Skip to content
Marathi Bana » Posts » Don’t want a girl but a daughter-in-law | मुलगी नको, पण सून हवी

Don’t want a girl but a daughter-in-law | मुलगी नको, पण सून हवी

Don’t want a girl but a daughter-in-law

Don’t want a girl but a daughter-in-law | मुलगी नको, पण सून हवी; आमची मुलं लग्नाळू, ‘वधू देता का वधू’

तुलसी विवाह संपन्न झाल्यांनतर, लग्नासाठी मुहुर्त असतात; परंतु, ग्रामीण भागातील जवळजवळ प्रत्येक गावात; लग्नासाठी वाजणा-या बँडचा आवाज क्वचीतच ऐकू येतो. गावातील मुला-मुलींची विवाह जुळवणारी मंडळी; सध्या निवांत आहेत. प्रत्येक गावात दरवर्षी किमान 10 ते 20 लग्न जमायची; पण गेल्या दोन-तीन वर्षापासून हा आकडा 4 ते 5 वर येऊन थांबला आहे. (Don’t want a girl but a daughter-in-law)

मुलगा काय करतो? (Don’t want a girl but a daughter-in-law)

विवाह जुळवताना मुलगा काय करतो? असा प्रश्न जेंव्हा मुलीकडच्यांकडून विचारला जातो; तेंव्हा उत्तर मिळते, ‘शेती’ किंवा ‘खूप शिकलाय, पण सध्या घरीच असतो’. हे उत्तर ऐकताच मुलीच्या पालकाचे एकच उत्तर असते; ते म्हणजे पाहू, बघू, सांगतो, किंवा निरोप देतो. त्यांनतर काहीही सांगितले जात नाही आणि निरोपही येत नाही. वाचा: What is New BH Bharat Series? | नवीन ‘बीएच’ सिरीजकायआहे?

Don’t want a girl but a daughter-in-law
Don’t want a girl but a daughter-in-law/Image by Veronika Melissa Pujari from Pixabay

शेती करणाऱ्या स्थळांना मुलीचे पालक नाकारतात. मुलगा कुठेही व कोणतिही नोकरी करत असला तरी चालेल; पण मुलीला नोकरीवालाच पती हवा, अशी त्यांची स्पष्ट अट असते.

मुलगा शहरातील हवा ही दुसरी अट; शेतकरी मुलाची शेती कितीही सधन असेल; शेतामध्ये स्वत:चा बंगला, गाडी असेल; तरीही नको, अशी भावना वाढत आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात शेतक-यांच्या मुलांना; लगनासाठी मुली मिळत नसल्याने; शेतकरी मुलाच्या बापाच्या चिंतेत भर पडली आहे.

त्याचाच परिणाम म्हणून; खेडयात मोठया प्रमाणात शेतकरी नवरदेवांची संख्या वाढत आहे; शेतकरी नवरदेवाच्या शेतीत ऊस, केळी, द्राक्ष, डाळींब, कांदा ही रोखीची पिके होत असली तरी; त्यांचे हात पिवळे करण्यासाठी; बापाची चांगलीच दमछाक होत आहे. वाचा: Most Beautiful Birds: ‘आम्ही’ आहोत जगातील सर्वात सुंदर पक्षी

वधू-वर सूचक मंडळे (Don’t want a girl but a daughter-in-law)

लग्न लवकर जमत नाही, मुलांचे लग्नाचे वय वाढत आहे; या चिंतेने पालक वधू-वर सूचक केंद्रात नावनोंदणी करुन; तिकडे चकरा मारततात. त्यामुळे सध्या वधू-वर सूचक मंडळांची; चांगलीच चलती असल्याचे चित्र आहे. त्यांनी आता लग्न जमवून देण्याचे दरही वाढवलेले आहेत. वाचा: The Most Inspirational Personalities | सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्व

काही कुटुंबामध्ये, पस्तीशी ओलांडलेली मुले लग्नाची असल्याने; पालक  विवाहाच्या चिंतेत आहेत. त्यामुळे अनेक तरुण आणि त्यांची कुटुंबे; या चिंतेमुळे मनातून खूप खचलेली आहेत. परंतु, हे वास्तव कोणी जाहीरपणे बोलून दाखवत नाही.  

बेकारी, बेरोजगारी आणि शेतीच्या बिकट परिस्थिती सोबतच; ‘मुलगी नको’ म्हणून झालेल्या स्त्री भ्रूणहत्या; याचाच हा स्पष्ट परिणाम दिसत आहे. मुलींची संख्या कमी असल्याने; मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत ही वस्तूस्थिती आहे.

लग्नासाठी काय पण! (Don’t want a girl but a daughter-in-law)

Don’t want a girl but a daughter-in-law
Don’t want a girl but a daughter-in-law/Image by Pixabay

शेतकरी व कामगार कुटुंबातील मुलांची लग्ने रखडण्याची; मोठी सामाजिक समस्या, सध्या संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राला भेडसावत आहे. प्रत्येक गावात लग्न रखडलेल्या 25 ते 40 वयोगटांतील; किमान 25 ते 30 तरुण सध्या आहेत.

यामुळे अनेक पालक आपल्या मुलांच्या लग्नासाठी; लग्न जमवणा-या एजंटमार्फत; मुली विकत आणण्याची तयारी दाखवत आहेत. तसे त्याचे प्रमाणही; ग्रामीण भागात बरेच वाढले आहे.

हा व्यवहार लग्न जमवणाऱ्या एजंटमार्फत केला जातो; अनेकजन त्यामध्ये फसवले गेले असले तरी, मुलांच्या विवाहासाठी पालक; याही गोष्टी स्विकारायला तयार आहेत. वाचा: What is Vaijayanti mala or Vana-mala? | वैजयंतीमाळ, वन-माळ

लग्न जमवण्याचा व्यवहार कसा होतो

लग्न जमवण्याचाव्यवहार होत असताना; सुरुवातीला स्थळ सुचवण्यासाठी  एजंट तीन ते पाच हजारांपासून सुरुवात करतात. मुलगी पाहण्यासाठी; गाडी भरुन मुलाकडील लोक नेले जातात. मुलगी पाहिल्यानंतर; पसंती-नापसंतीचा पर्याय मुलगा किंवा त्याच्या घरच्या मंडळीसमोर; जवळजवळ नसतोच. मुलाच्या घरची परिस्थिती कशी आहे; यानुसार आर्थिक व्यवहार ठरतो.

वाचा: Mobile Phone and Children: पालकांनो! आपल्या मुलांकडे लक्ष द्या!

काही वेळेला मुलीच्या सौंदर्यानुसार; व मुलाची गरज आणि आर्थिक स्थितीनुसार; नवऱ्या मुलीचे दर ठरवले जातात. राज्यातील अनेक ठिकानावरुन; तसेच परराज्यातील मुलींचा; लग्नासाठी एजंटांमार्फत सौदा केला जात आहे. पन्नास हजारापासून; दहा लाखांपर्यंत, मुलीच्या कुटुंबाला पैसे दिले जातात.

यामध्ये एजंट सांगतील तेवढे पैसे; गरजवंत मुलाच्या पालकांना मोजावे लागत आहेत. या व्यवहारातील किती रक्कम; मुलीच्या पित्यापर्यंत जाते; हे कोणालाही ठाऊक नाही. लग्नानंतर काही मुली पळून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

वाचा: Importance of Colours in Life | रंगांचे जीवनातील महत्व

लग्नासाठी मुली न मिळण्याची कारणे

वंशाचा दिवा हवा ही मानसिकता

अजुनही समाजामध्ये, अनेक लोकांची मानसिकता; वंशाला दिवा पाहिजे म्हणून; पुरुषांनी महिलांवर खूप अन्याय केला आहे. मुलगा हवा म्हणून गर्भपात करुन; जन्माला येण्यापूर्वीच; स्त्री जातीच्या अर्भकाचा गळा घोटण्याचे प्रकारही; अनेकांनी केले आहेत. वाचा: All Round Development of Kids | मुलांचा सर्वांगीण विकास

हुंड्यांसाठी मुलींचा बळी घेणारेही कमी नाहीत; या सर्वांचा परिणाम म्हणून; आज परिस्थिती बदलली आहे. नवऱ्या मुलीसाठी लाखो रुपये मोजण्याबरोबरच; जातीपातीला फाटा दिला जात आहे. जणू नियतीनेच हे चक्र फिरवले आहे असे वाटते.

Don’t want a girl but a daughter-in-law
Don’t want a girl but a daughter-in-law/Image by Pixabay

वंशाला दिवा हवा म्हणून, गर्भपातासारखे प्रकार समाजात; सर्रासपणे होतात. मात्र, याचे भयंकर परिणाम; आज समाजात पहायला मिळत आहेत. मुलांना लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे.

मुलींचे उच्च शिक्षणाचे प्रमाण जास्त

आजकाल गामीण व शहरी, दोन्ही विभागात; उच्च शिक्षण घेणा-यांमध्ये; मुलींचे प्रमाण जास्त आहे. मुली उच्च शिक्षित होऊ लागल्यामुळे; त्यांच्या लग्नासंबंधीच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. या स्पर्धेमध्ये जी मुले उच्च शिक्षित असतील; उच्च पदावर काम करत असतील; सरकारी गलेलठ्ठ पगाराची नोकरी असेल; अशा मुलांनाच लग्नासाठी प्राधान्य दिले जात आहे.

त्याचा परिणाम अल्पशिक्षित असलेली; शेतकरी कुटुंबातील मुले; कामगारांची मुले यांच्या विवाहावर होतांना दिसत आहे. काही मुले उच्च शिक्षित असूनही; नोकरी नसल्यामुळे शेती करत आहेत; त्यांच्याही लग्नाचा पालकांसमोर मोठा प्रश्न आहे.

वाचा:Effective ways to get rid of house lizards! पाली घालवण्याचे उपाय!

बहुतेक मुली किमान पदवीपर्यंत शिक्षण घेत असल्यामुळे; विवाहासाठी मुलांबद्दल त्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचा परिणाम, विवाहासाठी मुली मिळणे; दुरापास्त होण्यावर झाला आहे. याची झळ सर्वच जातीधर्माच्या युवकांना बसत आहे; परंतू, हा परिणाम विशेषतः शेतकरी व कामगार वर्ग यांच्या मुलांवर; अधिक होतांना दिसत आहे.

गेल्या काही वर्षात; मुली उच्च शिक्षित होत असल्यामुळे; त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आपल्या शैक्षणिक दर्जाचा; किंवा त्याहून अधिक उच्च दर्जाचा वर असला पाहिजे; अशी मुलींची अपेक्षा असते. ते स्वाभाविकही आहे; पण, कमी शिक्षण झालेल्या मुलींच्या अपेक्षाही; उच्च शिक्षित मुलींसारख्‍याच वाढल्या आहेत. प्रत्येकीला नोकरी करणारा वर हवा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

वाचा: Lockdown and Environment│लॉकडाऊन काळातील पर्यावरण

शेतकरी पालक व मुली यांचा बदललेला दृश्टीकोन

हल्ली स्वतंत्र जीवन जगण्याकडे मुलींचा ओढा असल्यामुळे; उच्चशिक्षित मुली स्वतंत्र राहण्यास प्राधान्य देतात. या सर्वात विशेष लक्षवेधी बाब म्हणजे; शेतकरी कुटुंबातील मुली सुद्धा; शेतकरी नवरा करण्यास नकार देतात. मुलीचे पालकही, आपण शेतकरी आहोत; पण आपल्या मुलीला नोकरी करणारा; व शहरात राहणारा मुलगा मिळाला; तर, ती सुखात राहील अशी त्यांची भावना असते. 

Don’t want a girl but a daughter-in-law/Image by rajesh koiri from Pixabay 

तुलनेने मुलींची संख्या कमी

मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे; गेल्या सात वर्षातील, राज्यातील मुलींचा, एक हजार पुरुषांमागील; जन्मदर प्रमाण असे होते. 2013 मध्ये 900, 2014 मध्ये 914; 2015 मध्ये 907, 2016 मध्ये 904; 2017 मध्ये 913, 2018 मध्ये 920; तर 2019 मध्ये हे प्रमाण 930 इतके होते. जन्मदर प्रमाणामध्ये असलेल्या तफावतीचा परिणाम देखील; लग्नासाठी मुलांना मुली न मिळण्यावर झालेला दिसून येत आहे. ही परिस्थिती जर अशिच राहिली तर; भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

तरुणांमध्ये वाढणारे व्यसनाचे प्रमाण

एकतर, शेतकरी कुटुंबातील मुलं; प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत शेती करतात. त्यात पिकवलेल्या मालाल योग्य भाव मिळेल की नाही; याची खात्री नाही. वयाची चाळीसी ओलांडली तरी विवाह होत नाही; अशा विविध कारणांमुळे; तरुणांमध्ये नैराश्य आणि व्यसनाधीनता; वाढताना दिसत आहे.

अशा मुलांचे मनोबलही खचते; त्यामुळे अशी मुले सर्वात जास्त; व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. याच टोळक्यांचा राजकारणात वापर केला जातो; त्यांना नोकरीची आश्वासने दिली जातात; परंतू नंतर हाती काहीच लागत नाही. निवडनुकांच्या काळात त्यांची चंगळ होते. वाचा: Know The Road Safety Rules | रस्ता सुरक्षा नियम

पण नंतर काय? असा प्रश्न निर्माण होतो; तेंव्हा चोरीचा पर्यायही काही तरुण निवडतात. या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांच्यावर “टुकार” हा शिक्का कायमचा मारला जातो; त्यानंतर तर, त्यांच्याकडे घरातलेही दुर्लक्ष करतात. वाचा: Importance of the Role of Women | महिलांच्या भूमिकेचे महत्व

निष्कर्ष | Conclusion

वरील सर्व बाबींचा निट विचार केला; तर, काही गोष्टी लक्षात येतात; त्यातील पहिली गोष्ट म्हणजे, समाजाने मुलींच्या जन्माचे स्वागत करुन; भृणहत्या थांबवली पाहिजे. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे; हा हट्ट करु नये. मुलीही अलिकडे मुलांपेक्षा; जास्त सामर्थ्यशाली होत आहेत. आता असे एकही क्षेत्र शिल्लक नाही; की, ज्यामध्ये मुली कार्यरत नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे मुलींच्या पालकांनी; शेतकरी किंवा बेरोजगार मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. लग्न जमवताना नोकरी बरोबर शेती असली पाहिजे; ही अट लावतात, पण त्याबरोबरच, मुलगी शेतात काम करणार नाही, हेही सांगतात. वाचा: The Best Activities for Kids | मुलांसाठी सर्वोत्तम उपक्रम 

मग शेतीची अट कशासाठी. शेवटी, शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना; थोडयाफार प्रमाणात काहोईना; पण शेतीकडे लक्ष देणे भाग असते. नाहीतर, ती शेती असून काहीच कामाची ठरणार नाही. वाचा: Most Attractive Facts About Human Babies | बाळांबद्दलची तथ्ये

Know all Facts about Virus

Know all Facts about Virus | व्हायरस बद्दल जाणून घ्या

Know all Facts about Virus | व्हायरस, व्हायरसची रचना, कार्य, गुणधर्म, वर्गीकरण, पुनरुत्पादन, आर्थिक महत्त्व व व्हायरसबद्दल सर्व तथ्ये जाणून ...
Read More
Know The Details About Bacteria

Know The Details About Bacteria | जिवाणू

Know The Details About Bacteria | बॅक्टेरिया सेलची रचना, वैशिष्टये, वर्गीकरण, आकार, जीवाणू पुनरुत्पादन, उपयुक्तता, हानिकारकता व जिवाणू विषयी शंका ...
Read More
people woman sitting technology

Know About Severe Dehydration | गंभीर निर्जलीकरण

Know About Severe Dehydration | गंभीर निर्जलीकरणाची कारणे, लक्षणे, परिणाम, गंभीर चिन्हे व गंभीर निर्जलीकरणावर उपचारांबद्दल जाणून घ्या. जेव्हा शरीरातील ...
Read More
crying upset black female with tissue

Know About Hypertonic Dehydration | हायपरटोनिक

Know About Hypertonic Dehydration | हायपरटोनिक डिहायड्रेशन म्हणजे काय? डिहायड्रेशनची लक्षणे, कारणे, निदान आणि उपचार जाणून घ्या. शरीरात पाणी आणि ...
Read More
a mother caring for her sick child

Know the dehydration signs in kids | निर्जलीकरण चिन्हे

Know the dehydration signs in kids | मुलांमध्ये निर्जलीकरण चिन्हे, निर्जलीकरणाची लक्षणे, निदान व उपचारां बाबत जाणून घ्या. जेव्हा शरीरातील ...
Read More
man in gray sweater sitting beside woman

Know the Dehydration in Olders | वृद्धांमध्ये निर्जलीकरण

Know the Dehydration in Olders | वृद्धांमध्ये निर्जलीकरणाची कारणे, लक्षणे, उपचार व निर्जलीकरण टाळण्यासाठी टिप्स जाणून घ्या. जेंव्हा शरीरात जितके ...
Read More
woman drinking at blue sports bottle outdoors

How to Recognize the Dehydration? | निर्ज. कसे ओळखावे

How to Recognize the Dehydration? | निर्जलीकरण कसे ओळखावे? निर्जलीकरण ओळखण्याची चिन्हे किंवा लक्षणे, निर्जलीकरण कसे टाळावे? निर्जलीकरणासाठी कोणते उपचार ...
Read More
woman in gray tank top lying on bed

What to know about Dehydration | निर्जलीकरण

What to know about Dehydration | निर्जलीकरण जोखीम घटक, निर्जलीकरणाची चिन्हे, वैद्यकीय आणीबाणी, निदान, उपचार, निर्जलीकरण कसे टाळावे? या बद्दल ...
Read More
Know All About Dehydration

Know All About Dehydration | डिहायड्रेशन

Know All About Dehydration | निर्जलीकरण म्हणजे काय? त्याची कारणे, लक्षणे, निर्जलीकरण झाल्यास काय करावे? डॉक्टरांकडे कधी जावे, याबद्दल सर्व ...
Read More
woman coding on computer

Software Engineering after 10th | सॉफ्टवेअर अभियांत्रिकी

Software Engineering after 10th | सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, अभ्यासक्रमांचे महत्व, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे कोर्सेस, पात्रता निकष, महाविद्यालये, अभ्यासक्रम आणि करिअर संधी. माहिती ...
Read More
Spread the love