How to be a Successful Student | शाळा बंद परंतू अभ्यास चालू, लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा; याबाबत मार्गदर्शन करणारा हा लेख नक्की वाचा.
विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व आपल्या आयुष्यातील अनिश्चितता, नैराश्य आणि अनेक शंका मनात आणून जगत आहोत. फक्त आपणच नाही तर, जगातील अनेक देशांमधील विद्यार्थ्यांची अवस्था काही वेगळी नाही. सद्यस्थितीत संपूर्ण जग एका अभूतपूर्व जागतिक महामारीला तोंड देत आहे. (How to be a Successful Student)
आपल्यातील प्रत्येकजण, आपले कुटुंब, शेजारी, गावकरी, आपला समुदाय, आपला देश आणि आजूबाजूचे जग या नवीन संकटाला तोंड देत, जगण्याची सवय लावण्यासाठी धडपडत आहे. आपल्यापैकी ब-याच जणांना आपल्या शैक्षणिक वर्षाचं काय होईल. (How to be a Successful Student)
Table of Contents
विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर होण्याची वेळ आली आहे
आपल्या भविष्यावर याचा कसा परिणाम होईल याचा विचार करुन; ताणतणावाची भावना जाणवत असेल. परंतू आलेल्या प्रसंगाला न घाबरता, संयमाने तोंड देत पुढे जाण्यात; तर खरे धैर्य आणि शौर्य असते. यातूनही आपण कठीण परिस्थितित एकमेकांना साथ कशी दयावी या विषयी शिकत असतोच.
आता विद्यार्थ्यांनी ख-या अर्थाने आत्मनिर्भर होण्याची वेळ आली आहे; असे असले तरी या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात; तुमची शाळा, शिक्षक व पालक या प्रवासात तमच्याबरोबर आहेत. आपला मौल्यवान वेळ वाया जाणार नाही; यासाठी शालेय शिक्षण पूर्णपणे आभासी व्यासपीठावर घेऊन हे आव्हान स्वीकारले आहे.
हे आपल्या प्रत्येकासाठी स्वतःचे आव्हान आणि मर्यादा असलेले; एक नवीन व्यासपीठ आहे. एक चांगली शिक्षण संस्था, शाळा, शिक्षक आपल्याला सर्वोत्कृष्ट शिक्षण संसाधने प्रदान करण्यासाठी; आपल्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, परंतु आपणच त्यांच्याशी जुळवून घ्यावे आणि आपल्या वैयक्तिक फायद्याच्या उद्देशाने त्यांचा प्रभावीपणे वापर करा.
सेल्फ लर्निंगच्या या प्रवासात तुमच्यासाठी काही उपयुक्त टिप्स दिलेल्या आहेत; त्या तुम्हाला अधिक चांगले शिकण्यास मदत करतील त्याचबरोबर आपला वेळ अधिकाधिक प्रभावी आणि समाधानकारकपणे वापरण्याबाबतही मार्गदर्शन करतील.
1) दिवसाची सुरुवात लवकर करा (How to be a Successful Student)

म्हणजे सकाळी लवकर उठा, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे; “Early to bed and early to rise, (makes a man healthy, wealthy and wise)” म्हणजे आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर; रात्री पुरेशी झोप घेतली तर आरोग्य निरोगी राहते, त्यामुळे सकाळी लवकर काम सुरु करता येते; सर्व काम वेळेत व व्यवस्थित पार पडते.
या सवयीमुळे व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते; यशस्वी लोकांच्या चांगल्या सवयींपैकी एक म्हणजे त्यांनी आपला दिवस लवकर सुरु केला. तेंव्हा आपणही ही सवय अंगिकारण्याचा प्रयत्न करा; सकाळी काही साधे व्यायाम प्रकार करा, ताजेतवाने व्हा आणि आपले पूर्ण दिवसाचे काम करण्यास सज्ज व्हा. वाचा: How to Provide Support to Students | विद्यार्थ्यांना आधार द्या
दुसरे उदाहरण म्हणजे “The early bird gets the worm”; म्हणजे सकाळी लवकर उठणा-या पक्षाला सर्वात अगोदर अळी (खाद्य) मिळते. प्रथम येणा-याला यशाची उत्तम संधी असते; कारण तो नेहमीच पहिल्या ओळीत असतो.
आपल्या आवडीचा एखादा कार्यक्रम पाहण्यासाठी आपण इतरांच्या अगोदर इच्छित स्थळी पोहोचलो; आणि योग्य जागा पकडली, तर कार्यक्रमाचा आनंद घेता येतो. यावरुन सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात लवकर करण्याचे महत्व; लक्षात आले असेल अशी आशा करुया. वाचा: 10 Important Study Tips for Students | अभ्यास नको! मग वाचा…
२) आपले ध्येय निश्चित करा (How to be a Successful Student)

कुठल्याही प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण हा प्रवास का व कशासाठी करत आहोत; हे माहित असणे महत्वाचे असते. आपल्याला काय मिळवायचे आहे ते निश्चित करा; त्याबदल जाणून घ्या. ध्येये आपल्याला पेलेल असेच ठेवा; ध्येये प्राप्तीमध्ये आपण अपयशी ठरल्यास निराश होऊ नका. आपल्या डोक्यावर यश आणि आपल्या मनातील अपयश काढून टाका.
ध्येय म्हणजे भविष्यातील इच्छित परिणामाची कल्पना; एखादी योजना आखून ती साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे. अंतिम मुदत निश्चित करुन लक्ष्य वेळेत प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे. वाचा: Mobile Phone and Children: पालकांनो! आपल्या मुलांकडे लक्ष द्या!
ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा ही गुरुकिल्ली आहे. ध्येयपूर्तीसाठी वचनबद्धतेची आवश्यकता असते, जेणेकरुन यशाची शक्यता जास्तीत जास्त वाढते. “मला हे करणे आवश्यक आहे; आणि ते मी केलेच पाहिजे” ही वृत्ती असणे आवश्यक आहे. जर ही वृत्ती नसेल; तर आपण ध्येयापासून दूर जाण्याचा धोका असतो. वाचा: 14 Benefits of Abacus for Kids | मुलांसाठी ॲबॅकस शिकण्याचे फायदे
3) ध्येये प्राप्तीसाठी इच्छित ठिकाण निवडा

एक आनंदी, प्रसन्न, दोलायमान आणि वैयक्तिकृत केलेले कार्य करण्यासाठी अभ्यासाचे ठिकाण निश्चित करा. मनाच्या प्रसन्नतेसाठी ते सुशोभीत करा. एखादे कॅलेंडर, वेळापत्रक, काही प्रेरक सुविचार आणि कोणतीही प्रेरक गोष्ट जी तुम्हाला तुमच्या सभोवती असावी असे वाटते, ती नजरेसमोर ठेवा.
कधी कधी अशी वेळ येते की, आपण छोटयाशा अपयशाने निराश होऊन लगेच हार मानतो. अशा वेळी डोळयासमोर असलेले प्रेरणादायी सुविचार आपला उत्साह वाढवतात. तुम्हाला जर ख-या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल तर, स्वत: प्रयत्न करा.
अभ्यासाच्या ठिकाणी चांगला प्रकाश ठेवा; जेणेकरुन आपल्या डोळ्यांवर ताण पडणार नाही. चांगला टेबल व खुर्ची वापरा. पलंगावर झोपून कधीही अभ्यास करु नका. वाचा: Drawing and Painting a best career way | ड्रॉइंग व पेंटिंग
4) सर्व विषय समावेशक वास्तववादी वेळापत्रक तयार करा

आपल्या सर्व विषयांचे वास्तववादी वेळापत्रक तयार करा; त्याप्रमाणे दररोज किमान एका विषयांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा; आणि सराव करा. आपल्याला स्पष्टपणे दिसेल असे अभ्यासाचे टाइम टेबल नजरेसमोर ठेवा; जेणेकरून आपण ट्रॅकवर आहात की नाही याची आपल्याला जाणीव राहील. अधिकाधिक लिहिण्याचा सराव करा.
5) अभ्यासाच्या वेळेमध्ये थोडी विश्रांती घ्या

खूप ताणून अभ्यास करु नका, कंटाळा आला असे वाटल्यास; फेरफटका मारा, बाहेर जा, मोकळा दीर्घ श्वास घ्या, झाडांना पाणी द्या,; आपले आवडते काम करा. ब्रेकमध्ये निरोगी पौष्टिक आहार घ्या; अभ्यासापूर्वी आणि अभ्यासादरम्यान जड अन्न खाऊ नका; कारण यामुळे तुम्हाला झोप लागेल. या लहान ब्रेकमध्ये व्हिडिओ गेम खेळू नका किंवा टीव्ही पाहू नका; कारण ते तुम्हाला त्यातच रममान करतील.
6) आपल्या नोट्स स्वत: तयार करा (How to be a Successful Student)

नोट्स तयार करणे ही एक कला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासावर लक्ष केंद्रित ठेवायचे आहे; त्यांच्यासाठी एक अत्यावश्यक गोष्ट आहे. आपण स्वत: अभ्यास करत असताना; वेगवेगळया पुस्तकांचा संदर्भ घेऊन नोट्स तयार करा.
त्यामध्ये आपल्या पाठयपुस्तकांचा प्राधान्य क्रम असावा; मोठयाने वाचन करुन जर आपल्या लक्षात राहात असेल तर तसे करा. अभ्यास करताना आपण स्वतः ऐकण्यास सक्षम असणे आवश्यक आहे; हायलाईटर्स आणि मार्कर वापरा आणि आपली पाठ्यपुस्तके पूर्ण वाचा. वाचा: How to Study Alone at Home | घरी अभ्यास कसा करावा
7) आठवड्यातून एकदा स्वयं-मूल्यमापन करा

जर तुम्ही तुमच्या प्रगतीमुळे खूश असाल तर सर्व काही ठीक होईल; आणि लक्षात ठेवा, आपण जे करत आहात त्यात थोडे अपयश आले; समाधानकारक यश मिळाले नाही तरी हरकत नाही. तुम्ही 100% सर्वोत्तम कार्य करण्याचे प्रयत्न करत राहा.
विद्यार्थी मित्रांनो एखादया अपयशाने खचू नका, अभ्यासात तुम्ही मागे पडत आहात असे वाटत असेल तर; तुम्ही नक्की पुढे जाणार आहात; कारण धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो. अपेक्षा पूर्ण होतात, पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक असते. वाचा: Information on Education in Maharashtra: महाराष्ट्रातील शिक्षण
8) आपल्यातील कमतरता व सामर्थ्ये ओळखा

आपण एखादी गोष्ट स्वत: करु शकत नसाल तर; आपल्या पालकांची किंवा शिक्षकांची मदत घ्या. वर्षभर आपली तब्येत सांभाळा, केवळ परीक्षा जवळ आली म्हणून; एकाच वेळी खूप अभ्यास करु नका. परीक्षेपूर्वीच आपल्या सर्व शंकांचे निरसन करा.
9) स्वत: ला फसवू नका (How to be a Successful Student)

कोरोनाच्या या काळात ऑनलाइन वर्ग आहेत, म्हणून स्वत: ला फावून आपण त्यास सहभागी नाही झालो तरी चालेल; असे करु नका, कारण आता कोणीही सतत तुमच्यावर नजर ठेवू शकत नाही.
आपण असे केले तर, आपल्या भविष्यातील यश; आणि आनंदाची फसवणूक कराल! स्वत: चे मूल्यांकन करा आणि प्रतिक्रियेसाठी आपला प्रतिकार कमी करा, आपल्या कमकुवतपणांना आलिंगन द्या, आपल्या सामर्थ्यावर कार्य करा.
10) आपला वेळ हुशारीने वापरा (How to be a Successful Student)

आपण केलेल्या नियोजनप्रमाणे आपल्या वेळेचा सदुपयोग करा; वेळेच्या नियोजनाप्रमाणे तुम्हाला तुमचा अभ्यास कव्हर करावा लागेल. एका दिवसात आपण किती अभ्यास करु इच्छिता ते ठरवा; आणि त्यानुसार अभ्यास करा.
वाचा: Benefits of Reference Books in Study | संदर्भ ग्रंथांचे महत्व
11) आपला वेळ व्यर्थ घालवणारी कारणे शोधा

तुम्ही विचार केल्या नंतर असे लक्षात येईल की, आपण आपला बराच वेळ सोशल मीडिया, व्हिडिओ गेम्स, टीव्हीचे पाहणे; किंवा फक्त आपला आळशीपणा असू शकतो. अभ्यास करत असताना सोशल मीडियापासून दूर रहा; आपला सेल फोन अपरिहार्यपणे बंद ठेवा; केवळ आपल्या ब्रेकच्या वेळीच त्यांचा वापर जर अत्यावश्यक असेल तरच करा. स्वत: ला प्रेरक विचारांनी वेढून घ्या; प्रेरणादायक पुस्तके आणि चरित्र वाचा, लक्ष केंद्रित आणि प्रेरित रहा!
झोपेच्या आधी प्रत्येक रात्री विश्वाच्या कृतज्ञतेची प्रार्थना म्हना. आपले पालक आणि शिक्षकांचे आभार माना, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि आपल्या भविष्यासाठी वचनबद्ध रहा. वाचा: How to be a Good Student? | आदर्श विद्यार्थी कसे व्हावे?
अभ्यासाची चांगली सवय लावून स्वत:ला त्यामध्ये गुंतवा; भविष्यात ते तुम्हाला चांगल्या स्थितीत ठेवतील. नवीन कौशल्य शिकण्यात, घरातील कामात मदत करण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासमवेत बसण्यासाठी थोडा वेळ द्या.
समारोप | Conclusion (How to be a Successful Student)
विद्यार्थी मित्रांनो पाऊस आला की आपण छत्री डोक्यावर घेतो, छत्री पावसाला थांबवू शकत नाही; पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. अगदी त्याप्रमाणेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही; पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. वाचा: The Role of Parents in the Success of their Children | मुलांच्या यशात पालकांची भूमिका
तुमचा एखादा शत्रू तुम्हाला जितकी दुःख देत नाही; त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात. तेंव्हा कधीही नकारात्मक विचार करु नका. तुम्ही हुशार आहात फक्त कशात ते ओळखा; ज्या दिवशी तुम्हाला ते कळेल त्यानंतर तुमचं जग बदलेल. वाचा: Dr. Ambedkar CSS of Interest Subsidy | स्कीम ऑफ इंटरेस्ट
कोणतेही चांगले कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही; यशप्राप्तीसाठी जे शेवटपर्यंत प्रयत्न करतात, त्यानांच यश प्राप्त होते. जो खरा विद्यार्थी असतो, तो कधीच सुट्टी घेत नाही; उलट सुट्टी त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.
ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो; जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो; आणि जो संधिचं सोन करतो तो विजेता असतो. तेंव्हा तुम्हाला मिळालेल्या संधीचे साेन करा. वाचा: How to Memorize New Vocabulary | नवीन शब्द कसे लक्षात ठेवावेत
वाचा:
- The Role of the Teacher in Child Protection: बालसंरक्षण व शिक्षक
- Computer Education is the Need of the Time: संगणक शिक्षण
- Education from the Vision of Swami Vivekananda: स्वामी विवेकानंदांचे शिक्षणा विषयीचे विचार
- Related: Does your kid need a Mobile Phone? Cell Phone & Children
- Importance of Sports and Games In Students Life | खेळाचे महत्व
- शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.
“How to be a Successful Student: विद्यार्थी यशस्वी होण्याचा मार्ग” हा लेख आपणास कसा वाटला; या बद्दल आपला अभिप्राय व सूचना कमेंटमध्ये जरुर कळवा. आपला प्रतिसाद व शुभेच्छा आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत; त्या नवचैतन्य देतात व त्यामुळे नवीन लेख लिहिण्यास प्रेरणा मिळते. आपण हा लेख जास्तीतजास्त विद्यार्थ्यांपर्यत पोहचवा; आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद…!

Popular Varieties of Mangoes in India | आंब्याचे प्रकार
Read More

The Deadliest Places in the World | प्राणघातक ठिकाणे
Read More

Online Teaching and Learning | ऑनलाइन शिक्षण
Read More

The best ways to deal with Acne | मुरुमांना असे सामोरे जा
Read More

Strange facts about the human body | मानवी शरीर तथ्ये
Read More

How to Manage Time at Work | कामाचे वेळ व्यवस्थापन
Read More

Know the Amazing Benefits of Amla | आवळयाचे फायदे
Read More

How to avoid NFT Scams? | एनएफटी घोटाळे कसे टाळावेत
Read More

How to Celebrate Holi Festival in India | होळी उत्सव
Read More

Most Popular Sports in India | भारतातील लोकप्रिय खेळ
Read More