10 Important Study Tips for Students | अभ्यास नको! मग वाचा..

10 Important Study Tips for Students

10 Important Study Tips for Students | विद्यार्थ्यासाठी अभ्यास कसा करावा; या बाबत अनुभवी शिक्षकांच्या 10 मार्गदर्शक सूचना, ज्या विदयार्थ्यांमध्ये बदल घडवण्यासाठी नक्कीच मदत करतील.

विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाचा कंटाळा फक्त तुम्हालाच येतो असं नाही; तर अत्युच्च शिखरावर पोहोचलेल्या प्रत्येक व्यक्तिला; त्यांच्या विद्यार्थी दशेत अभ्यास नकोसा वाटत असतो. तर मग तुम्ही म्हणाल या व्यक्ती अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचल्या कशा? असा प्रश्न आपल्याला पडणं साहजिकच आहे; त्याचे उत्तर म्हणजे त्यांना योग्य वेळी मिळालेलं योग्य मार्गदर्शन. (10 Important Study Tips for Students)

आपल्या धेय्यापर्यंत पोहचण्यासाठी; फक्त अभ्यास ही एकच गोष्ट पुरेशी नसते. तर त्यासाठी आपली मानसिकता असावी लागते; आणि ही मानसिकता त्यांच्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शकांनी तयार केली. त्यामुळेच त्यांना ते शक्य झालं. (10 Important Study Tips for Students)

आपणही हे करु शकता; परंतू त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या समोर एक धेय्य ठेवा. त्या धेय्यापर्यत आपल्याला पोहचायचे असेल तर; काही गोष्टी कराव्याच लागतील; त्यामध्ये अभ्यासही आहे ही मानसिकता ठेवा. कोणतिही गोष्ट सहजासहजी मिळत नाही हे लक्षात असू द्या.

त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे” हे मराठी सुभाषित आपण ऐकले असेल; अशक्य काहीच नाही, फक्त त्यासाठी प्रयत्न हवेत. आणि मी ते करणारच! ही मानसिकता, जिद्द व चिकाटी हवी. (10 Important Study Tips for Students)

मित्रांनो घराच्या खिडकीमध्ये एका छिद्रात काही मुंग्या राहात होत्या; त्यातील एक मुगी अन्नाच्या शोधात; खिडकितून खाली जमीनीवर येते. तिथे तिला अन्नाचा एक कण सापडतो; तो ती मुंगी आपल्या तोंडात घेऊन घराकडे जायला निघते. घराकडे जाण्यासाठी तिला भिंतिवरुनच जावे लागते; ती काही अंतर चढून गेल्यानंतर; भिंतीवरुन खाली पडते. ती पुन्हा भिंतीवर चढू लागते; व पुन्हा खाली पडते.

अशा प्रकारे तिच्या खाली पडण्याच्या अनेक वेळा होतात; परंतू शेवटी मुंगी तो अन्नाचा एक कण घेऊन; आपल्या घरी पोहचते. यावरुन एक गोष्ट लक्षात येते की; अपयश हे येतच असतं. कुणीतरी म्हटलं आहे की; “अपयश ही यशाची पहिली पायरी असते.” मुंगीला अनेक वेळा अपयश आलं; परंतू तिने आपली जिद्द व प्रयत्न सोडले नाहीत.

त्यामुळेच तर ती यशस्वी झाली; म्हणून एखाद्या अपयशाने खचून न जाता; पुन्हा जोमाने तयारीला लागले पाहिजे. अपयश आले, तरी निराश होऊ नका, आता अभ्यास करण्याविषयी; आपली मानसिकता तयार झाली असेल, अशी आशा करुया.

तर विद्यार्थी मित्रांनो; अभ्यास करण्यासाठी आपल्या मनाची तयारी झाली; म्हणून लगेच पुस्तक घेऊन धडाधड धडे वाचायला सुरुवात करायची, तर असे करु नका; अभ्यास जरुर करा, थोडाच करा; पण तो नियोजनबध्द करा; यासाठीच तर ही मार्गदर्शक तत्वं दिली आहेत.

ही मार्गदर्शक तत्त्वं मनापासून बारकाईने वाचा; त्याप्रमाणे नियोजन करुन अभ्यासाला सुरुवात करा. मग पाहा तुम्हाला तुमच्या धेय्यापर्यंत जाण्यापासून कोण अडवतं ते. येथे मुलांच्या शिक्षणात पालकांची भूमिका देखील महत्वाची आहे.

या मार्गदर्शक तत्वांमध्ये अभ्यास व आरोग्य या दोन्ही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. अभ्यासाबरोबर आरोग्य सांभाळणे हे देखील महत्वाचे आहे. हिंदीमध्ये एक मुहावरा आहे “सिर  सलामत तो पगडी पचास” म्हणजे आपण तंदुरुस्त असाल तर पुढे अशा अनेक परीक्षा आपण देऊ शकता. (10 Important Study Tips for Students)

अभ्यास कसा करावा या बाबत विद्यार्थ्यांसाठी 10 मार्गदर्शक तत्वे-सूचना

अभ्यासाचे स्वत:चे, स्वतंत्र वेळापत्रक तयार करा

विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही तुमचे अभ्यासाचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करा. अभ्यासाचे वेळापत्रक कसे बनवायचे यासाठी (Study Time Table for Student; विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक हा लेख वाचा. त्यामध्ये तुम्हाला एक महिन्याचे अभ्यासाचे नियोजन कसे करावे? या बाबत संपूर्ण; सविस्तर व वेळापत्रकासह माहिती मिळेल. त्यानंतर तुम्ही स्वतः पुढील महिन्याचे वेळापत्रक तयार करु शकता.

नियोजनाशिवाय अभ्यास करणे म्हणजे; आमंत्रणाशिवाय एखाद्याच्या घरी अचानक जाणे. अचानक आलेल्या पाहुण्याचा पाहुनचार करताना; यजमानांची जसी तारंबळ उडते; तसीच नियोजनाशिवाय अचानक केलेल्या अभ्यासाच्या बाबतीतही होत असतं. परीक्षा तोंडावर आल्याशिवाय; पुस्तक न उघडणा-या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही; असेच होत असत. म्हणून अभ्यास करा पण तो नियोजनबद्ध असावा. (10 Important Study Tips for Students)

अभ्यास करताना चित्र, आकृत्या किंवा फ्लो-चार्टचा वापर करा

आपण जेंव्हा अभ्यासाला बसता; तेंव्हा अभ्यासासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या जवळ ठेवा. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना; आपण फक्त वाचन किंवा लेखन यावर भर न देता; त्या विषयाशी संबंधित भागावर काही चित्र; आकृत्या किंवा फ्लो-चार्ट काढून तो भाग अधिक चांगला समजून घ्या.

असे केल्यामुळे तो भाग अधिक लवकर व चांगला समजतो; तसेच तो भाग दिर्घकाळापर्यंत आढवणीत राहतो. इंग्रजी भाषेत एक म्हण आहे; “A picture is worth a thousand words.” म्हणजेच; “चित्र एक हजार शब्दांच्या किमतीचे आहे.” एक हजार शब्दांमधून आपण जेवढे शिकतो; तेवढेच एका चित्रामधून शिकतो. म्हणून अभ्यास करताना चित्र, आकृत्या किंवा फ्लो-चार्टस यांचा वापर आवश्य करा. (10 Important Study Tips for Students)

कोणतिही संकल्पना समजून घ्या

बरेच विद्यार्थी अभ्यास करताना पाठांतरावर जोर देतात. घोकंपट्टी  करुन पाठांतर केलेला भाग पोपटासारख ते धडाघड बोलून दाखवतात मात्र जास्त काळ ते स्मरणात ठेवू शकत नाहीत. कारण त्या विषयाची मूळ संकल्पनाच त्यांना समजलेली नसते. तेंव्हा अभ्यास करताना कोणत्याही विषयाची संकल्पना समजून घेतल्यास तो भाग दिर्घकाळ चांगला स्मरणात राहतो. (10 Important Study Tips for Students)

स्वत:च्या नोटस स्वत: तयार करा

विद्यार्थी मित्रांनो; अभ्यासासाठी कोणत्याही विषयाचे रेडिमेड मटेरियल वापरु नका. कोणत्याही पश्नांची उत्तरे लिहिताना; मार्गदर्शकाचा आधार जरुर घ्या; परंतू तो मार्गदर्शक म्हणूनच असावा. ती उत्तरे जेंव्हा आपण स्वत: आपल्या शब्दात तयार करतो; आणि लिहितो तेंव्हा ती एकदा वाचली तरी दिर्घकाळ लक्षात राहतात; कारण ती आपण स्वत: तयार केलेली असतात.

दुसरे अशेकी; आपण तयार केलेली उत्तरे इतरांपेक्षा वेगळी असतात; युनिक असतात; त्यामुळे तपासणीसावर त्याचा वेगळा प्रभाव पडतो. तेंव्हा लक्षात ठेवा; इथून पुढे आपल्या स्वत:च्या नोटस स्वत: तयार करा, परीक्षेत त्याचा अनुभव घ्या; मग तुम्हाला तुमचे वेगळेपण लक्षात येईल. (10 Important Study Tips for Students)

समुहात अभ्यास करा

विद्यार्थ्यांनी समूह, ग्रुप किंवा गट करुन अभ्यास करण्याचे अनेक फायदे आहेत. उदा. एखादा भाग किंवा टॉपिक वर्गात शिकवला  तेंव्हा जर तो तुम्हाला चांगला समजला नसेल. किंवा तुम्ही त्यावेळी गैरहजर असाल तर, तुम्ही ग्रुपमधील आपल्या मित्राला विचारुन तो पुन: त्याच्याकडून समजून घेऊ शकता.

दुसरे अशे की, अभ्यासाच्या काही भागावर चर्चा केल्यानंतर ती संकल्पना अधिक स्पष्ट होते. ग्रुपमध्ये चर्चा करुन केलेला अभ्यास समरणात चांगला राहतो. एकमेकांच्या शंका निरसन करता येतात. (10 Important Study Tips for Students)

अभ्यासक्रमावर आधारित मागील सर्व प्रश्नपत्रिका सोडवा

मागील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवणे म्हणजे; विद्यार्थ्यांसाठी येणा-या परीक्षेचा मार्गदर्शक म्हणून उपयोग होतो. त्यातून परीक्षेमधील विविध प्रश्नांचे स्वरुप लक्षात येते; ऑबजेक्टिव्ह, लघुत्तरी व दिर्घोत्तरी प्रश्न; कशाप्रकारे विचारले जातात ते समजते. यातूनच परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होते; परीक्षेची चांगली तयारी करता येते. (10 Important Study Tips for Students)

झोपण्यापूर्वी केलेल्या अभ्यासाचे चिंतन करा

चिंतन हा अभ्यास स्मरणात ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. रात्री झोपण्यापूर्वी  आपण केलेल्या अभ्यास आठवण्याचा प्रयत्न करा. असे म्हटले जाते कि आपण रात्री झोपण्यापूर्वी जे वाचतो त्याविषयी आपला मेंदू रात्री विचार करतो, व त्या गोष्टी आपल्या अवचेतन मनामध्ये जतन करुन ठेवतो. आपल्या अवचेतन मनामध्ये साठवून ठेवलेला अभ्यास चांगला स्मरणात राहतो. त्यासाठी रोज झोपण्या पूर्वी त्या दिवसातील आपल्या नोट्स वाचून झोपा. (10 Important Study Tips for Students)

केलेल्या अभ्यासाचा सराव करा

“सरावाने व्यक्तीस पुर्णत्व येते” असे एक इंग्रजीत विधान आहे. “‘Practice makes a man perfect” सराव माणसाला परिपूर्ण बनवतो; हे अगदी सत्य आहे. जे आम्हाला काहीही शिकण्यासाठी; कोणत्याही विषयात सतत अभ्यासाचे महत्त्व सांगते. कठोर परिश्रमाशिवाय यशाचा मार्ग सापडत नाही; आपल्याला त्या विशिष्ट गोष्टीचा सराव करणे आवश्यक आहे; ज्यामध्ये आपण यशस्वी होऊ इच्छिता.

जर आपण नियमितपणे सराव करत नसाल तर; आपण त्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करु शकत नाही. केवळ सततचा सरावच एखाद्या व्यक्तीस; लक्ष्य प्राप्त करण्यास मदत करु शकतो. ज्ञान ही एक मोठी गोष्ट आहे परंतु जर सराव केला नाही; तर ज्ञान आपल्याला आपल्या ध्येयाकडे नेऊ शकत नाही.

आपल्याला आपले ज्ञान कृतीत उतरवण्यासाठी; नियमित सराव करणे आवश्यक आहे. आपण जास्तित जास्त वेळ हा झालेल्या अभ्यासाच्या सरावासारठी दिला पाहिजे. (10 Important Study Tips for Students)

योग्य आणि पोषण आहार घ्या

विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे; योग्य आणि पोषण आहार. शरीर निरोगी असेल तर; मन निरोगी असते. आणि मन निरोगी असते, जेंव्हा शरीर सुदृढ असते. आपल्या मेंदूला योग्य चालना मिळण्यासाठी; आहार अत्यंत म्हत्वाचा आहे.

आपण आहारात घेतलेल्या अन्नाचा; आपला मेंदू कसा कार्य करतो; यावर परिणाम होऊ शकतो. मेंदूला इंधन देणारे आणि आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक सांभाळण्यास मदत करणारे खाद्य पदार्थ आपण आहारात ठेवले पाहिजेत.

संशोधनात असे दिसून आले आहे की; पोषण आहार विद्यार्थीस; अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास सक्षम करतो. निरोगी आहार ;उत्कृष्ट स्मृती, सावधपणा आणि वेगवान माहिती प्रक्रियेशी जोडले गेले आहे. यामागील एक कारण म्हणजे; फायबर, प्रथिने, अंडी, दही, आणि सफरचंद; यासारखे निरोगी पदार्थ शरीरात जास्त काळ इनर्जी टिकवून ठेवतात; आणि दिवसभर सतर्क राहण्यासाठी पुरेशी उर्जा देतात. (10 Important Study Tips for Students)

पुरेशी झोप घ्या

प्रत्येक व्यक्तीला निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप अत्येत महत्वाची आहे.  जेव्हा व्यक्तीच्या आरोग्यासंदर्भात विचार केला जातो तेव्हा चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांची आवश्यकता असते.

प्रत्येक व्यक्तीला दिवसाला सरासरी; सहा ते सात तास झोपेची आवश्यकता असते. जर मेंदूला त्याचे काम करण्यासाठी पुरेपूर आराम मिळाला नाही, तर तो गोंधळून जातो; आणि त्यामुळे आपण लगेच काही गोष्टींवर; आपले लक्ष केंद्रित करु शकत नाही. त्यासाठी किमान सहा तास झोप घ्या; जेणेकरुन तुमचा मेंदू व्यवस्थितरित्या कार्य करेल. (10 Important Study Tips for Students)

सारांष

अशाप्रकारे, अधिक प्रभावीपणे अभ्यास करण्यासाठी विदयार्थी एक चांगली अभ्यासासाठी शांत, समर्पित जागा शोधून जिथे तुम्ही लक्ष केंद्रित करु शकता आणि सर्व वस्तू व्यवस्थित व निटनेटके ठेवा म्हणजे तुम्हाला त्या गरजेच्या वेळी सहज सापडतील.

अभ्यासाच्या वेळी व्यत्यय कमी करा जसे की, तुमचा फोन दूर ठेवा, सूचना बंद करा आणि सोशल मीडिया आणि टीव्ही टाळा. एक सलग अभ्यास न करता अधूनमधून लहान ब्रेक घ्या कारण ते तुमच्या मेंदूला माहिती टिकवून ठेवण्यास आणि गोष्टी अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत करतात. अधिक स्मार्टपणे अभ्यास कसा करावा हेही जाणून घ्या.

तुमची ध्येये आणि उद्दिष्टे निश्चित करा. आणि तुम्ही प्रेरित आणि नियंत्रणात राहण्यासाठी ते पूर्ण होत आहेत की नाही हे तपासा. मित्रांसोबत अभ्यास केल्याने तुमची शिकण्याची क्षमता वाढू शकते आणि तुम्हाला माहिती टिकवून ठेवण्यास मदत होते.  

वर्गात नोट्स घ्या आणि प्रत्येक विषयातील तुमच्या कमकुवत क्षेत्रांवर काम करण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्याही शंका दूर करण्यासाठी तुमच्या शिक्षकांना शंका विचारा. तुम्हाला तुमची ध्येये व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी “मराठी बाणा” च्या हार्दिक शुभेच्छा!

FAQs: Study Tips

अभ्यासाचे सर्वोत्तम तंत्र कोणते आहे?

अभ्यास करण्याचा कोणताही परिपूर्ण मार्ग नाही, कारण प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो आणि एका विद्यार्थ्यासाठी जे चांगले अभ्यासाचे तंत्र असू शकते ते दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रभावी असेलच असे नाही.

तुम्ही अभ्यास कसा करायचा हे शिकत असताना, तुमच्यासाठी काम करणाऱ्या सिस्टीमवर तुम्ही सेटल होईपर्यंत तुम्हाला विविध तंत्रांचा वापर करुन तंत्र शोधावे लागेल. (10 Important Study Tips for Students)

या अभ्यास टिपा कोणत्या विदयार्थ्यांसाठी आहेत?

विद्यार्थ्यासाठी अभ्यास कसा करावा; या बाबत अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शक सूचना, ज्या विदयार्थ्यांमध्ये बदल घडवण्यासाठी नक्कीच मदत करतील, त्या केवळ विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी नाहीत, तर सर्व स्तरावरील विदयार्थ्यांसाठी या अभ्यास धोरणांचा वापर विदयार्थी करु शकतात. (10 Important Study Tips for Students)

इतर आवडी व छंदांसह शैक्षणिक समतोल कसा राखावा?

त्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या प्रमुख कामांना प्राधान्य द्या. त्यासाठी एक सुव्यवस्थित दिनचर्या तयार करा. जबाबदारी स्विकारा परंतू अति-प्रतिबद्धता टाळा. वेळेचे व्यवस्थापन आणि वास्तववादी उद्दिष्टे निश्चित केल्याने समतोल राखण्यास मदत होऊ शकते. (10 Important Study Tips for Students)

ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मचा शिक्षणासाठी कसा फायदा होतो?

ऑनलाइन प्लॅटफॉर्म लवचिक शिक्षण संधी, विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश आणि आपल्या स्वत: च्या गतीने शिकण्याची संधी देतात. ते तुमची कौशल्ये वाढवू शकतात, प्रमाणपत्र देऊ शकतात आणि पारंपारिक शिक्षणाला पूरक ठरु शकतात. तथापि, आपण केवळ ऑनलाइन शिक्षण प्लॅटफॉर्मवर अवलंबून नसल्याची खात्री करा. (10 Important Study Tips for Students)

परीक्षेचा ताण आणि चिंता व्यवस्थापित करण्यासाठी प्रभावी धोरणे काय आहेत?

दीर्घ श्वास घेणे, माइंडफुलनेस, व्यायाम आणि संतुलित जीवनशैली राखणे यासारखी तंत्रे तणावाचे व्यवस्थापन करण्यात मदत करु शकतात. चांगली तयारी करणे,  चाचण्यांचा सराव करणे आणि सकारात्मक मानसिकता राखणे देखील आवश्यक आहे. (10 Important Study Tips for Students)

आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Scroll to Top