Marathi Bana » Posts » Impact of Lockdown on the Environment | लॉकडाऊन व पर्यावरण

Impact of Lockdown on the Environment | लॉकडाऊन व पर्यावरण

Lockdown & Environment

Impact of Lockdown on the Environment | लॉकडाऊन काळात वाहने, खाणकाम, जंगलतोड, प्राणी संग्रहालये, उदयाने, व्याघ्रप्रकल्प हे सर्व बंद होते. परंतु, या काळात निसर्गाने मात्र मोकळा श्वास अनुभवला.

पर्यावरणावर परिणाम करणारे घटक

निसर्गावर मानव हा कायमच अत्याचार करत आलेला आहे. वाहतूक, उद्योग, वीज केंद्र, पर्यटन यांचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. त्याचबरोबर औद्योगिकीकरण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि प्लास्टिक प्रदूषण वाढत आहे. जंगलतोड, नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी आणि वायू प्रदूषण वाढत असून पर्यावरणाचे फार मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. मानव निर्मित धातू व प्लास्टिक वस्तूंबद्दलचे आपले प्रेम पर्यावरणावर काय पणिाम करते याचा विचार आपण करत नाही. भारत सरकारने काही प्लॅस्टिक  वापरावर बंदी आनली त्यामुळे काही प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर कमी झाला असला तरी पूर्णपणे बंद झालेला नाही. त्यासाठी आपण सर्वांनी साथ देण्याची गरज आहे. (Impact of Lockdown on the Environment)

Impact of Lockdown on the Environment
Impact of Lockdown on the Environment-Photo by Leif Blessing on Pexels.com

‘पर्यावरणावर होणारा मानवी परिणाम’; हा जगभरातील तज्ञांसाठी चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड सुधारणा; औषधांमध्ये सुधारणा यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. शेती विकसीत होत असून; उत्पन्नात वाढ होत आहे. या सर्व सकारात्मक गोष्टी घडत असतांना पर्यावरणावर मात्र त्यांचा विपरीत परिणाम होतांना दिसतो.

वाचा: 10 Trees that release O2 at Night |’ही’ झाडं रात्री ऑक्सिजन देतात!

उर्जेसाठी कोळसा आणि जीवाश्म इंधनांवरील आपले अवलंबित्व; ही आणखी एक समस्या आहे. लोकसंख्या जितकी जास्त असेल; तितकी जास्त जीवाश्म इंधन वापरली जातील. जीवाश्म इंधन (जसे तेल आणि कोळसा) च्या वापरामुळे; मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड हवेत मिसळतो; त्यामुळे हजारो प्रजाती नष्ट होण्याची भीती निर्माण होते. (Impact of Lockdown on the Environment)

Impact of Lockdown on the Environment
Impact of Lockdown on the Environment-Photo by Bibhukalyan Acharya on Pexels.com

मानवांना जागेची आवश्यकता असते; आणि त्यापैकी बरीच जागा वसाहत, शेती आणि उद्योगांसाठी वापरली जाते. वाढत्या लोकसंख्येचा परिणाम अधिक स्पष्टपणे होतो; परिणामी मोठ्या प्रमाणात इकोसिस्टम खराब होते. हवा फिल्टर करण्यासाठी; पुरेसी झाडी नसल्यास, सीओ₂ पातळी वाढते ज्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे नुकसान होण्याची शक्यता असते.

वाचा: 20 Plants that Release Oxygen at Night | ही झाडे रात्री O2 देतात!

निसर्ग आणि मानव (Impact of Lockdown on the Environment)

आज संपूर्ण जग ‘ कोरोना’ शी लढत आहे.  ही नैसर्गिक आपत्ती आहे की मानव निर्मित याचा विचार करत बसण्याची ही वेळ नाही. तर आलेल्या संकटाला तोंड देत पुन: नव्याचे उभे राहण्याची वेळ आहे. निसर्गाच्या विरुद्ध गेल्यानंतर अनेक भयंकर परिणाम भोगावे लागतात हे जगाने आज अनुभवले आहे. तेंव्हा वेळोवेळी निसर्गाच्या विरुद्ध जाऊन लढत बसायचे की निसर्गाशी जुळवून भौगोलिक, आर्थिक व सामाजिक विकास साधायचा. याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. (Impact of Lockdown on the Environment)

Impact of Lockdown on the Environment
Impact of Lockdown on the Environment-Photo by Magda Ehlers on Pexels.com

निसर्गाला आपली गरज नाही; तर आपल्याला निसर्गाची गरज आहे. आपण आनंदी असलो; तर निसर्ग आनंदी होत नाही. तर नैसर्गिक वातावरण पाहून आपण आनंदी होतो; तेंव्हा आपल्या आनंदासाठी नैसर्गिक वातावरण बिघडणार नाही; याची काळजी आपणच घेतली पाहिजे. नैसर्गिक वातावरणसाठी आपण काही करण्याची मुळीच गरज नाही; ही प्रक्रिया निसर्ग स्वत: करतो. आपण थोडी झाडे लावली की; त्याचे फोटो काढत सर्वत्र आपल्या कार्याचा टेंभा मिरवतो. परंतू झाडे तोडतांना आपल्या कार्याचा; कतृत्वाचा विचार करत नाही. तेंव्हा विकासाचे नाव पुढे करत त्या आड दडण्याचा प्रयत्न करतो; विकास-विकास करत मोठया प्रमाणात वृक्षतोड करायची; त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करायचा; आणि पुन्हा झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे. हा खटाटोप करुन निसर्गावर उपकार करण्यापेक्षा; तो जसा आहे तसा राहू देण्याची कृपा करावी ही अपेक्षा मात्र निसर्ग निश्चितच करत असेल.

वाचा: Don’t sleep under a tree at night Why? | रात्री झाडाखाली झोपू नये
Impact of Lockdown on the Environment
Impact of Lockdown on the Environment-Photo by Max Vakhtbovych on Pexels.com

निसर्गामघ्ये मानवाने जर लुडबुड केली नाही तर; झाडे लावण्याचा खटाटोप करण्याची गरज पडणार नाही. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन विकास करण्यापेक्षा; निसर्गाशी जुळवून घेऊन विकास करण्याची वेळ आलेली आहे. निसर्गावर अतिक्रमण करुन विकास करण्यापेक्षा; मानवाने केलेले अतिक्रमण हटवून विकास करणे केंव्हाही चांगले. पण तसे होत नाही; कारण निसर्ग गप्प राहतो, आपले तसे नाही. परंतू गप्प राहून आपला झटका मात्र निसर्ग दाखविल्याशिवाय राहात नाही; यासाठी त्सुनामीचे उदाहरण पुरेसे आहे.  

लॉकडाऊन काळातील पर्यावरण

gray road and green mountains
Impact of Lockdown on the Environment-Photo by Brian de Karma on Pexels.com

जगभर ‘COVID-19’ चा  प्रसार वेगाने वाढत असताना, संपूर्ण जगाने मानवी गतिशीलतेला निर्बंध घालण्यासाठी कर्फ्यू, लॉकडाऊन, विलगीकरण या मार्गांचा स्विकार केला. त्यामुळे सर्व प्रकारच्या सामाजिक, आर्थिक, औद्योगिक आणि शहरीकरण क्रिया अचानक बंद झाल्या. लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग काही काळ थांबलेले होते. कारखाने, वायुगळती, विषारी पदार्थ  इतरत्र फेकणे बंद हाेते. दुषित पाणी नदयापर्यंत पाेहचत नव्हते. रस्त्यावरील वाहने, धुळीचे प्रदुषण, खाणकाम, जंगलतोड, प्राणी संग्रहालये, उदयाने, व्याघ्रप्रकल्प हे सर्व बंद होते. या सर्वामुळे आर्थिक विकास थांबला, परंतू  निसर्गाने मात्र मोकळा श्वास अनुभवला. लॉकडाऊनचा खरा फायदा निसर्गाला झाला. स्वच्छ हवा, स्वच्छ नद्या, कमी आवाज प्रदूषण, व्यवस्थित आणि शांत वन्यजीव यांच्या गुणवत्तेत सुधारणा झाली.

blue green and orange peacock standing in the ground during daytime
Impact of Lockdown on the Environment-Photo by Paula on Pexels.com

दररोज गाडयांच्या हॉर्नच्या कर्कष आवाजाने; जागे होण्याची सवय लागलेल्या आम्हा लोकांना; कित्येक दिवसानंतर पक्षांचा चिवचिवाट ऐकायला मिळाला; प्राणी, पक्षी मुक्तपणे संचार करतांना आढळले. रस्त्याच्या कडेला असणारी झाडी आपले काळे तोंड न दाखवता; आनंदाने आपल्या मुळ रुपात डोलतांना दिसली. खरा निसर्ग अनुभवायला मिळाला. 

girl standing in front of flying pigeons
Impact of Lockdown on the Environment-Photo by Fuzail Ahmad on Pexels.com

‘कोरोना’ ने मानवाचा श्वास रोखला, पण निसर्गाने मात्र मोकळा श्वास अनुभवला.  प्राणी व पक्षी मुक्तपणे संचार करताना आढळले. कदाचित त्यांनी केंव्हातरी विचार केलेला असेल ‘अपना टाईम आयेगा’ आता आपण विचार करण्याची गरज आहे की निसर्गावर असा विचार करण्याची वेळ येणार नाही याचा. निसर्गाने आपल्याला हा अनुभव दिला आहे. ही संधी दिली आहे की, आता तरी सुधरा, आर्थिक विकासाच्या नावाखाली  होणारी आमची होरपळ थांबवा.

वाचा: Tree Plantation Maharashtra Government | वन महोत्सव महाराष्ट्र
brown fox on green grass field
Impact of Lockdown on the Environment-Photo by Erik Karits on Pexels.com

आतापर्यंत प्राणी मानवाच्या संपर्कात यायला घाबरत होते; परंतू आताए, मानुस मानसाच्या संपर्कात यायला घाबरतो. निसर्गाच्या विरुध्द गेल्यास अशी संकट येत राहतील; तेंव्हा निसर्गाशी जुळवून घेणे आणि विकास करणे; हे आपल्या हिताचे आहे की नाही हे आपण ठरवायचे.

पर्यावरणाविषयीचे विचार (Impact of Lockdown on the Environment)

  • जेंव्हा लोक वापरलेल्या गोष्टी फेकून देताना दिसतात; तेंव्हा आपण त्यांचं लक्ष वेधेल अशा कृतीतून त्यांना समज दिली पाहिजे.
  • स्वच्छता आणि पर्यावरण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी मानसिकतेत बदल केल्याशिवाय प्रगती अशक्य आहे; आणि जे आपले विचार बदलू शकत नाहीत; ते काहीही बदलू शकत नाहीत.
  • आपल्या अंगणातील झाडांसोबत घालवलेला वेळ कधीही वाया जात नाही; त्याचे फळ एकदिवस नक्कीच मिळते.
  • जी व्यक्ती झाडे लावते ती स्वतःशिवाय इतरांवर निश्चित प्रेम करते.
  • विचारशील आणि वचनबद्ध नागरिकांचा एक छोटासा गट जग बदलू शकतो; याबद्दल कधीही शंका घेऊ नका; खरंच, ही एकमेव गोष्ट आहे जी आतापर्यंत घडत आलेली आहे.
  • जीवनात सतत आनंदी राहण्यासाठी माणूस आणि निसर्ग यांच्यात कधीही दुरावा असू नये.
  • वातावरण म्हणजे जिथे आपण सगळे भेटतो; जिथे आपणा सर्वांचे परस्पर हित पाहतो; ही एक अशी गोष्ट आहे जी आपण सर्वजण सामायिक करतो.
  • ज्या मनुष्याच्या मनात भविष्यातील पिढ्यांसाठी; आज काहीतरी बलिदान देण्याची असते; त्याचे बलिदान भविष्यातील पिढ्या कधिही विसरत नाहीत.
  • जी व्यक्ती पर्यावरणाचा नाश करते, ती स्वतःचा नाश करते; कारण जंगले हे आपली आणि आपल्या मातीचे फुफ्फुसे आहेत, ते हवा शुद्ध करतात आणि आपल्याला नवीन शक्ती आणि उर्जा देतात. वाचा: All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय?

Related Posts

Post Categories

शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.
All you need to know about sextortion

All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय?

All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय? सेक्सटोर्शनचे बळी होण्यापासून सावध राहण्यासाठी; तुम्हाला सर्व माहिती असणे ...
Read More
woman with face mask holding an alcohol bottle

All Information About Pharmacy Courses | फार्मसी कोर्सबद्दल

All Information About Pharmacy Courses | फार्मसी कोर्सबद्दल सविस्तर माहिती; प्रवेश प्रक्रिया, कौशल्ये, पात्रता निकष, अभ्यासक्रम, नोकरीच्या संधी, प्रमुख रिक्रूटर्स ...
Read More
Most Beautiful Flowers in the World

Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले

Most Beautiful Flowers in the World | जगातील सर्वात सुंदर फुले; फुलांचे सौंदर्य, रंग, प्रकार, उगम व महत्व जाणून घ्या ...
Read More
How to Check Income Tax Refund?

How to Check Income Tax Refund? | टॅक्स रिफंड कसा तपासायचा?

How to Check Income Tax Refund? | आयकर विभागाने AY 2021-22 साठी आयकर परतावा जारी केला. तुम्हाला आयटी रिफंड मिळाला ...
Read More
Know the meaning of moles on the face

Know the meaning of moles on the face | चेह-यावरील तीळाचे अर्थ

Know the meaning of moles on the face | चेह-यावरील तीळाचे अर्थ, तीळ कशामुळे होतो; मोल्सचे प्रकार व मोल्सविषयी विविध ...
Read More
Know About the Importance of Makar Sankranti

Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांती

Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांतीचे प्रादेशिक, सामाजिक व धार्मिक महत्व; प्रादेशिक भिन्नता व रीतिरिवाज या ...
Read More
How to Get Rid of Pimples?

How to Get Rid of Pimples? | मुरुमांपासून सुटका कशी करावी?

How to Get Rid of Pimples? | मुरुम किंवा पुरळ हा एक सामान्य त्वचा रोग आहे; यापासून सुटका करण्यासाठी, नैसर्गिक ...
Read More
photo of woman tutoring young boy

The Role of Parents in the Success of their Children |मुलांचे यश

The Role of Parents in the Success of their Children | मुलांच्या यशात पालकांची भूमिका; मुलांच्या करिअरसाठी पालकांनी काय केले ...
Read More
A career in the Fashion Designing

A career in the Fashion Designing | फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर

A career in the Fashion Designing | फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर, कोर्सेस, अभ्यासक्रम पुस्तके, महाविदयालये, वेतन व कंपन्या फॅशन डिझायनिंग हे ...
Read More
Success is Around Yourself

Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे

Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे; फक्त ते शोधण्याची नजर हवी आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या आयुष्यात अनेक लोकांना ...
Read More
Spread the love