What To Do After The 10th? | दहावी नंतर काय करावे? डिग्री की डिप्लोमा, निर्णय घेण्यास गोंधळलेले विदयार्थी व पालकांसाठी उपयुक्त मार्गदर्शन.
Secondary School Certificate (एस.एस.सी) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विदयार्थ्यांना आपल्या करिअरची वाट कशी शोधावी हे कळत नाही. काही पालकही ‘तुला काय करायचे ते कर’ असे बोलून मोकळे होतात. अशावेळी विदयार्थ्यांची मनाची अवस्था अधिक अवघडल्यासारखी होते व What To Do After The 10th? दहावी नंतर काय करावे? हे कळत नाही.
मग विदयार्थी आपल्या मित्राने काय निवडले, ते विचारतात आणि आपली आवड व क्षमता विचारात न घेता मित्राच्या आवडीला प्राधान्य देतात व करिअरची निवड करतात. नंतर काही दिवसांनी लक्षात येते की आपण हा मार्ग निवडायला नको होता. परंतू त्यानंतर वेळ गेलेली असते. बदल करण्यासाठी कधी कधी वार्षिक फी व शैक्षणिक वर्षही वाया जाते. असे आपल्या बाबतीत होऊ नये यासाठी अगोदरच चांगला विचार करा व योग्य मार्ग निवडा.
Table of Contents
काही विदयार्थी त्यांच्या आवडीनुसार कला शाखा, वाणिज्य शाखा किंवा विज्ञान शाखा यासारख्या पदवी अभ्यासक्रमाची निवड करतात, तर काही विदयार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करतात. अशाप्रकारे नेमकी कशाची निवड करायची? म्हणजे डिग्री की डिप्लोमा? यामध्ये विदयार्थ्यांचा गोंधळ होतो.
कदाचित, तुम्ही देखील याला अपवाद नसाल, तुमचाही असाच गोंधळ झाला असेल तर, तुमच्याकडे काय पर्याय आहेत ते जाणून घ्या. व त्यासाठी खालील प्रमुख मुद्द्यांचा विचार करा.
- Know the list of courses after 10th | 10वी नंतरचे कोर्स
- Know the courses after 10th | 10वी नंतरचे अभ्यासक्रम
तुमची आवड ओळखा
इ. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या करिअरची निवड करतांना सर्वात आधि तुमची आवड ओळखा. त्यासाठी तुम्हाला तुमच्या शाळेत जर तुमची कलचाचणी घेतली असेल तर त्याचा विचार करा.
तुमच्या पालकांशी मनमोकळी चर्चा करा व त्यांना तुमची आवड सांगा. तुम्ही पालकांसह तुमच्या शाळेतील तुम्हाला शिकविणा-या शिक्षकांची भेट घ्या, त्यांच्याशी चर्चा करा व सार्वानुमते योग्य तो निर्णय घ्या. (What To Do After The 10th?)
- How To Choose The Right Stream After 10th | योग्य शाखा निवड
- Diploma courses are better than degrees | पदवी की डिप्लोमा, काय करु
कला शाखा
तुम्हाला जर कला, विज्ञान किंवा वाणिज्य यापैकी एखादया शाखेची निवड करायची असेल तर त्या शाखेत शिक्षण घेणा-या तुमच्या जवळच्या मित्राशी किंवा नातेवाईकांपैकी कोणी त्या शाखेत शिक्षण घेत असेल तर त्यांच्याशी बोला.
तुम्हाला जर कला क्षेत्रात तुमचे करिअर करण्याची इच्छा असेल तर भाषा विषय जसे की, मराठी, इंग्रजी, हिंदी किंवा इतर भाषा विषय स्पेशल विषय म्हणून निवडू शकता. पदवीनंतर शिक्षण क्षेत्राशी संबंधीत कोर्स करुन शिक्षक म्हणून नोकरी किंवा खाजगी शिकवणी घेऊ शकता. (What To Do After The 10th?)
कला शाखेत तुम्हाला जर मानसशासत्र किंवा सामाजिक शास्त्र यामध्ये तुमचे करिअर करायचे असेल तर, कला शाखेत प्रवेश घेऊन तुम्ही इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यासारख्या विषयात तुम्ही पुढे जाऊ शकता.
विज्ञान शाखा
जर तुम्हाला विज्ञान शाखेची आवड असेल तर इ.11वी विज्ञान शाखेची निवड करा. तुम्ही इ.12वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे तुम्ही मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा वैज्ञानिक क्षेत्राची निवड करु शकता. (What To Do After The 10th?)
- Know All About Science Stream | विज्ञान शाखा
- Career Opportunities in the Science Stream |विज्ञान करिअर संधी
वाणिज्य शाखा
तुम्हाला जर बँकिंग, फायनान्स, अकाउंटन्सी किंवा बिझनेस क्षेत्रात तुमचे करिअर करण्याची इच्छा असेल तर, इ. 11वी कॉमर्स शाखेची निवड करा. या क्षेत्रात तुम्ही अर्थशास्त्र, लेखा आणि व्यवसाय प्रशासन यांचे शिक्षण घेऊ शकता.
- Know All About Commerce Stream | वाणिज्य शाखा
- Career Opportunities in the Commerce | कॉमर्समध्ये करिअर संधी
अभियांत्रिकी डिप्लोमा
ज्या विदयार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल ते डिप्लोमा कोर्सची (Polytechnic Diploma) निवड करु शकतात. यामध्ये विदयार्थी मेकॅनिकल इंजिनिअर्रिग, सिव्हिल इंजिनिअर्रिग, इलेक्ट्रिकल इंजिनिअर्रिग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर्रिग, संगणक विज्ञान अभियांत्रिकी अशा विविध डिप्लोमा कोर्सची निवड करु शकतात. (What To Do After The 10th?)
- Great Commercial Courses After 10th | व्यावसायिक कोर्स
- Diploma in Engineering after 10th | दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका
संगणकीय क्षेत्र
ज्या विदयार्थ्यांना संगणकाची आवड आहे असे विदयार्थी संगणक करिअर क्षेत्र या मध्ये डिप्लोमा इन इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी किंवा डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स मध्ये डिप्लोमा करु शकतात. (What To Do After The 10th?)
- Robotics Engineering | रोबोटिक्स अभियांत्रिकी
- Know About IT Courses After 10th | आयटी अभ्यासक्रम
- Diploma in Information Technology after 10th | आयटी डिप्लोमा
- Diploma in Animation After 10th | १०वी नंतर ॲनिमेशनमध्ये डिप्लोमा
- Courses in Computer Technology | १० वी नंतर संगणक तंत्रज्ञानातील कोर्स
- Diploma in Robotics Engineering | १०वी नंतर रोबोटिक्स अभियांत्रिकी डिप्लोमा
इतर क्षेत्रातील डिप्लोमा
इ. 10वी नंतर तुम्हाला जर डिझायनिंगमध्ये करिअर करायचे असेल तर, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग, डिप्लोमा इन टेक्सटाइन डिझायनिंग असे अनेक पर्याय आहेत. (What To Do After The 10th?)
- Great Beauty Courses After 10th | सौंदर्य अभ्यासक्रम
- Diploma in Textile Design After 10th | टेक्सटाईल डिझाईन
- Diploma: The best career option after 10th | 10वी नंतरचे डिप्लोमा
पॉलिटेक्निक डिप्लोमा
पॉलिटेक्निक हा एक डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये एखादी संस्था तांत्रिक शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करते. साधारणपणे, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाचा कालावधी हा तीन वर्षांचा असतो ज्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र मिळते.
पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत चांगली नोकरी मिळवून त्यांचे करिअर सुरु करण्यास मदत करते. बहुतेक संस्था सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि नव्याने उदयास येत असलेल्या शाखांमध्ये पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रम सुविधा देतात. (What To Do After The 10th?)
- Know All About Polytechnic | पॉलिटेक्निक विषयी सर्व काही
- Polytechnic Courses After 10th | दहावी नंतरचे पॉलिटेक्निक कोर्सेस
वैदयकीय क्षेत्र
वैदयकीय क्षेत्राची निवड करणा-या विदयार्थ्यांसाठी पॅरामेडिकलमध्ये नर्सिंग, लॅब टेक्नोलॉजी, फार्मसी असे कोर्स करु शकता.
- Popular Medical Diploma After 10th | वैद्यकीय डिप्लोमा
- Veterinary Courses After 10th | पशुवैद्यकीय अभ्यासक्रम
- Pharmacy Courses After 10th | 10वी नंतर फार्मसी कोर्सेस
- List of the Paramedical Courses | पॅरामेडिकल कोर्सेस यादी
आयटीआय
ज्या विदयार्थ्यांना 10वी नंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते आपल्या आवडीनुसार कोर्सची निवड करु शकतात. आयटीआयमध्ये विदयार्थ्यांना विविध तांत्रिक कौशल्ये शिकवली जातात. या कोर्सनंतर विदयार्थी स्वत:चा रोजगाराचा मार्ग शोधू शकतात. (What To Do After The 10th?)
- The Most Popular ITI Trades | सर्वोत्तम ITI अभ्यासक्रम
- The Best ITI Trades After 8th and 10th |सर्वोत्तम ITI कोर्स
सारांष
अशाप्रकारे, विदयार्थी त्यांच्या प्रथम पसंतिनुसार त्याचा करिअरचा मार्ग निवडू शकतात. वरील माहितीनुसार तुमच्यासाठी जे सर्वोत्तम असेल ते निवडा. आणि अजुनही मनात गोंधळ असेल तर, करिअर समुपदेशन म्हणजेच करिअर काउन्सिलरचा सल्ला घ्या, ते तुम्हाला करिअर मार्गदर्शन करतील. (What To Do After The 10th?)
- Know the short term courses after 10th | शॉर्ट टर्म कोर्स
- Know the top 5 Courses after 10th | 10 वी नंतरचे 5 कोर्स
- Career Opportunities in the Arts Stream | 10 वी नंतर करिअर संधी
- List of the most popular courses after 10th | 10 वी नंतर पुढे काय?
आमच्या Etopcollection वेबसाईटला जरुर भेट द्या, तसेच शैक्षणिक माहितीसाठी “ज्ञानज्योत” शैक्षणिक मराठी संकेत स्थळाला भेट द्या.
