Employee Provident Fund Organisation | तुम्हाला EPFO योजना, व्याज दर, शिल्लक तपासणी, हक्क प्रक्रियेबद्दल जाणून घ्यायचे आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ही 1952 मध्ये नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरु केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. 20 पेक्षा अधिक कर्मचारी किंवा कामगार काम करीत असलेल्या आस्थापनांमध्ये निवृत्ती पश्चात कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहीले जाते. कर्मचारी दरमहा मूळवेतनाच्या बारा टक्के रक्कम या निधीत जमा करतात. या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेद्वारे सेवानिवृत्ती नंतर एक रकमी लाभ देण्याबरोबरच इतर 2 अतिरिक्त लाभही दिले जातात. Employee Provident Fund Organisation
- कर्मचारी निवृत्तिवेतन योजना (Employees Pension Scheme)
- कर्मचारी ठेवीशी निगडित विमा योजना (Employees Deposit Linked Insurance Scheme). जर कर्मचा-याचा निवृत्तीपूर्वीच मृत्यू झाला तर, त्याच्यानंतर त्यावर अवलंबून असलेल्या वारसदारास पेन्शनचा लाभ या योजने अंतर्गत दिला जातो.
Table of Contents
1) पीएफचे पैसे काढायचे असतील तर वाचा ईपीएफओचे नियम
सेवानिवृत्ती पूर्वी भविष्य निर्वाह निधी हा गुंतवणुकीचा नोकरदारांसाठी एक उत्तम पर्याय आहे. भविष्य निर्वाह निधी ही अशी रक्कम असते, जी सेवानिवृत्तीनंतर आपल्याला मिळते. पण पीएफ संस्था (Employees’ Provident Fund Organisation- EPFO) सेवानिवृत्तीच्या आधी विवाह, मेडिकल इमरजंसी, शिक्षण इत्यादींसाठी भविष्य निर्वाह निधीमधून काही प्रमाणात पैसे देते. यासाठी ईपीएफओची ऑनलाईन सुविधा देखील आहे. EPFO असा दावा करते की, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर केवळ तीन दिवसांमध्ये पीएफचे पैसे आपल्याला मिळतात. पण यासाठी काय नियमावली आहे पाहुयात. Employee Provident Fund Organisation

ईपीएफओचे नियम (Employee Provident Fund Organisation)
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर खरेदी किंवा बांधकाम, कर्जाची परतफेड करण्यासाठी, दोन महिन्यांसाठी वेतन न भरणं, अर्धवट पैसे काढणं किंवा स्वत: मुलीच्या लग्नासाठी पीएफचे पैसे काढण्याची परवानगी आहे. तुम्ही स्वत: च्या उपचारासाठी, पत्नी, मुलं किंवा आई-वडिलांच्या उपचारांसाठीही पीएफमधून पैसे काढू शकता.
- पीएफ मधील पैसे ऑनलाइन काढण्यासाठी ग्राहकाकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असणं आवश्यक आहे. यूएएन नंबर सक्रिय करण्यासाठी मोबाइल नंबरदेखील आवश्यक आहे.
- त्याबरोबर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक डिटेल्सबरोबर युनिव्हर्सल अकाउंट नंबर KYC वेरिफाईड केलेला असने हे गरजेचं आहे.
- ग्राहक खात्यामधून आघाऊ पैसे काढण्यासाठी ईपीएफओच्या इंटिग्रेटेड पोर्टलद्वारे दावा करु शकतात. यानंतर हा दावा मालकाला मंजुरीसाठी पाठवला जातो. मंजुरी मिळाल्यानंतर ही रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाते.
- तुम्ही भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढून घेतल्यानंतर सेवानिवृत्तीच्या वेळी तुम्हाला मोठा तोटा सहन करावा लागतो, असे मत आर्थिकतज्ञांनी व्यक्त केलेले आहे. त्यामुळे आपण आपल्या नोकरीच्या काळात तातडी नसेल तर पीएफमधून पैसे काढायचे नाहीत हे लक्षात ठेवा.
- एखदया व्यक्तीने पाच वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर पीएफ काढला तर ती रककम करमुक्त असमते. परंतू जर त्या व्यक्तीने आपली पाच वर्षांची सेवा पूर्ण न करता पीएफमधून पैसे काढते तर त्या रकमेवर कर आकारला जातो.
- वाचा: New Updates of 4 Investment Schemes | गुंतवणूक
2) ‘पीएफ’ खात्यात व्याज जमा झाले का? अशी करा खात्री
आपल्या पीएफ खात्यात पीएफ जमा झाला आहे की नाही याची खातरजमा पीएफ सभासदांना खालील चार वेगवेगळ्या पर्यायांमधून करता येणार आहे. (वाचा: ITR filing date extended | ITR भरण्याची मुदत पुन्हा वाढली)
सभासदांना आपली पीएफची शिल्लक रक्कम Umang App दवारे तपासता येईल

स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरमधून Umang App डाउनलोड करावे. नंतर या ॲपमध्ये तुमचा मोबाइल नंबर टाका रजिस्टर करा व नंतर पुन्हा लॉगिन करा. Employee Provident Fund Organisation
ऍपमध्ये डाव्या बाजूला असलेल्या मेन्यूमध्ये ‘Service Directory’ मध्ये जा.
‘Service Directory’ मध्ये EPFO या पर्यायाची निवड करा.
यात View Passbook यावर क्लिक करुन त्यात UAN नंबर आणि OTP सादर करुन पीएफची शिल्कक जाणून घेता येईल.
SMS मधून कळेल तुमचा पीएफ बॅलन्स (Employee Provident Fund Organisation)
या सेवेसाठी तुमचा UAN नंबर EPFO कडे रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे.
तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर ‘EPFOHO UAN ENG’ हा संदेश पाठवावा लागेल.
ही सेवा इंग्रजी, हिंदी, पंजाबी यासारख्या 10 विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे.
वाचा: How to Make an Investment Plan? | गुंतवणूक प्लॅनिंग
मिस्ड कॉल देऊन तुम्हाला मिळेल माहिती
ज्याप्रमाणे तुम्ही SMS सेवेचा उपययोग करुन तुमचा बॅलन्स तपासता, त्याप्रमाणे तुम्ही मिस्ड कॉल देऊन पीएफचा बॅलन्स तपासू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस्ड कॉल करा..
या सेवेसाठी तुमचा UAN नंबर, PAN नंबर आणि आधार नंबर लिंक असायला हवा.
वाचा: How to avoid NFT Scams? | एनएफटी घोटाळे कसे टाळावेत
‘ईपीएफओ’ वेबसाइटवरुन मिळेल माहिती
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या epfindia.gov.in या वेबसाईटवर शिल्लक रक्कम किती आहे याची माहिती घेता येईल.
ही वेबसाईट ओपन केल्या नंतर passbook.epfindia.gov.in या एका नवीन पेजवर तुम्हाला माहिती सादर करावी लागेल.
या पेजवर तुम्हाला तुमचा UAN नंबर, त्यानंतर पासवर्ड आणि शेवटी कॅप्चा कोड भरावा लागेल.
सर्व माहिती भरल्यानंतर आणखी एक नवीन पेज खुले होईल आणि यात तुम्हाला मेंबर आयडीची निवड करावी.
यात ई-पासबुकमधून तुम्हाला ईपीएफ शिल्लक रक्कम कळेल.
3) तुम्ही आता, तुमच्या ‘पीएफ’ची माहिती मराठीतूनही मिळवु शकता | Now, get your PF information in Marathi
- आता कर्मचा-यांना त्यांच्या पीएफ अकाऊंटची माहिती त्यांच्या मोबाईलवर आणि आपल्या मातृभाषेत उपलब्ध होत आहे.
- ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून आपल्या पसंतीची भाषा निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलीय. यामध्ये, मराठी भाषेचाही समावेश आहे. वाचा: Why is the Investment more Important |गुंतवणूकीचे महत्व
- EPFO ऑनलाईन सेवेचा भाग असलेली ही सुविधा; केवळ ज्या सभसदांनी आपलं ‘युनिव्हर्सल अकाऊंट (Universal Account)’ अॅक्टिव्हेट केलं असेल त्याच सभासदांना ही सेवा होईल.
- यापूर्वी EPFO च्या वेबसाईटवर केवळ इंग्रजी आणि हिंदीतूनच माहिती मिळत होती. ती आता इतर 10 भाषेत उपलब्ध होणार आहे. वाचा: Know all about Atal Pension Yojana | अटल पेन्शन योजना
कशी सुरु कराल ही सुविधा आपल्या भाषेतून
- यासाठी, तुम्हाला युनिव्हर्सल नंबर ॲक्टक्टिव्ह करताना रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला एक एसएमएस पाठवायचाय.वाचा: What is National Pension System? | नॅशनल पेन्शन सिस्टम
- मॅसेजमध्ये EPFOHO UAN असं टाईप करा
- नंतर स्पेस दया व आपली पसंतीची भाषा असेल तिची पहिली तीन अक्षरं टाईप करा. मराठीसाठी MAR (EPFOHO UAN MAR) लिहा. वाचा NPS- Retirement Plan for All Citizens | राष्ट्रीय पेन्शन प्रणाली
- आणि हा मॅसेज पाठवा ७७३८२९९८९९ या क्रमांकावर

4) पीएफ खात्यातून मध्येच पैसे काढले तर होणारे नुकसान, समजून घ्या
अनेक कर्मचारी आपल्या गरजेनुसार पीएफ खात्यातून पैसे काढत असतात; परंतू जर तुम्हाला खेरोखरचं त्या पैशांची खूपच गरज असेल, दुसरा मार्ग नसेल तरचं तुम्ही ते पैसे काढा. Employee Provident Fund Organisation
कर्मचारी आपल्या पीएफ खात्यात जी रक्कम जमा करतो; तिच रक्कम त्याच्या सेवानिवृत्तीनंतर आधार बनते. तसेच अनेकदा कर्मचारी आपल्या गरजेनुसार; पीएफ खात्यातून पैसे काढत असतात. तुम्हाला जर खेरोखरचं त्या पैशांची तातडीची गरज असेल; तरचं तुम्ही ते पैसे काढा. वाचा: What are the Best Investment Options | गुंतवणूक पर्याय
पण जर तुम्हाला खरोखर जास्त गरज नसेल; आणि तुम्ही पैसे काढले तर ते तुमच्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. खरंतर सेवानिवृत्तीपूर्वी; पैसे काढण्यामुळे तुम्ही 10 पट जास्त पैसे गमावू शकता. खरंतर सेवानिवृत्तीपूर्वी पैसे काढण्यामुळे तुम्ही 10 पट जास्त पैसे गमावू शकता. Employee Provident Fund Organisation
कसे ते पहा…
तुम्ही जेवढी रक्कम काढता त्यापेक्षा 10 पट जास्त पैशांचं नुकसान होतं व तुमच्या सेवानिवृत्तीच्या फंडावरही परिणाम होतो. मध्येच पैसे काढण्यामुळे तुमचे बरेचं नुकसान होणार आहे. जर तुम्ही 1 लाख रुपये जमा केले असतील तर, तुम्हाला त्यावर व्याज मिळत रहाणार आणि त्याची मुदत रक्कम 11.55 लाख रुपयांपर्यंत होईल.
त्यामुऴे अतिमहत्वाचे असल्याशिवाय तुमच्या ईपीएफमधून पैसे काढू नका. हे पैसे तुमच्या वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत जमा केली जाते आणि त्या वयाचे होईपर्यंत ही रक्कम ब-यापैकी वाढलेली असणार. सध्या कर्मचा-यांना पीएफ अकाउंटवर 8.5 % दराने व्याज मिळत आहे. सर्व प्रकारच्या छोट्या बचत योजनांच्या तुलनेत हा सर्वाधिक व्याज दर आहे. वाचा: How to get one lakh monthly pension | दरमहा रु.1 लाख पेन्शन
सेवानिवृत्तीसाठी 30 वर्षे असतील तर
समजा तुमच्या सेवानिवृत्तीसाठी 30 वर्षे बाकी आहेत; आणि तुम्ही तुमच्या खात्यामधून 50 हजार रुपये काढले तर; तुम्हाला 5 लाख 27 हजार रुपयांचे नुकसान होईल. तसेच 1 लाख रुपयांवर 11 लाख 55 हजार रुपये नुकसान होईल; 2 लाख रुपयांवर 23 लाख 11 हजार रुपये नुकसान होईल; व 3 लाख रुपयांवर 34 लाख 67 हजार रुपयांचे नुकसान होईल. वाचा:New guidelines of EPFO for tax | EPFO ची नवीन मार्गदर्शक तत्वे
सेवानिवृत्तीसाठी 20 वर्षे असतील तर
सेवानिवृत्ती साठी तुमची 20 वर्षे असतील आणि तुम्ही 50 हजार रुपये काढले तर; तुमचा 2 लाख 5 हजार रुपयाचा तोटा होईल. त्याचप्रमाणे 1 लाख रुपयांवर 5 लाख 11 हजार रुपये; 2 लाख रुपयांवर 10 लाख 22 हजार रुपये; 3 लाख रुपयांवर 15 लाख 33 हजार रुपयांचे नुकसान होईल;.त्यामुळे आता तुम्हीच विचार करा की, या पीएफ अकाउंटमधून पैसे काढायचे की नाही ते. वाचा: All About National Pension Scheme 2022 | एनपीएस योजना
Universal Account Number (UAN)
MEMBER e-SEWA लॉगिनसाठी येथे क्लिक करा.
Related Posts
- Tax Free Income in India | भारतात कोणते ‘उत्पन्न करमुक्त’ आहे
- How to Claim TDS Refund? | टीडीएस परताव्याचा दावा कसा करावा
- TDS: All about tax deducted at source | सर्वकाही कर कपाती विषयी
- All About Income Tax Return Form1 Sahaj |सर्वकाही ITR-1 विषयी
- What are the tax rules about savings accounts? बचत खाते व कर
Related Post Categories
शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत”शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Ganpati-6 Know all about Girijatmaj Lenyadri | गिरिजात्मज, लेण्याद्री

What things give you energy? | कोणत्या गोष्टी तुम्हाला ऊर्जा देतात?

Ganpati-5 Know all about Chintamani Theur | चिंतामणी थेऊर

Ganpati-4 Know all about Varadvinayak Mahad | वरदविनायक, महाड

Ganpati-3 Know all about Ballaleshwar Pali | बल्लाळेश्वर, पाली

Ganpati-2 Know all about Siddhivinayak Siddhatek | सिद्धिविनायक

Ganpati-1 Know all about Moreshwar Morgaon | मोरेश्वर, मोरगाव

What are daily good habits? | रोजच्या चांगल्या सवयी काय आहेत?

Share the lessons you have learned in life | आयुष्यात शिकलेले धडे
