठी; 150 रुपये सेवा शुल्क भरावे लागेल. याव्यतिरिक्त, बँकांमध्ये तीन वेळा ठेवी विनामूल्य असतील; परंतु जर एखाद्याला महिन्यात चौथ्यांदा पैसे जमा करायचे असतील तर; त्यांना 40 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. जन धन खातेधारकांसाठी; हा नियम असेल. तथापि, जर त्यांना विहित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढायचे असतील; तर, त्यांना 100 रुपये द्यावे लागतील. वाचा: How to stop net banking scams? नेट बँकिंग घोटाळे कसे थांबवायचे?
3) रेल्वे वेळापत्रक (New Rules From 1 November 2021)

1 नोव्हेंबर 2021 पासून भारतीय रेल्वे; देशभरातील अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. यापूर्वी, रेल्वेने 1 ऑक्टोबरपासून गाड्यांचे वेळापत्रक बदलण्याची योजना आखली होती; परंतु नंतर ही योजना 31 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. आणि शेवटी 1 नोव्हेंबर 2021 पासून; हा बदल अंमलात आणण्याचे मान्य केले.
त्यानुसार, भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात; बदल करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रेल्वेने राजस्थानच्या चार विभागांमध्ये धावणाऱ्या; 100 हून अधिक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला होता. अहवालानुसार; नोव्हेंबरमध्ये मोठ्या बदलांची अपेक्षा केली जाऊ शकते. यानंतर जवळपास 13,000 पॅसेंजर ट्रेन; आणि 7,000 माल वाहतूक ट्रेनच्या वेळा बदलतील. 1 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात धावणाऱ्या; सुमारे 30 राजधानी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकातही बदल होणार आहेत.
4) एलपीजी सिलिंडर (New Rules From 1 November 2021)

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला, एलपीजीचा व्यवसाय करणाऱ्या तेल विपणन कंपन्या; स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती बदलतात. 1 नोव्हेंबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत; पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून; त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे.(New Rules From 1 November 2021)
एलपीजी गॅस सिलिंडर वापरणारांसाठी हे धक्कादायक असू शकते; परंतु एलपीजीच्या किमती वाढण्याची शक्यता असल्यामुळे; सर्वसामान्यांच्या चिंतेत आणखी; दरवाढीची भर पडणार आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर; एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुधारणा करतात. शिवाय, LPG सिलिंडरच्या विक्रीत होणारे नुकसान पाहता; सरकार आणखी एक दरवाढ करु शकते, असे अहवालात सुचित करण्यात आले आहे.
5) गॅस सिलेंडर बुकिंग
1 नोव्हेंबर 2021 पासून; एलपीजी सिलिंडरच्या वितरणाची; संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे. वापरकर्त्याने गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर; एलपीजी ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर; एक ओटीपी पाठवला जाईल. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या विक्रीचे प्रमाणीकरण करण्यासाठी; ग्राहकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी; सिलिंडर वितरीत करण्यासाठी जेव्हा डिलिव्हरी अधिकारी येतात; तेव्हा त्यांना हा OTP शेअर करावा लागेल. नेहमीपेक्षा, सिलिंडर खरेदी करणे अधिक सुरक्षित व्हावे; यासाठी सिलिंडर वितरण प्रक्रियेत हा बदल करण्यात आला आहे. वाचा: How Can Pensioners Submit Life Certificates? जीवन प्रमाणपत्र
6) व्हॉट्सॲप सेवा (New Rules From 1 November 2021)

व्हॉट्सॲप काही आयफोन आणि अँड्रॉइड फोनवर; 1 नोव्हेंबर 2021 पासून आपली सेवा देणे बंद करेल. फेसबुकच्या मालकीच्या कंपनीने दिलेल्या सूचनेनुसार; मेसेजिंग प्लॅटफॉर्म यापुढे; Android 4.0.3 आइस्क्रीम सँडविच; iOS 9 आणि KaiOS 2.5.0 ला सपोर्ट करणार नाही. हा बदल सोमवार दिनांक 1 नोव्हेंबर 2021 पासून होत आहे; त्यामुळे तुम्ही अजूनही ऑपरेटिंग सिस्टीमच्या या आवृत्त्या वापरत असाल तर; तुम्हाला त्या आवृत्त्या अपग्रेड करणे आवश्यक आहे.
7) जीवन प्रमाणपत्र सुविधा

देशातील सर्वात मोठी बँक; स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI); 1 नोव्हेंबर 2021 पासून एक नवीन सुविधा सुरु करणार आहे. आता पेन्शनधारक त्यांचे जीवन प्रमाणपत्र; SBI मध्ये घरी बसून व्हिडिओ कॉलद्वारे; सादर करु शकतील. पेन्शनधारक जिवंत असल्याचा पुरावा म्हणजे; जीवन प्रमाणपत्र. पेन्शन सुरु ठेवण्यासाठी, पेन्शन येते त्या बँका; पोस्ट ऑफिस किंवा वित्तीय संस्थेत; दरवर्षी ते जमा करावे लागते. या सुविधेमुळे; पेन्शनधारकांना दिलासा मिळाला आहे.
Related Posts
- How To Spot Fake Shopping Sites | बनावट शॉपिंग साइट विषयी
- 101 Facts About Fashion and Clothing | फॅशनची मनोरंजक तथ्ये
- Don’t want a girl but a daughter-in-law | मुलगी नको, पण सून हवी
- New 7 Wonders of the World: जगातील नवी सात आश्चर्ये
- GAS CYLINDER: ‘गॅस सिलिंडर बाबत तुम्हाला ‘हे’ माहित आहे का?
Related Post Categories
आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Ganpati-2 Know all about Siddhivinayak Siddhatek | सिद्धिविनायक

Ganpati-1 Know all about Moreshwar Morgaon | मोरेश्वर, मोरगाव

What are daily good habits? | रोजच्या चांगल्या सवयी काय आहेत?

Share the lessons you have learned in life | आयुष्यात शिकलेले धडे

Know the effects of multitasking on health | मल्टीटास्किंगचे परिणाम

Value of additional courses to get a job | नोकरीसाठी अतिरिक्त कोर्स

How to Memorize Study? | अभ्यास लक्षात कसा ठेवावा?

Best Qualities of a Great Lawyer | चांगल्या वकिलाचे गुण

Sources of water pollution and its control | जल प्रदूषण
