Study Time Table for Students | विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक, वेळेचे पैशापेक्षाही अधिक मूल्ये आहे; आपण अधिक पैसे मिळवू शकता, परंतू गेलेला वेळ परत मिळवता येत नाही.
विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे; आपला वेळ कार्यक्षम आणि प्रभावीपणे वापरणे. वेळेचे नियोजन प्रत्येक विद्यार्थ्याला गोंधळात टाकणारा; सर्वात कठीण भाग आहे. इतर बाबीमध्ये कोणिही तुम्हाला मदत करेल; परंतु वेळेचे व्यवस्थापन ही एक अशी गोष्ट आहे; जी आपण स्वतः व्यवस्थापित केली पाहिजे. आपले मित्र किंवा कुटुंब आपल्या प्रोजेक्टच्या कार्यात; गृहपाठ पूर्ण करण्यात; मदत करु शकतात. परंतु आपला वेळ व्यवस्थापित करण्यास; कोणीही मदत करु शकत नाही. Study Time Table for Students
वेळ व्यवस्थापन हा विद्यार्थी जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे; आणि प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचे व्यवस्थापन; योग्य प्रकारे केले पाहिजे. गेलेली वेळ पुन: येत नाही; आणि वेळ कोणासाठी थांबतही नाही. हे माहित असूनही बरेचजण वेळेचे नियोजन करण्यात यशस्वी होत नाहीत.(Study Time Table for Students)

विद्यार्थी मित्रहो हे ध्यानात घ्या; “एका ठराविक वयानंतर; लिहिण्यासाठी आपल्याला पेन्सिल ऐवजी पेन दिला जातो, त्याचे कारण आपल्या लक्षात आलं पाहिजे; जसे- जसे आपण मोठं होत जातो; तशा आपल्या चूका खोडल्या जात नाहीत. म्हणजे आपल्याकडून चूकांची अपेक्षा नसते” वेळेचे पैशापेक्षाही अधिक मूल्ये आहे; आपण अधिक पैसे मिळवू शकता; परंतू गेलेला वेळ परत मिळवता येत नाही.
वाचा: 10 Important Study Tips for Students | अभ्यास नको! मग वाचा…
वेळेचे महत्व सांगताना म्हटलेले आहे की; आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा; नाहीतर जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा माणसं जवळ नसतील. तेंव्हा आयुष्यात काय करायचे; नियोजन कसे करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका, नाही तर तुम्ही काय करायचं हे तीच वेळ ठरवेल.
वाचा: Improve the Quality of Education | शिक्षणाचा दर्जा सुधारा
Study Time Table for Students असंच आहे; जे आपणास आपल्या अभ्यासासह ट्रॅकवर राहण्यास मदत करते; आणि अभ्यासाचा वेळ संतुलित करण्यास मदत करते; जेणेकरुन आपल्याकडे इतर कामांसाठी देखील वेळ असेल.
वाचा: How Important is Learning Abacus? | अबॅकसचे महत्व
जेव्हा आपण आपल्या परीक्षांच्या अगोदर नियोजन करता; तेव्हा आपल्याला काय करावे लागेल; हे माहिती असते. Study Time Table for Students आपणास; आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या इतर कार्यांमध्ये फिट होण्यास मदत करते; आणि जीवनाच्या इतर महत्त्वपूर्ण कामांसाठी; वेळ काढण्यासही मदत करते.
वाचा: Good Habits for Students | विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सवयी
ब-याच यशस्वी विद्यार्थ्यांना Study Time Table for Students; अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करावे; हे माहित असते. जर आपल्याला चांगली ग्रेड मिळविण्यात यश हवे असेल तर; आपण अभ्यासाचे वेळापत्रक तयार केलेच पाहिजे. आपणास ही म्हण माहित असेल, ‘केल्याने होत आहे; पण आधी केलेच पाहिजे’. त्यासाठी वेळ न दवडता, लगेच तयारीला लागा.
वाचा: How to Study Alone at Home | घरी अभ्यास कसा करावा
असे तयार करा तुमचे वेळापत्रक (Study Time Table for Students)

विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही तुमचे अभ्यासाचे स्वतंत्र वेळापत्रक (Study Time Table for Students) तयार करा. ते कसे तयार करायचे? तर समजा तुमची शाळा 15 जूनला सुरु झाली, तर 15 जून ते 30 जून पर्यतचेच वेळापत्रक तयार करा.
लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे; वेळापत्रक हे लवचिक व एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे; तयार करु नका. दुसरी गोष्ट म्हणजे; एका वेळी पूर्ण वर्षातील 12 महिन्याचे; वेळापत्रक तयार करु नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेळापत्रक (Study Time Table for Students) तयार करण्यापूर्वी; वेळेचे नियोजन करा. जसे की, तुमचे घर आणि शाळा यामधील अंतर; शाळेत जाण्यासाठी लागणारा वेळ;. अभ्यासासाठी शाळेत जाण्यापूर्वी; आणि शाळेतून घरी परत आल्यानंतर; मिळणारा वेळ, इ.
वाचा: Adverse effects of media on children | मीडिया आणि मुले
वेळापत्रक तयार करताना; सर्वप्रथम तुम्ही शिकत असलेल्या विषयांची नावे लिहा. उदा. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान; सामाजिक शास्त्रे इ. नंतर तुम्हाला अवघड वाटत असलेले विषय; अधोरेखित करा. आणि त्या विषयांच्या अभ्यासासाठी वेळापत्रकात जास्त वेळ द्या.
वाचा: How to be a Good Student? | आदर्श विद्यार्थी कसे व्हावे?
आठवडयातील सोमवार ते रविवार; असे सलग सात दिवसांचे वेळापत्रक तयार करु नका; तर त्यातील 1 दिवस फ्री ठेवा. म्हणजे जर काही कारणास्तव; एखाद्या विषयाचा अभ्यास; आठवडयातील नियोजनाप्रमाणे झाला नाही, तर त्या फ्री असलेल्या दिवशी; राहिलेल्या विषयाचा अभ्यास करता येईल. किंवा आठवडयातील गृहपाठासाठी; तो दिवस वापरता येईल.
अभ्यासाचे वेळापत्रक Study Time Table for Students: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आपण वेळापत्रक डाऊनलोड देखील करु शकता.
अशाप्रकारे; तुम्ही तुमचे प्रत्येक महिन्याचे अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. वरील वेळापत्रक हे जुलै महिन्यातील आहे; शाळा सुरु झाल्यानंतर; जुलै महिन्यापर्यंत थोडा अभ्यासक्रम वर्गात शिकवलेला असतो. त्यामुळे नमुना वेळापत्रकामध्ये अभ्यासासाठी वेळ कमी दर्शविलेला आहे; आपण प्रत्येक महिन्यात; आपल्या गरजेनुसार; अभ्यासाच्या वेळेत बदल करु शकता.
- वाचा: The Role of the Teacher in Child Protection: बालसंरक्षण व शिक्षक
- How to be a successful teacher | यशस्वी शिक्षक कसे व्हावे
वेळापत्रक तयार करताना खालील मुद्दे विचारात घ्या
आपली शिकण्याची शैली शोधा (Study Time Table for Students)
इतरांच्या वेळापत्रकाचे कधीही पालन करु नका; कारण प्रत्येकाच्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या शैली असतात. प्रत्येकाची आकलन किंवा स्मरणशक्ती, भिन्न सर्जनशील मन आणि अर्थातच; भिन्न शिक्षण शैली असते. म्हणून, सर्वप्रथम, कोणती शिकण्याची शैली आपल्यासाठी सर्वात योग्य आहे; हे शोधणे आवश्यक आहे.
काही विदयार्थ्यांना सकाळी अभ्यासाठी चांगले वाटते तर; काही रात्रीचा अभ्यास करणं पसंत करतात. प्रथम आपण आपल्या अभ्यासासाठी; वेळ निश्चित करा.
वाचा: Why skill-based education is important | कौशल्यावर आधारित शिक्षणाचे महत्व
तुमच्या मोकळया वेळेचे नियोजन करा
आपला वेळ अभ्यासासाठी तसेच मनोरंजनासाठी देखील विभागून व्यवस्थापित करा; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाव्यतिरिक्त; शारीरिक हालचालिंसाठी थोडा वेळ घालवणे देखील खूप महत्वाचे आहे. तुमचा मोकळा वेळ मित्रांसोबत गप्पा मारण्यात; किंवा सोशल मीडियामध्ये वेळ घालवू नका; कारण तुमच्यासाठी प्रत्येक मिनिट मौल्यवान आहे; त्याचा आपल्या अभ्यासासाठी उपयोग करा. हे
वाचा: How to be a Successful Student: विद्यार्थी यशस्वी होण्याचा मार्ग
आपली प्रगती नियमित तपासा (Study Time Table for Students)
काही आठवडे किंवा महिन्यानंतर, आपण किती प्रगती केली आहे ते तपासा; आणि स्वतःला बक्षीस द्या. आपण तयार केलेल्या अभ्यासाचे वेळापत्रक; योग्य परिणाम आणत नसल्यास; वेळ बदलण्याचा प्रयत्न करा.
वाचा: The Role of Parents in the Success of their Children | मुलांच्या यशात पालकांची भूमिका
विश्रांतीसाठी वेळ निश्चित करा (Study Time Table for Students)
अभ्यासामध्ये लहान ब्रेक आवश्यक आहे; कारण आपण एक माणूस आहोत, रोबोट नाही जो दीर्घकाळ; अविरतपणे काम करु शकतो. आपण जे करतो त्यामध्ये अधिक चांगले प्रदर्शन करण्यासाठी; विश्रांतीची आवश्यकता असते. अनेक तज्ञांचे संशोधन सांगते की; एखाद्याने 45 मिनिटे काम केले; म्हणजे नंतर थकवा टाळण्यासाठी; 5 ते 10 मिनिटे विश्रांती घ्यावी.
वाचा: 14 Benefits of Abacus for Kids | मुलांसाठी ॲबॅकस शिकण्याचे फायदे
आपल्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करा
अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे जितके महत्त्वाचे आहे; तितकेच ते पाळणे महत्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या हेतूने; कोणीही वेळापत्रक बनवत नाही. परंतु कधीकधी, अशी परिस्थिती उद्भवू शकते; जेव्हा आपल्याला आपला अभ्यास एका दिवसासाठी; किंवा काही दिवसांसाठी करता येत नाही. त्यानंतर पुन्हा अभ्यासाचे नियोजन करा.
वाचा: Information on Education in Maharashtra: महाराष्ट्रातील शिक्षण
Study Time Table for Students-हा लेख तुम्हाला कसा वाटला; या बद्दल आपला अभिप्राय व सूचना कमेंटमध्ये जरुर कळवा. आपला प्रतिसाद व सुभेच्छा आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत; त्या नवचैतन्य देतात व त्यामुळे नवीन लेख लिहिण्यास प्रेरणा मिळते. आपण हा लेख आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद…!
हे देखील वाचा:
- How to Memorize New Vocabulary | नवीन शब्द कसे लक्षात ठेवावेत
- Tally The Most Useful Certificate Course | टॅली कोर्स प्रमाणपत्र
- Diploma in X-Ray Technology after 12th: एक्स-रे तंत्रज्ञान डिप्लोमा
- Diploma in Petroleum Engineering after 10th: पेट्रोलियम डिप्लोमा
- Beautician Course is a Valuable Career Option | ब्यूटीशियन जॉब
- Best Career in Drawing and Painting | ड्रॉईंग व पेंटींगमध्ये करिअर
- शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या

Best healthy foods to eat in winter | हिवाळ्यातील आरोग्यदायी पदार्थ

Know about the winter skincare tips | स्किनकेअर टिप्स

Most effective ways to reduce obesity | लठ्ठपणा कमी करण्याचे मार्ग

Know the Types of Real Estate | RE गुंतवणुकीचे प्रकार

Direct Equity Investment Plans | थेट इक्विटी गुंतवणूक

Know The Best PO Saving Schemes | PO बचत योजना-2

How drinking water helps to lose weight? | पिण्याचे पाणी व वजन

Importance of the skin health | त्वचा आरोग्याचे महत्त्व

Know All About Low Blood Pressure | कमी रक्तदाब
