Skip to content
Marathi Bana » Posts » What are the tax rules about savings accounts? बचत खाते व कर

What are the tax rules about savings accounts? बचत खाते व कर

What are the tax rules about savings accounts?

What are the tax rules about savings accounts? | एका व्यक्तिला किती बचत खाती ठेवता येतात?, बचत खात्या बाबत आयकर नियम काय आहेत? पीएफ व्याजावर भरावा लागणार आता कर

बचत खाती व आयकराबाबत एक सामान्य प्रश्न असा आहे; की, जो बहुतेक लोकांना पडलेला असतो. एक व्यक्ती एकाच वेळी किती बचत खाती कार्यरत ठेवू शकते? म्हणजे आयकर विभागाकडून त्या व्यक्तीला; कोणतिही नोटीस येणार नाही. तसेच एक व्यक्ती आपल्या बचत खात्यात; किती जास्तीत जास्त रक्कम शिल्लक ठेवू शकते? जेणेकरुन आयकर विभाग नोटीस पाठवणार नाही. असे करदात्याच्या मनात बचत बँक खात्याबाबत; अनेक संभ्रम निर्माण करणारे प्रश्न असतात. नागरीकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी; या लेखात सविस्तर माहिती दिलेली आहे. (What are the tax rules about savings accounts?)

प्राप्तिकर व बचत खाती यांचा संबंध काय आहे?

What are the tax rules about savings accounts?
What are the tax rules about savings accounts?/ Photo by Mayur Bhutada on Pexels.com

एक व्यक्ती एकाच वेळी; किती बचत खाती कार्यरत ठेवू शकते? म्हणजे आयकर विभागाकडून त्या व्यक्तीला; कोणतिही नोटीस येणार नाही. या बाबत असा कोणताही आयकर नियम नाही; की, ज्याद्वारे जास्तीत जास्त बचत खाती असलेल्या व्यक्तीस; आयकर विभागाकडून नोटीस येणार आहे. याचा अर्थ असा आहे की; बचत खात्याशी प्राप्तिकराचा काहीही संबंध नाही. एखादी व्यक्ती आपल्याला पाहिजे तितकी बचत खाती उघडू शकते.

दुसरा प्रश्न असा होता की, एक व्यक्ती आपल्या बचत खात्यात; किती जास्तीत जास्त रक्कम शिल्लक ठेवू शकते? जेणेकरुन आयकर विभाग नोटीस पाठवणार नाही. (What are the tax rules about savings accounts?)

एखादया व्यक्तीच्या खात्यात ठेवल्या जाणाऱ्या जास्तीत जास्त रकमेवर; कोणतीही मर्यादा नाही, जी आयकराशी संबंधित आहे. एखादी व्यक्ती आपल्या बचत खात्यात; हवी तेवढी रक्कम ठेवू शकते. मात्र व्यवहारांवर; आयकर नियम लागू आहे. म्हणजेच बचत खात्यातील किती रक्कम तुम्ही कुठे; व कशी खर्च करता. तुम्ही ती रक्कम रोखीने खर्च करा; किंवा क्रेडिट-डेबिट कार्डचा वापर करुन खर्च करा, या बाबत काळजी घेतली पाहिजे.

रोख व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी?

एक किंवा अनेक बचत खाती असलेल्या व्याक्तीला; जर आयकर नोटीस टाळायची असेल तर; त्यांनी रोख व्यवहारांची काळजी घेतली पाहिजे. जर खातेदाराने याकडे लक्ष दिले तर; आयकर कारवाई टळू शकते. त्यासाठी खातेदाराने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे; ती म्हणजे एका वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करु नयेत. एक व्यक्ती आपल्या खात्यातून; दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाही; किंवा त्या बचत खात्यात; दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करु शकत नाही. जर खातेदाराने हा नियम मोडला तर त्या व्यक्तीला आयकर नोटीस येऊ शकते.

नोटबंदीनंतर बँकांना एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त रोख व्यवहारांवर; शुल्क आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढे, RBI ने असामान्य रोख व्यवहारांची चौकशी करणे; अनिवार्य केले आहे. याचे कारण असे की जेव्हा; 500 आणि 1000 रुपयांची रोकड जमा होते; तेव्हा बरेच गैरप्रकार लक्षात आले. अशी प्रकरणे हाताळताना अधिकार्‍यांच्या मूल्यांकनासाठी; मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचे वर्णन करणारे एक परिपत्रक वित्त मंत्रालयाने पारित केले. त्यानुार तुमच्या व्यवहारासाठी पडताळणी वॉरंट जारी केले जाऊ शकते. (What are the tax rules about savings accounts?)

एका वर्षात किती रक्कम जमा किंवा काढली जावी?

What are the tax rules about savings accounts?
What are the tax rules about savings accounts?/ Photo by Ravi Roshan on Pexels.com

एखादया व्यक्तीने बचत खात्यात एका वर्षात; फक्त दहा लाख जमा करावेत किंवा काढावेत. जर दहा लाखांपर्यंत रक्कम जमा केली किंवा एकूण दहा लाखाच्या बदल्यात रक्कम काढली; तर नोटीसची शक्यता अधिक वाढते. जर दहा लाखांची मर्यादा ओलांडली तर; आयकर कारवाई शक्य आहे, ती कोणीही वाचवू शकत नाही. बचत बँक खात्यासाठी हा नियम आहे. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे; एकच व्यवहार दोन लाखांपेक्षा जास्त नसावा; आणि एकूण व्यवहार एका वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त नसावा. जर एखादया व्यक्तीने हा नियम मोडला तर; आयकर विभाग कारवाई करेल.

आयकर विभागाला व्यवहारांची माहिती कशी मिळते?

जर एखादया व्यक्तीने एका वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त; किंवा एकाच वेळी दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार केला; तर आयकर विभागाला त्याची माहिती कशी मिळते? जर पॅन नंबर बँक खात्याशी लिंक केलेला असेल; आणि तुम्ही तुमच्या बचत खात्यातून दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली किंवा जमा केली तर; आयकर विभागाला पॅनद्वारे माहिती मिळते.

जर पॅन लिंक नसेल, तर ज्या बँकेत तुम्ही दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली किंवा काढली; तर ही माहिती ती बँक आयकर विभागाला कळवते. कर विभागाला माहिती देण्यासाठी सहकारी बँक; आणि पोस्ट मास्टर जनरल यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. सहकारी बँका किंवा पोस्ट ऑफिस यांचेद्वारे पैसे जमा करता येतात; किंवा काढता येतात. त्यामुळे सहकारी बँक आणि पोस्ट मास्टर जनरल यांनाही माहिती देण्याचा अधिकार दिलेला आहे.

चालू खात्याचा नियम काय आहे? (What are the tax rules about savings accounts?)

एका आर्थिक वर्षात जर एखाद्या व्यक्तीने; बँक ड्राफ्ट खरेदी करण्यासाठी किंवा वेतन आदेश घेण्यासाठी; दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम रोख खर्च केली; तर त्याला नोटीस मिळू शकते. रिझर्व्ह बँकेने प्रीपेड इन्स्ट्रुमेंटचा दर्जा दिलेले उत्पादन; खरेदी करण्यासाठी आर्थिक वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त खर्च केल्याबद्दलही; कारवाई केली जाऊ शकते. चालू खात्यासाठी देखील असाच नियम आहे; परंतु व्यवहाराची मर्यादा पन्नास लाख ठेवण्यात आली आहे. चालू खात्यावर एका वर्षात पन्नास लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करु शकत नाही; किंवा पन्नास लाखांपेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाही. हे काम धनादेश देऊनही करता येत नाही.

आता पी.एफ. व्याजावर भरावा लागणार कर, सरकारचा नवा नियम

केंद्र सरकारने नवीन आयकर नियमावली अधिसूचित केली आहे; त्या  अंतर्गत विद्यमान भविष्य निधी खाते दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागले जाईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, पीएफवरील व्याज मोजण्यासाठी पीएफ खात्यातच एक वेगळे खाते उघडले जाईल. वाचा: NEW YEAR… NEW RULES 2022 | नवे वर्ष… नवे नियम 2022

What are the tax rules about savings accounts?
What are the tax rules about savings accounts?/ Photo by maitree rimthong on Pexels.com

पीएफ खाते दोन विभागामध्ये विभागले जाईल (What are the tax rules about savings accounts?)

नवीन अधिसूचनेनंतर, सर्व कर्मचा-यांचे भविष्य निधी खाते करपात्र आणि कर-नसलेल्या योगदान खात्यांमध्ये विभागले जाईल. वाचा: How to plan IT for the FY 2022-23 | आयकर नियोजन

पीएफ व्याजावर कर केंव्हापासून लागू होईल?

सीबीडीटी च्या अधिसूचनेनुसार 31 मार्च 2021 पर्यंत; कोणत्याही योगदानावर कोणताही कर लावला जाणार नाही, परंतु 2020-21 आर्थिक वर्षानंतर पीएफ खात्यांवर मिळणारे व्याज करपात्र असेल; आणि त्याची स्वतंत्र गणना केली जाईल. पीएफ खात्यात 2021-22 आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये वेगवेगळी खाती असतील.वाचा: What is the EPF & how to calculate PF balance? |ईपीएफ योजना

सीबीडीटी ने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की; नवीन नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील; परंतु 2021-22 आर्थिक वर्षापर्यंत, जर तुमच्या खात्यात वार्षिक ठेव 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर; त्यावर मिळणारे व्याज करपात्र असेल. आणि त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल. लोकांना पुढील वर्षाच्या आयकर विवरणपत्रात; या व्याजाची माहिती द्यावी लागेल.

यापूर्वी एकदा हा प्रस्ताव मागे घेतलेला आहे (What are the tax rules about savings accounts?)

यापुर्वी देखील 2016 मध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या एकूण रकमेपैकी; 60 टक्के रकमेच्या व्याजावर कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानंतर सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला; आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तो प्रस्ताव मागे घेतला होता. लोकसभेमध्ये निवेदन करुन त्यांनी हा प्रस्ताव; मागे घेत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी विविध कर्मचारी संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी; सरकारच्या या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता. (What are the tax rules about savings accounts?) वाचा: Post Office NSC Scheme | पोस्ट ऑफिस NSC योजना

Related Posts

Related Post Categories

आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Diploma: The best career option after 10th

Diploma: The best career option after 10th | 10वी नंतर डिप्लोमा

Diploma: The best career option after 10th | 10वी नंतर करिअरचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे डिप्लोमा कोर्सेस; कमी कालावधी व कमी ...
Read More
The Best Law Courses After 12th

The Best Law Courses After 12th | 12वी नंतर कायदा अभ्यासक्रम

The Best Law Courses After 12th | 12वी नंतर कायदा अभ्यासक्रम; कायदा अभ्यासक्रम कोर्स, कालावधी, पात्रता; अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाचे प्रकार व ...
Read More
4 Important Actions About Aadhaar card

4 Important Actions About Aadhaar card | आधार अपडेट्स बाबत

4 Important Actions About Aadhaar card | आधार अपडेट्स बाबत महत्वाच्या चार क्रिया; आधार प्रमाणीकरण, इतिहास, पॅन- आधार लिंक, आधार ...
Read More
Latest Water Purification Technologies

Latest Water Purification Technologies | नवीन जल शुध्दी तंत्रज्ञान

Latest Water Purification Technologies | नवीन जल शुद्धीकरण तंत्रज्ञान; नॅनो तंत्रज्ञान, ध्वनिक नॅनोट्यूब तंत्रज्ञान, फोटोकॅटॅलिटिक तंत्रज्ञान, एक्वापोरिन्स तंत्रज्ञान आणि ऑटोमेटेड ...
Read More
Psychology: The best career option after 12th

Psychology: The best career option after 12th | मानसशास्त्र

Psychology: The best career option after 12th | 12 वी नंतर मानसशास्त्राचा अभ्यासक्रम; हा उत्तम करिअर पर्याय आहे. अभ्यासक्रम पात्रता, ...
Read More
How to Make a Career in Merchant Navy

How to Make a Career in Merchant Navy | करिअर इन मर्चंट नेव्ही

How to Make a Career in Merchant Navy | मर्चंट नेव्हीमध्ये करिअर कसे करावे; पात्रता, प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रम, नोकरीच्या संधी; ...
Read More
Bachelor of Arts in Hotel Management

Bachelor of Arts in Hotel Management | हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीए

Bachelor of Arts in Hotel Management | हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीए, कोर्स, पात्रता, अभ्यासक्रम, महाविद्यालये, फी, करिअरची व्याप्ती बॅचलर ऑफ आर्ट्स ...
Read More
Marine Engineering: the best option for a career

Marine Engineering: the best option for a career | सागरी अभि.

Marine Engineering: the best option for a career | सागरी अभियांत्रिकी पदवी; प्रवेश, पात्रता, अभ्यासक्रम, महाविद्यालये, पगार व करिअर संधी ...
Read More
How to become a corporate lawyer

How to become a corporate lawyer | कॉर्पोरेट वकील कसे व्हावे

How to become a corporate lawyer | कॉर्पोरेट वकील कसे व्हावे, कॉर्पोरेट कायदा अभ्यासक्रम तपशील; पात्रता, प्रवेश, फी, कालावधी, करिअरच्या ...
Read More
Diploma in Information Technology

Diploma in Information Technology | माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा

Diploma in Information Technology | माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा; पात्रता, प्रवेश, अभ्यासक्रम, कौशल्ये, महाविदयालये, व्याप्ती, सरासरी वेतन व प्रमुख रिक्रुटर्स. माहिती ...
Read More
Spread the love