Beware of fake reviews while shopping online | ही इंटरनेटवरुन उत्पादने किंवा सेवा खरेदी करण्याची क्रिया आहे; म्हणजे विक्रेत्याच्या वेबसाइटवर जाणे, वस्तू निवडणे व खरेदी करणे
असे म्हटले जाते की, ज्ञानाच्या चार आयामांपैकी तिसरा आयाम म्हणजे विचार; जेंव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार करतो; तेंव्हा आपला तिसरा आयाम त्या वस्तूविषयी विचार करायला लागतो; माहिती घ्यायला लागतो. सध्याच्या इंटरनेट युगामध्ये; कुठल्याही वस्तूविषयी माहिती एका क्लिकवर मिळते. परंतू आपल्याला त्या वस्तूविषयी नेमकी कुठली माहिती हवी आहे; याचा शोध घेत-घेत आपण दुसरीकडेच सर्फिंग करत राहतो. शेवटी मनाचे समाधान होत नाही, आणि वेळही वाया जातो. (Beware of fake reviews while shopping online)
पूर्वी एखादी नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर; आपण वर्तमानपत्रात येणारी जाहीरात किंवा प्रत्यक्ष दुकानात जाऊन; वस्तू पाहून खरेदी करत असायचो. परंतू आजकाल सोशल मीडीयाच्या जमान्यामध्ये; कुठल्याही वस्तूची निवड करणे तसे सोपे व्हायला हवे होते; परंतू तसे न होता उलट मनाचा गोंधळ उडविणारे झालेले आहे. त्याचे कारण म्हणजे विविध प्रकारच्या माध्यमातून होणारा जाहिरातींचा प्रचंड भडीमार. (Beware of fake reviews while shopping online)
अशावेळी नेमकी कोणत्या वस्तूची निवड करावी हे कळत नाही; विचार करुन करुन डोक्याला अक्षरश: मुंग्या येतात. मग आपण आपले मित्र, नातेवाईक किंवा इतर लोक; ज्यांनी पूर्वी अशा प्रकारची वस्तू घेतलेली असते; त्यांना त्या वस्तूविषयी त्यांचा अनुभव व सल्ला म्हणून विचारले तर, ते त्यांनी घेतलेलीच वस्तू कशी चांगली आहे; हेच पटवून सांगतात. त्यामुळे आपण आणखी गोंधळतो. आपला हा होणारा गोंधळ थांबावा म्हणून; नवीन वस्तू खरेदी करतांना नेमके काय महत्वाचे असते? वस्तूची किंमत, वस्तूचा आकर्षक लुक की त्याची बाजारातील मागणी या सर्वां विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.
Table of Contents
शॉपिंग म्हणजे काय? (Beware of fake reviews)

खरेदी ही एक क्रिया आहे; ज्यामध्ये ग्राहक किरकोळ तसेच ठोक विक्रेत्यांनी सादर केलेल्या; उपलब्ध वस्तूंची योग्य निवड विकत घेण्याच्या संभाव्य हेतूने करतात. ग्राहक जवळपासच्या दुकानामध्ये, बाजारात किंवा ऑनलाइन वस्तू खरेदी करतात.
ऑनलाइन शॉपिंग म्हणजे काय?
ऑनलाइन शॉपिंग (Online shopping) हा ई-कॉमर्सचा एक प्रकार आहे; इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ग्राहकांना विक्रेत्यांकडून उत्पादने खरेदी करण्याचा; एक चांगला मार्ग आहे. ग्राहक वस्तू खरेदी करण्यासाठी व पैसे देण्यासाठी; मोबाइल अॅप किंवा वेब ब्राउझरचा वापर करतात. डेस्कटॉप संगणक, लॅपटॉप, टॅब्लेट आणि मोबाईल यासारख्या; भिन्न साधनांचा वापर करुन; ग्राहक ऑनलाइन शॉपिंग करु शकतात.
बी 2 बी म्हणजे काय? (Beware of fake reviews)
बी 2 बी म्हणजे व्यवसायिक ते व्यवसायिक; जेव्हा एखादा व्यावसायिक दुस-या व्यावसायिकाकडून उत्पादने खरेदी करतो; तेव्हा त्यांना व्यवसायिक ते व्यवसायिक (बी 2 बी) ऑनलाइन शॉपिंग असे म्हणतात. एक सामान्य ऑनलाइन स्टोअर त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या वस्तू; किंवा सेवांची वैशिष्ट्ये आणि किंमतींबद्दल माहिती देतो. त्यामध्ये वस्तुंच्या इमेजसह फर्मची उत्पादने आणि सेवांची श्रेणी; ब्राउझ करण्यास, उत्पादनांचे फोटो किंवा प्रतिमा पाहण्यास मिळतात.
बी 2 सी म्हणजे काय? (Beware of fake reviews)
बी 2 सी म्हणजे ग्राहक ते व्यवसायिक; जेव्हा विक्रेता ग्राहकांना उत्पादन विकतो तेव्हा त्याला; बी 2 सी ची प्रक्रिया म्हणतात. ई-कॉमर्स हा व्यवसायिक ते ग्राहकांच्या उत्पादनांची; किंवा सेवांची ऑनलाइन विक्री करण्याचा मार्ग आहे.
ऑनलाईन ग्राहक (Beware of fake reviews)
ऑनलाइन वस्तू खरेदी करणा-या व्यक्तींना; ऑनलाइन ग्राहक म्हणतात. ऑनलाईन ग्राहकांना व्यवहार पूर्ण करण्यासाठी; इंटरनेट व पेमेंटची वैध पद्धत माहित असणे आवश्यक आहे. सामान्यत: उच्च पातळीचे शिक्षण आणि वैयक्तिक उत्पन्न; ऑनलाइन शॉपिंगच्या अनुकूलतेशी संबंधित असतात. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रमानामुळे नवीन शॉपिंग वाहिन्यांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलतांना दिसत आहे. (Beware of fake reviews while shopping online)
ऑनलाइन उत्पादन निवडणे
किरकोळ विक्रेत्याच्या वेबसाइटवर थेट भेट देऊन; किंवा शॉपिंग सर्च इंजिनचा वापर करुन वैकल्पिक विक्रेत्यांमधून; शोध घेत ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित केले जाते. एखाद्या विक्रेत्याच्या संकेतस्थळावर ग्राहकाला हवे असणारे उत्पादन; सापडल्यानंतर बहुतेक ऑनलाइन विक्रेते शॉपिंग कार्ट सॉफ्टवेअरचा वापर करतात. जे ग्राहकांना एकापेक्षा जास्त वस्तू गोळा करण्यास मदत करते; पारंपारिक स्टोअरमध्ये शॉपिंग कार्ट किंवा बास्केट भरण्यासारख्या सुविधा ग्राहकांना ऑनलाईन शॉपिंगमध्ये देखील मिळतात.
वस्तू खरेदी करताना महत्वाचं काय असतं
- खरेदीचा योग्य वेळ किंवा हंगाम
- उत्पादनाची गरज
- उत्पादन उत्पादक कंपन्यांबद्दलची माहिती
- कंपनी किंवा उत्पादन विक्रेत्याची विश्वासार्हता
- आपल्याला आवश्यक असलेल्या वैशिष्ट्यांविषयी माहिती
- खरेदीच्या वेळी बाजारातील मागणीची
- खरेदीच्या वेळी गुणवत्ता आणि बाजारभाव
- इतर कंपन्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि बाजार मूल्य
- कंपनी देत असलेली सवलत
- उत्पादनाचा रंग व आकर्षक लुक
- उत्पादनाचे वजन व आकार
- वस्तू ठेवण्यासाठी लागणारी जागा
- उत्पादनाची हमी व उाउटपूट
- उत्पादन सेवा केंद्राबद्दल विश्वासार्हता
- उत्पादनाचे ओरीजनल बीलाची पावती
सुरक्षित ऑनलाइन खरेदीसाठी महत्वाच्या टिप्स
- https:// सह सुरक्षित साइट निवडा.
- अँटी-मालवेयर प्रोग्राम वापरा.
- पीसी किंवा लॅपटॉपच्या सुरक्षितता सेटिंग्ज ऑप्टिमाइझ करा.
- आपली माहिती केवळ एखाद्या परिचित दुकानदारासह सामायिक करा.
- आपण माहिती भरता तेव्हा कोणीही आपले निरीक्षण करत नाही हे शोधा.
- डेबिट कार्ड ऐवजी क्रेडिट कार्ड वापरा.
- आपल्या ऑर्डरची एक प्रत जतन करा किंवा मुद्रित करा.
- बिलाची प्रिंट ठेवा.
- आपल्या ऑर्डरची स्थिती वारंवार तपासा.
फेक रिव्ह्यू पासून सावध राहा
एखाद्या वस्तूवर दिले जाणारे रिव्ह्यू एक प्रकारचा स्कॅम आहे; तुम्ही ज्या प्रॉडक्टचे रिव्ह्यू पाहता, आणि खरेदी करता; त्यापैकी अनेक रिव्ह्यू फेक असतात. ऑनलाईन शॉपिंग करताना खरेदीदार सर्वात आधी; एखाद्या प्रोडक्टच्या रिव्ह्यूची तपासणी करतो. बरेच लोक किंमती वस्तू ऑनलाईन घेताना; आपले मित्र किंवा नातेवाईक यांचही मत विचारात घेतात. परंतु एखाद्या नवीनच लाँच झालेल्या वस्तूबाबत; किंवा इतरही अनेक प्रॉडक्टसचे ऑनलाईन रिव्ह्यू पाहतात; आणि त्यानुसार वस्तू खरेदी करायची की नाही हे ठरवतात. पण एखाद्या वस्तूवर दिले जाणारे रिव्ह्यू; एक प्रकारचा स्कॅम असू शकतो. म्हणजेच तुम्ही ज्या प्रॉडक्ट वरचे रिव्ह्यू पाहता, त्यापैकी बरेच रिव्ह्यू फेक असू शकतात.
स्कॅम कसा होतो (Beware of fake reviews)

काही कंपन्या आपले प्रॉडक्ट्स फायू स्टार रेटिंगसाठी रिव्ह्यूअर्सकडे पाठवतात; हे असे प्रॉडक्ट असतात, प्रत्यक्षात त्यांना फायू स्टार रेटिंग नसते. परंतू उत्पादकांना मात्र त्यावर फायू स्टार रेटिंग हवी असते; हे रिव्ह्यूअर्स त्या उत्पादनाला फायू स्टार रेटिंग देतात. त्यामुळे सजेशन मध्ये हे उत्पादन टॉपवर येतात; खरेदीच्यावेळी युजर, प्रॅाडक्ट सर्च करतो, त्यावेळी त्याला असे प्रॅाडक्ट टॉपवर दिसतात.
निष्कर्ष | Conclusion (Beware of fake reviews)
ज्याच्याशी लढायचय त्याचा पूर्ण परिचय हवा हा जसा युध्दाचा नियम आहे, तसा जी वस्तू आपण घेणार आहात त्या वस्तूची पूर्ण माहिती हवी हा शॉपिंगचा नियम आहे. आपला प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होण्याचा नसला तरी आपण काल होतो त्यापेक्षा आज चांगला होण्याचा असला पाहिजे. वाचा: Pros & Cons of Online Shopping | ऑनलाईन शॉपिंगचे फायदे-तोटे
आयुष्यात प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे कारण चांगले लोक नेहमी साथ देतात तर वाईट लोक नेहमी अनुभव देतात. कोणताही अनुभव हा वाचून मिळत नाही तो घ्यावाच लागतो स्वत:च घर स्वत:च सांभाळायचं हे आपल्याला गोगलगायीकडून शिकलं पाहिजे. काहीच हाती लागत नाही तेंव्हा मिळतो तो फक्त अनुभव. काहीतरी घडल्यानंतर पश्चाताप, चिंता किंवा काळजी करण्यापेक्षा, काळजी घेण केंव्हाही चांगल. भरोसा श्वासांवर सुध्दा नसतो आणि आपण लोकांवर ठेवतो. थोडिशी काळजी घेतली तर ऑनलाईन शॉपिंगचा भरपूर आनंद घेता येईल. (Beware of fake reviews while shopping online)
“Online Shopping | ऑनलाइन खरेदी करताय, मग ही माहिती वाचा…” हा लेख आपणास कसा वाटला, या बद्दल आपला अभिप्राय व सूचना कमेंटमध्ये जरुर कळवा; आपला प्रतिसाद व सुभेच्छा आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत. त्या नवचैतन्य देतात; व त्यामुळे नवीन लेख लिहिण्यास प्रेरणा मिळते. आपण हा लेख आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद…!
Related Posts
- How To Spot Fake Shopping Sites | बनावट शॉपिंग साइट विषयी
- Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे
Post Categories
शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Diploma: The best career option after 10th | 10वी नंतर डिप्लोमा
Read More

The Best Law Courses After 12th | 12वी नंतर कायदा अभ्यासक्रम
Read More

4 Important Actions About Aadhaar card | आधार अपडेट्स बाबत
Read More

Latest Water Purification Technologies | नवीन जल शुध्दी तंत्रज्ञान
Read More

Psychology: The best career option after 12th | मानसशास्त्र
Read More

How to Make a Career in Merchant Navy | करिअर इन मर्चंट नेव्ही
Read More

Bachelor of Arts in Hotel Management | हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीए
Read More

Marine Engineering: the best option for a career | सागरी अभि.
Read More

How to become a corporate lawyer | कॉर्पोरेट वकील कसे व्हावे
Read More

Diploma in Information Technology | माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा
Read More