All About PF Withdrawal Conditions and Rules | आता PF च्या मदतीने करा लग्न, खरेदी करा घर-जमीन, बांधकाम किंवा घर नुतणीकरण, या व अशा अनेक कारणांसाठी…
Table of Contents
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना (All About PF Withdrawal Conditions and Rules)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ही 1952 मध्ये नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरु केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. 20 पेक्षा अधिक कर्मचारी किंवा कामगार काम करीत असलेल्या आस्थापनांमध्ये; निवृत्ती पश्चात कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहीले जाते. कर्मचारी दरमहा मूळवेतनाच्या 12% रक्कम; या निधीत जमा करतात. या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्तीसमयी एक रकमी लाभ देण्याबरोबरच दोन महत्वाचे अतिरिक्त लाभही आहेत. (All About PF Withdrawal Conditions and Rules)
1) कर्मचारी निवृत्तिवेतन योजना (Employees Pension Scheme)
2) कर्मचारी ठेवीशी निगडित विमा योजना; (Employees Deposit Linked Insurance Scheme) कर्मचा-याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबित व्यक्तीस पेन्शनचा लाभ या योजनेंतर्गत दिला जातो. (EPF withdrawal rules)
आपली स्वप्नपूर्ती करा आता पीएफच्या मदतीने

आपली स्वप्नपूर्ती करा आता पीएफच्या मदतीने
नोकरी करणा-या प्रत्येकाचे आपले स्वत:चे एक घर असावे हे स्वप्न असते; स्वप्नपूर्तीसाठी अनेकजन आपल्या नोकरीच्या कालावधीत थोडेथोडे पैसे वेगवेगळया प्रकारच्या गुतवणूकीमध्ये गुंतवतात. परंतू गृह कर्जाच्या कडक अटी आणि न परवडणारे व्याजदर; यामुळे आपली स्वप्नपूर्ती लांबते. आता आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी; आपल्या गुंतवणूकीच्या मॅचुरीटीची वाट पहावी लागणार नाही. जर आपले पीएफ खाते असेल तर; ते आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ); ही कर्मचा-याची भविष्यासाठी असलेली निश्चित रक्कम आहे, ज्यात पगारदार कर्मचा-यांच्या पगारामधून दरमहा योगदान दिले जाते; आणि ती रक्कम खात्यात जमा केली जाते; त्या रकमेमधील काही हिस्सा आपण काढू शकता. (EPF withdrawal rules) वाचा: EPFO- जाणूनघ्या, पीएफचेनियम, व्याज, आणि बरेचकाही…
कोणकोणत्या कारणांसाठी पीएफमधून पैसे काढता येतात?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ); योजनेचे नियम आपल्याला विविध कारणांसाठी ईपीएफ खात्यातून; पैसे काढण्याची परवानगी देतात. निवृत्तीनंतर तुम्ही ईपीएफ खात्यातून पैसे काढू शकता; तसेच, सेवानिवृत्तीपूर्वी विविध कारणांसाठी आपण; आपल्या ईपीएफ खात्यातून पैसे काढू शकता. वाचा:New guidelines of EPFO for tax | EPFO ची नवीन मार्गदर्शक तत्वे
यामध्ये घर बांधकाम, घर खरेदी, मुलांचे शिक्षण, लग्न; मेडिकल इमरजंसी इ. कारणांसाठी पैसे काढता येतात. कोरोनाव्हायरस-लॉकडाऊनमुळे उद्भवणा-या आर्थिक आपत्कालीन परिस्थितीला; वित्तपुरवठा करणे समाविष्ट आहे. नोकरी गमावल्यामुळे किंवा आपण नोकरी सोडल्यानंतर आपल्याला परतावा मिळण्यासाठी दावा दाखल करण्याची देखील परवानगी आहे. वाचा: National Pension Scheme (NPS)│राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

पीएफ मधून पैसे काढण्यासाठी; काय आहेत पीएफच्या अटी आणि शर्थी
१. शिक्षण: कर्मचा-याला आपला मुलगा किंवा मुलगी यांचे इयत्ता 10 वी नंतरचे शिक्षणसाठी पैसे काढता येतात. त्यासाठी 7 वर्षांच्या ईपीएफ सदस्यत्वाची अट आहे. शिक्षणासाठी पैसे काढताना कर्मचा-याला एकूण जमा राशी व व्याज यांच्या 50% रक्कम काढता येते. वाचा: All About National Pension Scheme 2022 | एनपीएस योजना
२. विवाह: कर्मचा-याला 7 वर्षांच्या ईपीएफ सदस्यत्वानंतर स्वत: चा मुलगा, मुलगी, भाऊ किंवा बहिणीचे लग्न यासाठी एकूण जमा राशी व व्याज यांच्या 50% रक्कम काढता येते.
3. घर: घर खरेदी, घराच्या बांधकामासाठी जमीन खरेदी किंवा घराचे नुतणीकरण यासाठी कर्मचारी पैसे काढू शकतो. त्यासाठी ईपीएफ सदस्यत्व किमान 5 वर्षांचं असलं पाहिजे. घर विकत घेण्यासाठी किंवा घराचे नूतनीकरण करण्यासाठी स्वत: च्या किंवा पत्नीच्या नावे घर किंवा जमीन घेणे आवश्यक आहे. आपण भूखंड खरेदीसाठी मासिक पगाराच्या 24 पट आणि घर खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी मासिक पगाराच्या 36 पट पैसे काढू शकता. या प्रकरणात आपण आणि कंपनी दोघांचेही योगदान आणि व्याज रक्कम काढून घेऊ शकता. तसेच घर खरेदी करण्यासाठी गृहनिर्माण योजनेचा सदस्य असणे आवश्यक नाही.
ईपीएफओची ऑनलाईन सुविधा (All About PF Withdrawal Conditions and Rules)
EPFO ची ऑनलाईन सुविधा देखील आहे. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अवघ्या 15 ते 20 दिवसांमध्ये पीएफचे पैसे आपल्याला नोंदणीकृत बँक खात्यात जमा हाेतात.
ईपीएफओच्या ऑनलाईन सुविधे द्वारे ‘असे’ काढा पैसे

1. खालील ईपीएफओ (EPFO) वेबसाईट ओपन करा. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
2. लॉगिन करण्यासाठी आपला UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाका.
3. मॅनेजवर (Manage) क्लिक करा.
4. केवायसी (KYC) पर्यायावर सर्व माहिती तपासा.
5. ऑनलाईन सेवांवर (Online Services) पर्याय निवडा आणि CLAIM (फॉर्म -31, 19 & 10C) वर क्लिक करा.
6. येथे ईपीएफची संपूर्ण रक्कम काढून घेणे, कर्जे आणि ॲडव्हान्ससाठी काही पैसे काढून घेणे; आणि पेन्शनसाठी पैसे काढण्याचे पर्याय दिलेले आहेत.
7. आपल्या गरजेनुसार पर्याय निवडा, त्यानंतर ड्रॉप मेनू उघडेल. त्यावरुन क्लेमवर क्लिक करा.
8.आपला फॉर्म सबमिट करण्यासाठी Proceed For Online Claim वर क्लिक करा.
फॉर्म भरल्यानंतर साधारनत: 15 ते 20 दिवसांमध्ये ईपीएफची रक्कम तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा होईल.
वाचा: National Pension Scheme (NPS)│राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन कोण करते?
कामगार मंत्रालयांतर्गत कार्यरत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन; (EPFO) ईपीएफचे व्यवस्थापन करते. प्रत्येक महिन्याच्या पगाराच्या स्लिपमध्येही; ही माहिती उपलब्ध आहे. कोणताही नोकरी करणारा कर्मचारी घर खरेदी करण्यासाठी; त्याच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो. याशिवाय ही सुविधा EPFO मार्फत पुरविली गेली आहे; आपण आपल्या घराच्या खरेदीसाठी; पीएफ खात्यातून 90 % पर्यंत पैसे काढू शकता. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून मासिक ईएमआयदेखील भरु शकता. वाचा: What is National Pension System? | नॅशनल पेन्शन सिस्टम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विषयी थोडक्यात माहिती.

EPFO ग्राहक आणि हाती घेतलेल्या आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत; जगातील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा संस्था आहे. सध्या ती 19.34 कोटी खाती (वार्षिक अहवाल 2016-17); त्याच्या सदस्यांशी संबंधित आहे.
15 नोव्हेंबर 1951 रोजी कर्मचारी भविष्य निधी; अध्यादेश जारी करुन; कर्मचारी भविष्य निधी अस्तित्वात आला. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अधिनियम, 1952 ने त्याची जागा घेतली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विधेयक; संसदेत सादर करण्यात आले. 1952 सालचे बिल क्रमांक 15 म्हणून; कारखाने आणि इतर आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांसाठी; भविष्य निर्वाह निधीची तरतूद करणारे; विधेयक म्हणून. हा कायदा आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी; आणि विविध तरतुदी कायदा; 1952 म्हणून ओळखला जातो; जो संपूर्ण भारतात विस्तारित आहे. त्याखाली तयार केलेला कायदा; आणि योजना केंद्रीय विश्वस्त मंडळ, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या; त्रिपक्षीय मंडळाद्वारे प्रशासित केल्या जातात. ज्यात सरकारचे प्रतिनिधी (केंद्र आणि राज्य दोन्ही); नियोक्ते आणि कर्मचारी असतात. वाचा: What is the EPF & how to calculate PF balance? |ईपीएफ योजना
केंद्रीय विश्वस्त मंडळ भारतातील; संघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या; कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी भविष्य निर्वाह निधी; पेन्शन योजना आणि विमा योजना व्यवस्थापित करते. कर्मचारी पीएफ संघटना (ईपीएफओ); द्वारे बोर्डाला मदत केली जाते; ज्यामध्ये देशभरातील 135 ठिकाणी कार्यालये असतात. संस्थेचे एक सुसज्ज प्रशिक्षण आहे; जेथे संस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी; तसेच नियोक्ते आणि कर्मचारी; यांचे प्रतिनिधी प्रशिक्षण आणि सेमिनार साठी उपस्थित असतात. EPFO कामगार आणि रोजगार मंत्रालय; भारत सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. वाचा: How to get one lakh monthly pension | दरमहा रु.1 लाख पेन्शन
EPFO मंडळ तीन योजना चालवते – ईपीएफ योजना 1952, पेन्शन योजना 1995 (ईपीएस) आणि विमा योजना 1976 (ईडीएलआय). वाचा NPS- Retirement Plan for All Citizens | राष्ट्रीय पेन्शन प्रणाली
शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Diploma: The best career option after 10th | 10वी नंतर डिप्लोमा
Read More

The Best Law Courses After 12th | 12वी नंतर कायदा अभ्यासक्रम
Read More

4 Important Actions About Aadhaar card | आधार अपडेट्स बाबत
Read More

Latest Water Purification Technologies | नवीन जल शुध्दी तंत्रज्ञान
Read More

Psychology: The best career option after 12th | मानसशास्त्र
Read More

How to Make a Career in Merchant Navy | करिअर इन मर्चंट नेव्ही
Read More

Bachelor of Arts in Hotel Management | हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीए
Read More

Marine Engineering: the best option for a career | सागरी अभि.
Read More

How to become a corporate lawyer | कॉर्पोरेट वकील कसे व्हावे
Read More

Diploma in Information Technology | माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा
Read More