Easy Way to Memorize Study for Students | आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो; विद्यार्थी दशेमध्ये थोडा त्रास सहन केला तर, भविष्य निश्चितच उज्वल असेल.
Table of Contents
यशस्वी विद्यार्थी कसा अभ्यास करतात
अभ्यास करण्याची; आणि केलेला अभ्यास लक्षात ठेवण्याची एक कला आहे. प्रत्येकाची अभ्यास करण्याची शैली; किंवा पध्दती वेगळी असते. जर आपण खूप अभ्यास करत असाल आणि केलेला अभ्यास लक्षात रहात नसेल तर; अभ्यास करण्याची पध्दती बदला. अभ्यास करण्याच्या वेगवेगळया पध्दती वापरुन; आपणास जुळणा-या पध्दतीचा शोध घ्या. अभ्यासात त्या पध्दतीचा वापर करुन; केलेल्या अभ्यासाचा आढावा घ्या. (Easy Way to Memorize Study for Students)

उदा. वर्गात शिक्षकांनी शिकविलेला घटक किंवा उपघटक; घरी विद्यार्थ्याने केलेला अभ्यास, एखाद्या व्याख्यानामध्ये ऐकलेली माहिती; आकाशवाणीवर ऐकलेली माहिती, किंवा अभ्यासा विषयी एखादया घटकावर मित्रांबरोबर केलेली चर्चा. अभ्यासाविषयी पाहिलेली व्हिडिओ क्लिप; टीव्ही पाहतांना केलेला अभ्यास, गप्पा मारतांना केलेला अभ्यास, वाचन व लेखन करुन केलेला अभ्यास; किंवा खेळताना केलेला अभ्यास.
अशा वेगवेगळया पध्दतींचा वापर करुन; आपणास योग्य वाटणा-या पध्दतीचा शोध घ्या. तिचा वापर करा व पडताळा घेऊन आपणास योग्य वाटणारी पध्दत निवडा. (Easy Way to Memorize Study for Students)

त्याचबरोबर लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळी गाणी; अक्षरे, प्रतिमा, नकाशे, आलेख, मार्कर पेन, नोटसवहीमध्ये केलेले मार्किंग; अधोरेखन, चौकट, यमक, अॅक्रोस्टिक, रंग, कीवर्ड पद्धत, कथा किंवा ड्रॉईंग व पेंटिंग इत्यादींसह; वेगवेगळया खुनांचा वापर करु शकता. अर्थात हे प्रत्येकाची आवड व विचार करण्याची पद्धती यावर अवलंबून आहे; वरीलपैकी आपणास जी पध्दती आरामदायक किंवा उपयुक्त वाटते; ती निवडा. वाचा: Adverse effects of media on children | मीडिया आणि मुले
केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी टिप्स
केलेला अभ्यास लक्षात ठेवणे हे एक अवघड काम आहे; आपण काही गोष्टी सहज लक्षात ठेवू शकतो, परंतु इतर काही गोष्टी आठवत नाहीत. आपल्याला आयुष्यात काही गोष्टी आठवतात; तर काही गोष्टी आपल्या मनातल्या एका दरवाजातून येतात; आणि दुस-या दरवाजाने त्या बाहेर जातात. (Easy Way to Memorize Study for Students)
लक्षात ठेवण्यासाठी कोणतीही “जादूची गोळी” नाही. परंतु येथे काही टिप्स आहेत; ज्या तुम्हाला Easy Way to Memorize Study for Students मदत करु शकतील.
माहिती लक्षात कशी ठेवावी? (Easy Way to Memorize Study for Students)

- जी माहिती आपण लक्षात ठेवली पाहिजे असे वाटते; तेंव्हा ती माहिती अगोदर समजून घ्या. माहिती समजून घेतल्याशिवाय; ती दीर्घकाळ लक्षात राहात नाही. कोणतिही गोष्ट चांगली समजली की; ती सहसा विसरली जात नाही. माहितीचे पुन्हा पुन्हा पुनरावलोकन केल्यास; ती माहिती कायमस्वरुपी लक्षात राहते.
- तुम्हाला आठवत असलेली माहिती आणि एखादी व्यक्ती; ठिकाण, वस्तू, परिस्थिती किंवा भावना; यामध्ये एक सांगड निर्माण करण्याचा प्रयत्न करा. वाचा: Best Career in Drawing and Painting | ड्रॉईंग व पेंटींगमध्ये करिअर
- तुम्ही जी माहिती लक्षात ठेवली पाहिजे असे वाटते; तेंव्हा ती माहिती पुष्कळ वेळा लिहा; आणि इतरांना ती वारंवार सांगा.
- जर आपल्याला खूप मोठी माहिती लक्षात ठेवणे आवश्यक असेल तर; माहितीची लहान, लहान भागांमध्ये विभागणी करा. विभागणी केलेल्या प्रत्येक भागाला एक शिर्षक द्या; मुद्दे तुम्ही लक्षात ठेवू शकता त्या क्रमाने मांडा. अगोदर मुद्दे लक्षात राहिले की स्पष्टिकरण आपोआप आठवते; एक एक मुद्दा घेऊन त्याचे स्पष्टिकरण लिहा. प्रत्येक प्रवर्गातील माहिती; स्वतंत्रपणे लक्षात ठेवण्याचे काम करा. वाचा: Diploma in banking & finance after 12th | बँकिंग व फायनान्स कोर्स
- ठराविक माहिती चांगली लक्षात ठेवण्यासाठी चित्र (ग्राफिक्स्) तयार करा; सर्वत्र दिसत असलेली माहिती लक्षात ठेवण्याऐवजी प्रदर्शित केलेली माहिती लक्षात ठेवणे सोपे आहे.
वाचा: How to Provide Support to Students | विद्यार्थ्यांना आधार द्या
- तुम्हाला आठवत असलेल्या माहितीचे मनात एक चित्र बनवण्याचा प्रयत्न करा. व्हिज्युअल प्रतिमा लक्षात ठेवण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे.
- तुम्हाला जे आठवले पाहिजे ते वापरण्याचा प्रयत्न करा; उदाहरणार्थ, आपण काही नवीन शब्दसंग्रहातील शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्यास, आपल्या बोलण्यात आणि लिहिताना ते शब्द जानीवपूर्वक वापरा.
- स्वत:ची चाचणी घ्या; असे करण्याचा एक चांगला फायदा म्हणजे आपणच आपला पेपर तपासतो; त्यावेळी आपण कोणत्या चूका केल्या हे समजते. नंतर आपण त्या चूका टाळतो; त्यातूनच सुधारणा होत जाते. अशा प्रकारे सोप्या प्रश्नांकडून अवघड प्रश्नांकडे जाता येते.
- आपण लक्षात ठेवलेल्या माहितीचा वापर करुन गेम तयार करा एक मजेदार ॲक्टिव्हिटी तयार करुन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
- लक्षात ठेवणे म्हणजे, आपण शाळेत काहीतरी करणे; आवश्यक नाही. आपल्या आयुष्याच्या सर्व बाबींमध्ये; आपण हे करणे आवश्यक आहे. वाचा: पालकांनो सावधान! आपल्या मुलांच्या बाबतीतही ‘अस’ घडेल..! Mobile Phone and Children
चाचणी परीक्षेसाठी आपण काय करु शकता?

आपली चाचणी परीक्षेची चिंता कमी करण्यासाठी आपण परीक्षेच्या आधी; परीक्षे दरम्यान आणि परीक्षे नंतर करु शकता अशा काही गोष्टी येथे आहेत.
- चाचणी परीक्षेमध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व विषयांच्या सर्व घटकांची अगोदर माहिती घ्या; नियोजन करुन सर्व घटकांचा चांगल अभ्यास करा. हे तंत्र आपल्याला अति चिंता करण्याऐवजी आत्मविश्वासाने परीक्षेस जाण्यास मदत करेल.
- अभ्यास करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवा; चांगले काम करण्याचा विचार करा, अपयशी होऊ नका. आपण किती शिकलात हे दर्शविण्याची संधी म्हणून परीक्षेचा विचार करा.
- परीक्षेच्या आदल्या रात्री पुरेसी झोप घ्या; चाचणीपूर्वी हलके आणि पौष्टिक जेवण करा. जंक फूडपासून दूर रहा; चाचणी परीक्षा सुरु हेाण्यापूर्वी इच्छित स्थळी जा, थोडी विश्रांती घ्या व मन शांत ठेवा.
वाचा: Advice About An Interview | मुलाखतीबद्दल माहिती आणि सल्ला
- चाचणी दरम्यान आपल्याला परीक्षा कठीण वाटली तरी घाबरु नका. आरामशीर रहा, हळू आणि खोल श्वास घ्या. “मी हे करु शकतो” यासारख्या सकारात्मक स्व-विधानांवर लक्ष केंद्रित करा.
- आपण संपूर्ण पेपर सोडविण्यापूर्वी इतर विद्यार्थ्यांनी त्यांचा पेपर संपविण्याबद्दल काळजी करु नका; आपले काम चालू ठेवा; व आपला सर्वोत्तम प्रयत्न करा. वाचा: 14 Benefits of Abacus for Kids | मुलांसाठी ॲबॅकस शिकण्याचे फायदे
- एकदा आपण चाचणी समाप्त केली की; त्याबद्दल चिंता करु नका, ते तात्पुरते विसरा. कारण दिलेल्या चाचणी बद्दल विचार करुन आपण काही करु शकत नाही; आपले लक्ष आणि प्रयत्न नवीन असाइनमेंट आणि राहिलेल्या विषयांकडे वळवा.
- चाचणी परीक्षेच्या निकालानंतर, मिळालेली श्रेणी; या बाबत परीक्षण करा. पुढील चाचणीमध्ये आपण काय बदल करणार; त्यासाठी आपण काय चांगले केले पाहिजे; याचा विचार करा. आपल्या चुका आणि आपण काय चांगले केले; त्यापासून शिका व आपण पुढील परीक्षा देता; तेव्हा हे ज्ञान वापरा. वाचा: 10 Important Study Tips for Students | अभ्यास नको! मग वाचा…
चाचणी परीक्षेपूर्वी हे करा (Easy Way to Memorize Study for Students)

- परीक्षेसाठी तयार राहा, परीक्षेसाठी लागणारे साहित्य तयार ठेवा.
- आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा; आपण किती अभ्यास केला आहे हे दर्शविण्याची आणि आपण केलेल्या अभ्यासाचे बक्षीस मिळण्याची संधी म्हणून परीक्षा आहे असे समजा.
- परीक्षेच्या आदल्या रात्री चांगली झोप घ्या.
- स्वत:ला भरपूर वेळ द्या, विशेषत: परीक्षेपूर्वी परीक्षेच्या ठिकाणी थोडे लवकर जा.
- परीक्षेच्या अगदी आधी आराम करा.
- शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करु नका.
- रिकाम्या पोटी परीक्षेला जाऊ नका.
- आपल्या मनाची चिंता दूर करा आणि परीक्षेला सामोरे जा.
- वाचा: Study Time Table for Students: विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक
चाचणी परीक्षे दरम्यान हे करा (Easy Way to Memorize Study for Students)
- प्रश्नपत्रिकेमधील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- प्रश्न काळजीपूर्वक वाचा.
- जे प्रश्न सोपे वाटतात ते अगोर साडवा.
- अवघड प्रश्न सोडविण्याचा नंतर प्रयत्न करा.
- सर्व प्रश्न सोडविले असल्याची खात्री करा.
- आपल्याला आराम करण्यास मदत करण्यासाठी बसण्याची स्थिती बदला.
- विद्यार्थी जेव्हा त्यांचे पेपर जमा करण्यास सुरुवात करतात; तेव्हा घाबरु नका; प्रथम पेपर पूर्ण करण्यासाठी; आणि जमा करण्यासाठी; कोणताही पुरस्कार नाही. वाचा: The Role of Parents in the Success of their Children | मुलांच्या यशात पालकांची भूमिका
यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी

यशस्वी विद्यार्थ्यांना अभ्यासाची चांगली सवय असते; ते नियोजनबध्द अभ्सास करतात; त्यांच्या अभ्यासाच्या प्रत्येक सवयीबद्दलची माहिती वाचा. आपल्याकडे नसलेली अभ्यासाची सवय; विकसित करण्याचा प्रयत्न करा. वाचा: Why skill-based education is important | कौशल्यावर आधारित शिक्षणाचे महत्व
- एका वेळी जास्त अभ्यास करत नाहीत.
- अभ्यासाच्या वेळेचे नियोजन करतात.
- अभ्यासाचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करतात.
- दररोज नियोजनाप्रमाणे ठरलेल्या वेळी अभ्यास करतात.
- पालक मुलांना ठरवलेल्या अभ्यासाच्या वेळेसाठी सहकार्य करतात.
- अभ्यास करताना प्रथम अवघड वाटणा-या भागावर लक्ष केंद्रित करतात.
- असाइनमेंट सुरु करण्यापूर्वी नोट्सचे पुनरावलोकन करतात.
- वाचा: How to be a Successful Student: विद्यार्थी यशस्वी होण्याचा मार्ग
निष्कर्ष | Conclusion (Easy Way to Memorize Study for Students)
आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की; आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो; तेंव्हा विद्यार्थी दशेमध्ये थोडा त्रास घेतला तर भविष्य निश्चितच उज्वल असेल. यशस्वी विद्यार्थी कोणत्याही वेगळया गोष्टी करत नाहीत; तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, त्यामुळेच तर ते यशस्वी असतात; आपले ध्येये गाठण्यासाठी अतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल; कारण वेडे लोकच इतिहास घडवतात; आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. आज तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक धडा; तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. वाचा: Information on Education in Maharashtra: महाराष्ट्रातील शिक्षण
“Study Tips for Students अभ्यास विसरता लक्षात राहात नाही मग ही माहिती वाचा“; हा लेख आपणास कसा वाटला, या बद्दल आपला अभिप्राय व सूचना; कमेंटमध्ये जरुर कळवा. आपला प्रतिसाद व सुभेच्छा; आमच्यासाठी लाख मोलाच्या आहेत. त्या नवचैतन्य देतात; व त्यामुळे नवीन लेख लिहिण्यास प्रेरणा मिळते. आपण हा लेख आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद…!
Related Posts
- Parents’ Role in the Education of Children |पाल्य, पालक व शिक्षण
- The Role of the Teacher in Child Protection: बालसंरक्षण व शिक्षक
- How to Memorize New Vocabulary | नवीन शब्द कसे लक्षात ठेवावेत
- Does your kid really need a mobile phone or cellphone?
- Dr. Ambedkar CSS of Interest Subsidy | स्कीम ऑफ इंटरेस्ट
Post Categories
शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.

Diploma: The best career option after 10th | 10वी नंतर डिप्लोमा
Read More

The Best Law Courses After 12th | 12वी नंतर कायदा अभ्यासक्रम
Read More

4 Important Actions About Aadhaar card | आधार अपडेट्स बाबत
Read More

Latest Water Purification Technologies | नवीन जल शुध्दी तंत्रज्ञान
Read More

Psychology: The best career option after 12th | मानसशास्त्र
Read More

How to Make a Career in Merchant Navy | करिअर इन मर्चंट नेव्ही
Read More

Bachelor of Arts in Hotel Management | हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीए
Read More

Marine Engineering: the best option for a career | सागरी अभि.
Read More

How to become a corporate lawyer | कॉर्पोरेट वकील कसे व्हावे
Read More

Diploma in Information Technology | माहिती तंत्रज्ञान डिप्लोमा
Read More