What is the domestic violence prevention act? | कौटुंबिक हिंसा प्रतिबंधात्मक कायदा, स्त्रियांवर होणारे कौटुंबिक हिंसाचार थांबविण्याच्या दृष्टीने; या कायदयान्वये स्त्रियांना कोणत्या गोष्टींसाठी न्याय मागता येतो, घ्या जाणून…
विवाहित, अविवाहित किंवा विधवा स्त्रियांच्या होणाऱ्या कौटुंबिक अत्याचारास किंवा छळास; प्रतिबंध करण्यासाठी; भारतात काही कायदे केलेले आहेत. या कायदयामध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी; अधिनियम 2005 व 2006, संपूर्ण भारतात 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने What is the domestic violence prevention act? बाबतची माहिती घेतली पाहिजे.
समाजातील पीडितेंना कायद्याची माहिती नसेल; तर त्या महिला त्याचा लाभ घेवू शकनार नाहीत. कौट़ुंबिक हिंसाचार म्हणजे काय? हे समाजातील खासकरुन महिला; व सर्वसामान्य नागरीकांना समजले पाहिजे. या उद्देशाने हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. (What is the domestic violence prevention act?)
Table of Contents
कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय? (What is the domestic violence prevention act?)

कुटुंबातील व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, शाब्दिक, लैंगिक; किंवा आर्थिक छळ करणे. हुंडा पैसा किंवा वस्तूच्या स्वरुपात; किंवा मालमत्तेसाठी कुटुंबातील महिलेला सतत अपमानित करणे. तिला शिवीगाळ करणे, विशेषत: जर त्या स्त्रीला अपत्य नसेल; तर त्यासाठी तिला हिणवणे धमकावणे, त्रास देणे; किंवा दुखापत करणे.
कोणत्याही किरकोळ कारणासाठी स्त्रीला मारहाण करणे; पीडित महिलेचा; किंवा तिच्या मुलांचा जीव धोक्यात आणण्यास भाग पाडणे. स्त्रिचे माता-पिता किंवा कोणत्याही नातेवाईकाकडे हुंडयाची मागणी करणे; अशा प्रकरच्या गोष्टींचा दुष्परिणाम पीडित व्यक्ती अथवा तिच्या नातेवाईकांवर होणे; तसेच आर्थिक छळ करणे.
कुटुंबामध्ये त्या महिलेचे स्वत:चे कोणत्याही प्रकारचे उत्पन्न, मग ते स्त्रीधन, मालमत्ता किंवा इतर आर्थिक स्वरुपातील तिच्या हक्काच्या कोणत्याही मालमत्तेपासून तिला वंचित करणे. अशा प्रकारच्या कारणांसाठी स्त्रिला घराबाहेर काढणे; या सर्व बाबींना कौटुंबिक हिंसाचार म्हटले जाते. वाचा: The Best Activities for Kids | मुलांसाठी सर्वोत्तम उपक्रम
कौटुंबिक हिंसाचारासाठी कायदयाने संरक्षण कोणास मिळते?

एखादया कुटुंबातील स्त्री, जी त्या परिवारासोबत किंवा आपल्या साथीदारासोबत एकाच छताखाली रहात असेल; आणि तिचा छळ त्या पुरुषाकडून होत असेल; तर ती स्त्री कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये न्यायदंडाधिकाऱ्याकडे संरक्षण मागू शकते.
पीडित महिला व तिची मुलं यांच्या निवासाच्या अधिकारासह, त्यांच्या सुरक्षेचा व आर्थिक संरक्षण करण्याचा आदेश; न्यायदंडाधिकारी देवू शकतात. त्या स्त्रीला तिच्या मुलांसह; कोणत्याही छळापासून संरक्षण मिळू शकते; तो छळ शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा लैंगिक स्वरुपाचा असू शकतो. वरील प्रमाणे कोणत्याही प्रकारचा अत्याचार महिलांवर होत असेल; तर, महिला अत्याचार करणा-या व्यक्तींविररुध्द न्यायालयात कादेशीर दाद मागू शकते.
वाचा: How to Manage Time at Work | कामाचे वेळ व्यवस्थापन
शारीरिक छळामध्ये कशाचा समावेश होतो? (What is the domestic violence prevention act?)

शारीरिक छळामध्ये स्त्रिला मारहाण करणे, विशेषत: तोंडात मारणे, केस ओढणे, चावणे, तडाखा देणे, लाथ मारणे, गुद्दे मारणे, ढकलणे, लोटणे; म्हणजे जोराचा धक्का मारणे. अशा पद्धतीने इतर कोणत्याही प्रकारे शारीरिक त्रास, दुखापत; किंवा वेदना होणारा त्रास देणे. या सर्व बाबींचा शारीरिक छळामध्ये समावेश होतो. वाचा: Importance of the Role of Women | महिलांच्या भूमिकेचे महत्व
लैंगिक अत्याचारामध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत

लैंगिक अत्याचारामध्ये स्त्रिची इच्छा नसताना जबरदस्तीने समागम करणे; अश्लिल फोटो काढणे, बिभत्स कृत्य जबरदस्तीने करावयास लावणे. स्त्रिची समाजातील किंमत कमी होईल या दृष्टीने; अश्लील चाळे करणे, तिची बदनामी करणे किंवा अनैसर्गिक अश्लिल कृत्य करणे याबाबींचा लैंगिक अत्याचारामध्ये समावेश होतो. वाचा: Amazing Places in the World | जगातील आश्चर्यकारक ठिकाणे
तोंडी आणि भावनिक अत्याचारमध्ये कोणत्या गोष्टी येतात?

तोंडी आणि भावनिक अत्याचार म्हणजे स्त्रिला जानिवपूर्वक सतत अपमानीत करणे; तिला दु:ख होईल असे शब्द वापरणे; व तिच्या नावाचा वाईट उल्लेख करणे. तसेच तिच्या चारित्र्याबद्दल नेहमी संशय घेणे, मुलगा झाला नाही म्हणून अपमान करणे; हुंडा आणला नाही म्हणून अपमान करणे.
महिला किंवा तिच्या जवळ असलेल्या तिच्या मुलाला शाळा; महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यास मज्जाव करणे; नोकरी स्वीकारण्यास व करण्यास मज्जाव करणे. स्त्रीसह तिच्या मुलांना घरातून बाहेर जाण्यास मज्जाव करणे; नेहमीच्या कामासाठी कोणत्याही बाहेरील व्यक्तीला भेटण्यास मज्जाव करणे.
स्त्रिची विवाह करण्याची इच्छा नसल्यास तिला विवाह करण्यास जबरदस्ती करणे; किंवा तिला पसंत असलेल्या व्यक्ती बरोबर विवाह करण्यास प्रतिबंध करणे. तसेच तिला पसंत नसणा-या व्यक्तीबरोबर; विवाह करण्यास जबरदस्ती करणे.
तिला सतत आत्महत्येची धमकी देणे; इतर कोणतेही भावना दुखविणारे अपशब्द वापरणे. या सर्वांचा समोवश तोंडी आणि भावनिक अत्याचारामध्ये होतो. वाचा: ‘MEHRANGARH’ The most famous fort in the world | मेहरानगड
आर्थिक अत्याचारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

महिलांवरती होणा-या आर्थिक अत्याचारामध्ये; कोणत्याही स्वरुपात हुंडा मागणे. महिलेच्या किंवा तिच्या मुलांचे पालन पोषणासाठी पैसे न देणे; महिला किंवा तिची मुलं यांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधे; इत्यादी प्राथमिक सुविधा न पुरविणे.
स्त्रिच्या नोकरी करण्यास मज्जाव करणे; स्त्रिला नोकरी करण्यास विरोध करणे व नोकरीवर जाण्यास अडथळा निर्माण करणे. नोकरी स्वीकारण्यास संमती न देणे; तिच्या पगारातून किंवा रोजगारातून आलेले पैसे धमकावून काढून घेणे.
महिलेला तिचा पगार किंवा रोजगारामधून मिळालेला पैसा वापरण्यास परवानगी न देणे; स्त्रिला राहात असलेल्या घरातून हाकलून देणे, घराचा कोणताही भाग वापरण्यास; किंवा घरात येण्या- जाण्यास अडथळा निर्माण करणे.
घरातील नेहमीचे कपडे, वस्तू वापरण्यापासून रोखणे; तसेच भाड्याच्या घराचे भाडे न देणे या बाबींचा समावेश होतो. वाचा: How to stop net banking scams? नेट बँकिंग घोटाळे कसे थांबवायचे?
कौटुंबिक हिंसा प्रतिबंधात्मक कायदा (What is the domestic violence prevention act?)

आपल्या समाजाची अशी धारणा झालेली आहे की, स्त्रीचा जन्मच मुळी अत्याचार सोसण्यासाठी झाला आहे. अशा प्रकारच्या दृष्टीकोनाला गरीब, श्रीमंत, जात, धर्म, पंथ, शिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी, नोकरी करणारी, किंवा नोकरी न करणारी असा कुठलाही अपवाद नाही.
आपल्याकडे स्त्री-पुरुष समानता आहे, हे केवळ भाषणांमध्ये सांगण्यासाठी किंवा आपण किती आधुनिक विचारसरणीचे आहोत, हे दाखविण्यापुरतीच मर्यादित आहे. वास्तव नेमके याच्या उलट आहे.
वाचा: Computer Education is the Need of the Time: संगणक शिक्षण
भारतीय संविधानाच्या कलम 14 नुसार भेदभावापासून मुक्ती, कलम 15 अन्वये स्त्री पुरुष समानता आणि कलम 21 अन्वये जीवित व स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा हक्क महिलांनाही दिलेला आहे.
तरी देखील महिला कौटुंबिक हिंसाचारास बळी पडत आहेत. स्त्रियांची कुटुंब आणि समाजातील प्रतिष्ठा सांभाळली जात नाही. देशामधील अनेक समाजसुधारक, विचारवंत यांनी समाजाचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
परंतू तेही समाजाचे पूर्ण मानसिक परिवर्तन करु शकले नाहीत. समाज परिवर्तन करण्यासाठी केवळ प्रबोधन पुरेसे नाही, तर कायदे देखील तितकेच महत्वाचे आहेत. वाचा: Importance of Colours in Life | रंगांचे जीवनातील महत्व
म्हणून कौटुंबिक हिंसचारास प्रतिबंध करणारे हे कायदे केंद्र शासनाने केलेले आहेत. वाचा: Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे

या कायद्याद्वारे पीडित महिलेला न्याय, संरक्षण मिळू शकते; या कायद्याचा आधार जर पीडित महिलेने घेतला; तर, ती तिच्या विरुध्द किंवा तिच्या मुलांविरुध्द होणारे अत्याचार थांबवू शकते. स्त्रीधन, दागदागिने, कपडे इत्यादींवर ताबा मिळवू शकते; स्त्री तिचे संयुक्त खाते, लॉकर किंवा संयुक्त मालमत्ता; हिंसा करणाऱ्या पुरुषास वापरण्यास प्रतिबंध करु शकते.
स्त्री आपल्या मुलांसह ज्या घरात राहते; ते घर सोडण्याची तिच्यावर वेळ येणार नाही. पीडीत स्त्री राहात असलेले घर जर हिंसा करणारी व्यक्ती विकत असेल तर; ती त्याला प्रतिबंध करु शकते. स्त्रिला वैद्यकीय उपचारासाठीचा खर्च मागण्याचा अधिकार आहे; तसेच स्त्री आपल्या भावनिक व शारीरिक हिंसाचारबद्दल नुकसान भरपाई मिळण्याचा दावा करु शकते.
वाचा: Rights of Women as per Hindu Law: हिंदू कायदा व महिला अधिकार
त्याप्रमाणे पीडित महिलेला मोफत कायदेविषयक केंद्राद्वारे सल्ला, सेवा पुरविणाऱ्या संस्था, वैद्यकीय सुविधा; निवासगृह इत्यादी मधून आवश्यक त्या सेवा सुविधा प्राप्त करुन घेता येतात.
भारतीय स्त्रिया पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी; दंड संहिता 498 अ चा वापर करु शकतात. भारतीय दंडसहिता कलम 125 नुसार पोटगी मिळण्याव्यतिरिक्त; ती अतिरिक्त पोटगी, स्वत:साठी तसेच स्वत:च्या अपत्यासाठी मागता येते. वाचा: वाचा: What is New BH Bharat Series? | नवीन ‘बीएच’ सिरीज काय आहे?
कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिलांमध्ये पत्नी, सासू, बहिण, मुलगी, कुटुंबातील अविवाहित स्त्री, आई; किंवा एखादी विधवाही असू शकते. म्हणजे लग्न, रक्ताचे नाते, लग्न सदृश्य संबंध जसे की; लिव्ह इन रिलेशनशीप, दत्तकविधी अशा कारणाने नाते संबंध असणाऱ्या व कुठल्याही जाती धर्माच्या स्त्रिया; तसेच, त्यांची 18 वर्षाखालील मुले दाद मागू शकतात. वाचा: Know about loudspeakers & law in India | ध्वनी प्रदुषण कायदा
छळ होत असलेली किंवा छळ झालेली स्त्री या कायद्यांतर्गत सरंक्षण अधिकारी, सेवा पुरविणाऱ्या संस्थां, पोलीस स्टेशन; किंवा दंडाधिकाऱ्याकडे तोंडी किंवा लेखी स्वरुपात तक्रार दाखल करु शकते. वाचा: All you need to know about sextortion | सेक्सटोर्शन म्हणजे काय?
वाचा:
- Don’t want a girl but a daughter-in-law | मुलगी नको, पण सून हवी
- How to be a Successful Student: विद्यार्थी यशस्वी होण्याचा मार्ग
- Adverse effects of media on children | मीडिया आणि मुले
- 10 Study Tips for Students: अभ्यास नको! मग वाचा या टिप्स
- Study Tips: अभ्यास विसरता, लक्षात राहात नाही, मग ही माहिती वाचा..
- शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Know the most common online scams | ऑनलाइन घोटाळे
Read More

The Deadliest Places in the World | प्राणघातक ठिकाणे
Read More

Online Teaching and Learning | ऑनलाइन शिक्षण
Read More

The best ways to deal with Acne | मुरुमांना असे सामोरे जा
Read More

Strange facts about the human body | मानवी शरीर तथ्ये
Read More

How to Manage Time at Work | कामाचे वेळ व्यवस्थापन
Read More

Know the Amazing Benefits of Amla | आवळयाचे फायदे
Read More

How to avoid NFT Scams? | एनएफटी घोटाळे कसे टाळावेत
Read More

How to Celebrate Holi Festival in India | होळी उत्सव
Read More

Most Popular Sports in India | भारतातील लोकप्रिय खेळ
Read More