Skip to content
Marathi Bana » Posts » Think and Quit Bad Habits | ‘वाईट सवयी’ सोडा…

Think and Quit Bad Habits | ‘वाईट सवयी’ सोडा…

Think and Quit Bad Habits

Think and Quit Bad Habits | जुन्या सवयी मोडणे; आणि नवीन सवयी तयार करणे; कठीण आहे. कारण मानवांच्या पुनरावृत्ती करण्याच्या वर्तणुकीचा; मनावर तसेच शरीरावर घट्ट व खोलवर प्रभाव पडलेला असतो.

प्रत्येक व्यक्तीला सवयी असतात; मग त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील; पण सवयी मात्र असतात. काही सवयी उपद्रवी असतात; तर काही निरुपद्रवी. आपल्या सवयीमुळे इतरांना मदत होत असेल; इतरांना आनंद मिळत असेल; तर ती निरुपद्रवी, पण जर आपल्या सवयीचा इतरांना त्रास होत असेल; तर ती उपद्रवी. अशा उपद्रवी सवयींबद्दल Think and Quit Bad Habits विचार करा आणि ‘वाईट सवयी’ सोडा…

कोणत्याही सवयींचा परिणाम स्वतःच्या; आणि संपर्कात येणा-या इतरांच्या आरोग्यावर देखील कमी अधिक प्रमाणात होत असतो; परंतू याची जाणीव सवय असणा-याला होत नाही, तर ती सवयीचे परिणाम भोगणा-यांना होत असते; सवयीचे वाईट परिणाम जेंव्हा जाणवतात; त्यांचा उद्रेक होतो, तेंव्हा ती बंद केली पाहिजे; असे सवय असणारालीही वाटते, पण तेंव्हा बराच उशिर झालेला असतो. (Think and Quit Bad Habits)

वय म्हणजे काय? (Think and Quit Bad Habits)

‘एखाद्या व्यक्तींकडून कळत- नकळत घडणारी क्रिया किंवा एखादी कृती, जी सतत किंवा वारंवार करणे म्हणजे सवय हाेय’. सवयीमध्ये वर्तनाची पुनरावृत्ती केली जाते. 

जुन्या सवयी मोडणे आणि नवीन सवयी तयार करणे हे कठीण आहे कारण मानवांच्या पुनरावृत्ती करण्याच्या वर्तणुकीचा मनावर तसेच शरीरावर घट्ट व खोलवर प्रभाव पडलेला असतो.

असे असले तरी, प्रयत्न  केल्यास पुनरावृत्तीद्वारे वाईट सवयी बंद करुन नवीन सवयी अंगीकारणे शक्य आहे. परंतू त्यासाठी मनाची तयारी असली पाहिजे.

वाईट सवयी कोणत्या आहेत? (Think and Quit Bad Habits)

वाईट किंवा उपद्रवी सवयी खालील प्रमाणे आहेत, त्या आपल्यामध्ये असतील तर त्या सोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

शिंकताना किंवा खोकताना तोंडाला रुमाल न लावणे

Think and Quit Bad Habits-young amazed woman in casual wear covering mouth while keeping secret
Think and Quit Bad Habits-Photo by Andrea Piacquadio on Pexels.com

कोरोना विषाणूचा प्रसार खोकला किंवा शिंकेतून बाहेर पडणाऱ्या; छोट्या छोट्या थेंबांमधून किंवा हे थेंब पडलेल्या जागी स्पर्श केलेला हात; नाक किंवा तोंडाला लागल्याने होत असल्याचं; आतापर्यंतच्या संशोधनातून दिसून आलं आहे.

तसंच गर्दीच्या ठिकाणी अशा संसर्गाचा धोका जास्त असल्याचं; तज्ज्ञांनी वारंवार सांगितलं आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये; यासाठी शिंकताना आणि खोकताना टिशू पेपर किंवा रुमाल वापरला पाहिजे. वापरुन झाल्यानंतर तो बंदिस्त डस्टबिनमध्ये टाकून हात स्वच्छ धुतले पाहिजेत.

या सवयीचा होणारा परिणाम किती भयानक आहे; हे संपूर्ण जग अनुभवते आहे. परिणामांची जाणीव असतानादेखील; अजुनही काही लोक आपली सवय बदलायला तयार नाहीत. आपल्यापासून इतरांना त्रास होत असेल तर, अशी उपद्रवी सवय बदलायला हवी.

सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणे

Think and Quit Bad Habits-crowd of protesters holding signs and kneeling
Think and Quit Bad Habits-Photo by Life Matters on Pexels.com

कुठल्याही विषाणूंचा संसर्ग होऊ नये; यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लोक नाका-तोंडावर मास्क लावतात. मास्क वायू प्रदूषणापासून संरक्षण म्हणून वापरले जातात; मात्र, हवेतून पसरणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी मास्क उपयोगी पडतात. मास्क वापरल्याने तोंडातून हातावाटे होणारं संक्रमण; काही प्रमाणात टाळता येऊ शकतं, यापूर्वी आपण सर्जरी करताना; ऑपरेशन थिएटरमध्ये असलेले सर्जण सर्जिकल मास्क वापरताना पाहिले आहे.

मात्र, सामान्य लोकांनी सार्वजनिक ठिकाणी; विषाणूचा होणारा प्रदुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरला पाहिजे, परंतू अजुनही बरेच लोक; त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. असे न करता आपणही मास्क वापरा व इतरांनाही वापरण्यास सांगा. (Think and Quit Bad Habits)

कुठेही थुंकणे (Think and Quit Bad Habits)

लोक जेंव्हा घराच्या बाहेर असतात; तेंव्हा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबत विचार करत नाहीत. रस्ता, उद्यान, बस, रेल्वे अशी सर्व सार्वजनिक ठिकाणे; अशा सवयीच्या लोकांनी व्यापलेली आहेत. आपण अनेक कार्यालये किंवा सार्वजनिक ईमारतींची कोपरे पाहिले तर; ते रंगीत दिसतात विशेषत: जिन्यांचे कोपरे.

याचा अर्थ असा की, आपली पान-तंबाखू किंवा गुटख्यासारखी एक वाईट सवय; इतर अनेक वाईट गोष्टी करण्यास भाग पाडते; आणि अनेकांच्या जिवीतास धोका निर्माण करु शकते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे; ईमारतीचे सौंदर्य तर नष्ट करतेच पण त्याचबरोबर संक्रमण पसरवते.

रस्त्यावर थुंकणारे लोक; आजही दिसतात. पायी, दुचाकी, कार किंवा बसने प्रवास करताना अनेक लोक रस्त्यावर थुंकत असून त्याच्या परिणामांचा विचार करत नाहीत. (Think and Quit Bad Habits)

तामिळनाडू सरकारने थुंकण्यावर प्रतिबंध करणारा कायदा केला आहे; धुम्रपान व थुंकी निषिद्ध कायदा, 2002. या कायद्यात सार्वजनिक कामकाजाच्या ठिकाणी; किंवा सार्वजनिक सेवेच्या ठिकाणी धूम्रपान करणे आणि थुंकणे; या दोन्ही गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. हे गुन्हे आहेत आणि दंड शिक्षेस पात्र आहेत; यासाठी कायदे करण्याची वेळ यावी हे दुर्दैव आहे.

कुठेही कचरा टाकणे (Think and Quit Bad Habits)

Think and Quit Bad Habits-piles of garbage by the shore
Think and Quit Bad Habits- Photo by Lucien Wanda on Pexels.com

रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्यापूर्वी विचार करा; अनेक लोक आपले स्वतःचे घर सोडून इतर मोकळी जागा दिसेल; त्या ठिकाणी कचरा टाकतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचराकुंडीमध्ये कचरा न टाकता; बाहेर टाकतात. काही तर गाडीवरुन किंवा गाडीमधूनच कचरा कुंडीकडे प्लास्टीक थैली फेकतात; रस्त्याच्या कडेली असलेले प्राणी, त्यातील पदार्थ खाण्यासाठी ती थैली ओढतात, आणी कचरा इतस्ततः पसरतो. (Think and Quit Bad Habits)

वाचा: Adverse effects of media on children | मीडिया आणि मुले

प्रदूषित वातावरण रोगाचा प्रसार करण्यास प्रोत्साहित करते; कच-यामध्ये विषारी रसायने आणि रोगामुळे उद्भवणारे सूक्ष्मजीव देखील पाण्याची व्यवस्था दूषित करतात; आणि पाण्यामुळे होणारे रोग पसरतात. अशुद्ध किंवा उपचार न केलेले पाणी वापरले तर, जनावरे व मानवांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. (Think and Quit Bad Habits)

भारतीय दंड संहिते नुसार कचरा कुठेही टाकणे हा गुन्हा आहे; दुर्दैवाने, भारतात अजूनही ही सामान्य गोष्ट आहे. स्थानिक नगरपालिकांवर याचा मोठा तान पडतो; त्सांना रस्त्यांची साफसफाई करणे, कचरा वेगळा करणे; आणि शेवटी त्याचा पुनर्वापर करण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. त्याचबरोबर या सवयीमुळे प्राणघातक संसर्गजन्य आजारही होऊ शकतात.

नाकात बोट घालणे (Think and Quit Bad Habits)

Think and Quit Bad Habits-photography of a woman holding lights
Think and Quit Bad Habits-Photo by Matheus Bertelli on Pexels.com

केंव्हाही नाकात बोट घालने ही अशी गोष्ट आहे; जी प्रत्येकजण करतो. ही कृती करताना आपण विचार करत नाही की; यामुळे आपले नुकसान होऊ शकते. या सवयीचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो; हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ येऊ शकते.

जेंव्हा आपण विविध वस्तूंना स्पर्श करतो; तेंव्हा त्या वस्तूवर बॅक्टेरिया किंवा विषाणू असू शकतात. आपण त्या वस्तूला स्पर्श केल्यामुळे ते आपल्या हाताला लागू शकतात; आणि आपण तेच बोट नाकात घातल्यास; त्या बोटावरील विषाणूला आपण नाकापर्यंत घेऊन जातो; आणि शरीरात संक्रमण करण्याचा त्याचा मार्ग सुखकर करण्यास एकप्रकारे मदत करताे.

वारंवार नाकात बोट घालण्याची सवय असेल तर; सर्दी होण्याची अधीक शक्यता असते कारण; त्यामुळे शरीरात व्हायरस पोहचतात. तसेच बोटाने दातात अडकलेले अन्नाचे कण काढण्याचा देखील प्रयत्न करु नये; सध्याच्या या कोरोनाच्या काळात प्रत्येकाने ही काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना संक्रमणाच्या भितीनेकाहोईना पण ही सवय बंद करा.

बोटाची नखं कुरतडणे (Think and Quit Bad Habits)

pink manicure
Think and Quit Bad Habits-Photo by Valeria Boltneva on Pexels.com

ब-याच लोकांना संघर्षमय परिस्थितीत बोटांची नखे कुरतडण्याची सवय असते ही सवय केवळ एक वाईट व्यक्तिमत्त्वाचा हावभाव दर्शवते असे नाही; तर, स्वतः बरोबरच कुटुंबातील व इतरांच्या आरोग्यासाठीही घातक आहे.

जेव्हा आपण वेगवेगळ्या पृष्ठभागास स्पर्श करतो; तेंव्हा त्यावरील विषाणू आपल्या बोटांवर चिकटतात. नखे कुरतडण्याची सवय असलेल्या लोकांना सर्दी, फ्लू आणि इतर बरेच नाक व घशाचे आजार; होण्याची अधिक शक्यता असते.

वाचा: How to Manage Time at Work | कामाचे वेळ व्यवस्थापन

धूम्रपान करणे (Think and Quit Bad Habits)

person smoking cigarette
Think and Quit Bad Habits-Photo by fotografierende on Pexels.com

आपणास हे माहित आहे की धूम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे. तसे ठिकठिकाणी बोर्डही लावलेले असतात. धूम्रपानासाठी वापरल्या जाणा-या वस्तूवरही तसा संदेश असतो, आपण हे चर्व वाचतो, ऐकतो तरीही धुम्रपान करतो.

बहुतेक धूम्रपान करणा-यांना त्याचे कारण विचारले तर ते मला याचे टेंन्शन होते त्यामुळे मी हे करतो, अशी उतरे देतात, वास्तविक ही पळवाट त्यांनी शोधलेली असते.

धूम्रपान केल्याने खरोखर टेंन्शन कमी होते का? तर नाही, उलट, ती व्यक्ती त्याच्याबरोबर कुटुंबातील इतर व्यक्तींचे टेन्शन वाढवते. सततच्या धूम्रपानामुळे; रक्तात गिठळया होऊ शकतात. त्याचबरोबर त्यांच्या सहवासात येणा-या व्यक्तीच्या शरीरावरही त्याचा परिणाम हातो, इतरांचा मानसिक त्रास वाढतो.

बरेचजण आपल्या वाईट सवयी सोडण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी अतोनात; अगदी पराकोटीचे प्रयत्न करतात. ज्यांचा मनावर ताबा असतो ते त्यावर नियंत्रण मिळवितात पण सर्वानाच त्यात यश मिळते असे नाही.

वाचा: Importance of Colours in Life | रंगांचे जीवनातील महत्व

जेवणाची वेळ न पाळता केंव्हाही खाणे

anonymous waiter pouring draft beer for multiethnic friends having lunch in street cafe
Think and Quit Bad Habits-Photo by Kampus Production on Pexels.com

आपण जेवणाची वेळ ठरवून त्याचवेळी जेवण घेत असाल तर भूकेचेसिग्नल योग्य प्रकारे काम करतात; म्हणजे ठरलेल्या वेळी भूक लागते. जर आपण आपल्या जेवणाची वेळ ठरवलेली नसेल; तर आपल्या शरीराची भूक सिग्नल पाहिजे तेव्हा येत नाहीत.

भूक नसताना आपण खाऊ शकता; पण ब-याचदा असे केल्यास, आपल्या शरीरात अतिरिक्त कॅलरीज भरल्या जातात. ही सवय दिर्घकाळ राहीली तर लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह, ॲसिडिटी; यासारख्या समस्या निर्माण होतात व त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. वाचा: Mobile Phone and Children: पालकांनो! आपल्या मुलांकडे लक्ष द्या!

रात्री उशिरा झोपणे (Think and Quit Bad Habits)

close up photography of woman sleeping
Think and Quit Bad Habits- Photo by Andrea Piacquadio on Pexels.com

रात्री जास्त वेळ टीव्ही पाहणे, उशिरापर्यंत मित्रांबरोबर गप्पा मारणे, बरेच विद्यार्थी परीक्षा जवळ आल्यानंतर पहाटेपर्यंत अभ्यास करतात; अशा विविध करणामुळे बरेचजण रात्री झोपण्यास उशिर करतात. 

जोपर्यंत आपल्या क्रियांचा कोणताही शारीरिक दुष्परिणाम दिसत नाही; तोपर्यंत, हे सर्व चांगले आहे. परंतू दीर्घ कालावधीपर्यंत जर आपण सहा तासांपेक्षा कमी झोपत असाल तर; तुमची प्रतिकारशक्ती आणि इतर शारीरिक प्रक्रिया कमकुवत होण्याची शक्यता जास्त असते.

जेव्हा आपली रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होते; तेंव्हा जंतू संक्रमण आणि रोगांचा धोका अधिक वाढतो. जास्त जागरण केल्यामुळे अपचन, ॲसिडिटी; आणि दुस-या दिवसाच्या कामावर देखील त्त्याचा परिणाम होतो. शरीर निरोगी राहण्यासाठी शरीराला किमान सहा ते सात तासाच्या विश्रांतीची गरज असते. वाचा: How to Grow the Height of Children | मुलांची उंची कशी वाढवायची

मेक अप न धूता झोपणे (Think and Quit Bad Habits)

photo of a woman hugging a blue pillow
Think and Quit Bad Habits- Photo by Andrea Piacquadio on Pexels.com

ब-याचवेळा स्त्रिया थकून घरी येतात; आणि लगेच अंथरुणावर लोळतात. जेवण झाले की लगेच झोपतात; मेकअप न काढता झोपणे ही सवय त्वचेसाठी घातक आहे. मेकअपमुळे चेह-यावरील त्वचेची छिद्रे बंद झालेली असतात; त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. तसेच डोळ्यांचा मेकअप काढून टाकणे गरजेचे असते कारण डोळे अधिक संवेदनशील असता; कमी प्रतिचा मेकअप दररोज वापरण्याच्या सवयीमुळे दृष्टी कमी होऊ शकते. वाचा: Amazing Uses of Orange Peel | संत्र्याच्या सालीचे अप्रतिम उपयोग

चेह-यावरील मुरुमांबद्दल जास्त काळजी करणे

young ethnic lady applying foundation on face of friend with brush
Think and Quit Bad Habits- Photo by George Milton on Pexels.com

ब-याच मुली आपल्या त्वचेच्या त्रुटींबद्दल खूप चिंता करतात; त्यांना शरीरावर दोष नसलेली त्वचा हवी असते. चेह-यावर एखादी पुरळ असेल तर; तिला हाताने सारखा स्पर्श करतात. सततच्या स्पर्शामुळे इन्फेक्शची शक्यता वाढते; या कृतीमुळे त्वचेवर चट्टे देखील होऊ शकतात. तेंव्हा, आपल्या त्वचेबद्दल जास्त काळजी करणे थांबवा. आपण जसे आहात तसे सुंदर आहात.

नकारात्मक दृष्टीकोन (Think and Quit Bad Habits)

Negative attitude
Think and Quit Bad Habits-marathibana.in

सतत नकारात्मक विचार करणे ही वाईट सवय आहे; काहीजण ब-याच गोष्टींचा नकारात्मक विचार करतात. मला हे जमेल की नाही, नाही जमले तर काय होईल? हे केले तर माझे नुकसान होईल काय? असे नकारात्मक विचार करण्याऐवजी सकारात्मक रहा; सर्व ठीक होईल, असा विचार करा.

हायपर न होता मित्रांमध्ये मिसळा; त्यांचा सल्ला घ्या, अनेकांच्या विचारांमधून योग्य मार्ग सापडतो. सकारात्मकतेमध्ये प्रचंड शक्ती असते; आपण मानसिक ताणतणावात असताना शारीरिक प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते, म्हणून नकारात्मक दृष्टीकोन बदला. वाचा: What are the Benefits of Milk Thistle? | काटेरी दुध फुलांचे फायदे

सवयीचे मुळ घट्ट होण्यापूर्विच नष्ट करा

Destroy the habit before it takes root
Think and Quit Bad Habits-marathibana.in

एका श्रीमंत व्यावसायिकाला आपल्या मुलाच्या वाईट सवयीबद्दल काळजी होती. त्यासाठी त्याने एका शहाण्या, वृद्ध माणसाचा सल्ला घेतला. म्हातारा त्या व्यवासयीकाच्या मुलाला भेटला आणि त्याला बाहेर फिरायला नेले. ते जंगलात गेले तेथे त्या वृद्ध व्यक्तीने मुलाला एक लहान रोपटे दाखवले. वृध्दाने मुलास  ते छोटे रोपटे उपटण्यास सांगितले. मुलाने ते रोपटे अगदी सहज उपटले, आणि ते पुढे चालू लागले. वाचा: Don’t sleep under a tree at night Why? | रात्री झाडाखाली झोपू नये.

काही अंतर चालून गेल्यानंतर पुन्: त्या वृध्दाने मुलाला पूर्विपेक्षा पेक्षा; थोडे अधिक मोठे रोप उपटण्यास सांगितले; मुलानेही ते थोडे प्रयत्न करुन उपटले; ते पुढे चालत असताना त्या वृद्धाने मुलाला अगोदरच्या दोन्ही रोपटयांपेक्षा; अधिक मोठे आणि बळकट रोपटे उपटण्यास सांगितले; मुलगा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करुनही; ते मजबूत रोपटे उपटण्यात अयशस्वी होतो. तेंव्हा वृद्धव्यक्ती त्या मुलाकडे पाहते, हसते आणि मग त्या मुलास विचारते; “तुझ्यामध्ये असलेली सवय ही चांगली आहे की वाईट”.

यावरुन वाईट सवयीचे मूळ जर घट्ट रुतले; तर ते बाहेर काढणे कठीण असते. तेंव्हा सवयीचे मुळ घट्ट रुतन्यापूर्वीच; त्यापासून सुटका करणं केंव्हाही चांगलं. वाईट सवयी वेळेच्या आत बदललल्या नाही, तर त्याच सवयी आपली वेळ बदलतात. वाचा: How to get one lakh monthly pension | दरमहा रु.1 लाख पेन्शन

Related Posts

Related Post Categories

शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Bachelor of Technology Courses

Bachelor of Technology Courses | बीटेक कोर्स यादी

Bachelor of Technology Courses | इयत्ता 12वी सायन्स नंतर बीटेक कोर्स आणि स्पेशलायझेशनची यादी, जी विदयार्थ्यांना उद्योगाच्या आवश्यकतांसह अवगत करेल ...
Read More
Diploma in Textile Design After 10th

Diploma in Textile Design After 10th | टेक्सटाईल डिझाईन

Diploma in Textile Design After 10th | 10वी नंतर टेक्सटाईल डिझाईन मध्ये डिप्लोमासाठी पात्रता, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, महाविदयालये, नोकरी व ...
Read More
Diploma in Accounting After 12th

Diploma in Accounting After 12th | डिप्लोमा इन अकाउंटिंग

Diploma in Accounting After 12th | डिप्लोमा इन अकाउंटिंग, पात्रता, प्रवेश प्रक्रिया, कौशल्ये, अभ्यासक्रम, प्रमुख महाविद्यालये, जॉब प्रोफाईल, नोकरीचे क्षेत्र, ...
Read More
B.Tech in Information Technology

B.Tech in Information Technology | आय.टी बी.टेक

B.Tech in Information Technology | माहिती तंत्रज्ञानातील बी. टेक, पात्रता निकष, प्रवेश प्रक्रिया, प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रम, विषय, करिअर पर्याय, भविष्यातील ...
Read More
Hotel Management Courses After 10th

Hotel Management Courses After 10th | हॉटेल मॅनेजमेंट

Hotel Management Courses After 10th | 10वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस, कोर्स अभ्यासक्रम, कालावधी, महाविदयालये, सरासरी फी व शंका समाधान ...
Read More
Bachelor of Technology in Automobile Engineering

Bachelor of Technology in Automobile Engineering

Bachelor of Technology in Automobile Engineering | बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक), ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग कोर्स, पात्रता, प्रवेश परीक्षा, अभ्यासक्रम, महाविदयालये व ...
Read More
Know About IT Courses After 10th

Know About IT Courses After 10th | आयटी अभ्यासक्रम

Know About IT Courses After 10th | दहावी नंतर कमी कालावधीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करुन देणा-या आयटी अभ्यासक्रमांबद्दल जाणून घ्या ...
Read More
Know the top 5 Courses after 10th

Know the top 5 Courses after 10th | 10 वी नंतरचे 5 कोर्स

Know the top 5 Courses after 10th | अभियांत्रिकी, वैदयकिय, व्यवसाय व्यवस्थापन, प्रमाणपत्र व व्यवसायाशी संबंधीत महत्वाचे 10 वी नंतरचे ...
Read More
Know what to do after 12th?

Know what to do after 12th? | 12वी नंतर पुढे काय?

Know what to do after 12th? | 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर विदयार्थी त्यांच्या आवडीनुसार विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेची निवड करु ...
Read More
Best 5 Computer Science Courses

Best 5 Computer Science Courses | संगणक विज्ञान पदवी

Best 5 Computer Science Courses | सर्वोत्कृष्ट 5 संगणक विज्ञान अभ्यासक्रम, बीटेक, बीई, बीसीएस, बीएस्सी व बीसीए विषयी सविस्तर माहिती ...
Read More
Spread the love