How to Register for Covid-19 Vaccination? | नागरिक काेराेना लसीकरण नोंदणी करण्यासाठी; दोन पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडू शेतात.
देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्नांची वाढती संख्या दिवसेंदिवस चिंता वाढवित आहे. अशा वेळी कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. आता 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. देशभरात एक मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. कोरोना लसीकरणाच्या तिसरा टप्प्यात १८ वर्षावरील सर्व व्यक्तींना लसीकरण करता येणार आहे. यापूर्वी दुस-या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. आता 18 ते 44 वर्षांमधील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. (How to Register for Covid-19 Vaccination?)
कोरोना लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असणार आहे. सरकारनं स्पष्ट केलं आहे की, या लोकांना थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करण्याची सुविधा मिळणार नाही. प्ले स्टोअरवर नोंदणी करण्यासाठी CoWIN ॲप आहे परंतू ते केवळ प्रशासकीय कामकाजासाठी आहे.
वाचा: कोरोना रुग्णांसाठी अतिशय दिलासादायक बातमी…
नागरिक नोंदणी करण्यासाठी खालील दोन पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय वापरु शकतील.
(1) रजिस्ट्रेशन करण्यासाठी “कोविन (cowin) पोर्टल” वर http://www.cowin.gov.in या लिंकद्वारे

(2) “आरोग्य सेतु” (Aarogya Setu) या ॲपचा वापर करु शकता.
डीसीजीआयने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया निर्मित ऑक्सफर्डच्या ‘कोविशिल्ड’ लसीला आणि भारत बायोटेकच्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ला आपत्कालीन उपयोगासाठी मंजुरी दिली आहे.
कोविन Co-WIN पोर्टलवर होणार लसीकरणासाठी नोंदणी– Registration for vaccination will take place on the Co-WIN portal

(DCGI) ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ ने भारतात तयार करण्यात आलेल्या दोन कोरोना लसींना, आपत्कालीन उपयोगासाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोव्हिशिल्ड’ या दोन लसींना; मान्यता मिळाली आहे. त्यामुळे, आता, देशातील कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल; Covid लसीची वाट देशातील सर्वच नागरिक प्रदिर्घ काळापासून वाट पाहत होते, आता, ही प्रतिक्षा संपली आहे. वाचा: GAS CYLINDER: ‘गॅस सिलिंडर बाबत तुम्हाला ‘हे’ माहित आहे का?
कोरोना लसीकरणासाठी कोविन (Co-WIN) पोर्टल
Covid-19 लसीकरणाच्या ड्राय रन नंतर आता पुढील टप्प्यात कोरोना लस देण्यासाठी आरोग्य विभागाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकराने स्पष्टपणे जाहीर केलं आहे की, पहिल्या टप्प्यात कोरोना लस फ्रंटलाईन वर्कर्स व आरोग्यसेवक यांना दिली जाईल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड लसीकरण, त्याच्या संबंधित डेटा, लस देण्यात येणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी कोविनने (Co-WIN) कोविड व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क नावाने एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. कोविन ॲप सुरु करण्यात आलेले आहे. आता तुम्हाला कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. (How to Register for Covid-19 Vaccination?)
“अशी” करा रजिस्ट्रेशन प्रक्रिया (How to Register for Covid-19 Vaccination?)
- www.cowin.gov.in या अधिकृत साइटवर जा.
- Register किंवा Sign in yourself मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करावा लागेल.
- नंतर तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपीच्या ठिकाणी टाका व क्लिक करा.
- नंतर Vaccine Registration form भरा.
- Schedule appointment वर क्लिक करा.
- पिन कोड टाका (सहा अंकी उदा. 414001)
- तुम्हाला योग्य असणारे सकाळ किंवा दुपार Session निवडा.
- लसीकरण केंद्र (Vaccine center) व दिनांक निवडा.
- Appointment book करुन ती conform करा.
- Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
हा मेसेज जपून ठेवा, कारण लसीकरण केंद्रावर तुमचे ओळखपत्र; आणि हा मेसेज दाखविल्यास लस देणे सोपे होईल. एक व्यक्ती आधी प्रविष्ट केलेल्या मोबाइल नंबवरुन; आणखी चार लोकांना जोडू शकते. आपण ‘जोडा बटण’ वर क्लिक करु शकता; आणि त्यांच्यासाठी नोंदणी करण्यासाठी इतर व्यक्तींचा तपशील प्रविष्ट करु शकता.
कोरोनाव्हायरस उपलब्ध लसींविषयी (How to Register for Covid-19 Vaccination?)

कोविशील्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक व्ही या लसी आहेत; देशभरात लसीकरण मोहिमांना वेग आला आहे; आणि आता, वापरासाठी आणखी लस उपलब्ध आहेत. मॉडर्ना इंक, लसीला नुकतीच मंजुरी मिळाल्याने; भारताकडे आता 4 लस आहेत. प्रत्येक लस, डब्ल्यूएचओच्या मंजुरीचे मानक पार करते, सहनशीलता वाढवते आणि धोके कमी करते.
कोविशील्ड लस, जी भारतात वापरण्यासाठी सर्वप्रथम मंजूर करण्यात आली होती; त्याची प्रमाणितता 70% आहे, जी दोन्ही डोस 8-12 आठवड्यांच्या अंतराने 91% पर्यंत वाढवता येते. लस उच्च प्रतिपिंड प्रतिसाद देखील देते; आणि गंभीर परिणाम टाळते.
अलीकडेच चाचण्यांचा तिसरा टप्पा पूर्ण करणारा कोवाक्सिन 78% चा कार्यक्षमता दर दर्शवितो; याव्यतिरिक्त गंभीरता आणि मृत्यूच्या विरूद्ध 100% संरक्षण प्रदान करतो.
हे वाचा: असेही होऊ शकते ! २४ स्कोर असताना…मृत्यूच्या दारातुन माघारी
तिसरी कोविड लस, स्पुतनिक व्ही, आरडीआयएफनुसार, चाचणी आणि केस स्टडीजनुसार .6..6% ते 3३.% च्या कार्यक्षमतेचा दर दर्शवते.
सर्वांपेक्षा, मॉडर्ना सर्वांत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे; डिसेंबरमध्ये कंपनीने चाचण्या पूर्ण केल्या असताना; असे आढळून आले आहे की लसीची प्रभावीता दर 91%पेक्षा जास्त आहे, दोन डोस दिल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढते; कंपनी 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर चाचण्या घेण्यात आल्या आणि अंतरिम डेटाने हे सिद्ध केले आहे की; बालकांसाठी ही लस तितकीच प्रभावी आहे.
तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की उपलब्ध असलेल्या सर्व लसी; डेल्टा प्रकाराविरूद्ध लक्षणात्मक संक्रमण, रुग्णालयात दाखल आणि मृत्युदर कमी करण्याच्या चांगल्या संरक्षणात्मक शक्यता देतात.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या उद्रेकाबद्दल आपण चिंतित असताना; लसीकरणाला उशीर करणे हा एक धोकादायक निर्णय असू शकतो. लोकांचे जितक्या लवकर लसीकरण केले जाईल; तितके चांगले. संरक्षण आणि भविष्यातील चिंता आणि धोका कमी करणे अधिक चांगले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं ट्विट (How to Register for Covid-19 Vaccination?)
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट केले आहे की; Co-WIN या पोर्टलच्या माध्यमातून नागरीकांना खालील सुविधा प्रदान केल्या जातील.
लाभार्थ्यांची नोंदणी आणि पडताळणी
लसीकरणाचे वेळापत्रक
लाभार्थ्यांना लसीकरणासाठी एसएमएस
लसीकरणा झाल्यानंतर प्रतिकूल असल्याचा अहवाल देणे
लसीकरणानंतर प्रमाणपत्र देणे”
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा घेतला निर्णय
देशातील वेगाने वाढणारा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी; भारत सरकारने जाहीर केल्याप्रमाणे, 18 वर्षांवरील सर्व वयोगटातील लोकांना १ मे पासून कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य अधिका-यांची ऑनलाईन बैठक घेतल्यानंतर; हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लसीकरणाला वेग देण्याचे अधिकार राज्यांना
तिस-या टप्प्यात, कोरोना लसीची कमतरता भासू नये म्हणून; लस खरेदीचे नियम शिथिल केले आहेत. त्याशिवाय आता लस तयार करणा-या कंपन्यांकडून थेट अतिरिक्त डोस घेण्याचा अधिकार; राज्यांना देण्यात आला आहे. या अधिकारांतर्गत, लस उत्पादक कंपन्या आता लस पुरवठा करण्याच्या त्यांच्या एकूण क्षमतेच्या; 50 % पर्यंत राज्य सरकार; आणि इतर खुल्या बाजारात, पूर्वी जाहीर केलेल्या किंमतींत देतील.
‘लसीकरण’ हेच कोरोनाविरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोरोनाविरुद्धच्या लढाईतील लसीकरण हेच; सर्वात मोठे शस्त्र असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘गेल्यावर्षी डॉक्टरांचे कठोर परिश्रम आणि देशाच्या रणनीतीमुळे; कोरोना संसर्गाची लाट नियंत्रित होऊ शकली. परंतू आता देशात दुस-या लाटेचा सामना करावा लागत आहे; अशा परिस्थितीत, देशातील फ्रन्ट लाइनवर असलेले सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी; पूर्ण ताकदीने लढा देत आहेत, आणि लाखो लोकांचे प्राण वाचवित आहेत.
कोरोनावरील उपचारांबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व डॉक्टरांना जनजागृती करण्यासाठी; आणि कोविड-19 बाबत उपचार आणि प्रतिबंधा विषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करु;, अफवांपासून लोकांनी सावध राहिले पाहीजे. अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये; असे आवाहन त्यांनी केले. मोदी म्हणाले की, या कठीण परिस्थितीत लोकांनी दहशतीला बळी न पडता; योग्य उपचार मिळविणे हे फार महत्वाचे आहे. त्याबरोबरच, कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी पीडित असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी; डॉक्टरांना त्यांनी टेली-मेडिसीन वापरण्याची सूचना केली आहे.

Diploma: The best career option after 10th | 10वी नंतर डिप्लोमा
Read More

The Best Law Courses After 12th | 12वी नंतर कायदा अभ्यासक्रम
Read More

4 Important Actions About Aadhaar card | आधार अपडेट्स बाबत
Read More

Latest Water Purification Technologies | नवीन जल शुध्दी तंत्रज्ञान
Read More

Psychology: The best career option after 12th | मानसशास्त्र
Read More

How to Make a Career in Merchant Navy | करिअर इन मर्चंट नेव्ही
Read More

Bachelor of Arts in Hotel Management | हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीए
Read More

Marine Engineering: the best option for a career | सागरी अभि.
Read More

How to become a corporate lawyer | कॉर्पोरेट वकील कसे व्हावे
Read More

Diploma in Information Technology | माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा
Read More