What is Vaijayanti mala or Vana-mala? | जन्माष्टमी, वैजयंती माळ म्हणजे काय? वैजयंती माळ परिधान करण्याचे फायदे घ्या जाणून…
कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू सणांपैकी; सर्वात महत्वाचा एक सण आहे. या दिवशी सर्व लहानथोर मंडळी; जन्माष्टमी कार्यक्रमासाठी तयारीत व्यस्थ असतात. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद घेण्यासाठी; त्यांच्या शिकवणींचे स्मरण करुन आणि त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी; जन्माष्टमी साजरी केली जाते. What is Vaijayanti mala or Vana-mala?
जन्माष्टमी गोकुळाष्टमी म्हणूनही ओळखली जाते; आणि जगाच्या विविध भागांमध्ये; वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून ओळखले जातात; आणि जगाला वाईटापासून वाचवण्यासाठी, प्रेम आणि सौहार्दाचा संदेश देण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला.
वाचा: Janmashtami and Dahi Handi | कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी
हिंदू दिनदर्शिकेनुसार हा उत्सव कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला किंवा भाद्रपद महिन्यातील पंधरवड्याच्या 8 व्या दिवशी येतो. 2021 जन्माष्टमी बद्दल बोलताना; कृष्ण पूजा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ; निशिता पूजा मुहूर्त दरम्यान आहे; जो निशिता काल मध्ये येतो, जो वेदांनुसार मध्यरात्री आहे. पूजा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ; रात्री 11:59 पासून सुरु होईल आणि 31 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 12:44 पर्यंत चालू राहील. What is Vaijayanti mala or Vana-mala?
वैजयंती माळ म्हणजे काय? (What is Vaijayanti mala or Vana-mala?)

वैजयंती एक वनस्पती आहे; वैजयंतीच्या झाडावर खूप संदर व आकर्षक आणि सुवासिक फुलं उमलतात. त्यांच्या बियांपासून माळ तयार केली जाते, तिला वैजयंती माळ म्हणतात. ही माळ म्हणजे जिंकवणारी, विजय मिळवून देणारी किंवा यश संपादन करुन देणारी माळ म्हणून ओळखली जाते. वाचा: बैल पोळा सण
वैजयंतीचे फुल प्रभू श्रीविष्णू व देवी लक्ष्मीला फार प्रिय होते; तर, भगवान श्रीकृष्णाला वैजयंती माळ प्रिय होती. भगवान श्रीकृष्ण वैजयंतीमाळ नेहमीच आपल्या गळयात घालत असत.
वाचा: Know All About Ganesh Chaturthi 2022 | गणेश चतुर्थी
वैजयंती माळेला अनेक नावे आहेत; अर्थात, वैजयंतीमाळ किंवा वन-माळ. जन्माष्टमीच्या शुभ प्रसंगी; कृष्ण आणि विष्णूला पूजेसाठी अर्पण केले जाणारे हे एक धर्मशास्त्रीय फूल आहे; आणि त्यातून पुष्पहार तयार केला जातो. वेद आणि हिंदू पौराणिक कथांनुसार; वैजयंती माळेचा उल्लेख विष्णू सहस्त्रनामातही आहे. हे महाभारतात भगवान विष्णूला समर्पित स्तोत्र आहे, वनमाळी (वन फुले) म्हणून.
लाल, पिवळा, नारिंगी अशा विविध रंगांच्या फुलांनी; विजयाची माला तयार केली जाते, हे एक सुंदर संयोजन बनते; हे भगवान श्रीकृष्णाचे वैभव आहे, जे त्यांना अधिक आकर्षक बनवते.
वाचा: Gudhi Padva is the most important festival in India | गुढीपाडवा
असे म्हणतात की, भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांनी पहिल्यांदा त्यांच्या मैत्रिणींसह रासलीला खेळली होती; त्यावेळी राधेने भगवान श्रीकृष्ण यांना वैजयंतीची माळ घातली होती. वैजयंती एक प्रकारची फुल वनस्पती आहे या वनस्पतीला लाल आणि पिवळया रंगांची फुले येतात.
या फुलांचे कडक दाणे कधीही तुटत नाहीत आणि सडत नाहीत. ते नेहमीच चकचकीत राहतात. ह्याचा अर्थ असा होतो की, जो पर्यंत आयुष्य आहे; तो पर्यंत ते तसेच राहतात. दुसरे असे की या माळेतील जे बियाणं आहे, ते बियाणं स्वतःला जमिनीशी जोडून वाढते. याचा अर्थ असा आहे की, आपण कितीही यशस्वी झालात; तरी नेहमी जमिनीशी जुळलेले राहिले पाहिजे.
वैजयंती माळेचे महत्व (What is Vaijayanti mala or Vana-mala?)

काही विद्वान मंडळी असे सांगतात की; या वैजयंतीच्या माळेत पाच प्रकारांचे मणी गुंफले जातात. जे पंचमहाभूतांचे प्रतीक आहेत;. या मण्याचे नाव इन्द्रनीलमणि (पृथ्वी), मोती (जल), पद्मरागमणि (अग्नि); पुष्पराग (वायुतत्त्व) वज्रमणि म्हणजे हीरा (आकाश) हे आहेत.
दुसरी अशी एक आख्यायिका आहे की; भगवान श्री कृष्ण दोन कारणामुळे वैजयंतीची माळ घालत असत. पहिले कारण हे आहे की; वैजयंतीच्या माळे मध्ये सौंदर्य आणि माधुर्याची अधिष्ठात्री देवी लक्ष्मी वास्तव्यास असते. कारण भगवान श्रीकृष्ण यांच्या मनात राधेचे पाऊल उमटलेले आहे; म्हणून श्री लक्ष्मी यांनी वैजयंती माळेला आपल्या वास्तव्यासाठी निवडले आहे.
जे नेहमी श्रीकृष्णाच्या वक्षस्थळी असते; आणि दुसरे कारण असे की श्रीकृष्णाला; ही माळ सतत राधेची आठवण करुन देत होती, ही माळ मथुरेचा एक माळी तयार करत असे; व भगवान श्रीकृष्णांसाठी ती आणत असे.
वाचा: श्रीकृष्णजन्माष्टमी 2021
वैजयंती माळेचे महत्व एका आख्यायिकेनुसार असे सांगितले आहे की, एकदा इंद्राने गर्वाने व अभिमानास्तव वैजयंती माळेचा अवमान केला होता, त्या कारणास्तव महालक्ष्मी त्यांच्यावर रुसली होती. त्याचा परिणाम असा झाली की, त्यांना वणवण भटकावे लागले.
देवराज इंद्र आपल्या हत्ती ऐरावत वर प्रवास करत होते. वाटेमध्ये त्यांना महर्षी दुर्वासा भेटले; त्यांनी आपल्या गळ्यातली फुलांची माळ काढून इंद्रांना भेट स्वरुपात दिली.
इंद्राने ह्याला आपला अपमान समजून; ती माळ आपल्या हत्ती ऐरावतच्या गळ्यात घातली. आणि ऐरावताने ती माळ आपल्या गळ्यातून काढून पाया खाली चिरडली. आपण दिलेल्या भेटीचा असा अपमान होत असल्याचे पाहून; महर्षी दुर्वासाने संतापून, इंद्राला लक्ष्मीहीन होण्याचाा श्राप दिला.
वैजयंतीचे फूल आणि माळ खूप शुभ आणि पवित्र असतात. वैजयंतीच्या फुलांची माळ अतिशय भाग्यवान असते. ही माळ घातल्याने सौभाग्यामध्ये वाढ होते. या माळेला कोणत्याही सोमवारी; किंवा शुक्रवारी गंगेच्या पाण्याने किंवा स्वच्छ पाण्याने धुऊन घालावी. वाचा: How to Celebrate Holi Festival in India | होळी उत्सव
वाचा: Nag Panchami Festival 2022 the Best Information | नाग पंचमी
वैजयंतीच्या बियाणांच्या माळेने भगवान विष्णू किंवा सूर्याची पूजा केल्याने; ग्रह नक्षत्रांचे प्रभाव नाहीसे होतात. विशेषतः शनीचा दोष नाहीसा होतो. ही माळ घातल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते; दररोज या माळेने आपल्या इष्ट देवांचे जप केल्याने; नवी शक्तीचा संचार होऊन आत्मविश्वास वाढतो.
ही माळ घातल्याने मान सन्मानामध्ये वाढ होते; मानसिक शांती मिळते ज्यामुळे व्यक्ती आपल्या कार्याच्या क्षेत्रात; मन लावून काम करते. अशी आख्यायिका आहे की, पुष्य नक्षत्रामध्ये; वैजयंतीच्या बियाणांची माळ घालणे खूप शुभ असतं. ही माळ सर्व प्रकारांच्या इच्छापूर्ण करते.
या वैजयंती माळेने ‘ऊं नमः भगवते वासुदेवाय’ मंत्राचा; नियमाने जप केल्याने; वैवाहिक जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात. जप केल्यावर केळ्याच्या झाडाची पूजा करावी. वाचा: How to Celebrate Navratri in India | प्रादेशिक पद्धती
वैजयंती माळ कधी घालावी?

- कोणत्याही शुक्रवारी सूर्योदयानंतर 2 तासांच्या आत घालणे चांगले.
- तुम्ही ते पुष्य नक्षत्रावर देखील घालू शकता, दिवस काहीही असो.
- तथापि, जर पुष्य नक्षत्र शुक्रवारी असेल तर तो वैजयंती माळ परिधान करण्यासाठी एक परिपूर्ण दिवस असतो.
- वाचा: Know the Importance of Navratri 2022 | नवरात्री उत्सव
वैजयंती माळ परिधान करण्याचे फायदे
वैवाहिक संबंध सुधारतात
वैजयंती माळ परिधान केल्यामुळे; लोकांचे नशीब सुधारते आणि त्यांचे आकर्षण वाढवते. यामुळे पती पत्नीमधील प्रेम आणि आनंद सुधारुन; वैवाहिक संबंध वाढण्यास मदत होते. वाचा: Maharashtra Day History and all 2022 | महाराष्ट्र दिन
जर एखाद्या जोडप्याला संततीमध्ये समस्या असेल तर; ते बाल गोपालांना ही माळ देऊ शकतात; आणि संतां गोपाल मंत्राचे पठण करु शकतात. पूजेनंतर पती -पत्नी दोघांनी वैजयिंती माळ परिधान करावी; आणि संतां गोपाळ मंत्राचा जप करावा त्यामुळे प्रभू विष्णूच्या आशीर्वादाने संतती प्राप्तीसाठी आशीर्वाद मिळतो. वाचा: अष्टविनायक
वैयक्तिक अडचणी दूर करण्यासाठी
तुम्हाला आयुष्यात ज्या-ज्यावेळी अडचणी आल्या असे वाटेल; तेव्हा तुम्ही गायीला वैजयंती माळ अर्पण करु शकता; मिठाई खायला देऊ शकता आणि आशीर्वाद घेऊ शकता. वाचा: रामनवमीचे महत्व
शैक्षणिक यशासाठी वैजयंती माळ परिधान करावी
जर तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रातील लक्ष गाठायचे असेल; तर तुम्ही वैजयंती माळ; अभ्यासाच्या टेबलवर ठेवणे आवश्यक आहे; कारण त्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. तुमच्या मुलाजवळ जर सतत वैययंती माळ असेल; तर त्यामुळे त्याचे संरक्षण करण्यास मदत होते. वाचा: Importance of the Teachers’ Day | शिक्षक दिनाचे महत्व
चांगल्या आरोग्यासाठी वैजयंती माळ परिधान करावी
जर तुम्हाला आरोग्याच्या समस्या येत असतील; किंवा चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची असेल; तर तुम्ही वैजयंती माळ सूर्य मंदिराला अर्पण करु शकता; आणि सूर्य गायत्री मंत्राचा जप करु शकता. हे महत्वाचे आहे की पूजेनंतर; तुम्ही ही माळ गळ्यात घातली पाहिजे. वाचा: हिंदू कायदा व महिला अधिकार
वैजयंती माळ एक रक्षा कवच आहे
आर्थिक लाभ मिळण्यासाठी, वैजयंती माळ परिधान करावी. 8 वैजयंती माला 108 मणी आणि 6 मुखी रुद्राक्ष परिधान करा; कारण यामुळे तुमच्या जीवनात समृद्धी आणि न संपणारी संपत्ती येईल.
माळेसह लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करा; कारण तो व्यक्तीला कोणत्याही प्रलंबित कर्जाची परतफेड करण्यास मदत करतो.
महालक्ष्मी गायत्री मंत्र || ओम श्री महालक्ष्म्यै च विद्महे पत्न्यै च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम ||
आपल्या जीवनात समृद्धी, प्रेम आणि यश आणण्यासाठी; आपण वरील विधींचे पालन केले पाहिजे, आणि त्याच वेळी; आपले जीवन अंतःकरणाने प्रेमळ आणि मणाने निर्मळ राहिले की, जीवन सफल होतं.
Related Posts
- The Religious Significance of Diwali | दिवाळीचे धार्मिक महत्त्व
- Know the Importance of Makar Sankranti 2022 | मकर संक्रांती
- Importance of Guru Purnima in Marathi | गुरुपौर्णिमा
- Significance of Mahalakshmi Vrat | महालक्ष्मी व्रत 2022
Post Categories
आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.
(टीप : या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील तज्ञ व्यक्तींशी संपर्क साधा.) What is Vaijayanti mala or Vana-mala?

Know the early life of Lord Ram | श्रीरामाचे प्रारंभिक जीवन
Read More

Know all about Diabetes | मधुमेहाविषयी सर्व काही
Read More

Popular Varieties of Mangoes in India | आंब्याचे प्रकार
Read More

The Deadliest Places in the World | प्राणघातक ठिकाणे
Read More

Online Teaching and Learning | ऑनलाइन शिक्षण
Read More

The best ways to deal with Acne | मुरुमांना असे सामोरे जा
Read More

Strange facts about the human body | मानवी शरीर तथ्ये
Read More

How to Manage Time at Work | कामाचे वेळ व्यवस्थापन
Read More

Know the Amazing Benefits of Amla | आवळयाचे फायदे
Read More

How to avoid NFT Scams? | एनएफटी घोटाळे कसे टाळावेत
Read More