आई-बाबा सावधान! तुम्ही जर मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर वेळीच सावध व्हा! | Harmful Effects of Mobile Phone on Children…

Table of Contents
मोबाईल हे संपर्क, मनोरंजन व शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे?
(Mobile Phone and Children) अलिकडच्या काळात मोबाईल फोन (Mobile Phone) हा मानवाच्या जीवनाचा; एक अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल आपल्या जीवनात एक महत्वाची भूमिका बजावत असला तरी; त्याचे तोटे देखील आहेत.
आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईलला; संप्रेषणाचे (communication) सर्वात जलद साधन समजले जाते. संपर्काच्या साधनाबरोबरच मोबाईलचा मनोरंजनासाठी (intertainment) उपयोग केला जातो.;हल्ली अनेक शैक्षणिक ॲप्स उपलब्ध असल्यामुळे मुलांना (Children) शिक्षणासाठी (education) देखील त्याचा उपयोग होतो.
वाचा: How to be a Good Student? | आदर्श विद्यार्थी कसे व्हावे?
ग्रामीण भागातील अनेक पालकांनी हे अनुभवलं आहे की; मुलं शैक्षणिक ॲप्सचा शोध घेत इतरत्र भरकटले जातात; आणि आपला वेळ अभ्यासाव्यतिरिक्त ॲप्सचा शोध घेण्यामघ्ये घालवतात. पालकांनी जर त्यांना मदत केली तर; त्याचा योग्य उपयोग होऊ शकतो. परंतू पालकांकडे उपलब्ध असलेला वेळ आणि माहिती याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत.
मोबाईल (mobile phone) हे संप्रेषण; मनोरंजन आणि शिक्षणाचे प्रभावी साधन आहे. परंतू मोबाईलचा योग्य पदधतीने गरजेनुसार योग्य कामासाठी उपयोग केला पाहिजे. हे झाले मोठया मुलांच्या (children) बाबतीत, परंतू लहान मुलांचे काय? त्यांना मोबाईलचे आकर्षण कसे निमार्ण होते? वाचा: Think and Quit Bad Habits | विचार करा आणि ‘वाईट सवयी’ सोडा
सुरुवातीला केलेल्या कृतिची गंमत वाटते, मात्र नंतर तिच गंमत सवयीमध्ये बदलते

हल्ली घरात जेवढी मानसे आहेत त्यापेक्षा जास्त मोबाईल हॅन्डसेट सापडतील; त्याचे कारण म्हणजे एक मोबाईल खराब झाला की; तो रिपेअर होईपर्यंत आपण मोबाईल शिवाय राहू शकत नाही. घरातील मोठ्या व्यक्तींचा मोबाईलचा सततचा वापर लहान मुले पाहात असतात; लहान मुले अनुकरणप्रिय असतात, त्यामुळे त्यांनाही मोबाईलबद़ल आकर्षण निर्माण होत असते.
सुरुवातीला तुमच्या नकळत मुले (Children) मोबाईल घेतात व मोठी मानसे कसे बोलतात? कसे हावभाव करतात? तसे तेही करतात. त्यांच्याकडे पाहून मोठी मानसे हसतात, त्यांचे कौतुक करतात. तस मुलांनाही आपण काहीतरी चांगल करत आहोत असं वाटत, मोबाईल बद्दल त्यांना आकर्षण निर्माण व्हायला लागतं. आणि मग आपल्याकडच मोबाईल असावा अस त्यांना वाटत.
आजच्या लहान मुलांचं सर्वात आवडता खेळण म्हणजे मोबाईल फोन. जवळ जवळ प्रत्येक मुलाला मोबाईल हवा असतो. परंतू सतत मोबाईलच्या वापरामुळे अनेक दुष्परिणाम बघायला मिळतात. (Constant use of mobile has many side effects.)

लहाण मुलांच्या हातातील मोबाईल घेण्याचा जर प्रयत्न केला तर; ते रडतात, उडया मारतात, हात पाय आपटतात, पळतात, काही मुलं तर अक्षरश:जमीनीवर लोळतात; हे आपण पाहिलेले आहे. असेही काही पालक आहेत; ज्यांनी कौतुक म्हणून आपल्या मुलांच्या या कृतीचे समर्थन केलेले आहे.
तसेच त्यांचे व्हिडिओ तयार करुन ते; सोशल मीडीयावर व्हायरल देखील केलेले आहेत; अशा मुलांचे आधी कौतुक होते परंतू तेही नकळत मोबाईलच्या आहारी केंव्हा जातात हे आपल्या लक्षातही येत नाही.
मुले मोबाईलच्या आहारी जाण्यास जबाबदार कोण?

लहानमुले मोबाईलच्या आहारी जाण्यास; माता, पिता आणि कुटुंबातील इतर सदस्य; महत्वाची भूमिका बजावत असतात. काही मुलांच्या बाबतीत तर असे होते की, त्यांची आई मुल जेवत नाही; म्हणून त्याच्या हातात मोबाईल देतात.
मग मोबाईल पाहता पाहता आई घास भरवते; मुलंही जेवत असतात, पण त्या मुलांच लक्ष जेवणाकडे नसतं; तर मुलं मोबाईलमध्ये रमलेले असतात. आईच घास भरवण चालू असतं, मुलंही खात असतात; पण मोबाईलच्या नादात आपले पोट भरल्याचेही; मुलांच्या लक्षात येत नाही.
मुल छान जेवल्याचे समाधान आईच्या चेहऱ्यावर असते; पण नंतर त्याचे पोट दुखण्याचे कारण आपण फक्त शोधत राहतो. मुलाचे जेवताना मोबाईल पाहण्याच्या सवयीचे रुपांतर व्यसनात कधी होते; हे कोणाच्या लक्षातही येत नाही.
वाचा: Amazing Benefits of Dates for Health | खजूराचे अद्भुत आरोग्य लाभ
कधीकधी पालक आपल्या मुलांना (Children) शांत ठेवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल फोन ( Mobile Phone) देतात. असे असेल तर वेळीच सावध व्हा, कारण ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. मोबाईलमुळे मुलं चिडखोर होत असल्याचे संशोधनातून समोर आलं आहे.

वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा; मोबाईलचा घरातील अतिवापर मुलं पहात असतात. विनाकारण मोठी माणसं मोबाईल (mobile) सतत हाताळत असतात; कोणतिही टयून वाजली की लगेच मोबाईलकडे पाहातात. त्यामुळे आपल्या घरी जर लहान मुलं असतील तर; कुटुंबातील सर्व व्यक्तींनी मोबाईलच्या सर्व टयून म्यूट केल्या पाहिजेत.

पूर्वी आई-वडील बाजारातून जेंव्ही घरी येत असत, तेंव्हा मुलांची नजर त्यांच्या हातातील सामानाच्या पीसवीकडे असायची; उत्सुकता असायची की त्यांनी काय खाऊ आनला असेल याची. परंतू हल्ली आई वडील घरी आले की; मुलांची नजर बॅगकडे नसते तर मोबाईल ठेवलेल्या पर्सकडे असते; ते लगेच त्यांचेकडे मोबाईल मागतात; यावरुन मुलांना कोणत्या गोष्टीचे आकर्षण जास्त आहे हे लक्षात येते. वाचा: How to be a Good Parent | चांगले पालक कसे व्हावे
मोबाईल/सेल फोन आणि मुलांचे आरोग्य (Mobile Phone and Children)
मोबाईल/सेलफोन (mobile/cell phone) किंवा स्मार्टफोनचा जास्त वापर; वापरकर्त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक (harmful) आहे, परंतू मुलांच्या आरोग्यावर; (children’s health) त्याचा जास्त परिणाम होतो.
याबाबतचा इशारा डॉक्टरांनी वेळोवेळी दिलेला आहे; मोबाईलचा वापर मुलांच्या आरोग्याच्या (children’s health) दृष्टीने चांगला नाही. मोबाईलच्या अति वापरमुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? त्यामुळे मुलांचे डोळे लाल होतात, अशा परिथ्सितीमध्ये वेळोवेळी डॉक्टरांकडे जावे लागते; मोबाईलमधून बाहेर पडणा-या किरणांचा प्रखर प्रकाश; यामुळे चष्मा लागण्याची दाट शक्यता असते. स्मरणशक्ती कमी होणे, हाताची बोटे दुखणे, मोबाईल रेडियशनचा शरीरावर परिणाम होणे, इत्यादी.

मोबाईल (Mobile Phone) हातात आसतांना कोणाचाही व्यत्यय नको; म्हणून मुलं एकांत पसंत करतात त्यामुळे इतर मुलांमध्ये अशी मुले मिसळत नाहीत; इतर मुलांमध्ये न मिसळल्यामुळे ते एकलकोंडी होतात. असे आपण अनेक तज्ञ मंडळीकडून; ऐकलेले आहे. बाहेर मैदाणावर खेळायला न गेल्यामुळे; त्यांचा शारिरीक व्यायाम होत नाही; त्यामुळे रात्री झोपही चांगली लागत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या शाळेतील ॲक्टिव्हिटीवर व अभ्यासावरही होतो.
इतर मुलांमध्ये (Children) न मिसळल्यामुळे वैचारीक पातळी विकसीत होत नाही; मैदाणावरील खेळाचा आनंद त्यांना घेता येत नाही. तसेच मैदाणावरील मोकळी हवा त्यांना मिळत नाही; अशा मुलांचे मित्रही कमी असतात. जे थोडेफार असतात ते सर्व मोबाईल, मोबाईलवरील गेम, मोबाईलवर काय केले? असे फक्त मोबाईल या विषयावरच बोलत असतात.
मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी काय करावे?
मुलांना (Children) जर मोबाईलपासून (Mobile Phone) दूर ठेवायचे असेल तर; अगोदर पालकांना आपल्या सवयीमध्ये; काही बदल करावे लागतील. जेंव्हा आपण घरी असता तेंव्हा विनाकारण मुलांच्या समोर; मोबाईल हाताळत बसू नये. मोबाईलची गरज नसतांना केवळ टाईमपास म्हणून वापर करणे टाळावे; घरात मुलांच्या समोर मोबाईल या विषयावर बोलणे टाळावे.
वाचा: How to be a Good Father | चांगला पिता कसा असावा

आपआपल्या कामामुळे घरातील सर्व मंडळी दुपारचे जेवण एकत्र घेऊ शकत नाहीत, परंतू रात्रीचे जेवण मात्र एकत्र घ्यायला काय हरकत आहे? त्यामुळे कुटुंबातील सर्वजन एकमेकांशी आनंदाने गप्पा मारतील; दिवसभरातील प्रसंग एकमेकांना सांगतील. संपूर्ण कुटुंब व घरात आनंदाचे वातावरण तयार होईल.
मोबाईलच्या अडथळयाविना घेतलेल्या जेवनाचा आनंद; काही वेगळाच असेल. जर कौटुंबीक वातावरण आनंदी, उत्साही व मनमोकळे राहात असेल, आपली मुलंही मोबाईलपासून दूर रहात असतील तर; आपल्या घरी मुलांबरोबर असताना मोबाईल थोडा बाजूला ठेवायला काय हरकत आहे. वाचा: The Best Activities for Kids | मुलांसाठी सर्वोत्तम उपक्रम
लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायच असेल तर; या कल्पना वापरा, आपला जास्तीतजास्त वेळ मुलांसाठी द्या

पालकांनी घरी असताना आपला जास्तीत जास्त वेळ मुलांसाठी दिला पाहिजे; नोकरी, धंदा किवा इतर कामामुळे पालक, त्यात आई-वडील दोघेही घराबाहेर पडत असतील तर; अशा पालकांचा आपल्या मुलांबरोबरचा (Children) सहवास कमी असतो.
नोकरी किंवा धंदयाच्या निमित्ताने घराबाहेर पडणा-या पालकांचा आपल्या मुलांबरोबरचा सहवास कमी असतो. त्यामुळे मुलं त्यांची घरी येण्याची आतुरतेने वाट पाहात असतात. आई-वडीलांची दरवाज्यात ऊभे राहून, गेटजवळ आणि गॅलरीतून वाट पाहात असलेली अनेक मुलं आपण सर्वांनी पाहिलेली आहेत.
काही मुलं वडील घरी आले की; त्यांच्याकडे पळत जाऊन त्यांच्या हातातील मोबाईल घेणारीही अनेक मुलं आहेत. अशी मुलं आपल्या वडीलांची घरी येण्याची आतुरतेने वाट पाहतात; ती तुमची वाट पाहात नाहीत; तर, तुमच्या मोबाईलची वाट पाहात असतात. वाचा: Tips for Good Parenting | चांगल्या पालकत्वासाठी टिप्स
तेंव्हा पालकांनी ठरवाचय आपल्याला आपली वाट पाहणारी मुलं हवी आहेत की; आपल्या मोबाईलसाठी (Mobile Phone) वाट पाहणारी. वाचा: ‘MEHRANGARH’ The most famous fort in the world | मेहरानगड
मुलांना इतर ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवा (Mobile Phone and Children)

घरी असताना पालकांनी आपला जास्तीतजास्त वेळ मुलांसाठी देणे महत्त्वाच आहे; घरी मुलांना चित्रकला, रंगकाम, हस्तकला, संगीत, नृत्य, वादन, इनडोअर व आऊटडोअर गेम्स, पझल, हस्ताक्षर, वाचन इत्यादी. गोष्टी शिकविल्या; तर मुले त्यात रमतील. त्यातून त्यांची आवड-निवडही लक्षात येईल.
प्रेमाणे एकमेकांशी गप्पा मारा त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होईल; लहान मुलांना विश्वासात घेतले आणि एखादी गोष्ट त्यांना पटवून दिली की ते लगेच समजतात. वाचा: Know The Road Safety Rules | रस्ता सुरक्षा नियम
मोबाइल फोनशी संबंधीत पालकांचे प्रश्न (Mobile Phone and Children)
सेल्युलर रेडिएशन मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे का?
अनेक तज्ञांनी हे स्पष्ट केले की; मोबाईल फोन/सेल फोन किंवा स्मार्टफोनचे रेडिएशन मुलांसाठी धोकादायक आहे. मुलांच्या आरोग्यावर रेडिएशनचे दुष्परिणाम होतात; त्याचा मुलांच्या वागणुकीवर परिणाम होतो. मोबाईल फोनचा जास्त प्रमाणात वापर केवळ मुलांसाठीच नाही तर; मोठया व्यक्तींसाठीही हानिकारक आहे. वाचा: Good Foods for Students | विद्यार्थ्यांसाठी आहार
फोनच्या रेडिएशनचा मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम होतात; व्हा मुले दररोज आपली मान खाली घालून त्याचा वापर करतात; तेव्हा याचा परिणाम मुलांच्या मानेवर व मणक्यांवर होतो. वाचा: Know the meaning of moles on the face | चेह-यावरील तीळाचे अर्थ

मोबाइल मुलांसाठी चांगला आहे का? (Mobile Phone and Children)
डॉक्टरांनी सल्ला दिला दिलेला आहे की; 15 किंवा 16 वर्षाखालील मुलांना प्रामुख्याने मोबाईल देणे टाळा. मोबाइल फोनसाठी कोणते वय योग्य आहे? प्रथम पालकांनी हे समजले पाहिजे की आपल्या मुलांना मोबाइल देणे आवश्यक आहे काय?
हे मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मोबाइलच्या वापरावर अवलंबून आहे; योग्य कारणांसाठी विशिष्ठ वेळेपुरता मोबाईल वापरण्यास दिल्यानंतर; पुन्हा मोबाईल घेतांना मुलांची मानसिकता बदलते. तेंव्हा त्यांना मोबाईल देतानाच विश्वासात घेणे महत्वाचे आहे. वाचा: Impact of Lockdown on the Environment | लॉकडाऊन व पर्यावरण
पालक आपल्या मुलांचे मोबाईल व्यसन कसे रोखू शकतात?

या विषयीची माहिती वर दिलेली आहे; पालकांनी त्यांचा मोबाईलचा (Mobile Phone) वापर मर्यादित केला पाहिजे. पालक आणि मुलं घरी असतात; तेंव्हा मोबाईल दूर ठेवा. अभ्यासाच्या वेळी मोबाईलमुळे आपल्या मुलांच्या (Children) एकाग्रतेत अडथळा येत असेल तर; मोबाईल बंद करुन ठेवा. वाचा: Communication Games for Kids | मुलांसाठी संप्रेषण खेळ
पालकांनी मोबाइलच्या काही नोटिफिकेशन्स बंद केल्या पाहिजेत.;जर मुलांना एकदा मोबाईलच्या वापराचे व्यसन लागले तर; मोबाईलच्या व्यसनातून मुक्त करणं खूप कठीण आहे. (Children and Mobile Phone) वाचा: The Importance of Reading in life | वाचनाचे जीवनातील महत्व
आई-वडिलांनी त्यांच्या मुलांना वेळ देणं फार गरजेचं आहे; म्हणजे तुम्ही त्यांना ठरवून, प्लॅनिंग करुन वेळ दिला तर मुलांना मोबाईलची सवय लागणार नाही. वाचा: Success is Around Yourself | यश तुमच्या सभोवतालीच आहे
लक्षात घ्या… कोणत्याही सवयीचे मूळ पक्के होण्यापूर्विच नष्ट केले पाहिजे.

लहान वयात लागलेल्या सवयीचं मूळ जर; घट्ट रुतल तर झाड उखडल्याशिवाय ते नष्ट होत नाही. तेंव्हा कुठलिही सवय आपले मूळ पक्के करण्यापूर्विच नष्ट करणे महत्वाचे आहे. मोबाईलच्या अती आहारी गेलेल्या अनेक मुलांनी (Children) आत्महत्या केल्याच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत. वाचा: All Round Development of Kids | मुलांचा सर्वांगीण विकास
तेंव्हा मुलांकड लक्ष ठेवा, त्यांच्या सवयी शोधा, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा, त्यांना एकलकोंडे होण्यापासून वाचवा, त्यांच्यासाठी घरात जास्तीतजास्त वेळ द्या. (Harmful Effects of Mobile Phones on Children’s mental and Physical Health); वाचा: Most Attractive Facts About Human Babies | बाळांबद्दलची तथ्ये
एकंदरीत मोबाईल फोनशी (mobile phone) संबंधीत काही बदल; जर आपण केले तर त्याचा तोटा नक्कीच होणार नाही; मात्र झाला तर फायदाच होईल. मोबाईल फोनमुळे आपली सर्वांची सोय झाली आहे; मोबाईलमुळे जगातील माणसं जवळ आली आहेत; यात दुमत नाही, पण या सोयीचं व्यसनात रुपांतर होणार नाही; याची काळजी घेणही तितकच महत्वाच आणि गरजेच आहे.
Related Posts
- Don’t want a girl but a daughter-in-law | मुलगी नको, पण सून हवी
- Adverse effects of media on children | मीडिया आणि मुले
- The Most Beautiful Birds in the World | जगातील सर्वात सुंदर पक्षी
- New 7 Wonders of the World: जगातील नवी सात आश्चर्ये
Post Categories
शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Know the early life of Lord Ram | श्रीरामाचे प्रारंभिक जीवन
Read More

Know all about Diabetes | मधुमेहाविषयी सर्व काही
Read More

Popular Varieties of Mangoes in India | आंब्याचे प्रकार
Read More

The Deadliest Places in the World | प्राणघातक ठिकाणे
Read More

Online Teaching and Learning | ऑनलाइन शिक्षण
Read More

The best ways to deal with Acne | मुरुमांना असे सामोरे जा
Read More

Strange facts about the human body | मानवी शरीर तथ्ये
Read More

How to Manage Time at Work | कामाचे वेळ व्यवस्थापन
Read More

Know the Amazing Benefits of Amla | आवळयाचे फायदे
Read More

How to avoid NFT Scams? | एनएफटी घोटाळे कसे टाळावेत
Read More