TDS: All about tax deducted at source | सर्व कर कपाती स्त्रोत, ‘टीडीएस’ कपात केले जाणारे मार्ग; ‘टीडीएस’ संबंधीचे बदलले नियम आणि बरेच काही घ्या जाणून…
अंदाजपत्रक 2021 अद्यतन: पेन्शन उत्पन्न आणि व्याज उत्पन्न हेच वार्षिक उत्पन्न स्त्रोत असल्यास; ज्येष्ठ नागरिकांना आयकर विवरणपत्र भरण्यास सूट देण्यात येईल. बँकेकडून निवृत्तीवेतन आणि व्याजापोटी मिळणारे उत्पन्न असलेल्या; 75 व त्यापुढील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कलम 194 पी नव्याने समाविष्ट केला गेला आहे. (TDS: All about tax deducted at source)
TDS हा खरतर आयकरांचा एक भाग आहे; एखाद्या व्यक्तीने दिलेल्या विशिष्ट देयकासाठी TDS वजा करावा लागतो. या लेखात आम्ही आयकर कायद्यातील टीडीएस तरतुदींबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.
‘टीडीएस’ म्हणजे काय? (TDS: All about tax deducted at source)

टीडीएस म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स; या ठिकाणी सोर्स म्हणजे उत्पन्नाचा स्रोत, आणि टॅक्स डिडक्टेड म्हणजे; या स्रोतामधील कर कपात. उत्पन्नाच्या स्रोतावर कर कपात केली जाते; म्हणजे कर deduct केला जातो; त्याला TDS म्हणतात. याचा अर्थ असा की उत्पन्न जिथून मिळते तिथेच हा कर, एकूण उत्पन्नाच्या रकमेतून कापला जातो; आणि उरलेली रक्कम स्ंबंधीत व्यक्तीला दिली जाते. हा कापलेला कर, करकपात करणारांकडून; तपशिलासह सरकारकडे जमा करण्याच्या पध्दतीला टीडीएस (TDS) म्हणतात. आयकर विभागाने सुरु केलेली ही एक प्रणाली आहे; ज्याद्वारे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.
‘टीडीएस’ कशावर कापतात? (TDS: All about tax deducted at source)
टीडीएस उत्पन्न स्रोत किंवा मार्ग जसे की, वेतन, कमिशन, ठेवीवरील व्याज, बँक खात्यावरील व्याज, घरभाडे, कमिशन, व्यावसायिक फी, इत्यादी विशिष्ट देयके देताना हा कर कापला जातो. सामान्यत: उत्पन्न स्रोत प्राप्त करणा-या व्यक्तीस (employer) आयकर कपात व टीडीएस भरण्यास जबाबदार धरले जाते.
लॉटरीचे मोठे बक्षीस लागले, एखाद्या कोड्यांच्या स्पर्धेत तुम्हाला रोखीचे पारितोषिक मिळाले; एखाद्या ‘रिॲलिटी शो’ मध्ये किंवा ‘हॉर्स रेस’ मध्ये तुम्ही जिंकलात; आणि त्यातून भरघोस रक्कम मिळाली तर मात्र ‘टीडीएस’ आकारणीचा दर सर्वाधिक, म्हणजे ३० टक्के इतका लागू होईल. ‘टीडीएस’ हा रोख रकमेव्यतिरिक्तच्या इतर प्रकारच्या पारितोषिकांवरही (‘नॉन कॅश विनिंग्ज’) लागू होतो; उदाहरणार्थ, तुम्हाला 10 लाख रु. किमतीची मोटार बक्षीस म्हणून मिळाली तर तीन लाख रु.चा ‘टीडीएस’ भरल्यानंतरच तुम्हाला कारचा ताबा मिळेल
बँक ठेवींवरील ‘टीडीएस’ (TDS: All about tax deducted at source)

बँकांमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवींवर, म्हणजे फिक्स्ड डिपॉजिट्स, एफडी’ आणि बचत खात्यांतील रकमेवरीलही, वार्षिक व्याज दहा हजार रुपयांच्या वर गेले तर; बँक त्यावरील ‘टीडीएस’ कापून घेऊनच मुद्दल व व्याजाच्या परताव्याची रक्कम देते.
घरभाडे, घरविक्री उत्पन्नावरील टीडीएस

घरभाडे उत्पन्न मिळत असेल तर, त्यावरही ‘टीडीएस’ लागू होऊ शकतो; पण घरभाड्याची वर्षभरातील रक्कम 1 लाख 80 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर; ‘टीडीएस’ लागू होणार नाही. घरभाडे उत्पन्न त्याहून अधिक असेल तर; 10% दराने ‘टीडीएस’ लागू होईल. मात्र भाडेकरुकडून घरमालकाने घेतलेल्या अग्रिम ठेवीवर; (‘ॲडव्हान्स डिपॉजिट’) ‘टीडीएस’ लागू होत नाही. तुम्ही ग्रामीण भागातील तुमचे घर विकले; आणि त्याची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर; 1% दराने ‘टीडीएस’ लागू होईल. शहरी भागातील घर विकले आणि किंमत 50 लाख रु.पेक्षा अधिक असेल तर; असाच ‘टीडीएस’ लागेल.
सोने चांदी खरेदीवरील ‘टीडाएस’

काळ्या (बेहिशेबी, कर चुकवून मिळविलेल्या) पैशाच्या उलाढालींना आळा घालण्यासाठी; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2011-12 च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे सोन्याच्या किंवा चांदीच्या खरेदीसाठी; जेथे दोन लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम (‘कॅश’) वापरली जात असेल ;त्या व्यवहारावर विकणारा हा खरेदीदाराकडून 1 टक्का कर वसूल करील. जुलै 2012 पासून सोनेचांदी खरेदीवर हा कर लागू झाला आहे.
‘टीडीएस’ कसा वाचविता येईल?
TDS पासून सूट देणाऱ्या अनेक तरतुदी आयकर कायदयामध्ये आहेत; ‘समावर्ती ठेव योजना’ म्हणजे ‘रिकरिंग डिपॉजिट स्कीम (Recoring Deposit Scheme); या योजनेवर TDS लागू होत नाही. परंतू तुम्हाला मुदतपूर्तीच्या वेळी म्हणजे; मॅच्युरिटीची एकूण रक्कम हातात मिळेल. त्यातील व्याज उत्पन्न हे तुमच्या उत्पन्नात गणले जाईल; आणि तुमच्या उत्पन्नगटा नुसार (‘टॅक्स स्लॅब’) ते करपात्र ठरेल. तुमचे एकंदर उत्पन्न करपात्र मर्यादेच्या आत (बिलो टॅक्सेबल लिमिट) असेल; आणि बँकेतील मुदत ठेवींवर मिळालेले व्याज दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर; तुम्ही बँकेला तुमचा ‘टीडीएस’ न कापण्यास सांगू शकता. त्यासाठी तुम्हाला ‘फॉर्म 15जी’ किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला ‘फॉर्म; 15एच’ भरुन द्यावा लागेल. बँकेत ‘एफडी’ उघडतानाच या ‘फॉर्म’ची मागणी करावी.
‘टीडीएस’ संबंधीचे बदलले नियम
बँक खात्यामधून रोख रक्कम काढण्यासाठी टीडीएसचे नवीन दर (कर वजावट) कमी केल्यावर आता; आयकर विभागाने टीडीएस नियमात अधिक बदल केले आहेत. आयकर विभागाने केलेल्या या बदलानंतर बँक ग्राहकांना; इतर माहिती देणे बंधनकारक केले आहे. आयकर विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये; केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने TDS फॉर्ममधील केलेल्या बदलांची माहिती दिली आहे. (All about Tax Deducted at Source )
आता ही माहिती द्यावी लागेल
प्राप्तिकर विभागाच्या या निर्णयांबद्दल तज्ञांचे म्हणणे आहे की; नवीन टीडीएस फॉर्म पूर्विपेक्षा व्यापक आहे. यामध्ये ज्या रकमेवर टीडीएस कपात केली जाते; त्याबद्दल तर माहिती द्यावीच लागेल. परंतु या व्यतिरिक्त; आता करदात्यांना ती रक्कम देखील जाहीर करणे आवश्यक असेल; ज्यावर कोणत्याही कारणास्तव TDS वजा केला जात नाही. कमी दरावर TDS कपात किंवा TDS अजिबात कपात न होण्याच्या स्थितीसाठी; वेगवेगळे कोड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. करदात्यांनी त्या रकमेबाबत देखील माहिती द्यावी; हे नियम 31A मधील दुरुस्तीनंतर बंधनकारक झाले आहे. तसेच जी रक्कम करदात्याला दिली आहे, त्याने क्रेडिट केली आहे; परंतु त्यावर कोणातिही कर कपात झालेली नाही किंवा कमी दराने कर वजा केला आहे.
खालील फॉर्म्स सुधारित केले आहेत
आयकर विभागाने फॉर्म नंबर 26 Q हा सुधारित केला असून; फॉर्म नंबर 27 Q च्या स्वरुपातही बदल केला आहे. आता करदात्यांना या फॉर्ममध्ये; विविध प्रकारच्या निवासी देयकावरील TDS वजावट व जमा करण्याबाबत माहिती द्यावी लागेल. तसेच अनिवासी देय रकमेवर; कपात केलेल्या TDSची माहिती देखील द्यावी लागेल. वाचा: Important Questions About Income Tax | आयकर बाबतचे प्रश्न
मोठी रक्कम काढताना कर भरावा लागेल
यापुढे कोणतिही मोठी रक्कम काढताना कर भ्रावा लागेल, या नियमाची अंमलबजावणी 1 जुलै 2020 पासून करण्यात आली आहे. आयकर विभागाने टीडीएस नियमात बदल केला आहे. आणि अधिक मोठी रोख रक्कम काढणाऱ्यांना आयकर विवरण परतावा जोडावा लागेल. यामध्ये कोणतिही बँक, सहकारी बँक किंवा संस्था तसेच टपाल कार्यालयातून रोख रक्कम काढणाऱ्यांचा समावेश असेल. वाचा: How to Check Income Tax Refund? | टॅक्स रिफंड कसा तपासायचा?
आयकर भरल्यास
या नियमांतर्गत एखादी व्यक्ती मागील 3 वर्षांपासून आयकर विवरणपत्र भरत असेल; आणि वर्षाकाठी एक कोटी रुपयांपर्यंतची रोख रक्कम काढत असेल; तर त्यांना कोणताही टीडीएस भरावा लागणार नाही. परंतु, जर रोख रक्कम काढण्याची रक्कम 1 कोटींपेक्षा जास्त असेल तर; त्यांना 2% टीडीएस द्यावा लागेल. वाचा: How to choose the right ITR form? | योग्य ITR फॉर्म असा निवडा
आयकर न भरल्यास (TDS: All about tax deducted at source)
आयकर नियमात असेही म्हटले आहे की; जर एखाद्याने मागील तीन वर्षात आयकर विवरण भरले नसेल; आणि त्याने वार्षिक 20 लाखांपर्यंतची रोख रक्कम काढली असेल; तर त्याला टीडीएस भरावा लागणार नाही. त्याचबरोबर त्या व्यक्तीने आयटीआर दाखल न केल्यास 20 लाख रुपयांपासू; ते 1 कोटीपर्यंत रोख रक्कम काढण्यासाठी 2% कर भरावा लागेल. तसेच 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम काढल्यास; हा दर 5% असेल.
Related Posts
- How to File Income Tax Return (ITR-1) | आयटी रिटर्न कसा भरावा
- TDS: All about tax deducted at source | सर्वकाही कर कपाती विषयी
- New Rules of Income Tax Return from June-1 | ITRचे नवे नियम
- Good News for Taxpayers | करदात्यांसाठी चांगली बातमी
- Tax Free Income in India | भारतात कोणते ‘उत्पन्न करमुक्त’ आहे
शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.
(टीप: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने दिलेला आहे. This article is for informational purposes only)

Diploma: The best career option after 10th | 10वी नंतर डिप्लोमा
Read More

The Best Law Courses After 12th | 12वी नंतर कायदा अभ्यासक्रम
Read More

4 Important Actions About Aadhaar card | आधार अपडेट्स बाबत
Read More

Latest Water Purification Technologies | नवीन जल शुध्दी तंत्रज्ञान
Read More

Psychology: The best career option after 12th | मानसशास्त्र
Read More

How to Make a Career in Merchant Navy | करिअर इन मर्चंट नेव्ही
Read More

Bachelor of Arts in Hotel Management | हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीए
Read More

Marine Engineering: the best option for a career | सागरी अभि.
Read More

How to become a corporate lawyer | कॉर्पोरेट वकील कसे व्हावे
Read More

Diploma in Information Technology | माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा
Read More